Login

अर्धांगिनी - भाग -13

बायको

अर्धांगिनी - भाग -13


दीर्घकथा लेखन स्पर्धा


       आसिफ दर दोन दिवसाआड आता माझ्याबरोबर शारीरिक संबंधाला जबरदस्ती करू लागला, आणि मी नाही म्हणायची सोय नव्हती, तो माझं ऐकून घेतंच नव्हता, आणि असेच तीन महिने गेले, आसिफ माझ्याशी अतिशय गोड बोलत असे, अगदी मैत्रिणीसारख्या गप्पा मारत असे.


      कितीही काही झालं तरी मी इथून सुटणार नव्हते, त्यामुळे प्रयत्न करायचं नाही असं मी ठरवलं होतं, पण ते कितपत शक्य होणारं होतं हे त्या देवालाचं माहित होतं...त्यासाठी कसं आणि कांय नियोजन करायचं असं मी सतत मनोमन म्हणतं असे पण त्यासाठी आसिफचं मन जिंकण गरजेचे होते, आणि तेचं अतिकठिण होते.


     आसिफला माझ्यात गुंतवून मी इथून माझी सुटका करून घ्यायची असं मी म्हणून पण तो माझ्यात गुंतण्यासाठी मी माझं सर्वस्व पणाला लावलं होतं. पण मन मानायला तयार न्हवते, माझी शालिनता त्यात पणाला लागली होती, मी इंडियाला गेल्यावर आई - बाबांना कांय तोंड दाखवणार होते, त्यांना किती दुखावणार होते ते माझंच मला माहित होते.



   
मी नक्कीच चुकली होती, मी चुकीचं पाऊलं उचलते आहे हे मला समजत होते, पण इथे अडकून पडण्याला काय अर्थ होता आणि किती दिवस ते पण कळत नव्हते, त्यामुळे सध्या तरी ह्या नात्याला स्वीकारावं आणि पुढे जावं असं माझं मन म्हणत होतं.


पुढे काय होणार आणि त्याचे परिणाम कांय होतील असं मी सतत म्हणत राहत असे. चार महिन्यांनी माझी पाळी चुकली मला काय करू कळत नव्हते.


तीन दिवसांनी रात्री आसिफ जेवायला आल्यावर मी त्याला म्हंटल, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं, तो म्हणाला हा शर्वरी बोल नां...

आसिफ मी गरोदर आहे असं मला वाटतंय...पण अजून खात्री नाही आहे, आपण चेक करूयात... खात्री करून घ्यायला हवी, प्रेग्नेंसी किट आण आपण चेक करूयात...टेस्ट पॉझिटिव्ह असेल तर आपण हॉस्पिटलमध्ये जाऊ चेकअप करायला."


आसिफ अतिशय खुश झाला, त्याच्या डोळ्यात पाणी आलं, त्याने हात जोडून देवाचे आभार मानले..माझं मुलं, मी बाप होणार, देवा हे सुखं खूप उशिरा कां होईना पण मला दिलंस, असं तो म्हणत आयशाला सांगायला बाहेर पडला.


आणि मी इकडे विचार करू लागले, म्हणजे मी विचार करत होते ते बरोबर होतं, आसिफला स्वतःच मुलं न्हवतं, त्याच्या आणि आयशाच्या लग्नाला अकरा वर्ष झाली होती, आणि आयशामध्ये प्रॉब्लेम असावा म्हणून तर आसिफने ह्या सगळ्यासाठी माझी निवड केली असणार.



आसिफ थोड्या वेळाने प्रेग्नेंसी किट घेऊन आला आणि मला म्हणाला मी आयशाला आत पाठवतो तु टेस्ट करून घे, मला खूप कसतरीच वाटतं होतं, आयशाला किती दुःख होतं असेल नां असा विचार करून वाईट वाटतं होतं.


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत- प्रेग्नेंसी टेस्ट पॉझिटिव्ह आल्यावर पुढे अजून कांय घडतं ते)


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख



सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही"
0

🎭 Series Post

View all