भेटली तू पुन्हा! भाग - आठ

दुरावलेले दोघे
भेटली तू पुन्हा !

भाग - आठ


“ माझचं कौतुक करत असेल. असचं रोज पाहता यावं यार हिला.” त्याने फोन लावला.

“तुला कळत कसं नाही वारंवार विश्वराज समोर आल्यावर मी .. माझ्या निर्णयावर ठाम राहिल की नाही? भिती वाटते की माझा कंट्रोल सुटून त्याच्याकडे धावत जाऊन मिठीत जाईल.. माहितीये आहे ना तुला .. तरी पण .. माझी साथ द्या ऐवजी त्यांची देतो.. आधी फोन मग ऑफिसमध्ये भेटणं आणि आता घरी ड्रॉप करणं.. एकाच गाडीत अगदी हाताच्या अंतरावर होते. खूप रागवासं वाटलं, चिडावसं वाटलं. असं का केलतं माझ्यासोबत हा प्रश्न विचारावासा वाटतो. ती त्या नभातील चंद्राशी कधी चिडून तर हतबल होऊन बडबडत होती. बोलता बोलता ती दुःखी होऊन डोळे ही ओलावले होते. किती प्रयत्न केला तरी त्या डोळ्यांतील पाणी बाहेर ही आलचं. तिने डोळे पुसले आणि आत गेली.. तिचा नाराज चेहरा आणि डोळे त्याला खूप काही सांगून गेले..

“हॅलोऽऽऽ अमन.” विश्वराजचा आवाज ऐकून अमनने खाडकन डोळे उघडले.

“येस सरऽऽऽ ..”

“लिसन अमनऽऽ… .” बराच वेळ विश्वराज त्याच्या सोबत बोलत होता. बोलून फोन ठेवला तर तिच्या बाल्कनीत पाहिलं तर रूमचा लाईट बंद झाला होता मग विश्वराज ही घरी निघून गेला.

सकाळ झाली तर आदि तिच्या कुशीत शांत झोपलेला होता. त्याच्या कपाळावर ओठ ठेवून ती आवरायला गेली.. पटकन तयार होऊन ती आदिला उठवू लागाली.

“राज उठ ना बच्चाऽऽ.” भक्ती राजच्या केसांमध्ये हात फिरवत म्हणाली..

“ मम्मा..” त्याने डोळे किलकिले करत अर्धवट उघडून बघितले. तिचा नाजूक चेहरा दिसला तर त्याच्या चेहऱ्यावर हास्य आले त्याने दोन्ही हात पसरले. भक्तीने पटकन त्याला आपल्या कुशीत घेतले. मध्ये मध्ये त्याच्या डोक्यावर पप्पी घेत होती..

“चल उठ बाळा, मला ऑफिसला जायचं .. गुरुजीपण येतील. चल मी आवरून देते मग मला नाश्ता बनवायचा आहे.”

“मम्मा, मी माझी करतो अंघोळ.”

“काऽऽ? मी करून देते छान.”

“नाही. मला लाज वाटते.” तो खाली मान घालत लाजून म्हणाला

“ अरेऽऽऽ मम्मा समोर का लाजायचं? .. छोटा असल्यापासून करतेय न पिल्लू .. तेव्हा तर मी तुला बिन चड्डीचा पाहिला आहे.” ती हसून म्हणाली.

“म्हणूनच तर नाही म्हणत आहो मी..” राज गाल फुगवून म्हणाला.

“नाही हसणार माझ्या बाळाला.” ती त्याच्या गालावर ओठ ठेवत म्हणाली. भक्ती राजची अंघोळ करून तो नाही म्हणत असतानाही त्याचं आवरून दिलं. चड्डी काढतांना ही त्याने भक्तीला डोळे बंद करायला लावले होते आणि तिने केलेही. राज तयार होऊन नानांसोबत गार्डनमध्ये गेला नाश्ता बनवून टेबलवर लावला.

“बाबा, राज आत या.” आत येऊन तिघांनी सोबत नाश्ता केला.

“ मिठ्ठू, गुरुजी येणार आहेत.”

“हो बाबा .. उदयाची तयारी करावी लागेल. त्यांनी लिस्ट दिली की मागवून घेते. पूजा नंतर मंदिरात आणि आश्रमात जाऊन येऊ.”

“चालेल. राघवला मदतीला घेऊन जा.”

“हो आणि लिलीही आहेच.”,

“ हम्म” त्यांनी हुंकार दिला. तितक्यात गुरुजी ही आले.

“याऽऽ याऽऽ नमस्कार.” रावसाहेबांनी गुरुजींचे स्वागत केले.

“राधे राधे रावसाहेब.” गुरुजी प्रसन्न चेहऱ्याने म्हणाले.

“राधे राधे गुरूजी.. कसे आहात?”

“राधे राधे बेटा .. प्रभूचा आशिर्वाद ..” ती स्मित करत हात जोडत प्रसन्न चेहऱ्याने बोलले.

“तू कशी बेटा? आणि तूझा नंदगोपाल कुठे आहे ?

“हा इथेच तर होता.” भक्ती इकडे तिकडे बघत म्हणाली..

“राजऽ..” भक्तीने आवाज दिला.

“आलोऽऽ..” राज धावतच आला.

“ पिल्लू, आशीर्वाद घे यांचा.” त्याने लगेच स्पर्श करण्यासाठी त्यांच्या पायाकडे वाकला मध्येच गुरुजींनी त्याला उठवून त्याला आशीर्वाद दिला. गुरुजींना जल, दूध ग्रहण करून पुजेचा मुर्हत काढला त्यानुसार त्यांनी काही सामानाची यादी बनवून दिली. काही साहित्य ते स्वतः आणणार होते.

“उदया सर्व तयार ठेवा. राधेऽ राधेऽ ” बोलून ते निघून गेले..

भक्तीही उद्याच्या तयारीला लागली. राघवला सोबत घेऊन गेली. आधी ऑफिसला मग बाहेर शॉपिंगला जाणार होती.. ऑफिसमध्ये आल्या आल्याच कामाला लागली.

“लिलीऽ, आपल्याला थोडी शॉपिंग करायची आहे…

“हो मॅम जाऊ पण आज.. एक मिटिंग आहे.. “ लिली.

“ कॅन्सल कर .. यापेक्षा महत्त्वाची नाहीये.”

“ओके मॅम.”

“मॅडम चहा ..” ऑफिसमध्ये काम करणाऱ्या काकांनी चहा आणून दिला

“ठेऊन द्या काका ..” ती वर न पाहता मिळाली. काका चहा ठेवून गेले.. काका थोड्या वेळाने कप घ्यायला आले पण चहा जसाच तसा होता.. आज तिला चहा पिण्याचीही उसंत मिळाली नव्हती.

मॅडम तुम्ही चहा प्यायलाच नाही.”

“मी चहा घ्यायचं विसरले हो काका.”

“मी दूसरा चहा घेऊन येतो.” तितक्यात लिली केबिनमध्ये आली.

“मॅडम, मिस्टर अभ्यंकर सर मिटिंगसाठी आलेत.”

“पण मी तुला नाही म्हणाले होते मिटिंगसाठी

“मॅडम त्यांना आज मिटिंग करायची होती. लिगली पेपरवर्क आणि अजून काही आहे म्हणत.


“लिली, कधी व्हायचं आणि कधी जायचं आपण. उद्याची तयारी करायची आहे. दे आता पाठवून त्यांना .. सोबत माझा चहा आणि त्यांची ब्लॅक कॉफी पाठवं.” तिने लिलीला सांगितले. लिली मोठे डोळे करून तिला निरखत होती.

“अरे अशी काय बघतेस माझ्याकडे लवकर मिटिंग होईल .. त्यासाठी आहे सर्व.. बाकीचं रजतला सांगून दे .. तो ऑफिसमध्ये पाहून घेईल. उद्या आपण इथे नसणार आहोत.”

“डोन्ट वरी मी करते सर्व..” ती बाहेर गेली. लिलीने विश्वराजला आत पाठवले. तो नॉक करत आत आला.

“येस, वेलकम मिस्टर अभ्यंकर. प्लिज हॅव अ सीट.”

“मिस्टर अभ्यंकर जर तुम्हाला म्हणाले होते की, मिटिंग पोस्टपोन करूया मग असं अचानक.”

“ या मी पण आऊट ऑफ टाऊन आहे म्हणून आज आलो.”

“ओके . ज्यासाठी आले आहेत ते करूया.”

मिटिंग स्टार्ट झाली. त्याने pd तिच्या लॅपटॉपला कनेक्ट केला. ती पाहत होती आणि समजून घेत होती.. अमन एक बॅग घेऊन आला त्याने काही पेपर्स काढले आणि तिच्यासमोर ठेवले.
चहा कॉफी आणि काही स्नॅक्स् त्यांच्यासमोर ठेवण्यात आला. .

“प्लिज ..” ती कॉफीकडे निर्देश करून घेण्यास सांगत होती.

“एक्सयूज मी ..” ती वॉशरूममकडे वळली.. त्यांने एक कॉफिचा सिप घेतला तितक्यात त्यांच्या कानांवर भक्तीची आरोळी पडली.


“ आऽऽऽ … . आऽऽऽ . .” तो वॉशरूम जवळ गेला आणि ती पटकन त्याच्या मिठित शिरली…

“तिच अंग थरथरत होतं.. त्याच शर्ट दोन्ही हातांनी घट्ट पकडून तिने चेहरा त्याच्या मानेत घातला… ती अचानक अशी मिठित आल्यामुळे त्याचं हृदय धडधडलं. तिचा स्पर्श त्याला रोमांचित करून गेला. या स्पर्शासाठी आसुसला होता. पूर्ण शरीरभर तरंग उठू लागले.. कसेबसे भावनांना नियंत्रित करून घाबरलेल्या तिला त्याने काळजीने विचारले.

“भक्ती काय झालं? कशाला घाबरलीस इतकी?” तो तिच्या पाठीवर हात फिरवत म्हणाला.

“ ते ते आत ..”

“ काय आहे ?”

“आत .” तिने
त्याचं हातात पकडून ठेवलेलं शर्ट सोडलं आणि ती भानावर येत दूर झाली.

“ … . .”

“मी आत गेल्यावर दार उघडलं आणि आणि दारावर असलेली पाल माझ्या अंगावर पडली. ईव ई ई ई …”ती तिथल्या तिथेच डोळे बंद करून पालचा स्पर्श आठवत उड्या मारायला लागली..

तो तिच्या वेडेपणावर गालात हसत होता.

“भक्ती…” तिचे दोन्ही खांदे पकडून हलवले.

“गेलीय ती रिलॅक्स..” तो तिला समजवत म्हणाला..

“बाय द वे मी चॅलेंज जिंकलोय ते ही चोवीस तासांच्या आत.” तो गालात हसत म्हणाला. तिने डोळे बारीक करून त्याच्याकडे पाहिले..

“हूँऽऽऽ..” तिने नाक मुरडले. “ते तर लक बाय चान्स झालयं. ती पाल अंगावर पडली नसती तर हे घडलचं नसतं.”

“ते काहीही असो मी जिंकलो आहे. त्याचं बक्षीस तर मला मिळायलाच पाहिजे.”

“वाट पहा मग.” केसांना झटका देऊन ती वळली.

“ वाट तर मी आताही पाहातच आहे.” वेळेवर बक्षीस घेईल मी आणि जे माझं आहे ते मलाच मिळणार आहे.”

यापुढे ती त्याच्यासमोर थांबली नाही. ती पटकन फ्रेश होऊन झाली. काहीही न बोलता त्यांनी चहा कॉफी घेतला. कॉफी पित पित तो तिला अधून मधून बघत होता.

“मॅम, आपल्याला निघावं लागेल.” लिली आत येत म्हणाली.

“हो.. दहा मिनिटांत निघूया.”

“ ओके.”

“मिस रणदिवे ओके सी यू ऑन मन्डे. बाय ” तिच्या उत्तराची वाट न पाहता तो कॅबिनमधून बाहेर पडला.

“ आत काय आहे यांचं मन्डेला.” ती विचार करू लागली.

“मॅम .. चलायचं.” भक्ती लागलेल्या तंद्रीतून बाहेर आली.

“रजत त्याला .” भक्ती
“ त्याला सर्व सांगितलं आहे .” लिलीने भक्तीला बोलू न देता तिच अर्ध वाक्य पूर्ण केलं.

“स्मार्ट गर्ल..” भक्तीने तिचं कौतूक केलं. लिलीने आपल्या टॉपची नसलेली कॉरल सरळ केली.

“आय एम ऑल रेडी व्हेरी स्मार्ट. तेही आईच्या पोटातून ..”

“म्हणून बाहेर आल्या आल्याच लिलावतीच लिली केलसं.” भक्ती तिला चिडवू लागली.

“मॅम प्लिज हळू ना.. तुम्ही ना मला थोडाही भाव खाऊ देत नाही. लगेच हरभऱ्याच्या झाडावरून दणकन खाली आपटता.” ती गाल फुगवून म्हणाली.

“अगं भाव नको खाऊ, चल मी तुला तुझ्या आवडीच खाऊ घालते. ते खा पण भाव नको खाऊ..” भक्ती तिच्या गळ्यात हात टाकत हसत म्हणाली. दोघही शॉपिंगला गेले.. राघवने अर्धे काम करून आला .… राघव अन् लिली सोबत तिच्या आवडता नाश्ता खाऊन झाला. संध्याकाळी सहाच्या सुमारास तिघेही घरी परतले.


🎭 Series Post

View all