भान

मी नको होते का यायला, सर्वांना प्रश्न पडला आहे सोना तणतणत म्हणाली
*भान*

‘मीनल,अग निघायचं ना? आम्ही तयार आहोत’ रेखाताईंनी सुनेला आवाज दिला.
‘हो आई ,सर्व दूरचे दिवे ,गॅस बंद करून येते.

तेवढ्यात बाहेरची बेल वाजली.

‘अग बाई आता कोण? विचार करत रेखा ताईंनी दार उघडलं, सोना त्यांची लेक धडधडत घरात शिरली. हातातली पर्स फेकून सोफ्यावर धप्पकन बसली.
अग बाई सोना तू? अचानक!
तेवढ्यात मीनल पण बाहेर आली सोनाला पाहून तिने आश्चर्याने विचारलं’ सोना दी तुम्ही अचानक?’

कां? मी नको होते का यायला ? सर्वांनाच प्रश्न पडतोय? ती तणतणात म्हणाली. तुम्ही कुठे जात होता!?
मीनल काही न बोलता आत जाऊन एक ग्लास पाणी घेऊन आली व सोनाच्या हातात देऊन म्हणाली” बर झालं एवढ्यात आला पाच मिनिटं ही उशीर झाला असता तर कोणीच भेटलं नसतं आम्ही लग्नाच्या पार्टीला जात होतो.

तुही चलतेस का? रेखाताईंनी शांत स्वरात विचारले?’
‘नाही माझ्या मूड खराब आहे, मी नको होते का यायला?’
मीनल तू आणि रोहित जाऊन या आम्ही दोघं राहतो घरी असे म्हणताच रोहित म्हणाला’ बरं सोना तू राहणार आहेस ना ?आम्ही येतो म्हणून गाडीची किल्ली घेऊन निघाला!
पहा- पहा -सर्वांना माझ्या येण्याचा प्रॉब्लेम होतोय .
रेखाताईंनी मिनल ला डोळ्याने तुम्ही जा असा इशारा केला..
तेवढ्यात प्रमोद राव ही बाहेर आले’ एकटीच आलीआहेस की गौरव ?---नाही मी एकटीच आले सोना कडवटपणे म्हणाली.
बरं,चल आत, जेवण व्हायचं असेल ना काय बनवू बोल तुझी फरमाईश म्हणत रेखाताई किचनमध्ये गेल्या.

रात्री पाणी प्यायला म्हणून सोना उठली तेव्हा रोहित व मिनल आलेले तिला उमगले.

सकाळी सोनाला उशिरा जाग आली आई-बाबा वॉकला गेलेले,मिनलस्वयंपाक करत होती आणि रोहित आंघोळीला.

‘चहा घेणार की आधी फ्रेश होता आहे दी?’

‘चहा दे ,पण तुम्ही रात्रीच्या उशिरा आला तरी इतक्या लवकर उठला ?

‘ हो अलार्म लावलेला असतो. बरं तुम्ही ऑफिसला जाणार ? ‘

‘नाही, दोन दिवस सुट्टीवर आहे मी सोना म्हणाली!’

चहा पीत सोना विचार करत होती घरी गौरव चार वेळा आवाज देत राहतो तरीही ती उठत नाही. मग कसेतरी आटोपते त्यात कधी ब्रेड तर कधी मॅगी नाश्ता जेवण केंटिन च‌. गौरव ला फार आवडतं नाही. पण खातो.

‘आमचा टिफिन तयार आहे ,काकू येथीलच पोळ्यांसाठी मी आवरते माझे!’ म्हणत मीनल बाथरूम मध्ये गेली.

मीनल वहिनी, दोन वर्ष झाले लग्नाला इंटरकास्ट मॅरेज ! सुरुवातीला
रेखाताईंना जरा काळजी होती हिंदी साइडर, नोकरी करणारी कसं जमेल ? पण आता सर्वच तिच्या वर खुश आहे.

बरे दी ,भेटू आपण संध्याकाळी म्हणत मीनल निघाली रोहित खालून आवाज देत होता.

“मला जरा पांच दहा मिनिट लेट झालं तर गौरव निघून जातो, आणि इथे दादा— सोना बडबडली

“सोना काय नेमकं बिनसलय?
कां चिडचिड होतीए” बाबांनी प्रेमाने विचारताच सोनाचा विस्फोट झाला,
तुम्ही मला इतका शिकवलं, नोकरी करते मी गौरव च्या बरोबरीने कमावते ,मला नाही सवय आणी आवड , इथेही मी कधी फारस केलं नाही रोज रोज कीचन ला जुंपायला मला नाही जमणार अशी हुकूमशाही ,मी स्पष्ट सांगितलं गौरव ला मला नाही जमणार घरकाम, स्वैपाक’’!
आणि मग ?
‘काय बोलणार तोंड फुगवून बसला एक दिवस आणि मग आला लाईनवर.’
बापरे एवढी जरब? बायको आहेस की हिटलर आईने हसुन विचारले ?
हेच, हेच मला –म्हणत सोना पाय आपटत बेडरूम मध्ये निघून गेली.
किती ही आपण चिडचिड केली तरीही इथे कोणाला पडलीए? गौरवने ही एकदाही फोन केला नाही.नको करु माझं ही काही अडल नाही

हे बघ हे प्रकरण वाटतं तितका साध नाहीये हिच्या अशा वागण्याने नातं तुटायला वेळ नाही लागणार!” लग्नाला चारच महिने झाले आणी ही तीनदा रागावून इथे. प्रमोद राव म्हणाले.
हं आपलं चुकलंच आधीच हिला…. रेखाताई कुजबुजल्या.

रात्री जेवताना रोहित म्हणाला मीनल उद्या टिफिन मध्ये काही स्पेशल देशील का?
काय देऊ बोल ?

सकाळी सोनानी पाहिल छोले, दहिवडे, आणि शिरा, बापरे !हे केव्हा केले?
अग रात्री छोले भिजवून, दही लावून ठेवलं शिरा आईने बनवला मसाला रेडीमेड. मीनल हसत हसत म्हणाली!

कंटाळा नाही येत का ग तुला?

रोज तर तीच भाजी पोळी असते ना मग कधीतरी त्याला वाटत बायकोने काही स्पेशल द्यावं.


मी तर गौरवला स्पष्ट बोलते “असलं मला जमणार नाही तू विकत आण आणि खा”!

सोना पाहत होती मीनल तिच्यासारखी नोकरी करते तरीही किती उत्साही .

कां करतेस इतकी दगदग ?

आपल्या माणसाच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहिला न की सगळ्यात थकवा निघून जातो आई म्हणाली.

दुसरे दिवशी सकाळी सोना बेड वर लोळत होती रोहित आणि मिनल च बोलणं तिला ऐकू येत होते
आज तू जा, मला उशिरा जायचं आहे!जाता जाता माझे कपडे प्रेसला देऊन देशील कां? आणि त्याला सांग दहा मिनिटात पोहोचव ,मला आज मिटींग ला जाताना घालून जायचे आहे.

दादा ऐकतो तुझं ? सोना ने विचारले
हो त्यांना जाणीव आहे. मिनल म्हणाली.

बरं सोना आज गौरव ला जेवायला बोलावलं आहे संध्याकाळी, बाबांनी फोन करून.

‘कां त्यांचे काय काम?’

‘सहज सगळे बरोबर जेऊ या!’

बरं त्याला काय आवडतं? काही विशेष ?

सोना विचारात पडली, काय आवडतं? तिनेकधी त्याला विचारलं नाही आणि बनवण ना ?ते तर इम्पॉसिबल!
अगं काय विचारते?
असं स्पेसिफिक काही म्हणजे काहीही, टेस्टी छान. खरंतर सोनाला काहीही आठवत नव्हतं .
मिनल तिच्या अडखळण्या वरुन समजली. व तिच्या समजुतीप्रमाणे बनवायचे ठरवले.
ती उत्तर हिंदुस्तानी असल्याने तिला कामाची सवय आणि उरक होता, पटापट नवनवीन छान डिशेस सुट्टीला बनवत असे त्यामुळे घरदार तिच्यावर खूष.

सोनाला बसून बसून कंटाळा आला म्हणून किचनकडे वळली मीनल पुलाव बनवत होती.
‘ हे काय घालते? सोना नीविचारले! रोहित ला सोयाचंक्स बहुत पसंद है पुलाव मधे.

“वहिनी तुला कंटाळा नाही येत का ग एकटी करत असते ,”

‘नाही गं रोहित ,आई पण मदत करतात.

सोना आपल्या मनातल समोरच्याकडून करून घ्यायची पण एक ट्रिक असते .

‘त्यात काय ट्रिक?’
हे बघ नेहमी तू अशी तूतडाक सडेतोड उत्तर दिल्याने समोरचा आपल्याशी एक तर घाबरून वागतो किंवा मग मनातलं सांगत नाही, पण् मग या सर्वाचा आपल्या वैवाहिक जीवनावर गंभीर परिणाम होतो.
मी जेव्हा थकते मी पण शांतपणे सांगते रोहितला आज नको उद्या करेन किंवा थोडी मदत घेते,
संसारात “चारपावलं पुढे जायचं असलं तर कधी कधी दोन पावलं माघारघ्यावी त्याने संबंध तुटण्याची भीती नाही राहणार. तू गौरव शी असे वागून पहा.”
त्याचे तुझ्यावर खूप प्रेम आहे.

हो गं मला स्वतःवर कंट्रोल करायला शिकावे लागेल, आणि त्याचे मन,आता मला त्याची आठवण ही येते आहे.”
पण,
“ पण काय आज येतोय ना,” दिखा दो अपना जादू”.
मी बनवू पुलाव मला सांग काय कस करायच, सोना अडखळत म्हणाली.
हो ss मिनल हसुन म्हणाली..

जेवताना सर्व पहात होते सोना गौरव ला अगदी प्रेमाने आग्रह करून वाढत होती. गौरव ही खुश दिसत होता.जेवणाच्या शेवटी कस्टर्ड पाहून गौरव खुश झाला .”अरे वा मेरी फेवरेट डिश”. और पुलाव तो नंबर वन.

हां, सोना ने ही मंगवाई आपकी पसंद बता कर.

“ सच्ची सोना”, म्हणत गौरव ने एक चमचा कस्टर्ड सोनाला भरवले व म्हणाला” तेरे बिना घर बडा सूना सूना लगता है “

“मुझे भी जेवण झाल्यावर चलू! “तशी सर्वांनी निश्वास सोडला” चला गाडी लाईन वर आली म्हणायची”.
—----------------------------------------------
लेखन… सौ.प्रतिभा परांजपे