Login

भारताचा प्रजासत्ताक दिन

26 जानेवारी प्रजासत्ताक दिन विषयक माहिती, प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व वर्णन केलेला हा लेख आहे
भारताचा प्रजासत्ताक दिन ..!


हे जीवन ना तरि व्यर्थ, भाग्यसुर्य तडपत राहो
जगतास शांती देईल, तो सोन्याचा दिन येवो..!

स्वातंत्र्य हा भारतीय जनतेचा अविभाज्य अधिकार आहे. देशाच्या नागरिक म्हणून प्रत्येक व्यक्तीला काही अधिकार आहेत. स्वातंत्र्य हा भारतीय लोकांचा विभाज्य अधिकार मानला जातो. जसे की इतर कोणत्याही लोकांचे हक्क आणि स्वातंत्र्य उपभोगणे हा प्रत्येकांच्या जीवनाच्या गरजा आहेत. त्यांना विकासाच्या संधी मिळायला पाहिजे. भारतीय प्रजासत्ताक दिवस हा भारताच्या प्रजासत्ताक दिन दरवर्ष 26 जानेवारी रोजी पाडला जाणारा राष्ट्रीय दिन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारताचे संविधान, संविधान समितीने 26 नोव्हेंबर 1949 रोजी स्वीकारले. 26 जानेवारी 1950 रोजी पासून भारतीय संविधान अमलात आले. जवाहरलाल नेहरू यांनी 31 डिसेंबर 1929 रोजी लाहोर जवळ रावी नदीच्या काठी अशोकचक्र तिरंगा ध्वज फडकन पूर्ण प्रजासत्ताकाची स्वातंत्र्याची घोषणा केली होती. त्यांची आठवण म्हणून 26 जानेवारी हा दिवस राज्यघटना अमलात आणण्यासाठी निवडण्यात आला. या दिवशी देशभरात भारताच्या राष्ट्रध्वजाचे आरोहण होऊन त्याला वदंन दिले जाते. भारताचे राष्ट्रगीत म्हटले जाते. आदर व्यक्त केला जातो. प्रजासत्ताक दिवस आपल्या देशातील सुवर्ण दिन आहे. या दिवसाची प्राप्ती हजार देशभक्तांच्या बलिदानातून झाली होती. प्रजासत्ताक दिनाला शाळा महाविद्यालयांमध्ये भाषणाचे कार्यक्रम आयोजित केले जातात. दरवर्षी 26 जानेवारी रोजी भारताच्या राजधानीत म्हणजे नवी दिल्ली येथे एक मोठे संचलन आयोजित केले जाते. हे संचालनांना रायसीना हिलपासून राष्ट्रपती भावनापर्यंत राजपथ मार्गाद्वारे जाते. संचलनाच्या आधी अनाम सैनिकांसाठी बसवले गेलेले स्मारक, 'अमर जवान ज्योती' येथे भारताचे पंतप्रधान पुष्पचक्र अर्पण करतात. भारतासाठी आपले प्राण अर्पण करणारे वीर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात येते. त्यानंतर पंतप्रधान राजपताच्या मुख्य मंचावर जातात व आलेल्या पाहुण्यांना भेटतात. तितक्याच प्रमुख पाहुण्यांसोबत राष्ट्रपतीचे आगमन होते. राष्ट्रगीत सुरू होताच, राष्ट्रपती ध्वजारोहण करतात. व 21 तोफाची सलामी दिली जाते. त्यानंतर देशासाठी शौर्य गाजवलेल्या सैनिकांना राष्ट्रपतीच्या हस्ते अशोक चक्र आणि कीर्ती चक्र हे मुख्य पुरस्कार देण्यात येतात. राष्ट्रीय शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलेली देशातील शूर बालके सजवलेल्या हत्तीवरून किंवा वाहनांवर या संचलनात सहभागी होतात. प्रमुख पाहुणे म्हणून परराष्ट्रीय राष्ट्राध्यक्षांना निमंत्रण दिले जाते. भारतीय फौजेचे नौदल, पायदल, वायुसेना वेगवेगळे सेनाविभाग घोडदळ, पायदळ, तोफखाना आणि इतर अध्ययावत शस्त्रे/ क्षेपणास्त्रे जसे पृथ्वी, अग्नी,राणगाडे समवेत संचलन करतात. भारताचे राष्ट्रपती या फौजाची मानवंदना स्वीकारतात. या संचलनाच्या सादरीकरणाची पूर्वतयारी विशेष काळजीपूर्वक आणि शिस्तीने केली जाते. इतके या संचलनाचे महत्त्व आहे. नवी दिल्ली येथे होणारा संचालनाप्रमाणेच भारतातील सर्व राज्यातही एकेक संचलन होते. प्रत्येकी राज्यात त्या त्या राज्याचे राज्यपाल फौजांची मानवंदना स्वीकारतात.भारताला ब्रिटिश राजवटी पासून 15 ऑगस्ट 1947 ला स्वातंत्र्य मिळाले या मागे भारताच्या स्वातंत्र्यलढा मोठा सहभाग होता. तेव्हा स्वातंत्र्य भारताला स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे मात्र कायदे हे भारतीय राज्य शासनाच्या 1935 सालच्या कायद्यावर आधारित होते. 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली स्वातंत्र भारताच्या संविधान तयार करण्यासाठी मसुदा समिती स्थापन केली. या समितीने संविधानाचा मसुदा तयार करून तो सभेपुढे 4 नोव्हेंबर 1947 रोजी सादर केला. दोन वर्ष 11 महिने आणि 18 दिवसाचा कालावधीनंतर समितीने हा मसुदा अंतिम केला. बरेचसे विचार विमर्श आणि सुधारणा केल्यानंतर समितीच्या सदस्यांनी दोन हस्तलिखित प्रति हिंदी आणि इंग्रजी 24 जानेवारी 1950 रोजी स्वाक्षरांकित केल्या. दोन दिवसानंतर हे भारतात सविधान संपूर्ण राष्ट्रांमध्ये लावू करण्यात आले. भारताच्या संविधानाच्या निमित्ताने भारताच्या प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात येऊ लागला. प्रजासत्ताक अथवा गणराज्य हे अशा प्रकारचे सरकार आहे, ज्यामध्ये देश हा जनतेच्या सार्वजनिक एक मतात आणला जातो. एक व्यक्ती किंवा गटाच्या देशावर हक्क नसतो. प्रजासत्तकामध्ये राष्ट्रप्रमुख विविध पदाधिकारी व प्रशासक सार्वत्रिक निवडणुकीद्वारे नेमले जातात. 26 जानेवारी 1950 रोजी नव्याने स्वातंत्र्य मिळालेल्या भारत देशाने संविधानाचा स्वीकार करून लोकशाहीतील एका नव्या पर्वाची सुरुवात केली होती. लोकशाही म्हणजे लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य होय. थोडक्यात या दिवसापासून भारतीय जनतेला राज्य चालविण्याचा अधिकार मिळाला. दरवर्षी या दिवशी भारतात राष्ट्रीय सुट्टी घोषित असते. 26 जानेवारी रोजी भारत प्रजासत्ताक दिन आनंदाने साजरा करतो. तर 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र राष्ट्र झाला. या दिवशी देशातील सुमारे 200 वर्षाचा ब्रिटिश राजवटीचा अंत झाला. असे असतांना 26 जानेवारी 1950 पर्यंत भारताला लोकशाहीचा आत्मा म्हणजे राज्यघटना मिळाली नाही. लोकशाहीची व्याख्या म्हणजे लोकांनी चालवलेले सरकार सरकारच्या एक प्रकारामध्ये सर्वोच्च सत्ता लोकांमध्ये विलीन असते आणि त्याचा वापर थेट किंवा त्याच्या निवडून आलेल्या प्रतिनिधी द्वारे मुक्त निवडणूक प्रणाली अंतर्गत केला जातो. या प्रकारचे सरकार असलेल्या राष्ट्राला लोकशाही असे म्हटले जाते. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय संविधान देशभरात पूर्णपणे अमलात आले. त्यामुळे 26 जानेवारी 1950 पासून भारतात कायद्याचे राज्य सुरू झाले. प्रजेची सत्ता सुरू झाली. म्हणजेच भारत 26 जानेवारी 1949 ला प्रजासत्ताक झाला. त्यामुळे दर वर्षी देशभरात 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन साजरा केला जातो. प्रजासत्ताक दिन हा भारताचा सर्वात महत्त्वाचा दिवस आहे. दरवर्षी 26 जानेवारी रोजी साजरा केला जातो. भारताचा सार्वभौम लोकशाही प्रजासत्ताक सक्रमण झाल्याचे स्मरण म्हणून 1950 मध्ये भारतीय संविधान स्वीकारल्या गेले. 26 जानेवारी 1950 रोजी आपली राज्यघटना स्वीकारलेल्याबद्दल आपण 76 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहोत. हा दिवस आपल्याला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या दूरदृष्टीची आठवण करून देतो. आपली राज्यघटना भारतातील प्रत्येक नागरिकांना न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची हमी देते. सोप्या शब्दात प्रजासत्ताक दिन म्हणजे 26 जानेवारी 1950 रोजी ब्रिटिश राजवटीतून स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतामध्ये प्रजासत्ताक दिन स्वतःच्या संविधानाचा स्वीकार केल्याबद्दल साजरा केला जातो. संविधानाच्या अंमलबजावणीसाठी 26 जानेवारी ची निवड करण्यात आली. 26 जानेवारी ही याप्रसंगी तारीख मिळून निवडण्यात आली. कारण हा दिवस 1930 मध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने पूर्ण स्वातंत्र्य किंवा पूर्ण स्वराज्याची मागणी केली होती. डोमिनियन स्टेटसच्या विरोधात या दिवशी दरवर्षी भव्य प्रजासत्ताक दिन परेट राष्ट्रीय राजधानी नवी दिल्ली येथे राजपथ येथे आयोजित केले जातो. 26 जानेवारी 1950 रोजी भारतीय राज्यघटना लागू झाली. प्रजासत्ताक दिनाच्या क्रमाने अनुकरण करून सध्या 76 वा प्रजासत्ताक दिन आहे. 2025 ची थीम,'स्वर्णिम भारत - विरासत आणि विकास ( गोल्डन इंडिया- हेरिटेज आणि विकास ), तंत्रज्ञान पायाभूत सुविधा आणि सांस्कृतिक वारसा यातील भारताच्या प्रगतीवर प्रकाश टाकेल अशी थीम आहे. प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी देशभक्तीपर गीताच्या ओवी, तिरंगा ध्वज आदी संकल्पनांचा कल्पक वापर करून परस्परांना शुभेच्छा दिल्या जातात देशाभिमान मनात टिकून राहण्यासाठी भारतीय नागरिक अशा शुभेच्छा एकमेकांना देऊन परस्परांमधले ऐक्य टिकवून ठेवण्याचे आवाहनही करतात.

©® चैताली वरघट
मूर्तिजापूर, जि अकोला


🎭 Series Post

View all