भासती सत्य आभास जे भाग 4
मागील भागात आपण पाहिले कोणीतरी इंदुमती प्रधान नावाची महिला ह्या सगळ्यांना सत्संग सांगते . तेदेखील वेगळ्या लपवलेल्या नंबरवर . मृत असलेली प्रत्येक व्यक्ती ह्या बाईच्या संपर्कात आहे . आता पाहूया पुढे .
कदम पहाटेच उठून शरदच्या घरी हजर झाले . मुंबईपासून पाच तासांचा प्रवास होता . एका छोट्याशा गावात अशा नावाची बाई असेल का ? असली तरी इतक्या लोकांना प्रभावित करायची क्षमता असेल का ? अनेक प्रश्न भोवती फिरत होते . दोन तासांनी चहा प्यायला थांबल्यावर शरदने समीराला फोन केला .
" समीरा विनायक आणि बॉबी यांच्याही सिमकार्ड मध्ये तोच नंबर आहे का ? "
" होय , तोच नंबर आहे . आपल्या गुरुच्या आज्ञेचे पालन करावे ह्यावरच ती भर देत आहे . "
" ठीक आहे . त्या नंबरवरून अजून कोणाकोणला संपर्क करण्यात आला याची यादी काढा . "
चहा पिऊन गाडी पुढच्या प्रवासाला निघाली .
चहा पिऊन गाडी पुढच्या प्रवासाला निघाली .
जवळपास तीन तासांनी गाडी एका टुमदार गावात थांबली . गाव बरेचसे रिकामे होते . फारशी लगबग नसल्याने चौकशी करणे अवघड होते . दिलेल्या पत्त्यावर एक जुना वाडा होता . तिथे असणाऱ्या मुलाला शरदने जवळ बोलावले .
" ह्या वाड्यात मोठी माणसे कोणी आहेत का ? "
त्याने विचारले .
त्याने विचारले .
" एक म्हातारी आसा . "
मुलगा माहिती देऊन निघून गेला .
मुलगा माहिती देऊन निघून गेला .
वाड्यात गेल्यावर एक सुबक ठेंगणी आजीबाई अंगण झाडत असलेली दिसली .
" कोणाकडे आला ? काय काम आहे ? "
आजीची शुद्ध भाषा ऐकून कदम बघतच राहिले .
आजीची शुद्ध भाषा ऐकून कदम बघतच राहिले .
शरदने आपण पोलीस असून इंदुमती प्रधान यांना शोधायला आल्याचे सांगितले .
" इथे प्रधान नावाचे कोणीच रहात नाही ."
आजी म्हणाल्या .
आजी म्हणाल्या .
" आता नसतील रहात . पण पूर्वी कोणी रहात होते का ? "
कदम हळूच म्हणाले तशी आजी विचारात पडली .
कदम हळूच म्हणाले तशी आजी विचारात पडली .
" एक मिनिट थांबा , पूर्वी इथे एक प्रधान म्हणून बँक मॅनेजर राहायचे . त्यांची लहान मुलगी होती एक . तिचे नाव मात्र आठवत नाही . "
आजींनी त्यांना आठवलेला भाग सांगितला .
आजींनी त्यांना आठवलेला भाग सांगितला .
" सर , बँकेत जाऊन येऊ . "
कदमांनी विचारले .
शरद मंद हसला आणि दोघांनी बँकेची वाट धरली . पंचवीस वर्षांपूर्वी एका खेडेगावातील बँकेत काम करणारा माणूस आणि त्याचा पत्ता शोधणारी माणसे . एरव्ही कोणी उभेदेखील केले नसते .
" काय काम आहे ? "
चौकशी खिडकीवर असलेली महिला कदमांवर ओरडली .
चौकशी खिडकीवर असलेली महिला कदमांवर ओरडली .
शरदने हळूच ओळखपत्र समोर ठेवताच ती ताडकन उठून उभी राहिली .
" सर , आपण आत मॅनेजर साहेबांच्या केबिनमध्ये बसून बोलूया . "
बाईंचा सूरच बदलला .
पुढच्या अर्ध्या तासात प्रधान यांचा बँकेच्या रेकॉर्डवरील पत्ता शरदकडे होता .
इन्स्पेक्टर शरद आणि कॉन्स्टेबल कदम आपल्या दारात बघून समोरच्या माणसाची भंबेरी उडाली . त्याने कसाबसा नमस्कार करत त्यांना घरात घेतले .
" नमस्कार साहेब , पोलिसांना बघून घाबरायला होते ."
त्याने कसेबसे वाक्य उच्चारले .
" घाबरू नका . आम्हाला काही माहिती हवीय . "
" कशासंदर्भात " तो आणखी गोंधळात पडला . "
" इंदुमती प्रधान ! "
शरदने हे नाव उच्चारताच तो ताडकन उभा राहिला .
" कुठून आलाय तुम्ही ? काय झालेय नक्की ? "
" आम्हाला इंदुमती प्रधान यांच्या बद्दल माहिती हवी आहे . " शरद पुन्हा शांतपणे म्हणाला .
" सर इंदू आत्या बद्दल विचारलेले बाबांना अजिबात आवडत नसे . माझा जन्म झाला त्याआधीच तिचे लग्न झालेले . मला अंधुकसे आठवते ते बाबांचे रडणे आणि इंदू आत्याबद्दल हळहळणे .
