भय इथले संपत नाही पर्व 2 भाग 21
मागील भागात आपण पाहिले की तिक्षिता आणि विभावरी आता राणी अवंतिकाला परत आणायच्या विधीला सुरुवात करणार होत्या. इकडे प्रियाने चारही वृक्ष पुनरुज्जीवित केले. त्यानंतर तिला वैदेही तिची जन्म कहाणी सांगत होती. आता पाहूया पुढे.
प्रिया आता लक्षपूर्वक ऐकत होती. सुवर्णलता हे नाव तिने सरदेसाई घराण्याच्या वंशावळीत कुठेही वाचले नव्हते.
ती वैदेहीला म्हणाली,"पुढे काय झाले? सुवर्णलता यशस्वी झाली का?"
वैदेही सांगू लागली,"आम्ही सुवर्णलताचे मनसुबे ओळखून तिचा बंदोबस्त करावा अशी विनंती आम्हाला केली. त्यानुसार मी आणि निरंजन वाड्यात आलो.
त्यावेळी हिराबाई नुकत्याच विवाह करून आल्या होत्या. त्यांची ननंद सीमा आणि त्यांचे खूप सौख्य होते."
सीमा नाव ऐकताच प्रिया म्हणाली,"सीमा तर माझ्या आईचे नाव आहे. म्हणजे माझी आई?"
वैदेही पुढे बोलू लागली,"सीमा अतिशय सालस आणि.सुंदर तरुणी होती. तिचे मन निरंजनकडे ओढले जाऊ लागले. आम्ही गावात पोहोचलो. गावातील लहान मुली नाहीश्या होत होत्या. गावकरी घाबरले होते.
सुवर्णलता नक्की काय योजना आखत आहे समजत नव्हते. अचानक एके दिवशी हिराबाई शांत झाल्या आणि त्यांना दैवी संकेत मिळाला. आम्हाला योजना समजली. पण तिथे एक अडचण होती. केवळ सरदेसाई घराण्यातील विवाहित मुलगी सुवर्णलताला थांबवू शकत होती.
हिराबाई आणि थोरले सरदेसाई दोघांनी निरंजनला आग्रह धरला. माझी संमती मिळाली आणि विवाह पार पडला. सीमा आणि निरंजन एक झाल्यावर आम्ही दिव्य अस्त्र योजले.
सुवर्णलता जिथे विधी करत होती तिथे हल्ला केला. दिव्य अस्त्राने तिच्या सगळ्या शक्ती हिरावून घेतल्या. सीमाने तिला इथून दूर जा असे सांगितले. आम्ही वाड्यावर परत आलो.
त्यावेळी निरंजन म्हणाला,"वैदेही,आता मला काही वर्षे सामान्य जीवन जगावे लागेल. त्यानुसार निरंजन ह्या युद्धात मारला गेला अशी अफवा पसरवली."
वैदेही गप्प झाली. प्रिया म्हणाली,"मग मला एक भाऊ आहे त्याचे काय? तो कुठे आहे?"
वैदेही म्हणाली,"त्याचे उत्तर हे युद्ध संपल्यावर तुला मिळेल. आधी तू वाड्यावर जा. विभावरी विधी सुरू करणार आहे."
प्रिया वाड्यावर परत आली. निशा हिराबाई बाहेर येण्याची वाट पाहत थांबली होती. प्रियाला पाहताच चारही पवित्र वृक्ष पुनरुज्जीवित झाले आहेत याची खात्री पटली.
आता संरक्षक कवच असल्याने काळया शक्तींना बाहेरून मदत मिळणार नव्हती. दालनाचा दरवाजा उघडला आणि हिराबाई बाहेर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावर दिव्य तेज झळकत होते.
निशाने हिराबाईंकडे पाहिले. स्मित हास्य करून हिराबाई म्हणाल्या,"चला,काळया शक्तींना संपवायची वेळ झाली."
निशा आणि प्रिया चालू लागल्या.
इकडे गढीमध्ये विधी सुरू झाले होते. तेरा चेटकीणी रिंगण करून उभ्या होत्या. मधोमध राणी अवंतिकाचा अचेतन देह ठेवला होता.
इकडे गढीमध्ये विधी सुरू झाले होते. तेरा चेटकीणी रिंगण करून उभ्या होत्या. मधोमध राणी अवंतिकाचा अचेतन देह ठेवला होता.
विभावरी आणि तिक्षिता विधिकरिता तयार होऊन आल्या. कपाळावर रेखलेला काळा तिलक,गळ्यात तंत्र शक्तीची विविध यंत्रे आणि जादुई दंड घेऊन दोघी सज्ज झाल्या.
विभावरी बोलू लागली,"हजारो वर्ष आपण अंधारात जगत आहोत.आपल्याला सर्व शक्ती प्रदान करणारे ज्ञान कैद आहे. आज आपण मुक्त होणार आहोत."
सगळ्या चेटकीणी चित्कारू लागल्या. आता तंत्र विधी सुरू झाला. जयवंत आणि विनय दोघांना विवस्त्र रिंगणात उभे केले. विभावरी आणि तिक्षिता त्यांच्या जवळ गेल्या.
स्त्री पुरुष संग चालू असताना हा विधी आणि तंत्र सुरू होणार होते.
इतक्यात,"थांबा!"असा दृढ आणि कणखर आवाज घुमला. समोरून हिराबाई येत होत्या.
त्यांना पाहताच विभावरी ओरडली,"पाहताय काय? संपवून टाका ह्या सगळ्यांना. आज आपला विधी पूर्ण होणारच."
विभावरीने आदेश देताच तेरा चेटकीणी लढायला तयार झाल्या. परंतु महाराणी गार्गी आणि महाराजांनी दिलेले दिव्य मंत्र सोबत असल्याने निशा आणि हिराबाई तयार होत्या.
इतक्यात तिक्षिता ओरडली,"खबरदार काही कराल तर. ह्या तिघींनी डोकी उडवली जातील."
उमा,अरुणा आणि स्वातीला खांबाला बांधलेले होते. हिराबाई थांबल्या. एका क्षणात विभावरीने बंधन मंत्र जपला. हिराबाई,प्रिया आणि निशा कैद झाल्या.
विभावरी जयवंत जवळ गेली,"दोनशे वर्षांपूर्वी अपुरे राहिलेले कार्य आज पूर्ण होणार. राणी परत येणार आणि चेटकीण वंश परत सुरू होणार."
विभावरी विवस्त्र झाली आणि जयवंत जवळ गेली. तिकडे तिक्षिताने सुद्धा विनयजवळ जाऊन विधी सुरू केला.
मंत्रघोष सुरू झाला. प्रणय रंगू लागला आणि त्याबरोबर राणी अवंतिकाचा अचेतन देह सचेतन होऊ लागला. विभावरी आणि तिक्षिता दोघींनी प्रणयात धुंद जयवंत आणि विनय दोघांच्या शरीरातील रक्त घेऊन शिंपडले आणि...
राणी अवंतिका प्रकट झाली. मूर्तिमंत सौंदर्य आणि क्रूरता यांचा अपूर्व संगम असलेली ,महामाया देवींची पट्ट शिष्या,सर्व शक्तिमान चेटकीण राणी अवंतिका.
तिने आपली जादुई वेणी सिद्ध केली आणि त्याबरोबर जादुई दंड प्रकट केला.
विभावरी हात जोडून उभी राहिली,"राणी अवंतिकाचा विजय असो."
सगळीकडे घोषणा दुमदुमत होती. अवंतिकाने डोळे उघडले. समोर प्रियाला पाहताच ती क्रोधित झाली आणि ओरडली,"राजकुमारी! आता तू वाचणार नाहीस."
असे म्हणून राणी अवंतिका पुढे होत असताना अचानक राणीला बांधले गेले. तिच्या शरीरातील शक्ती शोषल्या जाऊ लागल्या. राणी अवंतिका ओरडू लागली.
विभावरी क्रूर हसत म्हणाली,"हा सगळा घाट तुला जिवंत करण्यासाठी नव्हताच तर तुझ्या शक्ती प्राप्त करण्यासाठी होता. आता मी ते प्राचीन ज्ञान प्राप्त करून सर्व काळया शक्ती मुक्त करणार."
थोड्याच वेळात राणी अवंतिका अचेतन झाली. ह्यावेळी विभावरी सावध होती. तिने तात्काळ राणी अवंतिकाचा देह जाळायला आदेश दिला. परंतु प्राचीन सुरक्षा कवच ती ओळखू शकली नाही. राणीचा देह गायब झाला.
विभावरी निश्चिंत होती. तिला शक्ती हव्या होत्या. त्या मिळाल्या होत्या.आता बिजधारण विधी सुरू करायचा होता.
बिजधारण विधी पूर्ण होईल का? तिक्षिता आता काय करेल? हिराबाई जयवंत आणि विनय दोघांना वाचवू शकतील का?
वाचत रहा.
भय इथले संपत नाही.
©®प्रशांत कुंजीर
भय इथले संपत नाही.
©®प्रशांत कुंजीर
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा