बायकोचा सिक्स्थ सेन्स

बायकोचा सिक्स्थ सेन्स
नमिता टीव्ही समोर बसली होती. टीव्ही वर समोर एक हॉरर वेब सीरिज चालु होती. टीव्ही बघताना हाताने गवारीच्या शेंगा निवडण्याच काम सूरू होत. वेब सीरिज अगदी मध्यावर आली होती.

ती मुलगी घाबरून, पायात डोकं घालून बसली होती. समोरच्या कपाटातून काहीतरी धुरा सारख बाहेर पडू लागलं. त्या सिनला साजेसा भिती वाढवणारा आवज ऐकु येत होता. नमिता हातातली शेंग तशीच हातात पकडुन , तिचा श्वास रोखून , तो सिन बघत होती. टीव्ही बघण्यात अगदी तल्लीन झाली होती.

इतक्यात समोरच्या रूमचा दरवाजा उघडला गेला. तिचा नवरा मयंक फोन वर बोलतं बोलत बेडरूम मधून बाहेर पडला. नमिताच्या समोरून किचन मध्ये गेला. फ्रीज मधून पाण्याची बाटली काढली. पाणी प्यायला. बाटली तशीच ओट्यावर ठेवली. ड्रॉवर उघडला. काहीतरी तो शोधत होता. त्याला भूक लागली होती.

" मयंक, स्नॅक्स , काचेच्या दरवाज्यातील कपाटात ठेवले आहेत."

त्याने समोरच्या कपाटातून डबा काढला. त्यात फरसाण चकली अस सगळ होत. त्याने बाऊल भर स्नॅक्स काढून घेतले. बाऊल काढताना त्याने त्या ड्रॉवर मधील रिकामे डबे आणि बाऊल काढून ओट्यावर ठेवले.त्याला हवा असलेला छोटा, निळ्या रंगाचा काचेचा बाऊल सर्वात मागच्या बाजूला ठेवला होता.डबा तसाच ओट्यावर ठेवला. तो पाणी प्यायला ग्लास घेत होता. इतक्यात तिचा आवज ऐकु आला.

" डबा जागेवर ठेवून दे. बाकीचे बाऊल ड्रॉवर मध्ये परत ठेवून दे. ओट्यावर पसारा नको करुस."

त्याने बाहेर काढलेल्या वस्तू पुन्हा ड्रॉव्हर मध्ये नीट जागेवर ठेवून दिल्या. स्नॅक्स सोबत थोडी कॉफी पिऊ, असा विचार करत त्याने ड्रॉवर उघडला.

" मयंक स्नॅक्स सोबत कॉफी आजिबात प्यायची नाही. आज सकाळ पासुन तीन वेळा कॉफी प्यायला आहेस तू."

ड्रॉवर मधून कॉफी साखरेचे डबे काढण्यासाठी पुढें झालेला त्याचा हात जागीच थांबला.

' ठिक आहे कॉफी नाही तर काहीतरी गोड खाऊ ' तो स्वतःशीच पुटपुटला.

" फ्रिज मध्ये चॉकलेट्स आहेत. एकच घे. मी चॉकलेट्स मोजून ठेवले आहेत. आठ चॉकलेट्स आहेत."

त्यावेळी मयंक काहीतरी गोड खाण्यासाठी फ्रिज मधे काही तरी शोधत होता. त्याला फ्रिज मध्ये चॉकलेट्स असतात. हे माहीत होत. म्हणूनच तो फ्रिज उघडण्यासाठी फ्रिजच्या दरवाज्याच हॅण्डल धरून उभा होता.त्याने एकच चॉकलेट घेतलं.

" चॉकलेटच रॅपर ओट्यावरच्या कचऱ्याच्या डब्यात टाक."

तिची सूचना आलीच. त्याने चॉकलेट खायला रॅपर फाडल होत. चॉकलेट तोंडात टाकल होत. रॅपर शेजारच्या किचन काट्यावर तसचं टाकल होत. तिची सूचना ऐकुन त्याने रॅपर कचऱ्याच्या डब्यात टाकल.

पाण्याचा ग्लास भरून घेतला. एका ट्रे मधे बाऊल आणि पाण्याचा ग्लास ठेवला. दोन्ही वस्तु घेउन बेडरूम मध्ये जायला निघाला.तो दोन पावलं चालला असेल की,

" मयंक, ओट्यावरचा मोबाइल घेउन जा. मी बाल्कनी मध्ये आणून देणार नाही."

तिची सूचना ऐकुन त्याने स्वतः कडे बघितलं तर त्याने मोबाइल फोन हातात घेतला. तो निघाला. तो तर विसरून गेला होता , तो किचन मध्ये स्नॅक्स घेण्यासाठी आला होता. त्याने स्नॅक्स ट्रे मध्ये ठेवले होते. ट्रे तसाच ओट्यावर ठेवला होता. मोबाईल फोन बघत तो किचन मधून बाहेर निघाला होता. चॉकलेट खाताना त्याच्या फोन वर एक मेसेज आला होता. चॉकलेट चघळत तो मेसेज वाचत होता. त्या नादात तसाच बाहेर पडत होता.

आता मयंक च डोकं सटकल. नमिता तर वेब सीरिज बघत होती. त्या सोबत भाजी निवडायचं काम करत होती. समोरचा भिती दायक सिन सुरू झाल्यावर श्वास रोखून ' पुढं काय होणार ' या उत्सुकतेनं सिन बघत होती.

मयंक किचन मध्ये उभा होता. किचन आणि लिव्हिंग रूम या मध्ये एक गेस्ट रूम आणि वॉश बेसिन आणि बाथरूम आहे.त्या रूमच्या पुढें कोपऱ्यात किचन आहे. लिव्हिंग रूममधुन किचन दिसत नाही. किचन मधून बाहेर आल्या शिवाय लिव्हिंग रूममध्ये काय चालु आहे ते समजत नाही. अस असताना देखील नमितला, मयंक किचन मधे काय करत आहे, हे सगळं कसं काय समजत होत.?

" हिला कुठली काळी जादू तर नाही ना येत.? किंवा भिंती पलीकडचं बघण्याची दृष्टी तर नाही ना तिच्याकडे ?."

एक बालिश प्रश्न त्याच्या मनात चमकून गेला. त्याने ट्रे ओट्यावर ठेवला. मोबाइल हातात घेतला. नी निघाला.

" मयंक, मोबाईल बघण्याच्या नादात ट्रे ओट्यावर तसाच राहिला आहे."

पुन्हा एक पाऊल टाकल असेल की, तिची सूचना ऐकु आली. त्याने स्वतः ला बघितलं तर तो ट्रे ओट्यावर ठेवून मोबाईल बघत किचन च्या दरवाज्यात उभा होता. मोबाइल खिशात ठेवला. ओट्यावरचा ट्रे उचलला. तो निघाला.

" किचन चा लाईट येताना बंद करून ये."

त्यावेळी तो स्विच बोर्ड जवळ उभा होता. अजून एक पाऊल पुढे तो बेडरूम च्या पॅसेजमध्ये आला असता.

त्याने ट्रे एका हातात सांभाळत स्विच ऑफ केला.
ताड ताड पावलं टाकत तो लिव्हिंग रूममध्ये आला.

" तुला काय भिंती पलीकडचं सगळं दिसतं का ? जादू वगेरे आहे का तुझ्याकडे ? "

तिने त्याच्या कडे बघितलं पण नाही. नुसतीच हसली. तो पुढे काही बोलणार, तिला काही विचारणार, त्या आधीच त्याच्या मोबाइल फोन वाजला, त्याने मोबाईल उचलण्यासाठी ट्रे समोरच्या सेंटर टेबल वर ठेवला. तो मोबाईल फोन उचलणार त्या आधी नमिता म्हणाली,

" मयंक प्रणवचा फोन असेल, त्याने विचारलं संध्याकाळी भेटू, तर नकार दे, आपल्याला संध्याकाळी किराणा आणायला जायचं आहे."

मयंक तिच्या कडे बघतच राहिला. ती वेबसिरीज चा हॉरर सिन बघत होती, हातातली गवारीची शेंग तशीच पकडली होती. तरी देखील तिला मयंक काय करणार आहे, हे सगळं समजत होत ?

त्याने मोबाईल फोन बघितला तर खरंच त्यावर नाव फ्लॅश होत होत ,

" प्रणव कॉलिंग "

त्याने मोबाइल फोन अन्सर केला.

" हॅलो, मयंक, अरे आज संध्याकाळी भेटायचं का ? कार्तिक पण येणार आहे."

" मी त.. तुला नंतर फोन करतो."

खरचं प्रणवचा फोन आला होता. त्याने नेमका तोच प्रश्न विचारला जो नमिताने त्याला सांगितला होता. ते सगळं तसचं घडताना बघून त्याचे डोळेच विस्फारले गेले होते.

त्याने मोबाईल फोन वरच बोलण आटोपलं. पाठी मागे वळून पाहिले तर मागच्या तिच्या पोझिशन मध्ये तूस भर फरक पडला नव्हता. त्याने शेवटी तिला मागचा प्रश्न विचारलाच,

" तुला काय भिंती पलीकडचं सगळं दिसतं का ?

जादू आहे का तुझ्याकडे ?

तुला काय भविष्य कळत का, आता पुढच्या क्षणाला काय घडणार आहे ते समजतं ?

तुला कस कळलं प्रणव चा फोन असेल, तो संध्याकाळी भेटायचं का हेच विचारेल ? की ,

अस काहीतरी घडणार आहे याचा तुला अंदाज होता ? " त्याने पटापट प्रश्न विचारले.

" त्याला बायकोचा सिक्स्थ सेन्स म्हणतात. तु कधी कसा वागू शकतो, हे मला इथ बसून समजत."

ती हसुन म्हणाली. बोलता बोलता तिने हातातली शेंग चार तुकड्यात तोडून ताटलीत ठेवली. पुन्हा टीव्ही बघण्यात गुंग झाली.

त्याने हातातला ट्रे सेंटर टेबल वर ठेवला. तिच्या समोर वाकून, किंचित् झुकत नमस्कार केला.

" बायकांच्या सिक्स्थ सेन्सला वाकून नमस्कार." तो खरच कंबरेत किंचित् झुकला होता.

ती नुसतीच हसली.

खरं आहे ना, बायकांचा सिक्स्थ सेन्स जबरदस्त असतो.

समोरचा माणूस आपल्या कडे ज्या नजरेने बघत आहे, त्या नुसत्या एका कटाकक्षात समजून जातात, समोरच्या व्यक्तीला तिच्या कडून काय अपेक्षा आहेत !


🎭 Series Post

View all