अर्धांगिनी - भाग - 14
दीर्घकथा लेखन स्पर्धा
आयशा थोड्या वेळाने किट घेऊन आत आली, मला मनापासून तिच्यासाठी खूप वाईट वाटतं होतं, ती मला किती वाईट समजत असेल नां, असं मी मनात म्हणत होते.
टेस्ट पॉझिटिव्ह का निगेटिव्ह येते, हे ऐकण्यासाठी ती बाथरूमच्या बाहेर थांबली होती, मी मनात म्हणत होते निगेटिव्ह येऊदेत... पण टेस्ट पॉझिटिव्ह आली होती..... मी आयशाला सांगितले ती पटकन बाहेर जाऊन आसिफला बोलली.
आसिफ अगदी खुश होऊन हसत आत आला, आणि मला बोलला, आपल्याला हॉस्पिटलला जायला हवं, उदया सकाळी जाऊयात.. मी बरं बोलून गप्प बसले..
सकाळी लवकरच आसिफ मला येऊन बोलला हा तुझ्यासाठी नाष्टा आणला आहे, तो खाऊन घे, आणि तयारी कर, आपल्याला हॉस्पिटलला जायचं आहे, त्याने एक काळा पूर्ण कोट माझ्यासमोर ठेवला आणि बोलला, तुझ्या ड्रेसवर हे घाल, आणि आयशा तुला स्कार्फ बांधेल. मी बरं म्हंटल.
आसिफच्या गाडीने मी आयशा, आसिफ हॉस्पिटलला पोचलो, डॉक्टरने चेक केलं आणि सोनोग्राफी झाल्यावर बोलली मी प्रेग्नेंट आहे, औषधं लिहून दिली, आणि आयशाला माझ्याकडे लक्ष द्यायला सांगितले.
माझ्या चेकअपनंतर आसिफ खुशीत आम्हाला जेवायला घेऊन गेला, मी बऱ्याच दिवसांनी बाहेरचं जग पाहत असल्यामुळे मला फ्रेश वाटतं होतं, तो ह्या बातमीने एवढा खुश होता की माझी अगदी खूप काळजी घेत होता, मला सारखं कांय हवं नको ते पाहत होता.
आजचा आसिफ काही वेगळाचं होता, त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद काही वेगळाचं होता, त्याला मला कुठे ठेवू आणि कुठे नको असं झालं होतं, आणि मी आयशाचा विचार करत होते, तीला स्वतःच्या नवऱ्याला माझ्याशी असं वागताना पाहून किती दुःख होतं असेल नां, असं मी मनात म्हणत होते.
आसिफ सतत मला तुला काही हवं कां असं विचारत होता, दोन- तीन दुकानाजवळ त्याने गाडी थांबवून तुला कांय हवं असेल ते घे, असंही म्हणाला.
मी काय घेणार होते मी एका रूममध्ये राहतं होते, ती पण बंदी म्हणून मला कांय लागणार होते, मी नको काहीच नको म्हणत राहिले.
घरी पोहोचल्यावर आसिफने मला रूममध्ये येऊन जवळ घेतले आणि म्हणाला, हे सुखं मला देण्यासाठी, तुझे खूप खूप आभार.. मी तुला कोणत्या शब्दात थँक्स म्हणू तेच मला कळतं नाही आहे.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - आसिफचं शर्वरी प्रति वागणं अजून चांगल होतं जातं आणि ती इथून सुटते की नाही ते )
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
देवरुख
सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा