अर्धांगिनी - भाग - 41
दादाच्या आवाजाने शर्वरी भानावर येते. ती पटकन आत जाते, साधासा ड्रेस घालते, केस नीट विंचरते, आरशात स्वतःकडे पाहताना तिला क्षणभर स्वतःचीच ओळख पटत नाही, हीच का मी? सात वर्षांपूर्वीची ती हसरी शर्वरी कुठेतरी हरवलेली दिसते, तीच्या डोळ्यात स्वतःला पाहून पाणी येतं. डोळे पुसते आणि ती बाहेर येते,
दादा आणि वहिनी तयार असतात, तिघेही बाहेर पडतात, दादा पुढे जातो, आणि साक्षी त्याच्या थोडं मागे, शर्वरी आपली एकटीच चालत असतें, बिल्डिंगखाली गाडीमध्ये बसल्यावर कुणीच बोलत नाही, बाहेरचे रस्ते, लोकांची गर्दी, दुकाने… सगळं असूनही शर्वरीला वाटतं—मी ह्या जगात अजूनही एकटीच आहे.
मोबाईलच्या दुकानात दादा वेगवेगळे मोबाईल दाखवतो,“हा बघ,तो बघ … तुझ्या वापराला पुरेसा असं सगळं...तो प्रेमाने म्हणत असतो, शर्वरी फक्त मान हलवत असते, दादा मोबाईल घेऊन शर्वरीच्या हातात देतो.
मोबाईल हातात घेताना तिचे हात थरथरतात, तिला अचानक दुबईतला तो फोन आठवतो—जो तिच्या हातात कधीच नव्हता, पण ज्यावरून तिचं आयुष्य कुणीतरी नियंत्रित केलं होतं, तिचा श्वास अडखळतो,ती घाबरिघुबरी होते..
साक्षी ते पाहते आणि म्हणते, “काय झालं?”
तिच्या आवाजात काळजीपेक्षा संशय जास्त असतो.
“काही नाही,” शर्वरी पटकन म्हणते, मोबाईल घेतल्यावर दादा खुश असतो.
“आता तू कुणाशीही संपर्कात राहू शकशील,”तो सहज बोलतो.
तेव्हा शर्वरीच्या मनात विचार येतो—कोणाशी? माझ्या आयुष्यात माझं म्हणावं असं कोण आहे?
तेव्हा शर्वरीच्या मनात विचार येतो—कोणाशी? माझ्या आयुष्यात माझं म्हणावं असं कोण आहे?
परत येताना अचानक शर्वरीला चक्कर येते. गाडी थांबवावी लागते, तीच्या डोळ्यांसमोर अंधार दाटतो.
“शर्वरी!”
दादा घाबरून हाक मारतो, शर्वरीला पाणी पाजलं जातं. ती थोडी सावरते,
“शर्वरी!”
दादा घाबरून हाक मारतो, शर्वरीला पाणी पाजलं जातं. ती थोडी सावरते,
शऱू...“आपण डॉक्टरकडे जाऊ,”
दादा म्हणतो.
“नको… मी ठीक आहे,शर्वरी म्हणते काही नाही रे बऱ्याच दिवसांनी मोकळा श्वास घेतला नां त्यामुळे झालं असेल असं.
घरी परतताना साक्षी गप्प असते., रात्री साक्षीला झोप येतं नसते, शर्वरीचा थकलेला चेहरा तिच्या डोळ्यांसमोर येत राहतो.
खरंच ही खोटं बोलतेय… की मीच चुकीचं वागत होते?
दुसऱ्या खोलीत शर्वरी उशीमध्ये तोंड खुपसून रडत असते.
सत्य किती दिवस लपवणार? हा प्रश्न तिला पोखरत राहतो.
घरात पुन्हा शांतता असते…पण ही शांतता आता वादळाआधीची असते.
सत्य किती दिवस लपवणार? हा प्रश्न तिला पोखरत राहतो.
घरात पुन्हा शांतता असते…पण ही शांतता आता वादळाआधीची असते.
(पुढच्या भागात आपण पाहणार आहोत — शर्वरीचं दडलेलं सत्य हळूहळू कसं उघडू लागतं, आणि साक्षीच्या मनातला कठोरपणा कसा तुटायला लागतो.)
सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा