Login

भातुकलीचा खेळ भाग 3

About Marriage

तिला जे काही करायचे होते; ते लग्नाच्या अगोदरच करायचे होते ना! माझ्या रोहितबरोबर लग्न करून त्याच्या आयुष्याशी का खेळली? या गोष्टीचे वाईट वाटते आहे. लग्न म्हणजे काय भातुकलीचा खेळ वाटला का तिला? लग्न रोहितबरोबर केले आणि प्रियकरासोबत पळून गेली. ती आणि रोहित जेव्हा फिरायला जाण्यासाठी घरातून निघाले,तेव्हा दोघेही किती खूश होते!
आणि जेव्हा रोहित एकटाच परत आला तेव्हा तो किती दु:खी होता! तिने अगोदरच काही प्लॅनिंग केलेले असणार म्हणून तर तिचा प्रियकर तिकडे ...जिथे हे दोघे फिरायला गेले होते;तिथे आला आणि तिला बरोबर घेऊन गेला.रोहित काही बोलायला गेला,त्याला अडवायला गेला तर तिने व तिच्या प्रियकराने रोहितला जीवे मारण्याची धमकीच दिली. तो सर्व प्रकार पाहून रोहितला खूप मोठा धक्काच बसला. आणि अजून ती रोहितला म्हणते कशी....
'मला तर तुझ्याशी लग्नच करायचे नव्हते.माझे एका मुलावर प्रेम आहे . हे मी माझ्या आईवडिलांना सांगितले होते; पण त्यांना जावई म्हणून तू आवडला होता आणि त्यांनी मला तुझ्याशी लग्न करण्यास भाग पाडले.मी तुझ्याशी लग्न करावे.अशी त्यांची इच्छा होती व मी ती पूर्ण केली. आता मी माझ्या इच्छेप्रमाणे वागणार. तू कितीही चांगला असला तरी... मी तुझ्यासोबत संसार करू शकत नाही. माझे ज्याच्यावर प्रेम आहे, त्याच्यासोबत मी संसार करणार आहे. तुला मी घटस्फोट देणार आहे. तूही मला घटस्फोट देवून दुसरे लग्न करू शकतोस.'
रोहितला वाटले पोलिसांकडे जाऊन दोघांविरुद्ध तक्रार करावी; पण तिने जर पोलिसांना रोहितविषयी चुकीचे सांगितले असते, आरोप केले असते तर...अजून अडचणी वाढल्या असत्या.
आणि आपल्याशी व तिच्या आईवडिलांशी बोलणेही गरजेचे वाटले त्याला. म्हणून तो तसाच दु:खी मनाने घरी परत आला.
घरी आल्यावर जेव्हा त्याने हे सांगितले, तेव्हा हे सर्व ऐकून माझे हातपायच गळाले. मन एकदम सुन्न झाले. आपल्यासोबत खूप मोठा धोका झाला असे वाटू लागले.
हे सर्व झाले..त्यात चूक कोणाची ?
तिची की तिच्या आईवडिलांची? ती सांगत होती, तिचे दुसर्‍यावर प्रेम आहे..तर का तिच्या आईवडिलांनी तिला लग्नाची गळ घातली? आणि तिनेही लग्नाच्या अगोदर जायचे होते ना मग पळून...अशीही गेलीच ना..पण जाताना माझ्या रोहितच्या आयुष्याशी, त्याच्या भावनांशी खेळून गेली. तिला हा असा अधिकार होता का? रोहितशी असे वागून ती तिच्या आयुष्यात खरंच सुखी राहील का?

क्रमश:
नलिनी बहाळकर
0

🎭 Series Post

View all