Login

भाऊ माझा पाठीराखा भाग २

नात भावा बहिणीच


वाचवा... वाचवा...नका अस करू हात जोडते तुमच्या.. पाया पडते नका अस करू. सोडा मला....

श्रीधर कुठलाही विचार न करता खाडकन दार खोलतो. समोर श्रीधरला पाहून सारिका धावतच त्याच्या जवळ जाते. ती त्याला मिठी मारून रडत असते. घाबरी घुबरी झालेल्या सारिकाची शुद्ध हरपली. बहिणीची ही अवस्था बघुन श्रीधर पण घाबरला.

"भाऊजी..काय चाललंय हे.. ताई.. ए ताई..उठ ना ग..डोळे उघड ना. तुझा श्री आलाय बघ ना.. ए ताई.." श्रीधर त्याच्या ताईला उठवण्याचा पर्यंत करत असतो. त्याला सारीकाच्या अंगाला कसला तरी वास येतो म्हणून तो तिच्या हाताला उचलून स्वतःच्या नाकाजवळ धरतो आणि त्याच्या लक्षात येत की हे घासलेट आहे..

"काय करत होतात माझ्या ताई सोबत? ए ताई.. उठ ना ग.. ताई.." रडवेला होत श्रीधर ताईला उठवण्याचा निष्फळ प्रयत्न करत होता. श्रीधर च्या गोंगाटाने सारिकाचा नवरा आणि सासू दोघेही घाबरतात आणि तिथून निसटून जातात. श्रीधर बहिणीच मांडीवरून खाली ठेवतो आणि आतून पाणी घेऊन येतो. पाण्याचा शिबका तिच्या तोंडावर मारून तो तिला शुद्धीत आणतो. सारिकाला शुद्ध येते.

"ताई... ए ताई.. अग काय हे.. यांनी काय केलं ताई.. तुला काय झालं ताई? " श्रीधर

"श्री...श्री.... "सारिका हुंदका देईन आक्रोश करून रडू लागली. श्रीधरला मात्र फार काही कळेना. तो फक्त त्याच्या ताईला मिठी मारतो आणि स्वतः सोबत घरी घेऊन जायला निघतो. हाता पायावर पट्ट्याचे निशाण..अंगाला घासलेटचा वास.. केस विस्कटलेले..रडून सुजलेले डोळे.. कधीही अश्या अवस्थेत न बघितलेल्या ताईला अस बघुन श्रीधरला काही कळेना झालं होत. कधीही रिक्षाने न जाणारा श्रीधर बराच वेळ वाट बघून एक रिक्षा त्याला दिसली त्या रिक्षात तो त्याच्या लाडक्या ताईला घेऊन गेला.

"बाबा...आई...बाबा..."रिक्षातूनच श्रीधर आवाज देतो.
श्रीधर चा असा आवाज ऐकून दोघेही घरातून धावत येतात कारण कुठेही जाताना सांगून जाणारा श्रीधर न सांगता कुठे गेला हे दोघांनाही माहीत नव्हते आणि अचानक असा आवाज ऐकून दोघेही घाबरतात. श्रीधरच्या बाजूला सारिकाला बघून दोघेही कावरे बावरे होतात.

"सारिका.. ए बाय..सारिका.." रडत रडतच ज्योती तिला आवाज देते.

श्रीधर खाली उतरतो आणि पुरुषोत्तम राव लेकीला दोन हातात उचलून घेऊन घरात आणतात. दोघांचा गोंगाट ऐकून आजूबाजूची माणस पण गोळा होतात.

सारिकाला घरात आणून ओसरीवर चटई टाकून झोपवतात. सारिकाच्या अंगाला येणारा घासलेटचा वास.. मारझोड केल्याचे निशाण..सुजलेले डोळे बघून सगळेच घाबरतात. गावातील वैद्याला बोलवून तिला आधी मलम पट्टी करतात.

"ए बाय... बोल ग काहीतरी... तुझी अशी दशा बघून जीव जातोय बघ माझा.. "ज्योती कळवळून विचारत होती. तिथेच बाजूला पुरुषोत्तम राव उभे राहून लेक काय बोलेल हे बघत होते.

"आई...आई..." सारिका आईच्या कुशीत शिरून रडू लागते.

तिथेच उभा असलेला श्रीधर त्याने पाहिलेला सगळा वृत्तांत घरी सांगतो.

"माझच मेलीच चुकल...घरात पोर दिली तर डोळ्यांदेखत राहील..खुश राहील वाटल होत; पण सगळ उलट झाल.. तरी मागच्या वेळी मी तिला विचारलं होत.. का नाही सांगितलस ग तेंव्हा. पुन्हा इकडे येऊ नका..मी खूप खूष आहे अस बजावलं या पोरीने..स्वतःची शपथ घातली म्हणून नाही आलो ग आम्ही कधीच.. श्री... बाळा तू कसा गेलास तिकडे आणि ते पण न सांगता.

"आई..मला ताईची खूप आठवण येत होती म्हणून गेलो. तुला कितीवेळा बोललो पण तू नाही जाऊ दिलं म्हणून न सांगता गेलो." श्रीधर रडत रडत बोलू लागला.

"ज्योती लेकीला सारखी कुशीत घेऊन आसव गाळत होती आणि सारिका पण आईच्या कुशीत शिरून मोकळी होत होती.

गावातले मोठे पंच जमा झाले. सारिका सोबत जो अत्याचार झाला तो सगळ्यांनी ऐकून त्याविरुद्ध सारीकाच्या सासरच्या मंडळींवर केस करण्याचा निर्णय झाला.

क्रमशः
@श्रावणी लोखंडे

🎭 Series Post

View all