भाव तिथे देव

आई वडील हेच खरे दैवत



भाव तिथे देव / नेहमी दिसतो
भक्तांना भेटतो / जळी स्थळी

आई वडिलांची / मनोभावे सेवा
बदल्यात मेवा / मिळणार

आशीर्वाद रुपी / जीवन मिळाले
आयुष्य जाहले / पूर्ण तृप्त

मिळो पदोपदी / आईची ही माया
असो तिची छाया / नेहमीच

शोधतो कशाला / देव दगडात
समोर आहेत / मायबाप

©® परवीन कौसर
बेंगलोर