ही रात्र संपूच नये
आभाळ नक्षत्रांचे
मणिहार तारकांचे
येथेच राहो सदाचे
हि रात्र संपूच नये
हातात हात गुंफुनी
भान विसरलो आम्ही
सायासांनी लाभलेली
ही रात्र संपूच नये
भान विसरलो आम्ही
सायासांनी लाभलेली
ही रात्र संपूच नये
सुखद गारवा येई
या रात्रीच्या प्रहरातूनी
चमकदार चांदण्याची
ही रात्र संपूच नये
या रात्रीच्या प्रहरातूनी
चमकदार चांदण्याची
ही रात्र संपूच नये
रात्र मधुर स्वप्नांची
दिल्या घेतल्या वचनांची
दिठीची आणि मिठीची
ही रात्र संपूच नये
दिल्या घेतल्या वचनांची
दिठीची आणि मिठीची
ही रात्र संपूच नये
भरभर वेचू प्रेमाचे कण
अपूर्व वाटती हे क्षण
ह्या कणांच्या आणि क्षणांच्या
अविट गोडीन साठी
ही रात्र संपूच नये
रात्र संपली
लख्ख उजाडलं
आम्ही दोघे, ते कण आणि क्षण
घेऊन आपापल्या वाटेने
निघताना म्हणत आहोत,
" वाटत होतं, ती रात्र संपूच नये. "
.,.,....... योगिता मिलिंद नाखरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा