तेलही गेले तूप ही गेले
भांडण (भाग 2)
©®स्वाती बालूरकर, सखी
जेवण झाल्यावर माई म्हणाल्या “मीत , आम्ही उद्या परत जातोय , आणि मिताली , तू तुझ्या आई बाबांना इथे बोलावून घे म्हणजे तुझा वेळही वाचेल आणि तुला रूद्रकडे लक्षही देता येईल. रुद्रालाही थोडा वेळ देत जा रे दोघेजण.”
“ हो माई बरोबर आहे तुमचं. पण वेळच नसतो हो. . त्याच्याकडे लक्ष द्यायला. पण तुम्ही ना अजून चार दिवस रहायला हवं होतं आणि आज स्वयंपाक का केला तुम्ही ?” मिताली म्हणाली.
“मिताली . . त्याचं ना. . . . अस काही नाही. अग मला तिथे रोजच सवय आहे ना ! इथे तर वेळच जात नाही माझा. आणि तू पण थकून येतेस. आवडतं गं ,मला स्वयंपाक करायला. दिवसभर माझा आराम झालेला असतो .”
मीतलीला माईचा खूप आधार वाटला.
मीतला वाटलं की तिचे आई बाबा घरात येणार म्हणून माझे माई आणि तात्या गावाला परत जात आहेत.
पण तो म्हणाला काहीच नाही.
माई आणि तात्या गावी गेले आणि
मितलीचे आई बाबा पंधरा दिवसांसाठी रहायला आले.
माई आणि तात्या गावी गेले आणि
मितलीचे आई बाबा पंधरा दिवसांसाठी रहायला आले.
रुद्रला खूप छान वाटलं.
हे रूटीन असच चालत राहिलं.
छोट्या-मोठ्या गोष्टींवरून ठिणगी उडायचीच.
तिचे आईवडील घरात असल्यामुळे मितालीला नेहमीच पडतं घ्यावं लागायचं आणि आवाजही दबलेला असायचा ,त्यांना ऐकू जाऊ नये म्हणून .
अशीच उणी पूरी तीन वर्षे निघून गेली.
स्वतःची प्रतिमा जपण्यात आणि एकमेकांवर हक्क गाजवण्याची सवय लागली हळुहळू!
प्रत्येक गोष्टीत वाद, संवाद जणू हर लाच होता.
प्रत्येक गोष्टीत वाद, संवाद जणू हर लाच होता.
रुद्र मात्र या सगळ्यात तटस्थ होवून गेला. त्याला आता काही टेन्शन वाटत नव्हतं. हे असेच भांडत राहणार हे तो समजून चुकला. मग मित्रांकडे जास्तीत जास्त वेळ घालवणे, खेळाचे क्लास लावणे यात तो गुंग झाला.
यांची भांडणे ऐकायची नसतील तर बाहेर राहणेच बरे असा त्याचा समज होत गेला.
दरम्यान त्याच्या मागण्या वाढत होत्या, दोघेही नोकरीत स्थिर झाले होते. पगारी बऱ्यापैकी होत्या. एकुलता एक मुलगा त्यामुळे तो मागेल ते देण्यात येत होतं.
ते दोघेही त्याच्या कुठल्याही मागणीला हो म्हणत होते कारण त्यामुळे त्याच्या मनात त्याच्याबद्दल चांगली प्रतिमा राहील.
ते दोघेही त्याच्या कुठल्याही मागणीला हो म्हणत होते कारण त्यामुळे त्याच्या मनात त्याच्याबद्दल चांगली प्रतिमा राहील.
जो मागणी पुर्ण करेल तो रुद्रच्या मनात जवळ राहील अशी एक आशा निर्माण झाली होती. या निमित्ताने दोघांनाही एकमेकांवर कुरघोडी करण्याची संधी मिळत होती.
या दरम्यान मितालीचे वडील अल्पशा आजाराने गेले होते आणि आई तिच्या बहिणीकडे रहायला गेली होती.
मीत चे आई वडील थकले होते . दवाखान्याच्या कारणाने यायचे अधे मधे.
आता मात्र रुद्र बाहेरच्या गोष्टी मध्येच आनंद शोधण्यात मग्न होता.
तो भौतिक आणि खर्चिक गोष्टीत रमायचा .
दिवसेंदिवस श्रीमंत मित्रांची संगत वाढत होती.
आजी आजोबा आले किंवा कुणी पाहुणे आले की त्याला खूप छान वाटायचं .
तो भौतिक आणि खर्चिक गोष्टीत रमायचा .
दिवसेंदिवस श्रीमंत मित्रांची संगत वाढत होती.
आजी आजोबा आले किंवा कुणी पाहुणे आले की त्याला खूप छान वाटायचं .
त्यावेळी घरातले वातावरण एकदम वेगळं आणि खेळीमेळीचे असायचे .
आता तो दहावीच्या वर्गात होता. त्याचे मुळी अभ्यासात लक्षच नव्हतं. वर्षभर त्याचे मला अभ्यासत लागतच नव्हते कारण चांगले प्ले स्टेशन, व्हिडियो गेम्स, ब्रँडेड कपडे , मुलीसमोर स्टाईल मारणे यात तो वाहवत गेला होता .
नुसतं आई बाबांच्या म्हणण्याने त्याला अभ्यासात गोडी निर्माण होणार नव्हती.
त्याने किती मार्क मिळवले तरीही त्यांच्या घरी कौतुक होणारच नाही असे त्याला वाटत होते. उलट त्या मार्कांचे क्रेडिट स्वतः कडे घेण्यासाठी पण दोघे भांडतील की काय असे त्याचे मत तयार झाले होते जणू!
त्याने किती मार्क मिळवले तरीही त्यांच्या घरी कौतुक होणारच नाही असे त्याला वाटत होते. उलट त्या मार्कांचे क्रेडिट स्वतः कडे घेण्यासाठी पण दोघे भांडतील की काय असे त्याचे मत तयार झाले होते जणू!
त्याचं दहावीची परीक्षा अशीच वाया गेली असती पण दैवयोग म्हणून झालं वेगळच.
दहावीत तर शेवटी शेवटी अभ्यास करून त्याला जे थोडेसे बऱ्यापैकी मार्क पडले होते त्याचे श्रेय आजी आजोबांना जातं. परंतु त्यामुळे आई बाबांचे वाद वाचले होते.
त्याच्या परीक्षेच्या वेळी माई आणि तात्या दोन महिने इकडेच राहिले होते.
घरातल्या वातावरणाची त्यांना कल्पना होती.
तात्यांनी दोन विषयात मदत केली नसती तेवढे पण लक्ष तो केंद्रित करू शकला नसता .
त्याच्या परीक्षेच्या वेळी माई आणि तात्या दोन महिने इकडेच राहिले होते.
घरातल्या वातावरणाची त्यांना कल्पना होती.
तात्यांनी दोन विषयात मदत केली नसती तेवढे पण लक्ष तो केंद्रित करू शकला नसता .
आजोबांच्या मार्गदर्शनाने तो थोडा ताळ्यावर आला. बऱ्यापैकी मार्क मिळाले.
रुद्र पाहतां पाहता दहावी पास होवून अकरावीला आला. मग त्याला चांगल्या कॉलेजात ऍडमिशन मिळाले होते.
रुद्र पाहतां पाहता दहावी पास होवून अकरावीला आला. मग त्याला चांगल्या कॉलेजात ऍडमिशन मिळाले होते.
मीत ने त्या महागड्या कॉलेजसाठी लोन काढले होते तर मिताली त्याच्यावर आणि त्याच्या मौजेसाठी पैसे खर्च करायला तयार होती.
तिची ऑफिसची पोझिशन आणि सॅलरीच्या पॅकेज नुसार तिच्या मुलाने तेवढे स्टॅंडर्ड मेंटेन करायलाच हवे होते. तसे भारी कपडे , घड्याळ आणि लेटेस्ट बाईक !
या सगळ्यात रुद्रची मात्र मजा होती कारण तो आता आई आणि बाबांच्या आकर्षणाचं केंद्र झाला होता आणि सगळ्या हौसा मौजा पूर्ण होत होत्या.
त्याला सगळं काही मिळत होतं.
अकरावी चं वर्ष असच सहज निघून गेलं.
अकरावी चं वर्ष असच सहज निघून गेलं.
बारावीचे क्लासेस सुरू झाले होते.
क्रमशः
©®स्वाती बालूरकर, सखी
३०.११.२४
३०.११.२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा