परतावा
अश्विन ऐक ना...प्रांजल किचन मधून आवाज देत बोलली तसा अश्विन अंघोळीला जाता जाता थांबला.
का गं काय झालं?
अरे आज सायंकाळी लवकर येशील का घरी?
आज... अगं आज येणारच होतो मी घरी पण कालच साहेबांनी मिटींग ठेवली आहे बाहेरच्या क्लायंट सोबत हॉटेल मेजबान मध्ये...
अच्छा... प्रांजलचा आवाज एकदम हळू झाला.
रियली सॉरी... लाडाने तिचा गालगुच्चा घेत बोलला.
अरे, पण तुला मी कालच सांगितले होते ना आपल्याला जायचे आहे म्हणून.. आज ना शलाकाच्या सासरचे येणार आहेत फायनल बोलणी करायला म्हणून आईने बोलावले आहे आपल्या दोघांना.
सॉरी यार आज खरंच नाही जमणार गं.
अरे,आईने खास तुला बोलावले आहे.
हो गं पण काय करु आमच्या बॉस ने आजच इंम्पारटेंट मिटींग ठेवली ना...
तुच आहे का एकटा काम करणारा... दुसऱ्या कोणाला सांगना जायला.
अगं, माझंच जाणं गरजेचे आहे कारण हा प्रॉजेक्ट मीच तयार केलेला आहे ना त्यामुळे मलाच जावे लागणार.
ठीक आहे... मग मी ऑफिस नंतर एकटीच जाऊन येते.
अगेन सॉरी यार.. तिच्या गालाचे चुंबन घेत तो बोलला. ती त्याच्या प्रेमळ स्पर्शाने हुरळून गेली.
चल, मी अंघोळीला जातो, म्हणत तो बाहेर निघून गेला.
प्रांजल ने दोघांचे टिफीन पॅक केले आणि ती पण तयारी करायला दुसऱ्या रुममध्ये गेली.
प्रांजल कॉलेजला लेक्चरर आणि अश्विन आयटी कंपनीत. मॅरेज ब्युरो च्या माध्यमातून त्यांनी एकमेकांना पसंत केलं, भेटीगाठी करून, स्वभाव जाणून घेऊन त्यांनी लग्न केलेलं. आत्ता लग्नाला जेमतेम तीन वर्ष झालेले.
अश्विन सकाळी साडे नऊला ऑफिसला निघत असे. प्रांजलचे कॉलेज अकरा वाजता असायचे त्यामुळे ती त्याच्या एक तासानंतर निघत असे.अश्विन ऑफिस ला गेल्यानंतर तीने स्वतः साठी कॉफी बनवली आणि समोर गॅलरीमध्ये येऊन बसली तोच शलाकाचा फोन आला,
ताई, तुम्ही येताय ना गं आज.
अगं, मीच येईल... अश्विनचं जमत नाहीये.
ताई, शेखरचे ताई जीजाजी पण येणार आहेत आज म्हणून जीजू पाहिजे होते गं..
अगं ते येणारच होते पण आज महत्वाची मिटींग आहे गं त्यांची.
ताई, आपल्याकडे केव्हाही बोलावले तेव्हाच जीजूंना काही ना काही अडचण येते का गं.. काहीशा नाराजीच्या सुरात ती बोलली,पण ताई तु येशील गं लवकर. प्लीज.
मी येते गं तु काळजी करु नकोस. मी येतांना खायचे घेऊन येते. बाबांना सांगुन देशील.
हो ताई...म्हणत तीने फोन बंद केला.
आपल्याकडे केव्हाही बोलावले तर जीजूंना काहींना काही अडचण येते... शलाकाचे शब्द तिच्या कानात घुमू लागले. तिला आठवले मागच्या आठवड्यात मयंक म्हणजे अश्विनच्या काकांच्या नातवाच्या वाढदिवसाला ती अश्विन सोबत दोन दिवस सुटी काढून गेलेली. मयंकला अंगठी आणि काका काकूंना कपडे तिने घेतले होते. याअगोदर मित्राच्या बहिणीचे लग्न झाले होते तेव्हा तिच्या कॉलेज मध्ये सेमिनार होता पण अश्विन ने आग्रह केला म्हणून ती त्याच्या सोबत गेली. नंतर प्रिन्सिपॉल मॅडमची बोलणी ऐकली तो भाग वेगळा. अश्विनच्या वडिलांचं फ्रॅक्चर झाले होते तेव्हा कॉलेजला सुट्टी होती म्हणून दीड महिना तीने त्यांची काळजी घेतली होती.एक एक करत असे अनेक प्रसंग तिला आठवू लागले.
पण....
तीने जेव्हाही तिच्या घरी त्याला चल म्हटले तेव्हा अश्विन काही ना काही कारण सांगून तिच्यासोबत आला नाही. एकदा तीला टायफाईड झाला होता तेव्हा त्याच्या घरच्यांना बोलावूनही कोणी आले नाही का तर सासूबाईंची कंबर लचकली होती म्हणून. शेवटी तिचेच आईवडिल आले होते. आपल्याकडे कधीही कामासाठी बोलावले तर असेच एक ना दोन कारणे सांगितली गेली. आपल्या कधीच कसे लक्षात आले नाही. विचार करता करता प्रांजल अस्वस्थ झाली. लग्नानंतर आपण अश्विन च्या परिवाराला आपले मानले, वेळी अवेळी मदतीला धावून गेलो पण जेव्हा कधी मला गरज पडली तेव्हा अतिशय गोड बोलून सगळ्यांनी आपले हात झटकून घेतलेले तिला आठवत गेले.
तीने कॉफीचा कप तोंडाला लावला. कॉफी कमालीची गार झाली होती पण डोक्यात मात्र विचारांचे वादळ पेटले होते.
काही दिवसातच प्रांजल च्या बहिणीचे लग्न ठरले. लग्नातही अश्विनने आणि त्याच्या घरच्यांनी गोड गोड बोलून हात आखडून पैसा, श्रम आणि वेळ खर्च केला पण तोरा मिरवायची एकही संधी सोडली नाही.
असेच दिवस जात होते. आणि एक दिवस...
प्रांजल, अगं सोमवारला मायराचा पाचवा वाढदिवस आहे. मायरा म्हणजे अश्विनच्या मोठ्या ताईची मुलगी. सायंकाळी ऑफिसमधून आल्यावर अश्विन बोलला.
अरे व्वा छानच की, प्रांजल त्याला चहाचा कप देत बोलली.
हो ना बघता बघता पिटुकली पाच वर्षांची झालीही. ताई बोलली की मागच्या वाढदिवसाला सकाळी आलात आणि सायंकाळी निघून गेलात. पण यावेळी सोमवारचा वाढदिवस आहे तेव्हा दोन दिवस मुक्कामाने यायचं.
अरे पण माझ्या कॉलेजमध्ये उद्या परवा ट्रेनिंग आहे.
अगं, ट्रेनिंग काय तु नंतरही करू शकते.
नाही यावेळी सगळ्यांना ट्रेनिंग करणे आवश्यक आहे असे प्रिन्सिपॉल मॅडमने सांगितले. तु असं कर ना तुच जाऊन ये, प्रेमाने त्यांच्या गालावर हात फिरवत म्हटले.
अगं पण मी एकटा जाणे बरे दिसणार नाही.
अरे त्यात काय विशेष मी पण बरेचदा एकटी गेलेली आहे माझ्या घरच्या कार्यक्रमात, हसत प्रांजल बोलली. एका क्षणासाठी तो गप्पच झाला.
बरं बाबा. मायराला आपण अंगठी करूया का?
तिच्या डोळ्यासमोर लग्नात बहिणीला गिफ्ट देण्याचा प्रसंग आठवला.
करूया की.. असं कर ना तु आज येतांना घेऊनच ये.
तु पण चल ना.
आले असते रे पण आता सध्या एक्स्ट्रा क्लासेस घेते आहे त्यामुळे थकून जाते मी. तशीही तुझी निवड खूप मस्त असते, त्याचेच शब्द आज त्यालाच परत करत तिने त्याच्या केसात प्रेमाने हात फिरवला.नेहमी आनंदाने दाद देणा-या अश्विनच्या चेहे-यावर काहीतरी चुकल्या चुकल्यासारखे भाव तिला दिसले. आजवर आपला एकही शब्द खाली पडू न देणा-या प्रांजलचे हे रूप त्यासाठी नवे होते. प्रांजलला ही असे कठोर वागायला आवडत नव्हते पण समोरचा जर आपल्या भावनांना समजून घेत नसेल तर त्याला त्याच्याच भाषेत समजावणे गरजेचे असते अशी मनाची समजूत घालून ती त्याला म्हणाली
ऐ आज तुझ्या आवडीचे मेथीचे पराठे सांगते करायला सांगते मावशीला.. म्हणत चहाचा खाली कप घेऊन ती किचनमध्ये निघून गेली.
वैशाली गोस्वामी

गोष्ट कशी वाटली अभिप्राय अवश्य द्या. शेयर करतांना नावासह शेयर करा ही विनंती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा