भरजरी ठिगळ
"आजी,मला पण एक मस्त गोधडी शिवून दे ना"
मिनू म्हणाली.
" शिवूया हं,एक छान मऊ साडी आहे माझ्याकडे, तिची शिवूया गोधडी"
"नको, ती त्या दिवशी आईची ती डिजाइनर जरीची साडी नाही का लग्नाहून येताना फाटली,त्या साडीची शिवून दे"
"अगं, अश्या भरजरी साडीची गोधडी नाही शिवत,त्या साडीला आरसे आणि टिकल्या आहेत,ते सगळे टोचेल तुला,छान जुनी मऊ साडी पाहिजे गोधडी शिवायला."
" अगं,किती छान दिसेल गोधडी त्या जरीच्या साडीची"
" आणि मग ती जर आणि टिकल्या टोचल्या तर तुला?"
"आजी, नाही टोचणार ना,शिव त्याच साडीची"
" नाही ग मिनू,मी बघ,कशी मऊ छान गोधडी शिवून देते तुला "
" बरं, मग त्या गोधडीला जरीच्या साडीचा एक तुकडा जोड"
" गोधडीला भरजरी ठिगळ?"
असे म्हणून आजी हसत सुटली,मग थोड्या वेळाने म्हणाली,
" बाळा,जुन्या गोधडीला जरीचे ठिगळ शोभणार नाही ग"
" शोभेल,तू लावून बघ,मी सांगते,छानच दिसेल "
" बरं,लावू आपण, आईला विचारून साडी घेऊन ये"
आजीने खरच एक छान मऊ गोधडी शिवली आणि छान कलाकारी करून त्या जरीच्या साडीचा फाटलेला तुकडा जोडला.
गोधडी तर फारच सुंदर दिसत होती पण मिनूने ती रात्री पांघरायला घेतली आणि तिच्या लक्षात आले, खरच तो भरजरी आणि टिकल्यांचा तुकडा टोचत आहे.इतकी सुंदर गोधडी शिवली होती आजीने पण टोचणारी असल्यामुळे वापरलीच गेली नाही.
मिनू मोठी झाली,शिक्षण,लग्न करून संसाराला लागली पण ती आजीने शिवलेली गोधडी अजून कपाटाच्या कप्प्यात पडून होती.कधीतरी पाहुणे आले की बेड सुंदर दिसावा,म्हणून ती गोधडी बेडवर अंथरली जायची पण बसताना टोचली की तिला वैतागाने सगळे बाजूला करायचे.आज तिला त्या भरजरी ठिगळं लावलेल्या गोधडीची आठवण येत होती.
पहिला संसार लवकर संपल्यावर तिने तिच्या जबाबदार्या पार पाडल्यानंतर दुसर्या लग्नाचा विचार केला.एखाद्या घराला आपण मदत करू शकू ह्या विचाराने तिने, ज्या घरात बर्याच जबाबदार्या होत्या, असे घर निवडले.ह्या नवीन घरात आल्यावर तिच्या हातात पूर्ण सत्ता दिली गेली म्हणून ती आवडीने सगळ्या जबाबदार्या ओढवून घेऊ लागली. त्या दुसर्या संसारात ती सगळ्या जबाबदार्या ओढत राहिली पण तिच्या हे लक्षातच आले नाही की इथे आपण उपर्या आहोत, आपल्याला हे जे काही स्थान दिलेले आहे ते फक्त स्वार्थापोटी दिलेले आहे.एक अपुरा राहिलेला संसार आणि त्या संसाराच्या जबाबदार्या घ्यायला मुलांचा बाप समर्थ नाही आणि बाकी कोणीही जबाबदारी घ्यायला तयार नव्हतेच, शिवाय काहीजण ह्या संसाराची कशी धूळधाण उडेल,बघायलाच टपलेले होते,त्यामुळे तिला हरभर्याच्या झाडावर चढवत तिच्याकडून संसाराची जबाबदारी पूर्ण करून घेण्यात आली होती.आता मुलांची लग्न होऊन सुना घरात आल्या होत्या.
आता आता तिच्या लक्षात येऊ लागले होते की तिचा आर्थिक, शारीरिक आणि अनेक प्रकारे उपयोगच करून घेतला जातो आहे.तिला काय करावे, हे सुचत नव्हते,शेवटी ती त्या घरात 10 वर्षे राहिली होती,सगळ्या नातलगांशी चांगले संबंध ठेवून होती, एकदम काही निर्णय घेण्याचे तिला धाडस होत नव्हते,एके दिवशी तिला तो मोठा निर्णय घ्यावाच लागला.
सगळ्या जगावर कोविडचे संकट आले होते,सगळीकडे लॉक डाऊन केलेला होता.त्यांची दोन्ही मुले आणि सुना वर्क फ्रॉम होम असल्याने त्यांचे राहते शहर सोडून घरी रहायला आले होते.
"आता दोन्ही मुले,सुना इकडेच राहणार आहेत ना? मग आता त्यांच्याकडून ही घरखर्च मागून घ्या ना दर महिन्याला"
ती म्हणाली.
"असंकसं,त्यांच्याकडे कसे पैसे मागू?मुले आहेत ती माझी,बापाच्या घरी रहायला आली आहेत ती." त्याने उत्तर दिले.
" अच्छा! मग तुम्हाला आता घरखर्च झेपणार का?"
तिने आश्चर्य दाखवत विचारले.
"अग,म्हणजे आम्ही दिवाळी,मे महिन्यात जायचो ना आईबाबांच्या घरी, तेव्हा आम्ही काही पैसे देत नव्हतो,म्हणून म्हंटले"
"किती दिवस राहायचात तुम्ही?"
" ते काय दिवाळीचे चार दिवस आणि मे महिन्यात तर मुले लगेच कंटाळायची कारण गरम खूप व्हायचे तिकडे"
" हो ना, आता मुले इकडे रहायला येऊन दोन महिने झाले,हा लॉक डाऊन कधी संपेल, माहित नाही तोपर्यंत सगळे इथेच राहतील.म्हणून म्हंटले,घरखर्चाला पैसे
मागा "
" राहू दे,त्यांच्या बापाच्या घरातच तर राहत आहेत"
" ओह,ओके,मग मी पण तुमची लग्नाची बायको आहे पण माझ्या जेवणाखाण्याचे तुम्ही पैसे घेताय गेले कितीतरी वर्षे, कारण काय तर मुले शिकत आहेत, मग काय तर मुलांना फ्लॅट्स घेऊन दिले, आता माझ्याकडे पैसे उरले नाहीत म्हणून म्हणालात"
" तू कुठला तरी चुकीचा अर्थ काढू नकोस,मी फक्त थोडीशी दर महिन्याला मदत कर, म्हणालो होतो"
" बरोबर,घरखर्चाला मला पैसे कमी पडतात तर दर महिन्याला थोडे पैसे देत जा,म्हणालात,मग आता कसं काय इतक्या लोकांचा खर्च परवडतो आहे, हेच विचारतेय मी"
" उगीच मुलांची आणि तुझी तुलना करू नकोस"
"बरोबर,आयटी मध्ये नोकरी करणारी मुले आणि मी,ह्यांची बरोबरी होऊच नाही शकत, माझा नवरा गेल्यावर माझ्या जबाबदार्या पार पाडून झाल्यावर उरलेला पैसा आहे माझा आणि तुमची मुले, तुमच्याच भाषेत भक्कम पॅकेजवाली आहेत,तेव्हा तुलनाच कशी होईल ना?"
" बरं,ठीक आहे,तू पण पैसे द्यायचे बंद कर."
"मी पैसे देईनच रहायचे,फक्त एव्हढेच सांगा,अशी वेळ जर मुलांची आई असताना आली असती तर तिच्या कडून पैसे घेतले असतेत का?"
" तिच्याकडून कसे घेतले असते? बायको होती ती माझी,ती माझीच जबाबदारी होती नाहीं का?"
" तेच,एव्हढेच जाणून घ्यायचे होते मला, माझे ह्या घरातले स्टेटस समजले मला,आता मी माझा निर्णय घ्यायला मोकळी आहे"
" काहीतरी बडबडू नकोस,ह्या घरातली कर्ती बाई आहेस तू, गेली 10 वर्षे सगळे सांभाळून प्रत्येक वेळी आमच्यामागे उभी राहिलीस भक्कम,कधीही माझ्याकडून काही अपेक्षा ठेवली नाहीस.मुलांची आई होऊन किती मोठी जबाबदारी उचलली आहेस तू,मी आजही मुलांच्या खर्या आईच्या आठवणीत रमलो आहे, पण मुले बघ,धाकटा तर तुला किती मानतो,तुला माहीतच आहे"
" ठीक आहे,हो,मी केले सगळे पूर्वी,पण ह्यापुढे नाही करणार,तुमच्या घरच्या सगळ्या जबाबदार्या मी पूर्ण केल्या आहेत,आता मला मोकळे करा"
" मोकळे करायला हे लग्न काय contract होते का? तू म्हणतेस,तू केलेस सगळ्यांचे पण मी पण तुझ्या प्रत्येक आजारपणात तुला डॉक्टर कडे घेऊन गेलो आहे."
" हो ना,नाही म्हणतच नाही मी, फक्त पैसे द्यायची वेळ आली की मी पर्स उघडायचे"
आणि ती विषण्णपणे हसली.
"अरे, तू काय हिशोब मांडायला लागली आहेस का?"
"हिशोब? तो मांडला तर तुम्ही मला बरेच पैसे देणे लागाल,सोडून द्या"
" का ग,तुझ्या आधीच्या संसारात तू पैसे देत नव्हतीस का?"
" ऑफकोर्स,देतच होते,मुळात कधी आमचे आर्थिक व्यवहार वेगळे नव्हतेच,जॉइन्ट अकाऊंट होते आमचे सगळे,पण मी नोकरी सोडल्यावर पण तसेच आर्थिक व्यवहार राहिले,माझ्या नवर्याने माझी आर्थिक, शारीरिक आणि मानसिक सगळीच जबाबदारी घेतली होती,आमच्या सगळ्याच जबाबदार्या जॉइन्ट व्हेंचर होत्या.आपल्या ह्या संसारात मी नेहमीच सगळी जबाबदारी घेतली पण तरी मला नेहमीच असे वाटत आले आहे की मी तुमच्या संसारात एखाद्या गोधडीला लावलेले ठिगळ आहे,न शोभणारे ठिगळ"
" काय उपमा दिलीस,स्वतःला ठिगळ म्हणतेस पण तू ठिगळ असशील तर तू आमच्या फाटक्या गोधडीला लावलेले भरजरी ठिगळ आहेस"
"ती गोधडी जगाला दिसते आहे सुंदर पण ती किती टोचते आहे,हे सांगता पण येत नाहीये."

*अंजली*
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा