भेटली तू पुन्हा ! भाग - बारा

भक्तीराज
भाग - बारा


“ मी काढून ठेवते तोपर्यंत तुम्ही फ्रेश होऊन या.” लिलीने तिला बाथरूम मध्ये पिटाळले. भक्ती फ्रेश होऊन बाहेर आली..

“हि साडी कशाला काढलीस तू?” ती चिडून म्हणाली..

“मम्मा किती सुंदर साडी आहे. तू वेअर करणार? मला बघायचं यात तुला..” साडी न्याहळत राज तिला गळ घालत होता.

“पण पिल्लू ..”

“मम्मा प्लिज ..” त्याने क्यूट चेहरा केला. ती लगेच पाघळली. त्याला नाराज करणं तिला जमत नव्हतं..त्याच्या केसातून हात फिरवून ती चेजिंग रूममध्ये गेली..


राज आणि लिली दोघेही बाहेर तिची वाट बघत होते.

“मम्मा ..” त्याने न राहवून तिला आवाज दिला.

“ आले रे बाळा .. साडी नेसायला वेळ लागतो रे राज. पाचच मिनिट थांब .”

“ गेली अर्धातासापासून तू पाच मिनिट आलेच बोलतेय.” भक्ती दार उघडून बाहेर आली. राज तिला एकसारखा न्याहाळत होता.. आदिराज आज तिला पहिल्यांदाच साडीत बघत होता. लाईट पिंक शिफॉन साडी त्यावर सिव्हलेज ब्लाऊज गळ्यात एक गोल्डचेन एका हातात सिंगल बांगडी. केसांना क्लिप लावून खाली कर्ल करून मोकळे सोडलेले केस.

“मम्मा, अतिशय सुंदर दिसतेस. माझीच नजर लागेल तुला.” असं म्हणत तो टेबलवर काहीतरी शोधू लागला.. लिलीही मोठे डोळे करून आश्चर्याने बघत होती. खरच कमालीची सुंदर दिसत होती. जास्त तर फॉर्मल ड्रेसेस सूट वेअर करणारी आज कितीतरी दिवसांनी ती साडी नेसली होती.


“राज काय करतोयस तू ?” ती प्रश्नार्थक चेहऱ्याने त्याच्याकडे बघत होती.

“मम्मा प्लिज वन मिनट .” त्याने त्याचं शोध कार्य तसंच चालू ठेवलं.

“अरे मला सांग मी शोधून देते.”

“ हे शोधलं मी .” त्याने हातातील वस्तू दाखवली.

“ मला सांगायच मग … . अरे काय करतोय तू ” भक्तीला स्टूलवर बसून तो उभा राहिला.

“मला तयार करून तू मला काजळाचा टिका लावते मग मी ही तेच करतोय. शांत बस ना थोडावेळ.” राज डोळ्यांनी दटावत होता तसं तिने हाताची घडी घालून शांत बसली. त्याने काजळ पेन्सिल हलकीच बोटांवर फिरवून तिच्या कानामागे दिट लावली.

“नाऊ इज परफेक्ट.” तो भक्तीच्या हनुवटीला हातांच्या बोटांमध्ये पिंच करत हसत होता. त्याने तिच्या गालावर ओठ ठेवले. आदिराज एखाद्या लहान बाळांसारखा लाड करत होता. तिनेही हसत त्याचा गाल ओढून त्यावर ओठ टेकवले आणि मिठीत घेतले..


“पण याची काहीच गरज नव्हती राज, इतकं ही काही सुंदर दिसत नाहीये तुझी मम्मा.”

“ No mam really you are looking gorgeous.”

“तुम्हाला तर कुणी म्हणणार ही नाही की तुम्ही एक मुलाची आई आहात. लाईक संतुर मॉम .” लिली हसत म्हणाली.

“ काहीही असतं तुझं लिली.. कुठेही काहीही लॉजिक लावत बसते.”

“येस मम्मा, दीदी इज राईट..” राज लिलीची बाजू घेऊन बोलला.

“ मी नेहमी खरं बोलते. मॅडमांनाच मी बोललेलं पटत नाही आता तिथे गेल्यावर सरांची तब्येत बिघडणार आहे हे नक्की.” ती ओठांत पुटपुटली.

“काय म्हणालीस का?” भक्ती तिच्या हलणाऱ्या ओठांकडे पाहत होती.


“काही नाही निघूया का उगाच उशीर व्हायला नको.” ती भोळा चेहरा करत म्हणाली..

“हम्म.. तुला खूप घाई झालेली दिसतेय.” भक्ती बारीक डोळे करून म्हणाली.. तशी ती गडबडली..


“मम्मा सेल्फी?” राज मध्येच म्हणाला. तसे तिघांनी वेगवेगळ्या अँगलने सेल्फी घेतल्या. नंतर लिलीने दोघांचे फोटो छान क्लिक केले.


“राज चल जेवण करून घे मग मी निघते. ”

“मम्मा मला भूक नाहीये नंतर जेवतो.”

“ नंतर नको, माझ्यासमोर जेवण करं.” तिने पटकन ताट वाढून त्याच्यासमोर ठेवले..” आता तर त्याला बसावं लागलं. जोपर्यंत आपण खाणार नाही तोपर्यंत त्याची मम्मा कुठेच जाणार नाही. हे तो जाणून होता म्हणून ताटातील शांतपणे जेवत होता आणि ती त्याच्याकडेच बघत विचारांत हरवली होती.. जितकं विश्वराज पासून दूर जायचा प्रयत्न करत होती पण तो मुद्दामून तिच्या जवळ यायचा प्रयत्न करत होता आणि आता तर तो समोरच्या बंगल्यातच राहायला आला होता.. ती विचार करत असतांनाच आदिराजचा आवाज आला. ती भानावर आली. लिली कॉलवर बोलयला बाहेर गेली.

“ मम्मा काय झालं?” राज तिच्याकडे बघून काळजीने विचारत होता.

“काहीच नाही.” तो अजूनही तिच्या चेहऱ्यावरचे सूक्ष्म निरक्षण करत होता. त्याने तिला हाताला पकडून जागे केलं होतं. मनात असलेले विचार झटकून तिने आदिराजकडे हसून पाहिलं. तो अजूनही तिच्याकडेच बघत होता.


“व्हॉट हॅपन्ड मम्मा कसला विचार करतेय इतका?”

“राज आपण उद्या जयपूरला माझ्या फ्रेंडच्या लग्नाला जातोय..” ती चेहऱ्याचे भाव सावरले. “ऑफिसची काम जायच्या आत संपवायची आहे. सो त्याच विचारात होते. तू काय म्हणत होतास?”

“हेच की तू किती जास्त विचार करत असते आणि त्यात तुला बाजूला काय होतंय ते लक्षात येत नाही.. तुझा मोबाइल किती वेळचा वाजून बंद झाला..” तो तिच्या क्लच कडे हात दाखवत म्हणाला.


“ओहह सॉरी.” भक्ती नाक जमा करून कानाला हात लावत म्हणाली..

“ it's Ok मम्मा पण लक्ष असू देत जा ग आजूबाजूला … म्हणूनच तुझी काळजी वाटते मला … कसं होणार तुझं …” राज मोठ मोठे डायलॉग मारत गालात हसत होता. त्याच्या या वाक्यावर भक्तीने दोन्ही हात कमरेवर ठेवून अगदी मांजरीसारखे बारीक डोळे गाल फुगवून त्याच्याकडे बघत होती.. त्याने पटकन त्याचा टॅब घेत तिचे त्या पोझचे पटापट फोटो कॅप्चर केले..


“ राज नको रे .. कसेही फोटो काढू नको रे ..”

“ खूप सुंदर आलेत हे पिक . मी तर यांना मोठ्ठा करून या रूममध्येच लावणार.. “ तो हसत म्हणाला. दुसऱ्याक्षणी तो टॅब घेऊन घरभर पळायला लागला त्याचे मागे भक्तीही पळत होती.

“थांबच तू..” म्हणत ती त्याच्यामागे पळत होती. लिली फोन कॉल संपवून आत आली तर बघते तर दोघेही घरात पकडापकडी खेळत होते. आदिराज कधी सोफ्याकडे तर कधी टेबलकडे इकडून तिकडे होत होता. भक्ती त्याला पकडण्याचा प्रयत्न करत होती पण राज ही हाती येत नव्हता, त्या दोघांना असं खेळतांना रेखाकाकू लिली हसत होत्या. त्यात लिली मॅडमांनी दोघांची व्हिडिओ शुटिंग सुरू केलेली. भक्तीला साडीत राजच्या मागे पळता येत नव्हतं म्हणून तिने एका हाताने साडी वरती करून त्याच्या मागे धावत होती.. तो ही हसत पुढे पळत होता.

“ टाईम प्लिज राज !” भक्ती म्हणाली आणि सोफ्यावर बसली. तिला दम लागला होता.. ती तोंडाने श्वास घेऊ लागली..

“मम्मा आर यू ओके.” आदिराज भक्तीच्या जवळ येऊन काळजी करत तिच्या गालाला हात लावून विचारत होता.. ती डोळ्यांनीच हो म्हणाली. आणि पटकन त्याला जवळ ओढून घेतले.

“येस sss पकडलं मी .” ती हसून म्हणाली

“ मम्मा ही चिटिंग आहे तू असं नाही करू शकत.”

“everything is fair in Love and game.” भक्ती

“चिटर .” त्याने वाकुल्या करून दाखवले.

“ अच्छा..” तिने त्याला पोटावर गुदगुदल्या करायला सुरवात केली.. पुन्हा तिचा मोबाइल ओरडू लागला.

“ मम्मा .. तुझा फोन .” राज . भक्तीने राजला सोडून टेबलवरच्या छोट्या पर्समधला मोबाइल बाहेर काढला…

“ मिस्टर शहा कॉलिंग .” तिने स्क्रीनवरच नाव वाचून कॉल अटेंड केला..

“ हॅलो मिस्टर शहा…”

“हॅलो मिस रणदिवे. कुठे आहात तुम्ही .. आम्ही पोहचलो ही इथे…”

“ आय ॲम कमिंग मिस्टर शहा.”

“ओके. सी यू सून.” जतीने ने कॉल कट केला.

“ येत आहेत त्या.” जतीन विश्वराजला म्हणाला..

“अरे आलोय तेव्हापासून साधा चेहरा ही दाखवला नाहीये यार तिने .. पूर्ण बंगल्याला परदे लावून घेतलेत. सकाळी दर्शन मिळाले ते ही दुरूनच.” विश्वराज सकाळचा किस्सा आठवत भक्तीची तक्रार करू लागला.

“ सद्धा तरी दुरून दर्शन होतय त्यातच समाधान मान, अजून काही दिवस कळ काढं. सगळं व्यवस्थित झाल्यावर अगदी निवांतपणे जवळून दर्शन घे तुझ्या देवीच..” तो डोळा मारत म्हणाला.

“जतीन पाच वर्ष झालीत रे.. कधी सर्व व्यवस्थित होईल यार .. एकटा पडलोय मी. खूप त्रास होतो रे मला … एक शब्द बोलली नाही की भांडली नाही पण निघून गेली मला सोडून एक संधी तर द्यायला हवी होती. डोळ्यांना जे दिसत आणि कानांना जे ऐकू येईल तेच सत्य असेल हे जरूरी नाहीये… एका चुकीची इतकी मोठी शिक्षा.. ” विश्वराज खूपच इमोशनल झाला होता.. जतीन ने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला..

क्रमश ..
©® धनदिपा सम्राट


🎭 Series Post

View all