भावबंध हे मोहाचे
रात्री बर्याच उशिरा रोहिणी ला झोप लागली, ती पण विक्रम ने झोपेची गोळी दिली तेव्हा. झोपेतही ती तळमळत होती.
सकाळी सकाळी तिला सोनूच्या रडण्याचा आवाज येतो आहे असे वाटले आणि तीखडबडून जागी झाली.बाहेर चांगलच उजाडल होतं. स्वयंपाक घरातून विक्रमचा गुणगुणण्याचाआवाज येत होता. .तिने आजूबाजूला पाहिलं सोनू कुठे दिसत नव्हता, आणि ती एकदम भानावर आली. सोनू तिच्या पासून दूर सातासमुद्रा पार– आठवताच तिचे डोळे भरून वाहू लागले.
तेवढ्यात विक्रमची दाराशी चाहूल लागली हातात चहाचा ट्रे घेऊन उभे होते .चहाच्या केटली वर ची टिकोजी हळूच उचलून त्यांनी तिच्यासमोर केली,” पहा बर तुझ्या चहा सारखा अरोमा आहे कां? उठ बर ,लवकर फ्रेश हो मी बाहेर लाॅन मध्ये वाट पाहतोय म्हणत ते बाहेर गेले …
डोळे पुसून रोहिणी फ्रेश होऊन लाॅन मध्ये आली. चहा पिता पिता तिने इकडे तिकडे पाहिलं. तेवढ्यात ओंजळ भरून प्राजक्ताची फुले तिच्यासमोर करत विक्रम म्हणाले पहा बरं पारिजात किती सुंदर फुलला आहे आणि गुलाब जो मी नैनिताल हून आणलाहोता किती बहरला आहे.
खरच रे कितीतरी दिवसांनी मी बागेकडे पाहते आहे असे वाटते .
“मग काय कितीतरी दिवसात तू माझ्याकडे तरी नीट पाहायल आहे का?विक्रम ने डोळे मिचकावततिला विचारलं”.
रोहिणीला समजत होतं विक्रम तिला खुश करण्यासाठी हे सगळं बोलतात आहे पण काय करू अजूनही माझं मन त्या दुःखातून बाहेर येऊन इच्छित नाही, माझा सोनू ,-जवळ जवळ दीड वर्ष झाल माझ्या सोबत होता
माझा पूर्ण दिवसच त्याच्याअवती भवती फिरत होता नि अचानक ही पोकळी निर्माण झाली ती मी कशी भरून काढू?” तिचे डोळे भरून आले विक्रम पाहत होते तेवढ्यात त्यांचा फोन वाजला आणि ते उठून आत गेले.
रोहिणी कितीतरी वेळ जड़वत होऊन बसली होती कपातला अर्धा चहा तसाच थंड होऊन गेला पण तिला प्यायचं भान नव्हतं.

“रोहिणी मी आफिस ला जातोय .”
‘अहो पण तुमचा नाश्ता?’ मी लगबगीने विचारले!
“मी केंटिन मधे खाईन,आणि हो उद्या मला मिटींगसाठी पचमढ़ीला जायचे आहे, तीन दिवसाची मिटींग आहे तेव्हा मला उद्या सकाळीच निघावे लागेल . प्लीज माझी बॅग—.”
“मी केंटिन मधे खाईन,आणि हो उद्या मला मिटींगसाठी पचमढ़ीला जायचे आहे, तीन दिवसाची मिटींग आहे तेव्हा मला उद्या सकाळीच निघावे लागेल . प्लीज माझी बॅग—.”
‘भरेन ‘.
तु ही चल बरोबर तुलाही चेंज हवाच आहे इथे राहशील तर कंटाळशील” असे म्हणत ते निघून गेले.
मी घरात आले त्यांचे कपडे व इतर सामान पॅक केले. माझेही कपडे भरायसाठी मी अलमारीपाशी आले खोलीत सोनूच्या अनेक वस्तू त्याच्या इथे असण्याची आठवण करून देत होत्या मी सुटकेसकाढली व पलंगावर बसले माझ्या पायाखाली एकदम टेडी बियर आलं ते बींप- बींप आवाज करू लागल मी ते उचलल आणि त्याच्याकडे पाहत पहात पुन्हा आठवणींत गुरफटले…
राहुल आमचा एकुलता एक मुलगा ,शालेय शिक्षण पूर्ण होतात पुढच्या शिक्षणासाठी कानपूरला गेला .त्याच्या जाण्याने मला एकदम रिकामपण आलं पण तरीही माझी शाळेची नोकरी असल्याने मी बऱ्यापैकी बीझी होते. त्यामुळे लवकरच मी स्वतःला सावरले. त्या वयात बरीच आकर्षण होती, विक्रम सोबत होते आमचे दोघांचं असं एक छान बॉण्डिंग होतं .आम्ही एकमेकांना खूप छान समजून सांभाळून घेत होतो त्यामुळे आयुष्य अगदी छान जात होत. थोडक्यात सांगायचं तर आमचा रोमान्स कमी नव्हता झाला.
पुढे राहुल ला तिथेच नोकरी लागली माझं रिटायरमेंट जवळ येत होतं अशाच सुमारास अर्चना त्याच्याआयुष्यात आली .
पुढे राहुल ला तिथेच नोकरी लागली माझं रिटायरमेंट जवळ येत होतं अशाच सुमारास अर्चना त्याच्याआयुष्यात आली .
अर्चना एम.एससी.झालेली तिने पुढे एम.सीए केल व एका कंपनीत नोकरी करत होती. तिथेच राहूल शी तीची ओळख झाली व दोघं प्रेमात पडले.
राहुलने आम्हाला अर्चना विषयी सर्व सांगितलं तिला आई बाबा एक मोठा भाऊ भावजय असा तिचा परिवार होता.
“ लग्न केव्हा करायचंय? असं यांनी राहुलला विचारलं,
“ मी तर अगदी गुडघ्याला बाशिंग की काय ते म्हणतात त्याप्रमाणे तयार आहे’
“ लग्न केव्हा करायचंय? असं यांनी राहुलला विचारलं,
“ मी तर अगदी गुडघ्याला बाशिंग की काय ते म्हणतात त्याप्रमाणे तयार आहे’
“मग घोड़ कुठे अडलय? यांनी चेष्टेने विचारलं .
बाबा अर्चनाला कंपनी सहा महिन्याच्या कोर्ससाठी यु.एस ए ला पाठवते आहे म्हणून ती थोडं थांबायचं म्हणते आहे!”,
पण मग अर्चनाच्या बाबांची तब्येत बिघडली त्यांना आपल्यासमोर लग्नव्हाव ही इच्छा पाहून तिने जाण टाळलं, व दोघांचे लग्न झालं .
पण मग अर्चनाच्या बाबांची तब्येत बिघडली त्यांना आपल्यासमोर लग्नव्हाव ही इच्छा पाहून तिने जाण टाळलं, व दोघांचे लग्न झालं .
आम्ही दोघे खूप आनंदातहोतो .अर्चना खूपच समजूतदार होती. आपल्या मुलाचा सुखाचा संसार पाहून आम्ही दोघं निर्धास्त झालो.
एक-दोन वर्ष अशीच गेली आणि अर्चनाने गोड बातमी दिली. तिच्या माहेरी तशी परिस्थिती नसल्याने तिचे बाळंतपण करायचा निर्णय आम्ही आनंदाने स्वीकारला आणि सोनू चे आमच्या घरात आगमन झाले.
आम्ही दोघं आजी-आजोबांच्या पदाला पोहोचलो माझ्या रिटायरमेंटला अजून सहा महिने होते थोडे दिवस माहेरी राहून अर्चना परत आली आता तिच्या सुट्या संपणार होत्या आणि त्याच सुमारास तिला कंपनीने त्या कोर्स करता यू.एस.ए ला जाण्या विषयी विचारणा केली.
मागच्या वेळेस वडिलांची इच्छा म्हणून लग्नाचा निर्णय घेतला त्यामुळे ती संधी हुकली. आता सोनू लहान त्याला कोणाच्या भरोशावर सोडणार त्यामुळे ही संधी पण आता हातची जाते कि काय अशा विवंचनेत तीअसताना मी पुढाकार घेतला तसेही मी आता रिटायर होणार होते तेव्हा मी सोनूला संभाळेन असे अर्चनाला आश्वासन दिले, ही संधी परत परत येणार नाही सहा महिन्याचा तर प्रश्न आहे असे समजावले.

दुसरे दिवशी पासून सोनू चे सर्व करायला सुरुवात केली. घरात वर कामाला बाया होत्या त्यामुळे मला ते सहज जमत आहे असे पाहून मग अर्चना जायला तयार झाली. तिला सोनूला सोडून जाणे म्हणजे काळजावर दगड ठेवण्यासारखे होते पण उज्वल भविष्याच्या कल्पनेने तिने ते स्वीकारले.
मलाही सुरुवातीला जड गेले पण कर्तव्य भावनेने आणि मग सहवासाने प्रेम वाढत गेले. राहुलचे छोटे रूप आहे असे मला वाटायला लागले आणि मी हळूहळू सोनू ची आई झाले मला आता त्याच्याशिवाय आणि त्याला माझ्या शिवाय करमत नसे.त्याला बाटलीने दूध पाजणे त्याची झोप अंघोळ सर्व मी करत असे.
अर्चनाशी रोजच व्हिडिओ कॉल वर गोष्टी होत सोनुला पाहून त्याला कधी जवळ घेते असे तिला होत असे .पण दिवसभर तिचं काम आणि पार्ट टाइम जॉब यामुळे ती खूप थकलेली असायची.
एक दिवस अर्चना म्हणाली ‘आई माझा कोर्स लांबतो आहे अजून सहा महिने इथे राहावे लागेल असे दिसते काय करू?’
तू पूर्ण कर, सोनू मजेत आहे त्याची काळजी करू नको मी सांभाळते आहे , त्याचा काहीच त्रास नाही.” असे सांगितल्यावर मग तिने तिथे राहायचे नक्की केले.
पाहता पाहता सोनू आठ महिन्याचा झाला त्याला दात येत होते आणि तो तोंडातून काही काही शब्द काढू लागला अर्चनाला दाखवून त्याला ममा असे बोलायला शिकवले तर मला तो आई मम्मी असे काही शब्द बोलू लागला. त्याच्या त्या बाललीला पाहून आम्ही दोघे खूप सुखावत होतो.

असेच दोन महिने अजून गेले.राहुलचे पण तिकडे जायचे प्रयत्न चालले होते त्यालाही कंपनीच प्रोजेक्ट मिळाले आणि तोही यूएस ला निघून गेला. आता हे दोघे एकत्र राहतील हे ऐकून आम्हा दोघांना खूप आनंद झाला अर्चनाच एकटेपण पण संपले .त्यामुळे तिची काळजी नव्हती
पण थोड्याच दिवसात अर्चनाने बातमी दिली ती थोड्या दिवसां करता येते आहे..
अर्चना आली आणि तिने सांगितले यावेळेस मी सोनूला घेऊन तिकडे जाते आहे. आता राहुल पण आहे, आम्ही दोघं मिळून संभाळु, नाही जमलं तर मी नौकरी मधुन ब्रेक घेईन. तिने हे सांगितले आणि माझ्या पायाखालची जमीनच सरकली, सोनू शिवाय राहायचं? एक दोन दिवस अर्चना ने मी सोनू च कसं करते ते पाहून घेतले आणि मग दुसर्या दिवशी पासून तिने सोनू चे सर्व करायला सुरुवात केली. त्याला दूध पाजणं, आंघोळ घालणं, इथपर्यंत ठीक होतं पण् रात्री झोपताना सोनूला मीच लागते ग असे म्हणून मी त्याला आपल्याजवळ झोपवण्याचा प्रयत्न करत होते पण अर्चना त्याला थोपटतम्हणाली” आई तुम्ही कितीतरी दिवस नीट झोपला नसाल. आता मी सवय करते आणि तुम्ही निवांत झोपा.

ती जरी म्हणाली तरी मला रात्री काही केल्या झोप येईना इतकी सवय झाली होती ना सोनू ची, मी रात्री दोनतीन दा तिच्या खोलीत जाऊन पाहिलं तो छान झोपला होता .त्याच्या जाण्याच्या कल्पनेनेच मी कावरी बावरी झाले कसा राहील सोनू अर्चनाला अजून काहीच त्याच्याबद्दल माहिती नाही आणि तो तिला अजून नीट ओळखतही नाही मी तिला एक दोन वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्नही केला अग अजून थोडे दिवस इथेच राहू दे त्याला थोडा मोठा झाला शाळेत जायला लागला की मग घेऊन जा तोपर्यंत त्यालाही कळायला लागेल पण अर्चनाने तिला परत इतक्यात सुट्टी नाही मिळणार असे सांगितले तेव्हा मग मला काही च बोलता येईना.
आम्हाला ही अचानक तिच्या बरोबर जाणे शक्य नव्हते.
आई आपण रोज विडियो काल वर बोलू अशी तिनेमाझी समजूत काढली.
आम्हाला ही अचानक तिच्या बरोबर जाणे शक्य नव्हते.
आई आपण रोज विडियो काल वर बोलू अशी तिनेमाझी समजूत काढली.
आणि मग अर्चना आणी सोनू दोघं ही गेले.
माझा एकुण रागरंग पाहून एयरपोर्ट वर हे एकटेच गेले.
माझा एकुण रागरंग पाहून एयरपोर्ट वर हे एकटेच गेले.
विचाराच्या भोवर्यातून स्वयंपाकाच्या बाई ने मलाबाहेर काढले. ताई काय भाजी चिरू? तिला भाजी सांगून मी माझी सुटकेच भरली त्यात सोनूचा एक फोटो ही ठेवला.
पचमढीला पोचेस्तवर संध्याकाळ झाली. दिवसभराच्या थकव्याने मला लवकरच झोप लागली.
सकाळी जाग आली ती खोलीच्या बेल ने ,अंगावर शाॅलघेऊन रोहिणी लाॅन मध्ये आली.
पचमढीच्या सुंदर वातावरणात ही तिच्या मनातले दुःख कमी करण्याचे सामर्थ्य नव्हते .
उठल्या उठल्याच तिला सोनू ची आठवण येऊ लागली .

“ चहा बाहेर प्यायचा की खोलीत मागवू या राणी सरकार?” तिच्या उदास चेहऱ्याकडे पाहत विक्रमने दिला नॉर्मल करण्याचा असफल प्रयत्न करत म्हटले.
‘ चालेल कुठेही’ निर्वेकरपणे रोहिणी म्हणाली .
“हे बघ नाश्ता झाल्यावर मी दोन तास मीटिंग अटेंड करून येतो तोपर्यंत तू तयार हो मग आपण दोघं फिरायला जाऊ, इथे बरेच पॉईंट्स आहेत पाहण्यासारखे.” मागून तिच्या गळ्यात हात टाकत विक्रम म्हणाले ..
‘तुला आठवतं आपण याआधी केव्हा आलो होतो पचमढी ला?’ माझ्या डोळ्यात डोळे घालून विक्रम ने विचारले.
‘तुला आठवतं आपण याआधी केव्हा आलो होतो पचमढी ला?’ माझ्या डोळ्यात डोळे घालून विक्रम ने विचारले.
ते आमचे लग्नानंतरचे मधुचंद्राचे दिवस होते सनसेट पॉईंट वर आम्ही दोघे उभे होतो आणि मावळतिच्या सूर्याच्या साक्षीने यांनी मला किस केले होते. ते सगळं मला आठवत होतं पण त्या गोड आठवणींचा प्रकाश ही माझ्या मनावर चढलेल्या निराशेच्या अंधाराला दूर करण्यात असमर्थ होता.
संध्याकाळी फिरून येईपर्यंत पचमढीच हवामान बदलल, बाहेर थंडी पाहून आम्ही दोघे खोलीत आलो .
‘थकलेली दिसतेस आता जरा तब्येतीकडे लक्ष दे'.
‘मी ठीक आहे', असे म्हणून मी शांतपणे बसले.
‘थकलेली दिसतेस आता जरा तब्येतीकडे लक्ष दे'.
‘मी ठीक आहे', असे म्हणून मी शांतपणे बसले.
चलायचं बाहेर लाॅन मध्ये शेकोटी पेटवलेली आहे?’
‘नको ,काहीही करावेसे वाटत
नाही,.
‘सोनूची आठवण येते ना ?’
‘नको ,काहीही करावेसे वाटत
नाही,.
‘सोनूची आठवण येते ना ?’
विक्रम ने एवढे बोलण्याचा अवकाश माझ्या मनाचा बांध फुटला मी हसून हसून रडायला लागले .कसा असेल माझं सोनू? मी जरा दिसले नाही की लगेच रडायला लागायचा. आता शोधत असेल का हो मला?’
हो थोडे दिवस त्रास होईलच नवी माणसं,नवी जागा पण हळूहळू रुळेलच अर्चना घेईल काळजी त्याची, ती आई आहे ना.”
हो ठाऊक आहे! पण मी पण आई च झाले होते त्याची, दोन महिन्याचा पण नव्हता अर्चना त्याला माझ्याजवळ सोडून गेली तेव्हा ,मी जरा चिडूनच म्हटले.”
“ हो कबूल आहे ,तू अगदी आजी नाही आईच होऊन त्याचे संगोपन केले , त्याला काहीच समजत नव्हते.
“ म्हणूनच ,म्हणूनच मी तिला म्हटले की इतक्यात नको इतक्या दूर त्याला नेऊ, माझी सवय आहे त्याला कसा राहील? थोडा मोठा झाला की घेऊन जा.”

“अग लहान मुलं लवकर विसरतात ,आणि विचार कर आज तुला जो विरह त्याच्या जाण्याने होतो आहे तेच दुःख अर्चनानेही कितीतरी पटीने सहन केले असेल? तिचे मातृ हृदय त्याचं दूध तोडताना कितीतरी पिळवटल असेल? कितीतरी वेळा नुसत्या आठवणीने तिची छाती भरून आली असेल.”
‘ मी काही त्याचे कमी नव्हते करत एक जन्म नव्हता दिला फक्त!’
हो तू खूप केलंस एक सासू म्हणून, एक आजी म्हणून त्याहीपेक्षा जास्तच, तुझे कर्तव्य अगदी चोख पार पाडले आणि मला तुझा अभिमान वाटतो पण् या सगळ्यात तू इतकी गुंतलीस की तू सोनू वर तुझा अधिकार समजायला लागली, तू स्वार्थी होऊन बसली ,तुला आपल्या दुःखा पुढे अर्चनाच्या मातृ हृदयाची तळमळ जाणवलीच नाही आणि इथेच तू चुकलीस.”

विक्रम जे बोलत होते ते मला जरी जिव्हारी लागले तरी खरे होते आपल्या दुःखा पुढे मला काहिच जाणवत नव्हते. मला आपली चूक जाणवू लागली.
मी प्रेमात आंधळी झाले सोनू माझा नातू आहे आणि अर्चना त्याची आई हे विसरले.
मी प्रेमात आंधळी झाले सोनू माझा नातू आहे आणि अर्चना त्याची आई हे विसरले.
“माझं चुकलं हो! मी अर्चनाच्या भावना समजून घेण्यात कमी पडले ,मला तिची क्षमा मागायची आहे पण ती बहुतेक रागावली आहे माझ्यावर, म्हणून तर गेल्यापासून एक फोन ही केला नाही!”
आला होता, त्याच रात्री फोन, तुला झोप लागली होती म्हणून मीच उठवले नाही !ती तुझी काळजी करत होती .
आला होता, त्याच रात्री फोन, तुला झोप लागली होती म्हणून मीच उठवले नाही !ती तुझी काळजी करत होती .
‘काय म्हणाली?’
‘ आई रागावल्यात माझ्यावर !मला त्यांची क्षमा मागायची आहे!”
हे सर्व ऐकून मनातलं मळभहळूहळू दूर झालं.
हे सर्व ऐकून मनातलं मळभहळूहळू दूर झालं.
“ हे बघ आता तिथे रात्र आहे उद्या आपण घरी पोहोचलो की तू कर फोन
आणि हो आता जरा या गरीबा वर ही —-”
आणि हो आता जरा या गरीबा वर ही —-”
“ हो पाहतेच आता चला तर घरी -मी कृतकोपाने विक्रम कडे पाहत म्हटले” तशी ते हसायला लागले .
परतिच्या वाटेवर मी फोन मध्ये सोनू चे फोटो पहात असताना मला जाणवल राहुल असाच दिसायचा आठ,नऊ महिन्याचा असताना. मी हीतेव्हा नोकरी करत होते, घरात सासूबाई होत्या. त्या मी नसताना राहुल ला संभाळत, मी घरी आले की त्या त्याला माझ्या कडे सोपवत . सुरवातीला मला शाळेत ची कधी सुट्टी होते असे व्हायचे. सोनू ही मला पाहून पटकन माझ्या कडे हात करायचा. उन्हाळ्यात मी दोन महिने आई कडे जात असे सुरवातीला एक दोन दिवस राहुल ला आजी ची आठवण यायची . पण मग तो रमायचा
थोडा मोठा झाला आणि सासुबाई नाही राहिल्या. थोडे दिवस राहुल त्यांना घरात शोधायचा पण हळूहळू तो त्यांना विसरला.
रोहिणी अग बघ तर बाहेर नुकताच पाऊस पडून गेल्यावर सुर्य प्रकाशाने आकाशात किती सुंदर इंद्रधनुष्य उमटलं आहे रोहिणी ने मोबाईल बंद करून आकाशात कडे पाहिले. सर्व सात रंग मग ती बरेच वेळ बाहेरची दृश्य पाहून लागली .

