Login

अर्धांगिनी - भाग -22

बायको
अर्धांगिनी - भाग - 22


दीर्घकथा लेखन स्पर्धा


दुसऱ्या दिवशी सकाळपासून आसिफ आणि आयशा माझ्याशी दुश्मनांसारखं वागू लागले, मला सकाळचे दहा वाजले तरी नाश्ता दिला नव्हता, नाहीतर नेहमी नऊ वाजताच नाश्ता घेवून आयशा रूममध्ये यायची, आज दहा वाजले त्तरी तिचा पत्ता न्हवता.


मी रूममधून बाहेर डोकावून बघितलं तर डायनिंग टेबलंवर चक्क आयशा आणि आसिफ नाश्ता करत बोलत बसले होते, अरे मग मला कां नाश्ता नाही असं माझ्या मनात आलं, मी परत जाऊन बेडवर बसले.


एकतर नुकतंच बाळं गेल्यामुळे मला विकनेस पण होता, मला भूक लागली होती, मी मनात म्हंटल आज डिलिव्हरी होऊन पाचंचं दिवस झालेत आणि हे दोघेही माझा असा छळ करायला लागलेतं, देवाला मी मनात म्हंटल देवा अजून किती संकट देणार आहेस मला, सोडवं मला ह्या सगळ्यांतुन...



तेवढ्यात आयशा नाश्ता घेऊन आली, सरळ नाश्ता टेबलंवर ठेवून काहींचं नं बोलता निघून गेली, ती रागातचं होती, अक्षरशः फणफणत ती बाहेर गेली.


मी मनात म्हंटल, अरे हे दोघेही माझ्यावर कां चिडलेत, मी कांय केलंय, मी तर बेशुद्ध होते, माझ्या हातात न्हवतं ह्यांच्या बाळाला वाचवणं, आणि बाळं गेलं त्यात माझी कांय चूक नां, एकतर माझं कांय करणार आहेत पुन्हा काय माहित, मी पुन्हा अडकले त्याचंच मला दुःख होतंय, कसले नीच लोक आहेत हे.


अरे मी ओली बाळंतीण, मला काय त्रास होतोय कां, ते विचारायचं सोडून स्वतःचचं दुःख कुरवाळत बसलेत, बाळं नॉर्मल डिलिव्हरी होऊन बाहेर काढलं होतं, त्यामुळे मला चार टाके पडले होते, त्यामुळे मला बसायला, उठायला त्रास होतं होता, त्याची कोणालाचं काहीचं पडली नव्हती.


असाचं एक महिना गेला, मी आपली आत पडून राहत असे, आता हे लोक माझा छळ करू लागले होते, जेवण पहिलं अगदी टाईम मध्येच दयायचे आता जेव्हा मी विचारेन तेव्हा आणून देतात, आणि आधी आसिफ माझ्याबाजूला बसून जेवत असे, आता आसिफ आतही येत नसे.


असेच दिवस चालले होते, चार महिने होऊन गेले आणि आसिफ पुन्हा माझ्याशी अगदी गोड बोलायला लागला, मी समजून गेले आता ह्याला पुन्हा मुलं हवं असणार, मी आतल्या आत त्या विचारानेच कोसळून गेले.

पण मी ठरवलं आता हार मानायची नाही, कोणाला तरी कां होईना मी इथे अडकली आहे हे कळायलाचं हवं, ह्या लोकांना शिक्षा व्हायला हवीय.


( पुढच्या येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत - शर्वरी कशी सुटते आणि त्यासाठी ती काय प्रयत्न करते ते.)

( वाचकहो - ही कथा - 50 भागाची आहे, त्यामुळे शर्वरीचं पुढे कांय झालं ते बघण्यासाठी कथेचे रोज येणारे भाग वाचत रहा.)

सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख


सदर दीर्घकथेचे भाग नियमित पोस्ट होणार असून याचे पुढील भाग चुकू नयेत म्हणून पेज फॉलो करा आणि फॉलो सेटिंग मध्ये जाऊन "fevorite" ऑप्शन निवडून घ्या जेणेकरून एकही भाग सुटणार नाही".
0

🎭 Series Post

View all