Login

भय इथले संपत नाही पर्व 2भाग 12

तीन पैकी पहिली चावी मिळाली.आता पुढे काय होणार?



भय इथले संपत नाही.पर्व 2 भाग 12

मागील भागात आपण पाहिले,विभावरीने महादेवला जाळ्यात ओढण्यासाठी टाकलेला डाव यशस्वी झाला. आता चिंतामणरावांचे वडील शेतावर रहायला आले. सोबत विभावरी आणि चिंतामणसुद्धा आले. आता पाहूया पुढे.

शेतावर आल्यावर विभावरी आता निवांत होती. इथे तिच्याभोवती ते पवित्र कवच नव्हते. परंतु सगुणाबाई सावध होत्या. त्यांनी त्यांच्या विश्वासातील एक जोडी पाठवली. जिवाजी आणि शांता. हे दोघेही म्हणायला सरदेसाई कुटुंबाचे नोकर होते. प्रत्यक्षात ते योद्धे होते. त्यांना विभावरीवर आधीच संशय होता.

महादेव आयुष्यात पहिल्यांदा घडलेल्या स्त्री संगाने वेडा झाला होता. ते धुंद क्षण त्याला परत अनुभवावे वाटत होते. जखिनसुद्धा त्याच्या पुरुषत्वाने वेडावली होती. तिला महादेव हवा होता.विभावरी स्वयंपाक बनवायला गेली.


शांताने तिला अडवले,"धाकट्या बाई, वाड्यावरून हुकूम हाय. तुमासनी काय काम करू द्याच नाय. जा आराम करा."


विभावरी चिडली तरी शांतपणे बाहेर गेली.सगुणाबाई आता तुम्ही फार काळ यांना वाचवू शकणार नाही.

इकडे महादेव उतावीळ झाला होता. तिकडे जखिनसुद्धा तयार होती. ती अगदी साजशृंगार करून तयार झाली. तिला आता महादेव हवा होता. तेवढ्यात विभावरी आली.


तिने जखिनिला पकडले,"तुला महादेवला माझ्या हवाली करायचे आहे.मला तो हवाय."


जखिन गप्प बसली आणि कामगिरीवर चालू लागली.
महादेव तिची वाट पहात होता. तिने खाली पाहून धोतर दिले. तो म्हणाला,"कालssss ते ssss "


ती हसून म्हणाली,"म्या मंगला हाय. चांगुनाची भाची."

असे बोलताना ती हळूच त्याच्या जवळ सरकली. त्याने हलकेच तिला स्पर्श केला. तिने त्याच्या छातीवर डोके टेकवले आणि मधाळ आवाजात बोलू लागली.


शिकार सापडली होती. पारध बाकी होती. एवढ्यात उन्ह वर येऊ लागली. रात्री भेटायचे ठरवून महादेव निघून गेला.




विभावरीने आता तंत्र साधना सुरू केली. नग्न होऊन तिने मंत्र जपायला सुरुवात केली. तिचे ध्येय समोरच दिसत होते. थोड्या वेळाने ती आत आली. येताना पूजेची थाळी घेऊन आली.


सासरे आलेले पाहून म्हणाली,"देवाला जाऊन आले.हा घ्या प्रसाद."


आता शांता थांबवू शकणार नाही हे तिला ठाऊक होते.

सासऱ्यानी प्रसाद खाल्ला. शांताचा नाईलाज झाला. तिला काहीच करता आले नाही.

विभावरी तिला हसून म्हणाली,"शांता,मळ्यात ताज्या भाज्या असतात. आज तू आणि जिवाजी जाऊन भाज्या घेऊन या."


शांता हो म्हणाली. शांता आणि जिवाजी गेल्यावर चिंतामणराव जवळ यायला लागले. तसे विभवारीने संमोहन मंत्र जपून त्यांना झोपवले.

क्रूर हसत ती म्हणाली,"मला महादेवचा अंश पाहिजे."


सगुणाबाई आता असवस्थ होत्या. नक्की काय करावे त्यांना सुचत नव्हते. आजवर त्यांनी काळया सावल्या रोखून धरल्या होत्या. परंतु आता मिळालेले आव्हान मोठे होते.

विभावरी नक्की आहे कोण? तिच्याकडे काळया शक्ती आहेत का?

याविषयी काहीच ठोस माहिती मिळत नव्हती. अशावेळी त्यांना एकच मार्ग दिसत होता. त्यांनी लागलीच गावाबाहेर देवळात जायची तयारी केली. सगुणाबाई देवळात पोहचल्या.


पुजारी समोर आला आणि सगुणाबाई चिंतेत असल्याचे पाहून म्हणाला,"कसली चिंता आहे? काही संकट आहे का?"

त्यावर सगुणाबाई म्हणाल्या,"चेटकीण परत आली आहे. ह्यावेळी सरदेसाई घरात तिने प्रवेश केला आहे."

हे ऐकल्यावर पुजारी म्हणाले,"म्हणजे युद्धाची तयारी करायची का?"

सगुणाबाई म्हणाल्या,"हो,कोणत्याही क्षणी घात होऊ शकतो."


सगुणाबाई आता थोड्या निश्चिंत झाल्या आणि देवळाबाहेर पडल्या.

समोरून जिवाजी येताना पाहून त्या थांबल्या,"जिवाजी,सगळे कुशल आहे ना?"

जिवाजी म्हणाला,"आक्का,ती खूप तयारीची हाय. पहिला घाव थोरल्या मालकांवर घालणार."


निरोप देऊन जिवाजी निघून गेला.


इकडे महादेव उतावीळपणे मित्रांना बोलून बसला. त्याबरोबर आपल्या मित्राला वेड लावणारी अप्सरा आहे कोण? ह्याचा शोध घ्यायचा त्यांनी ठरवले. महादेवला काहीच कळू न देता ते मळ्यात निघाले.


महादेवसारख्या पुरुषाचे एका भेटीत हृदय जिंकणारी स्त्री अप्रतिम लावण्यवती असणार यात शंका नव्हती. संध्याकाळी मजूर घरी जायच्या वेळेला ते आडबाजूला उभे राहिले. मंगला बनलेली जखिन सगळ्यांच्या मागून घरी जायला निघाली.


थोडा वेळ जाताच तिला हे दोघे आडवे गेले. तिचे अप्रतिम लावण्य पाहून यांचा ताबा सुटला.

त्यातील एकाने तिचा हात धरताच ती म्हणाली,"काय करताय?हात सोडा."


दुसरा हसत म्हणाला,"महादेवने केले तेच करू."


असे म्हणून तिला जवळ ओढले. तिने आता छान हसून दोघांनाही जवळ बोलवले..कामवासनेने अधीर दोघेही तिच्याकडे झेपावले आणि काही कळायच्या आत तिने दोघांची डोकी पिरगळून टाकली. दोघेही तडफडत मेले. ती पूर्ववत रूप घेऊन निघून गेली.



विभावरी संध्याकाळी जेवण करताना म्हणाली,"मामंजी तुम्ही शहरात जाणार आहात ना दोन दिवसांनी?" आबा हो म्हणाले.

तसे विभावरी गोड हसून म्हणाली,"मला काही वस्तू हव्या आहेत. तर मी येऊ का बरोबर?"

सासरे बोलून गेले,"हो,चला. दोन दिवस तिथल्या बंगलित रहा. मग परत येऊ आपण."


शांताने हा निरोप वाड्यावर पोहोचवला. तेवढ्यात सगुणाबाईंचा विष्णू गडबडा लोळू लागला,"आई,पोटात खूप दुखतेय. काहीतरी कर."


सगुणाबाई म्हणाल्या ,"शांता पाणी गरम करायला घे. जिवाजी वैद्याला घेऊन ये."


सगुणाबाई विष्णूजवळ बसून राहिल्या.

विभावरीने जायची तायरी केली.
महादेव म्हणाला,"आबा,सध्या व्यायाम जोरात सुरू आहे.मला यायला नाही जमणार."


विभावरी हसली,"भावजी कुस्ती नीट खेळा बर का?"

महादेव थोडा चपापला. विभावरी सासऱ्या बरोबर शहरात आली..आल्यावर तिने दोन वेळा त्यांना संमोहित करायचा प्रयत्न केला..दोन्ही वेळेस मंत्र चालला नाही..आता ह्याबाबत चिंतामणराव आपल्याला सांगू शकतात.


तिने त्या रात्री चिंतामणरावांना ते सुख दिले आणि बदल्यात खूण असलेल्या पुरुषाला एक पवित्र धागा बांधतात हे सांगितले. विभवारीचे काम झाले होते.



दोन दिवस राहिल्यावर परत जायचे होते. सकाळी चिंतामणराव तसे सांगायला आले..विभावरी झोपून होती.


त्यांनी हाक मारली,"विभा,बरी आहेस का?"

विभावरी हळुच म्हणाली,"संध्याकाळी निघाले तर नाही का चालणार? अंगात बारीक कणकण आहे."


चिंतामणराव म्हणाले,"आबांना सांगतो."


असे म्हणून ते बाहेर गेले. विभवारीने स्वयंपाकात आपली जादू दाखवली..दोघेही वामकुक्षी घेत गाढ झोपून गेले.


संध्याकाळी सगळे निघाले. घोडे अस्वस्थ खिंकळत होते. पक्षी बेसूर ओरडत होते. प्रवास सुरू झाला. रात्र पडू लागली.


चांदणे पडलेले पाहून आबा म्हणाले,"इतकी दाट रात्र आणि चांदणे पडलेय ना?"

चिंतामणराव म्हणाले,"हो,किती सुंदर आहे ही रात्र."

शहर संपून जंगल सुरू झाले. तेव्हा मात्र आबांचे लक्ष आकाशात गेले,"चिंतामण,अरे आज अमावस्या आहे.सुनबाई, तुमच्या लक्षात आले नाही का?"


विभावरी काहीच बोलत नव्हती. पाठमोरी बसलेली विभावरी मंत्र म्हणत होती. काळे धुके पसरू लागले.


आबांना धोक्याची जाणीव झाली,"चिंतामण पळ. विभवारी ssssss"


क्रूर हसत ती म्हणाली,"बोला आबा,बोला. विभावरी चेटकीण आहे..तुमचा मुलगा काहीच करू शकत नाही."


आबांनी गळ्यात हात घातला धागा नव्हता. विभावरीने अक्राळ रूप धारण केले..तिने आबांना पकडले आणि त्यांचा श्वास बंद पडेपर्यंत त्यांना दाबून धरले.


आबांनी प्राण सोडताच त्यांच्या शरीरातून बाहेर पडलेली दिव्य चावी तिने ताब्यात घेतली.. पहिली शिकार झाली होती.



दुसऱ्या दिवशी चिंतामण सकाळी बंगलीत जागा झाला. तोवर वाड्यावरुन नोकर बातमी घेऊन आला होता. चिंतामणराव आणि विभावरी वाड्यावर आले.


चिंतामण रडत म्हणत होता,"आबा,तरी विभा म्हणत होती. आज नको जायला. उद्या सकाळी जाऊ. तुम्ही ऐकायला हवे होते."


सगळ्यात सगुणाबाई शांत होत्या. त्यांना एकच प्रश्न सतावत होता. आबांच्या गळ्यात असलेला धागा कुठेय?


विभावरी कोपऱ्यात खाली मान घालून बसली होती.


पुढे काय होईल?इतर दोघांना मारण्यात विभावरी यशस्वी होईल का? सगुणाबाईंना मदत मिळेल का?

वाचत रहा.
भय इथले संपत नाही.