तुझ्या इतका नसेल पण मी सुद्धा मिस करतो ग सोनू ला पण माहित होतं न कि तो कधीतरी—
पण खरं सांगू कुठे तरी कर्तव्य पूर्ती च समाधान आहे न ..
तुम्ही म्हणता ते खरं आहे पण मी जे करते ते मनापासून स्वतः ला झोकून देते. त्यामुळे बहुतेक —.”
आता स्वतः ला कशात तरी गुतवल पाहिजे.”
तुझे क्लासेस सुरू कर .

संध्याकाळी रोहिणी नेअर्चना ला व्हिडिओ कॉल केला तिच्या मांडीवर सोनू बसला होता सोनुने तिला पाहून आई आई असा ओरडा केला.’
हो रे राजा कसा आहेस त्रास तर नाही ना देत ?मी काळजी करत अर्चना लाविचारले?”
“कधी कधी देतो त्रास पण बराच रुळला आहे .”
“अर्चना मला क्षमा कर, मी तुला समजून घेण्यात कमी पडले .”
“आई काय बोलताय? अहो तुम्ही जे माझ्यासाठी केले ते माझ्या आई ला ही जमलं नसत. तुम्ही सोनू ची जबाबदारी घेतली म्हणून मी निर्धास्त पणे हा कोर्स आणि ही नोकरी करू शकले!”
“ हो पण या सगळ्यात तुझ्यातल्या आई चे मन मी समजून घ्यायला हवे होते.”
“आई कुठलीही गिल्ट मनात ठेवू नका! तुम्ही ते सर्व सोनूच्या वरच्या प्रेमापोटी बोललात! तुम्ही त्याची जशी काळजी घेत होता तशी मलाही जमणार नाही! आणि एक गंमत सांगू का तुम्हाला न कळू देता मी तुमचं ते अंगाई गीत तुम्ही रोज सोनुला झोपवताना “चंदा आहे तू मेरा सूरज है तू” म्हणायचा ते मी रेकॉर्ड करून घेतल आहे ते मी त्याला ऐकवते तेव्हाच तो झोपतो.”
अर्चना शी बोलल्यावर रोहिणीचे मन निवांत झाले तेवढ्यात,” अरे –आता आम्हालाही बोलायला मिळणार आहे कां? “विक्रम ने मध्ये तोंड घातले.
‘ घ्या बोला, मी जरा स्वयंपाकाचे पाहते म्हणत रोहिणी आत गेली!
काय म्हणतोय सोनू विक्रम ने विचारले?

हा काय इथे. खूप बदमाश झालाय.
“अर्चना थँक्स, तू मनात कुठलेही किल्मिश न ठेवता वेळेवरच सगळं सांभाळलं नाही तर तुम्हा सासू-सुनेच्या नात्याला एक गाठ पडली असती आणि ती पुढे सोडवणे कठीण झालं असतं. अश्या रेशीम गाठींची उकल खूप सांभाळून करावी लागते, ती तुला जमली.”
“ बाबा असं नका बोलू, आई खूपच प्रेमळ आहेत!
तेवढ्यात ‘अरे वा बाबा कसे आहात? आई कशी आहे राहुल मध्येच बोलला .
मजेत अरे एक सरप्राईज आहे तुझ्या आई करता ते फक्त आपल्या दोघातच ठेव. आम्ही दोघं पुढच्या दोन महिन्या नंतर तुमच्या लग्नाच्या वाढदिवसाला तिकडे येत आहोत असे म्हणताच दोघेजण हसायला लागले ,आणि ते ऐकून रोहिणी च्या चेहऱ्यावरही हास्य फुलले.
—-----------------------------------------------

Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा