Login

अर्धांगिनी - 38

बायको
अर्धांगिनी - भाग - 38


( मागच्या भागात आपण बघितले - शर्वरीला पाहून वहिनी नाराज होते आता पुढे)


रात्रीची जेवण होतात, दादा - वाहिनी आत झोपायला जातात, शर्वरी हॉलमध्ये झोपते, शर्वरीला झोप येत नसते, ती विचार करत राहते मी ह्यांच्या संसारात ओझं वाटतेय वहिनीला, पण इथे राहण्याशिवाय दुसरा पर्याय पण नाही आहे माझ्याकडे, तीला तिचे झालेले हाल आणि इथे आल्यावर पण आई- बाबा नाहीत, असं सगळं आठवून रडायला येतं.


वहिनी - साक्षी विचार करत राहते - ही शर्वरी खोटं बोलतेय असं वाटतंयं - कारण सात वर्ष हिला नोकर म्हणून ठेवलं आणि पगार दिला नाही, ही इतकी सहज फसेल अशी साधी पण दिसत नाही आहे, तीला ह्यातलं काहींचं खरं वाटतं नसतं, पण दादाचं खुश होणं बघून ती त्याला काही विचारत नाही, पण तीला शर्वरिचं असं अचानक येणं पटलेलं नसतं.


सकाळी शर्वरी लवकरच उठते, वहिनी किचनमध्ये दादाचा टिफिन तयार करत असतें, शर्वरी तीला विचारते वहिनी मी तुला मदत करू कां, वहिनी नको एवढंच बोलते, दादा अंघोळ करून बाहेर येतो, शर्वरी त्याला बोलते दादा मला एखादी नोकरी बघशील, मी घरी राहून दिवसभर काय करणार...



दादा बोलतो, हो बघूया नोकरी पण आधी लगेचच नको मी तुला संध्याकाळी माझा लॅपटॉप देतो तू तुझा त्यात बायोडाटा टाईप कर, आणि मग तो आपण फॉरवर्ड करू... अँपलाय करू कुठेतरी, मिळेल नोकरी... आणि उदया दुकानात जाऊन तुला मोबाईल पण घेऊ हा...


दादा ऑफिसला निघून जातो, आता घरात साक्षी आणि शर्वरी दोघीच उरतात, साक्षी शर्वरिशी मोजकंचं बोलत असतें, घरातली सगळी काम झाल्यावर शर्वरी सोफ्यावर टीव्ही बघत बसलेली असतें, साक्षी तीच्या बाजूला जाऊन बसते आणि बोलते, परदेशात सात वर्ष राहूनसुद्धा आपल्या माणसांना विसरली नाहीस हे नशीब, दादा खूप खुश आहे तुला बघून, पण मला खूप प्रश्न आहेत, तू सात वर्ष अडकून राहिलीस आणि ते पण एक रुपये पगार नं घेता, तिथे फक्त नोकराणीचं होतीस नां... की कोणाबरोबर लग्न करून पळून गेली होतीस आणि त्याच्याबरोबर पटलं नाही म्हणून आता त्याला सोडून पुन्हा आली आहेस? ते पण सात वर्षांनी.


साक्षीच्या वाक्यात संशय असतो, शर्वरी मनात म्हणते एक खोटं सावरायला आज किती वेळा मला खोटं बोलावं लागणार आहे देवचं जाणो, साक्षीचे प्रश्न ऐकून तीला मनातून खूप दाटून येत असतं, पण तरीही ती स्वतःला सावरून बोलते, वहिनी मी खरं सांगतेय, माझ्यावर अन्याय झाला होता, मी अडकून पडले होते तिथे, आणि शर्वरी रडायला लागते.



बरं बाई तू म्हणते आहेस ते खरं म्हणूया, तुझ्या दादाच्या पुढे मी काय बोलणार, तो तुला इथे घेऊन आलाय म्हंटल्यावर मी काय बोलणार आता... नीट रहा मात्र इथे, माझ्या डोक्याला कसला ताप देऊ नकोसं.... असं रागाने बोलून साक्षी बेडरूम मध्ये निघून जाते.


शर्वरीला खूप वाईट वाटतं, ती मनात म्हणते स्वतःच्या घरी येण्यासाठी सात वर्ष एक एक् दिवस रडून घालवला आणि इथे आल्यावर वहिनीला मी नकोशी झालेय....


( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - साक्षी शर्वरीला अजून काय त्रास देते आणि त्यामुळे शर्वरी अजूनच त्रासातच अडकते)


सौ. सॊनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all