भेटली तू पुन्हा ! भाग - दहा

भक्तीराज
भाग -10 


रविवार असल्यामुळे भक्ती आज निवांत बेडवर लोळत पडली होती.. राज ही अजून जागा झाला नव्हता.. भक्तीने तिचं आवरून घेतले. आज पूर्ण दिवस ती त्याच्यासोबत वेळ घालवणार होती. आवरून ती किचनमध्ये गेली. राजच्या आवडीचा नाश्ता बनवायला लागली. नाश्ता तयार करून ती राजला उठवायला गेली तर तो आधीच उठलेला होता. बाथरूम मधून पाण्याचा आवाज आला. 

“पिल्लू, मी अंघोळ करून देऊ का?"

“नाही आलोच बाहेर.” आतून त्याचा आवाज आला. भक्तीने त्याचे कपडे बाहेर काढून ठेवले. कमरेला छोटा टॉवेल गुंडाळून तो आत आला. पॅन्ट चढवून तो टिशर्ट घालत होता. कपडे चढवून तो आरसाजवळ जाऊन त्याने हेअरब्रश हातात पकडून केस सेट करत होता. भक्ती बेडवर बसून हातावर हनुवटी टेकवून डोळ्यांची उघडझाप करून त्यालाच बघत होती..

“ आय ॲम रेडी… खाली जाऊया मला भूक लागली.” तो तिच्याजवळ आला. तिने त्याचे लाड करत गालावर ओठ ठेवले आणि दोघही खाली आले. रावसाहेब सोफ्यावर बसून पेपर वाचत बसले होते..

“गुडमॉर्निंग नानू, आलो मी.”

“ गुडमॉर्निंग राज .. अरे वा छान तयार झालास.” नानूने त्याचे कौतक केले..

“ थॅक्य यू नानू , चला मला भूक लागली आहे.”
“ हो चल मीही तुझीच वाट पाहत होतो.” दोघेही डायनिंग टेबलवर जाऊन बसले. राजच्या आवडीचे पदार्थ होता .. आलू पराठा विथ दही..

“ वॉव इट्स टेस्टी ..” राज मिटक्या मारत खाऊ लागला. 

“मम्मा, आज तू माझ्या सोबतच राहणार आहेस?”

“ हो  आज मी पूर्ण दिवस तुझ्यासोबत घालवणार. नो ऑफिस वर्क ॲन्ड नो फोन्स कॉल.” तिने वाजवणारा मोबाइल बंद करून स्विच ऑफ केला..

“मग आता पहिलं काय करू या?” तिने राजला विचारले.
“ अम्म… पहिलं मला घ्यायचं स्टेशनरी , कलर, पेन्सिल आणि बरचं काही.. दूसरं एडवेंचर गेम्स खेळायचं आणि खूप मजा मस्ती करायची आहे.

“ओके डन.” तिने त्याला हातावर टाळी दिली. रावसाहेब ही त्यांच्या मित्राकडे जाणार होते. नाश्ता करून रावसाहेब मित्रांकडे गेले. त्यानंतर राज आणि भक्ती ही शॉपिंग करायला गेले. एका मॉल मध्ये गेल्यावर स्टेशनरी सेक्शनकडे त्यांना हवं ते वस्तू घेतल्या. दोघांनी थोडीफार शॉपिंग केली. नंतर ते दोघं एडवेंचर सेंट्रलमध्ये गेले आणि तिथे वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी बघून राज एकदम उत्साहित झाला एडवेंचर सेंट्रल बघून त्याचे डोळे आनंदाने विस्फारले. .

“वॉव सुपर मी खूप एक्साइड आहे या राईड करायला..” आनंदाने त्याचे डोळे चमकत होते. ती त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद टिपत होती.

राज सर्व राईड वर जायला उत्सुक होता. एक व्यक्ती त्यांच्याजवळ येऊन त्याला मार्गदर्शन करू लागला. त्याच्या वयानुसार त्याला राईड देण्यात आले. सर्वात आधी तो नेट वर चढला होता आणि त्यात त्याच्या सेफ्टीची काळजी घेण्यात आली होती.. त्याला दोन्ही बाजूने मोठ्या दोरीच्या सहाय्याने घट्ट पकडलेले होते. तिथे त्याच्याच वयाचा असणारा आरूष फ्रेंड झाला.. जसा मध्ये ब्रेक झाला तसा राज, भक्ती आरूष आणि फ्रेंडसोबत जेवण करून घेतले.

“तुम्ही सर्व उद्या या ना माझ्या घरी?” राज खात म्हणाला.

“उद्या तर स्कूल आहे… आम्ही संडेला येऊ.” आरुष म्हणाला.

“ओके.” दोघ एकमेकांशी बोलत जेवण करत होते. भक्ती आणि आरूषची आई ही एकमेकांशी बोलत होत्या… पुन्हा दोघेही राईडवर गेले. संध्याकाळी आपआपल्या घरी जायला निघाले..

“बाय आरूष .” राज आणि आरूष दोघांनाही एकमेकांना मिठी मारली. काही वेळातच दोघांची गट्टी जमली होती. राजला तर कधी घरी जाऊन नानूला सर्व सांगतोय असं झालं होतं. अंगात उत्साह घेऊनच तो घरात आला. 
“नानू, कुठे आहेत बाहेर या  तुम्हाला खूप काही सांगायचं ?” राज घरात येतच त्याच्या रूममध्ये गेला पण, रावसाहेब रूम मध्ये नव्हते. तो स्टडीरूम मध्येच जाऊन बघून आला तिथेही नव्हते.

“ मम्मा, नानू रूममध्ये नाहीये. कुठे आहेत ते?”  तो नाराज झाला. त्याने भक्तीला फोन लावायला सांगितला. भक्तीने फोन लावला..
   
“बाबा, तुम्ही कुठे आहात? अजून आला नाहीत.”

“ मिठ्ठू बाळा, प्रताप ची तब्येत बिघडली आहे. मी आज येऊ शकत नाही.. त्याला बरं वाटल्यावर मी येतो..  राजची आणि तुझी काळजी घे. गणू, रेखा आणि राघव तर आहेच.

“ इकडची काळजी करू नका बाबा, तुम्ही तुमची काळजी घ्या.”

“ हॅलो नानू ..” राज ने भक्ती जवळचा फोन घेऊन बोलत होता. 

“तुम्ही घरी कधी येणार आहेत. मला खूप काही सांगायच आहे नानू लवकर या.”

“राज बाळा, माझ्या फ्रेंडची तब्येत बिघडली आहे मग मी कसा येऊ त्याच्या जवळ कुणीच नाहीये. माझी गरज आहे त्याला.” रावसाहेब बोलत होते.


“ नानू तुम्ही या त्या आजोबांना बरं वाटल्यावर.” 

“माझा हुशार बाळा.” रावसाहेब लाडाने बोलले.

“राज मी काय सांगतोय ते ऐक …” ते गंभीर आवाजात म्हणाले. तो भक्तीपासून जरा बाजूला गेला. “हे बघ मम्माची आणि स्वतःची काळजी घे..”

“Don't worry, Nanu.  I will take care of her but you take care of yourself… by ” राज मोठ्या माणसांसारखा समजल्याप्रमाणे बोलत होता.

“ हो रे बाळा मी काय लहान आहे काय ?”

“ नाही नानू .. पण फ्रेंडची काळजी घेण्यात स्वतःला इग्नोर करू नका.” 

‘मिठ्ठू बोलते ते अगदी बरोबर आहे. हा तर आता माझा ही बाप झाला.’ रावसाहेब मनातच बोलत होते.

“ माझी काळजी नको करूस…मम्मा आणि तुझी घे. ओके.”

“ओके . बाय नानू.” त्याने फोन कट केला.. रूममध्ये जाऊन फ्रेश झाला.  भक्तीही त्याच्या पाठोपाठ रूममधे आली.. 

“मम्मा, मी माझा  सर्व साहित्य कपाटात लावून घेतो.” राज एक एक वस्तू कपाटात लावत होता. भक्तीही वॉशरूममध्ये निघून गेली.. शॉवर घेऊन ती रिलॅक्स झाली. किचनमध्ये जाऊन तिने चहा ठेवला. कपात चहा ओतून कप घेऊन ती तिच्या रूमच्या बाल्कनीत गेली. चहाचा एक घोट घेतला आणि डोळे बंद झाले. नजर समोरच्या बंगल्यावर गेली. दोन तीन गाड्या दिसत होत्या.. सामान शिफ्ट करायचं काम चालू होतं…

“सानेकाकांच्या बंगल्यात कोणीतरी आलं वाटतं?” ती स्वतःशीच कुजबूजली.

“मम्मा..” राजने आवाज दिला.

“ हा.. मी इथे आहे बच्चा.” तिने त्याला प्रतिसाद दिला.

“ ओफ्फो मम्मा, तू पण ना कधी सुधरणार आहेस काय माहिती?” राज कपाळावर हात मारत म्हणाला. भक्तीचे डोळे मांजरीसारखे छोटे झाले मी काय केलं या अविर्भात त्याच्याकडे बघू लागली. त्याला ही लगेच समजले. तो तिला हाताला पकडून आत घेऊन येऊन बेडकडे नजरेने बघ म्हणाला.. तशी तिने जीभ दाताखाली धरली आणि छोटूसा चेहरा करत सॉरी म्हणाली.. त्याने पटकन बेडवरील बॅग वॉर्डरोबमध्ये ठेऊन दिल्या..

“ किती वेळ लागला मम्मा हे ठेवायला?” राज एक भुवई उंचावून कमरेवर हात ठेवून बोलत होता..

“ हा … मी चहा पिल्यानंतर करणारच होते. खाष्ट सासूबाई सारखा काय मागे लागतोस.” ती नाक फुगवत म्हणाली.

“व्हॉट.. खाष्ट सासूबाई म्हणजे ?”

“ खाष्ट म्हणजे दृष्ट .”

“ सासू बाई कोण ?”

“सासूबाई म्हणजे नवऱ्याची आई .. तुझ्या होणाऱ्या बायकोची मी होणारी सासू ..” तिने त्याला मांडीवर बसवलं.

“अच्छा ..मग मी काय केलं खाष्ट सासूबाई सारखं.” तो तिच्याकडे बघत होता.

“ती नाही का सतत सुनेच्या मागे लागलेली असते.. सुनबाई हे कर ते कर.. तसाच मागे लागतोस तू ..”

“ पण मी कुठे मागे लागलो तुझ्या मम्मा हे कर ते कर म्हणून ..”

“मम्मा तुझी सासूबाई कशी होती ?”

“माझी तर आईच होती. नेहमी माझ्या खंबीर पणे उभी राहिली ही आई.” भक्ती अंजलीच्या फोटोवरून भावूक होऊन हात फिरवत होती.

“ म्हणजे ह्या आजी तुझ्या सासूबाई आहेत तर?” तो डोळे मोठे करून म्हणाला.


“ मला वाटलं हे तुझ्या मॉम आहेत. या पिक मध्ये पप्पी घेताय तुझी.”  

“हो .. खूप लाड करायच्या माझ्या .. तुझ्या डॅडच्या आधी मला विचारायच्या.. माझ्यासाठी तुझ्या डॅडला रागवायच्या …” बोलण्याच्या नादात ती काय म्हणतेय ते तिला कळतचं नव्हतं.
 
“ तुझे डॅड म्हणायचे तू माझी आई आहेस की हिची? त्यावर आई म्हणायचे भक्तीची आई आहे मी.. काही झालं तरी आई माझ्याच साईडनेच होत्या.” ती आठवणीत हरवून हसून बोलत होती. राज दोन्ही कोपर बेडवर टेकून हातांवर हनुवटी टेकवून कौतुकाने ऐकत होता. अचानकपणे त्याच्या डॅडचा विषय निघाला होता हे तिच्या लक्षात ही आले नव्हते. तो खूपच आनंदित झाला होता. भक्ती ही उत्साहाच्या भरात बोलत होती. जुन्या आठवणींना उजाळा देत होती.


“ खूप सुंदर आठवणी आहेत आमच्या … खूप मिस करते मी त्यांना.. आई मावशी नंतर त्या माझ्या आई होत्या.. फार कमी दिवस सोबत राहिले आम्ही.. आज असत्या तर तुला बघून खूप खुष झाल्या असत्या.” बोलतांना हळवी झाली होती.. डोळ्यांत पाणी तरळले.

“मम्मा..” राज ने लगेच तिला मिठीत घेतले. त्याचे छोटे हात तिच्या पाठीवर हळूवार पणे फिरत होते. ‘मी आहे’ स्पर्शातून आश्वस्थ करत होता.. 

“आय लव यू मम्मा.” तो मिठीतूनच म्हणाला.

“आय लव यू टू बच्चा.” तिने त्याच्या कपाळावर आणि गालावर ओठ ठेवले..

“ताईसाहेब, जेवण झालयं गरमा गरम जेवून घ्या. मी वाढायला घेते. लवकर या छोट्या मालकांना घेऊन.”

“काकी आजी छोटं मालक नाही फक्त राज म्हणायचं नाहीतर मी जेवणचं नाही करणार.” राज गाल फुगवून म्हणाला.

“बरं बाबा नाही म्हणणार.” रेखा काकूने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला. जेवण झाल्यावर दोघं ही गेम खेळत होते.. स्क्रीनवर दोन गाड्या धावत होत्या.. राजची गाडी पुढे धावत होती आणि भक्ती मागे होती पण राजच्या गाडीने फिनिश लाईन पास केली आणि राज जिंकला..

“ येस आय वॉन." त्याने हाताची मूठ धरत उंचावली. असचे दोन तीन राऊंड झाले आणि या सर्व राऊंड मध्ये राज जिंकला.. खेळून तो भक्तीच्या कुशीत निजून गेला.. भक्ती गाण गुणगुणतं थोपटतच तिचे ही डोळे बंद झाले. मज्जामस्ती करत आजचा पूर्ण दिवस भक्तीने राजसोबत घालवला होता पण उद्याची सकाळ भक्तीच्या जीवनात उलथापालथ आणणारी होती. काय ते बघूया पुढच्या भागात..

क्रमश...

धनदिपा
२४/७/०२४

🎭 Series Post

View all