Login

अर्धांगिनी - भाग -40

बायको
अर्धांगिनी - भाग - 40


शर्वरी रात्री आई–बाबांचा फोटो हळूच उशीखाली ठेवते. अश्रू पुसते, पण डोळ्यांतील ओल काही केल्या आटत नाही. घरातला प्रत्येक आवाज तिला बोचू लागतो,  कधी दादाच्या पावलांचा आवाज, कधी साक्षीच्या बेडरूमची कडी, सगळंच तिला असुरक्षित वाटायला लागतं.



रात्री उशिरापर्यंत ती जागी असते, तिला झोप लागत नाही. डोळे मिटले की दुबईतले दिवस डोळ्यांसमोर उभे राहत होते - आसिफचं वागणं, तिच्या मनावर उमटलेली भीती, ती दचकून उठते, घामाघूम होते, ती पाण्याचा घोट घेते आणि पुन्हा झोपायचा प्रयत्न करते, रात्री उशिरा तीला झोप लागते.


दुस्र्या दिवशी सकाळी साक्षी मैत्रीणीकडे जायला दादाबरोबरचं निघताना थोडक्यात सांगून जाते, मी संध्याकाळपर्यंत येईन, जमलं तर स्वयंपाक करून ठेवं, दार उघडू नकोस, कुणाला आत घेऊ नकोसं ”त्या एका वाक्यातच शर्वरीला पुन्हा कैद झाल्यासारखं वाटतं. दादा - वहिनी निघून जातात,दार बंद होतं. घरात नुसती शांतता.




दुपारच्या सुमारास शर्वरीला अस्वस्थ वाटू लागत, ती सोफ्यावर बसून डोळे मिटते. खोल श्वास घेते, ती स्वतःशी पुटपुटते देवा कां माझ्या वाट्याला अशी संकट देतो आहेस ,थोड्या वेळाने सावरते, पण मन थकलेलं असतं, ती उठून भात - डाळचा कुकर लावते, आणि फ्रिजमधली कोबीची भाजी चिरायला घेते, ती एक तासात भाजी, चपाती, डाळ करून जेवण झाकून ठेवते, आणि बाहेर येऊन सोफ्यावर वर्तमानपत्र वाचायला घेते.


संध्याकाळी साक्षी परत येते तेव्हा शर्वरी शांत बसलेली असते, साक्षी तिच्याकडे पाहते आणि विचारते - जेवण केलेस कां.. शर्वरी हो सगळा स्वयंपाक झाला आहे असं बोलते. साक्षी आत निघून जाते.


संध्याकाळी दादा येतो, चहा पीत असताना साक्षी त्याला बोलते, शर्वरीचं काय करायचं ठरवलं आहे तुम्ही, म्हणजे तीच्या लग्नाचं बघताय की नोकरीचं,शर्वरिला लवकर नोकरी लागली पाहिजे, घरात बसून सतत विचार करत राहते, टीव्ही बघत राहते.


दादा बोलतो, लग्नाचं नंतर बघू, ते सध्या राहुदेत आणि माझे तीच्या नोकरीसाठी प्रयत्न चालू आहेत,आणि तो शर्वरीला म्हणतो, शर्वरी चल आपण तुला मोबाईल घ्यायला जाऊ, जा तयारी कर, तू आल्यापासून आठ दिवस झाले कुठेही गेलेली नाही आहेस, चल जरा जवळून राउंड मारून येऊ...


शर्वरीच्या मनात कालवा - कालव होते ती मनात म्हणते, माझं लग्न...
पण त्याच वेळी तिच्या मनात येतं, जर सत्य बाहेर आलं, तर? माझे आधीचं दोन अबोर्शन झाले आहेत हे होणाऱ्या नवऱ्याला समजणार, त्यापेक्षा नकोचं लग्न...


घरात शांतता असते. पण त्या शांततेत शर्वरीच्या श्वासांचा भार वाढत जातो, ती तिथेच विचार करत उभी असतें, दादा म्हणतो अगं शऱू जा तयारी कर आपण बाहेर जातोय नां.. तेव्हा ती भानावर येते.


(पुढच्या भागात आपण पाहणार आहोत— शर्वरिचं सत्य बाहेर येतं कां ते )


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0

🎭 Series Post

View all