Login

अर्धांगिनी - भाग -39

बायको
अर्धांगिनी - भाग - 39


शर्वरीला आता स्वतःच घरं असून पण त्यात परक्यासारखं वाटतं राहतं, साक्षी शर्वरीला मुद्दाम काहींचं काम सांगत नसे, ती किचनमध्ये गेली तरी तू बाहेर जा, असं बोलत असे.


दुपारी साक्षी बेडरूममध्ये फोनवर कोणाशीतरी बोलताना, शर्वरी तिची काही वाक्य ऐकते, ह्यांची बहीण आली आहे दुबईतुन काय माहित कुठे होती एवढे वर्ष, आताच्या मुलींचं काय सांगायचं, खोटं बोलतेय की खरं काय माहित, नोकरी लागुदेत लवकरच बाई हिला दिवसभर माझ्या डोक्यावर नको ही बसायला...


शर्वरीला तिची वाक्य ऐकून रडायला येतं असतं, पण ती काय करणार होती तीला दादाशिवाय दुसऱ्या कोणाचाच आधार नव्हता.


शर्वरी रडतं मनातल्या मनात म्हणते, कसलं नशीब आहे माझं, आणि अजून काय वाढून ठेवलं आहे देवाने माझ्या नशिबात, माझी काहीही चूक नसताना नियती मला ह्या कुठल्या दृष्ट चक्रात अडकवतेय...ती देवाच्या फ़ोटोजवळ जाऊन देवालाच म्हणते, कुठल्या पापाची शिक्षा देतो आहेस मला... तेवढ्यात तीला साक्षी आल्याचा भास होतो, ती डोळे पुसते, आणि तोंड धुवून पुन्हा सोफ्यावर जाऊन बसते. संध्याकाळी साक्षी शर्वरीला चहा- टोस्ट देते, आणि पुन्हा आत निघून जाते..


संध्याकाळी दादा ऑफिसवरून येतो. शर्वरी त्याच्याकडे पाहून हसण्याचा प्रयत्न करते. तो सहज विचारतो,“दिवस कसा गेला?”शर्वरी काही बोलणार, तेवढ्यात साक्षी मध्येच म्हणते..


“कसा जाणार, दिवसभर टीव्हीच बघत होती.”हे साक्षीचं वाक्य ऐकून शर्वरीला वाईट वाटतं, पण ती काहीच बोलत नाही.


रात्री जेवताना साक्षी म्हणते, “उद्या मी माझ्या मैत्रिणीकडे जाणार आहे, तू घर सांभाळ. आणि बाहेर कुठे जायचं नाही. लोक काय बोलतील सांगता येत नाही.”


शर्वरीच्या डोळ्यांत पाणी तरळतं, तिला आठवतं —दुबईतही ती अशीच कैद होती. वेगळ्या भिंती, वेगळ्या लोकांमध्ये… पण भावना तीच.


रात्री सगळे झोपल्यानंतर शर्वरी हॉलमध्ये बसून आई-बाबांचा फोटो हातात घेते आणि म्हणते,आणि रडतं म्हणते, “आई… बाबा… मी परत आले आहे,  पण तरीही एकटीच आहे. तुम्ही असता तर किमान माझ्यावर विश्वास तरी ठेवला असतातं …”


ती जोरात डोळे मिटते,आणि भिंतीला टेकून बसते. तिच्या मनात एकच विचार फिरत राहतो,इथूनही मला हाकलून दिलं गेलं, तर मी कुठे जाऊ ? घर असूनही, मी पूर्णपणे एकटी पडले आहे.


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all