माझ्याकडे तिच्या सासरचा पत्ता आहे . ती मनोरुग्णालयात असल्याची माहिती मिळाल्यावर पाच वर्षांपूर्वी तिला भेटायचा प्रयत्न केला . परंतु तिचे पालक म्हणून माझे नाव नसल्याने परवानगी नाही मिळाली . "
इंदुमती प्रधान यांच्या सासरचा पत्ता घेऊन शरद आणि कदम निघाले . तितक्यात समीराचा फोन आला .
समीराने इंदुमती प्रधान म्हणून बोलणारी एक मुलगी सापडल्याचे सांगितले . डार्क वेब वरून सिमकार्ड लोकेशन शोधण्यात तिला यश आले होते .
शरदने तिला शाबासकी दिली आणि तडक हाती आलेला पत्ता गाठला . डॉक्टर वैजयंती पाटील . घराबाहेर असणारी पाटी वाचत त्याने बेल वाजवली . नोकराने दरवाजा उघडला .
" डॉक्टर वैजयंती आहेत का ? "
" हो , मागच्या बाजूला दवाखान्यात मॅडम भेटतील ."
उत्तर मिळताच वळसा घालून शरद आणि कदम मागे पोहोचले .
उत्तर मिळताच वळसा घालून शरद आणि कदम मागे पोहोचले .
डॉक्टर वैजयंती पाटील मानसोपचार तज्ञ आहेत हे समजल्यावर आपण जवळ पोहोचल्याची खात्री त्यांना झाली . पेशंट संपल्याची खात्री होताच शरद आत गेला .
" मी इन्स्पेक्टर शरद , मुंबई क्राइम ब्रँच . "
" ओह , तुम्हीच ते प्रसिद्ध इन्स्पेक्टर तर ? "
डॉक्टर हसल्या .
डॉक्टर हसल्या .
" मॅडम सरळ मुद्द्याचे विचारतो विनय पाठक तुमचा पेशंट होता ? "
" थांबा मी चेक करून सांगते . एकच मिनिट . "
त्यांनी लॅपटॉपवर रेकॉर्ड तपासले .
त्यांनी लॅपटॉपवर रेकॉर्ड तपासले .
" नो , असा. पेशंट नाही माझ्याकडे . "
" इंदुमती प्रधान तुमच्या कोण ? त्या आता कुठे आहेत ? "
" आई आहे माझी . पण कशासाठी चौकशी करताय ? "
" गेले काही दिवस शहरात सुरू असलेले खून त्या करत आहेत . "
एकेक शब्दावर जोर देत शरद म्हणाला .
" व्हॉट नॉनसेन्स ? एक मानसिक रुग्ण असलेली बाई असे खून करेल ? "
" का नाही करणार ? काही विकृती असेल तर ? "
" इन्स्पेक्टर शी इज सफरिंग फ्रॉम डिसोसिएटिव आयडेंटिटी डिसऑर्डर . गेले वीस वर्षे माझी आई तिला कोणीतरी एक सुंदर प्रोस्टिट्यूट समजून जगते .
मी पहिले आहे तिला या अवस्थेत पोहोचताना . तिच्या नवऱ्याच्या विकृत लैंगिक गरजा भागवत मानसिक आजाराची शिकार होताना . जगाच्या घृणास्पद नजरा झेलल्या आहेत . "
डॉक्टर वैजयंती थांबल्या .
" मग म्हणूनच अशा लैंगिक विकृती असणाऱ्या लोकांचा तुम्ही तुमचे वैद्यकीय नॉलेज आणि आईचे नाव वापरून संपवत आहात . "
शरद वैजयंतीच्या डोळ्यात डोळे घालून शांतपणे म्हणाला .
" गेट आउट अँड कम विथ लीगल डॉक्युमेंट्स . "
जवळजवळ ओरडत डॉक्टरांनी त्यांना बाहेर जायला सांगितले .
" दोन मिनिटं थांबा डॉक्टर . वॉरंट येतच असेल . "
तितक्याच शांतपणे शरद उद्गारला .
" इन्स्पेक्टर प्लीज विश्वास ठेवा . मी एक डॉक्टर आहे . तुम्ही मला अटक केली तर माझे आयुष्य धुळीला मिळेल . "
" सॉरी , पण तुम्हाला चौकशीसाठी ताब्यात घ्यावे लागेल ."
शरदने समीराला फोन करून कागदपत्र घेऊन बोलावले .
" ओके , माझ्या वकिलांना फोन करू शकते का ? "
परवानगी मिळाल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या वकिलांना फोन केला .
परवानगी मिळाल्यावर डॉक्टरांनी त्यांच्या वकिलांना फोन केला .
" उद्या सकाळी बेल घेऊन येतो आता पोलिसांना सहकार्य करा . "
सगळे ऐकून वकिलांनी सल्ला दिला .
" इन्स्पेक्टर मी स्वतः येते . पण इथून अटक करून नेऊ
नका . "
वैजयंती शांतपणे म्हणाली .
" वीरेन , मी साहेबांच्या सोबत जाते आहे . उद्या क्लिनिक बंद राहील अशी पाटी लाव . "
एका तरुणाला आत बोलावून त्यांनी सूचना दिल्या .
शरद विजयी हास्याने क्लिनिक बाहेर पडला .
इंदुमती नाही तर मग कोण ?
डॉक्टर वैजयंती खुनी असतील का ?
वाचत रहा
भासती सत्य आभास जे
©® प्रशांत कुंजीर
भासती सत्य आभास जे
©® प्रशांत कुंजीर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा