Login

भातुकलीचा खेळ भाग 2

About Marriage

"अगं वंदना, अशी अंधारात का बसली आहेस? "

विकासरावांनी आपल्या पत्नीला चिंतेच्या स्वरात विचारले आणि रूममधील लाईट लावून ते पत्नीजवळ जाऊन बसले.

अगोदरच रडत असलेल्या वंदनाताई , विकासरावांच्या प्रश्नाने व ते जवळ येऊन बसल्यावर जास्तच रडू लागल्या.

"अगं, किती रडशील गं? असे सारखे रडून आणि दु:खी राहून काही होणार आहे का? अशाने तुझी तब्येत खराब होते आहे. झालेल्या गोष्टीचे मलाही दु:ख झाले आहे,
वाईट वाटते आहे; पण मी असा तुझ्यासारखा रडतो आहे का?"

विकासराव वंदनाताईंना समजावत म्हणाले.

"अहो, मी कितीही रडू आवरले, रडायचे नाही म्हटले, दु:ख करायचे नाही म्हटले तरी...आपोआपच रडू येत आहे. आमच्या स्त्रियांचा स्वभावच मुळात असा असतो. तुमच्या पुरुषांचे बरे असते..कोणत्याही प्रसंगाला किती सहजतेने सामोरे जातात."

वंदनाताई रडता रडता म्हणाल्या.

" तुझे सर्व म्हणणे खरे असले तरी, तुझ्या रडण्याने परिस्थिती बदलणार आहे का? यातून काहीतरी मार्ग काढावाच लागेल ना? "

विकासराव वंदनाताईंना धीर देत म्हणाले.

"बघा ना परिस्थितीही कशी बदलत असते. काही दिवसांपूर्वीच घरात किती आनंद,उत्साह होता! आपण सर्व किती खूश होतो!

रूप,रंग, शिक्षण या सर्व गोष्टीत रोहितला अनुरूप बायको मिळाली. यासाठी मी देवाचे आभार मानत होते आणि तिच्या माहेरील लोकही चांगलीच वाटत होती. असे काही होईल? असे काही तिच्या मनात असेल? असे आपल्याला कोणालाच जाणवले नाही.आपल्या चांगुलपणाचा, आपण ठेवलेल्या विश्वासाचा असा घात होईल? असा विचार स्वप्नात सुद्धा कधी आला नाही.
आपला रोहित किती साधा भोळा आहे. दिसायला देखणा, अभ्यासात हुशार आणि मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या पोस्टवर नोकरीला, कोणत्या मुलीकडे कधी वाईट नजरेने न बघणारा, सर्वांना मदत करणारा, आपल्या स्वभावाने सर्वांना आपलेसे करणारा. मी तर स्वतःला खूप भाग्यवान समजते की, देवाने मला इतका चांगला मुलगा दिला.

त्याचे लग्न करण्याचे ठरवताच, किती मुली त्याला सांगून आल्या; पण त्याला अनुरूप अशी भेटत नव्हती. आणि अनुरूप,मनासारखी भेटली तर तिने आपले गुण दाखवले. लग्नापूर्वी आपण तिची चौकशीही केली होती; पण त्या सर्वांनी तिच्याविषयी सर्व चांगलेच सांगितले.रोहितलाही ती मनापासून आवडली होती.जेवढ्या दिवस आपल्या सोबत होती, सर्वांशी किती छान वागत होती,बोलत होती. सर्वजण तिचे कौतुक करत होते. चांगली सून मिळाली. असे मला सर्व म्हणत होते; पण तिच्या मनात काय होते? हे काही तिने कोणाला कळू दिले नाही.

क्रमश:
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all