"अहो...काय करताय? नको ना.. अहो ऐका ना माझ.. पाया पडते तुमच्या.. नको ओ मला त्रास होतोय." सारिका विनवण्या करत होती पण तो मात्र त्याची भूक शमवत होता. मन भरल्यावर तो तसाच नग्नावस्थेत अंथरुणावर पालथा झाला. ही छताकडे एकटक बघत आसंव गाळत होती. फुटक्या कौलातून दिसणाऱ्या चांदण्या बघत होती.
********
"बाबा बाबा.. मला पण या बाहुल्या सारखा नवरा हवा..मला पण लग्न करायचं आहे. मी पण आई सारखी साडी नेसणार छोटीशी चांदोबा ची टिकली लावणार छोटूसा अंबोडा घालून त्यात गोंड्याच फुल माळणार आणि माझ्या नवऱ्यासाठी छान छान जेवण बनवणार.. अगदी आई करते तस्स.. " दहा वर्षाची चिमुकली सारिका तिच्या लाडक्या बाबाला सांगत होती. बाबा पण लेकीच बोलण अगदी लक्षपूर्वक ऐकत होता.
आई पण लेकिकडे कौतुकाने बघत होती. लग्न झाल्यावर आई बापाला कोणी नाव ठेवणार नाही अशीच वागेल माझी लेक म्हणत... तिने पान वाढायला घेतली पण नशिबाने एका रात्रीत फासे पलटी केले. मध्यरात्री अचानक सरिकाच्या आईला ठसका लागला. उशाजवळ ठेवलेल्या तांब्यातल थोडस पाणी तिने पेल्यात घेऊन त्याचा घोट घेतला आणि तिथेच सगळा खेळ संपला. सारीकाच्या आईला देवाज्ञा झाली. बापलेकीची अवस्था फार वाईट झाली. बायकोविना त्याला त्याच हसत खेळत घर भयाण वाटू लागलं. सारिकाही आता शांत शांत राहू लागली. सारिकाच्या आईला जाऊन वर्ष सरल होत. सगळीच जण आता सारीकाच्या बाबांना दुसर लग्न करण्यासाठी सांगू लागले. बापाच्या गरजा नसल्या तरी पुरुषाच्या काही गरजा असतात म्हणून सारिकाशी बोलून घेऊन त्यांनी दुसऱ्या लग्नासाठी होकार दिला. नवी आई सारिकाला खूप लाड करू लागली. काही महिन्यांनी तिला दिवस गेले आणि लवकरच घरात पाळणा हलला.. सारिकाला तिच्या सोबत खेळायला तिचा हक्काचा भाऊ भेटला. मुळात गुणी असलेली सारिका बाळंतीण झालेल्या आईला काहीच काम करू देत नव्हती. तिला जमेल तेवढी काम ती करू लागली होती. दोन्ही मुलं..एकत्र मोठी होत होती. लहानगा श्रीधर पण सारीकाच्या अंगाखांद्यावर खेळत होता. सारिका जणू त्याची दुसरी आईच झाली होती. श्रीधर शाळेत जाऊ लागला होता. सारिका पण मोठी झाली होती. गरिबी असली तरी दोघे तिला खूप जपत होते. अशीच एकदिवस पैशांची नड होती म्हणून ज्योतीने भावाकडे पैसे मागितले. भावाने पैसे दिले पण नंतर पैसे घेण्यावेळी त्याने डबल व्याज लावल. एवढे पैसे देता येणार नाही अस म्हणताच त्याने पैशांच्या बदल्यात तुमची लेक माझ्या मुलाला द्या. अस बोलला. सारीकाच्या बाबांनी पण लगेच होकार दिला कारण घरातली मुलगी घरातच राहील. गावच्या मोठ्या माणसांमध्ये बसून लग्नाची बोलणी झाली. दारासमोर मांडव सजला. साध्या पद्धतीने लग्न सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. लेकीची पाठवणी करतांना पुरुषोत्तम रावांना लेकीचे लहानपणीचे शब्द आठवून डोळ्यात पाणी येत होत. सारीकाने पण आईला भावाला आणि बाबाला घट्ट मिठी मारून माहेर मनात साठवून घेतल आणि माहेरचा उंबरठा ओलांडला. नव्याने नऊ दिवस सरले आणि माहेरी सावत्र आईने न केलेला जाच सासूने आणि नवऱ्याने भरून काढला. दारू पिऊन शारीरिक छळ सुरू झाला. सासूने मानसिक छळ करायला सुरुवात केली. राहून राहून सारिकाला माहेरची आठवण येऊ लागली. महिन्याभराने सगळे सारिकाला भेटायला आले. घरी टवटवीत असणार त्यांचं फुल इकडे पार कोमेजून गेलं होत. सरिकाला असं बघून ज्योतीला भरून आल. तिने सारिकाला खूपदा विचारूनही तिने काहीच सांगितल नाही. लग्नाला सात वर्ष होऊन गेली सरिकाची ओंजळ अजूनही रिकामीच होती म्हणून तिला जास्त त्रास देणं सुरू केलं.
**********
छताकडे बघत सारिकाला या सगळ्या गोष्टी आठवत होत्या. विचार करतच पहाटे तिला झोप लागली. श्रीधर पण त्याच्या वयापेक्षा लवकर मोठा झाला होता. घरी आईला आणि शेतावर बाबांना मदत करत होता. आई बाबांसोबत दुसऱ्यांच्या शेतात पण कामाला जात होता. जबादारीमुळे तो ही त्याच्या बहिणी सारखा समंजस झाला होता. कधीच कुठला हट्ट नाही की काही नाही.

एकदिवस अचानक तो त्याच्या ताईला भेटायला तिच्या घरी गेला. दार ठोकणार तेच त्याच्या कानावर त्याच्या बहिणीची आर्त किंकाळी ऐकू आली.
क्रमशः
@श्रावणी लोखंडे.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा