भाग - तेरा
“ हॅलो मिस्टर शहा…”
“हॅलो मिस रणदिवे. कुठे आहात तुम्ही .. आम्ही पोहचलो ही इथे…”
“ आय ॲम कमिंग मिस्टर शहा.”
“ओके. सी यू सून.” जतीने ने कॉल कट केला.
“ येत आहेत त्या.” जतीन विश्वराजला म्हणाला..
“अरे आलोय तेव्हापासून साधा चेहरा ही दाखवला नाहीये यार तिने .. पूर्ण बंगल्याला परदे लावून घेतलेत. सकाळी दर्शन मिळाले ते ही दुरूनच.” विश्वराज सकाळचा किस्सा आठवत भक्तीची तक्रार करू लागला.
“ सद्धा तरी दुरून दर्शन होतय त्यातच समाधान मान, अजून काही दिवस कळ काढं. सगळं व्यवस्थित झाल्यावर अगदी निवांतपणे जवळून दर्शन घे तुझ्या देवीच..” तो डोळा मारत म्हणाला.
“जतीन पाच वर्ष झालीत रे.. कधी सर्व व्यवस्थित होईल यार .. एकटा पडलोय मी. खूप त्रास होतो रे मला … एक शब्द बोलली नाही की भांडली नाही पण निघून गेली मला सोडून एक संधी तर द्यायला हवी होती. डोळ्यांना जे दिसत आणि कानांना जे ऐकू येईल तेच सत्य असेल हे जरूरी नाहीये… एका चुकीची इतकी मोठी शिक्षा.. ” विश्वराज खूपच इमोशनल झाला होता.. जतीन ने त्यांच्या खांद्यावर हात ठेवून त्याला धीर दिला..
" तुझ्या आयुष्यात तुला हवी असलेली पहाट नक्कीच होईल तोपर्यंत प्रयत्न सोडायचे नाहीत. प्रयत्नार्थी परमेश्वर ! काय समजलास ?” विश्वराजच्या खांद्यावर थोपटत समजवत होता. मित्रांच्या सहवासाने आयुष्यातील दुःख कमी होत नाही पण होणारा त्रास मात्र कमी जाणवतो.
“चेहरा ठीक कर तुझ्या कडकलक्ष्मी येत आहेत.” जतीन हसत म्हणाला..
“ प्रयत्न तर सोडणार नाहीच.” तो ठाम स्वरात. “आता झाली ती थोडी चिडचिडी आधी नव्हती रे तशी मला माझी आधीची चुलबुली बडबडी भक्ती हवी आहे.. आता हिटलर झाली...”
“ हिटलर .. मस्तच रे..” जतीन
“डोळ्यांनी राग दाखवत असते तरीही क्यूट दिसते.. ” तो तिच्या डोळ्यांना आठवून बोलत होता.
“ तुला तर तुझी कडकलक्ष्मी क्यूटच वाटणार रे.. दोन वर्षापासून बघतोय त्यांना .. कॉलवरच उडवून देतात. कसं बसं कन्व्हिन्स करून इथ पर्यंत आणलय त्यांना पुढचं तुला सांभाळून घ्यायचं आहे..”
“ आम्ही एकत्र यावं म्हणून सर्वच प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कामाला लागले आहेत आणि तो दिवस ही लवकरच येईल..” विश्वराज विश्वासाने बोलत होता.
“That's the spirit !” जतीने एकाबाजूने जवळ घेतले. दोघही बाहेर लॉनमध्ये गेले.
भक्ती येत असल्याचं समजताच तिथे थोडं फार डेकोरेशन करून घेतलं होतं.. नाहीतर पार्टी ही कॅन्सल झाली असती. आफ्टर ऑल हे सर्व तिच्याच साठी चालू होतं आणि आता खरचं पार्टी साठी ती येणार होती..
भक्ती येत असल्याचं समजताच तिथे थोडं फार डेकोरेशन करून घेतलं होतं.. नाहीतर पार्टी ही कॅन्सल झाली असती. आफ्टर ऑल हे सर्व तिच्याच साठी चालू होतं आणि आता खरचं पार्टी साठी ती येणार होती..
तिकडे भक्तीने फोन ठेवल्यावर रूममध्ये येऊन साडी ठीकठाक करत आरशात बघितलं आणि पार्टीला जाण्यासाठी निघाली..
“बच्चा, मी लवकर येईल. इथे जवळच आहे पार्टी.. तुला झोप येत असेल काकीआजीला सांग.”
“काकू आलेच मी ..त्याच्या कडे लक्ष असू द्या. मी लवकर येते.”
“ताईसाहेब मी आहे काहीच काळजी करू नका.” रेखाकाकू तिला आश्वस्त करत म्हणाल्या.
“डोन्ट वरी मम्मा .. तू आरामात जा .. एन्जॉय कर.” राज समजून म्हणाला.. .
“हम्म.. तू काळजी घे.. थोड्याच वेळात येईल मी..”
“हो.. जा आता तू..” राज तिला बाय करत होता. त्याला बाय बोलून भक्ती आणि लिली दोघेही गेटच्या बाहेर पडल्या.. ती गाडीत बसली.
“मॅम आपल्याला जवळच तर जायचं आहे गाडी कशाला?”
“ जरा लॉग ड्राईव्हला जाऊन येऊ म्हटलं..”
“ मॅम मी काय सर नाही माझ्यासोबत लॉग ड्राईव्हला यायला..”
“ वेडी राज बघत होता आपल्याला .. आपण पायी गेलो असतो तर त्याने विचारलच असतं आणि मग सगळचं बिघडलं असतं.”
“ ओह्ह आय सी.” ती विचार करत
“ म्हणनूच म्हणते डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघत जा जरा.”
“ म्हणनूच म्हणते डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघत जा जरा.”
“ मॅम माझे तर पूर्ण डोळे उघडे असता आणि ”
“ त्या डोळ्यासोबत डोक ही ठिकाण्यावर ठेवावं.. राजचे प्रश्न सरता सरत नाही. त्या प्रश्नांची उत्तरे देता देता नाकी नऊ आले असते म्हणजे?” भक्ती तिला मध्येच तोडत म्हणाली.
“ सॉरी मॅम.” त्यांची गाडी फ्लॉवर शॉपजवळ थांबली. खाली उतरवून भक्तीने व्हाईट ट्युलिप बुके घेतला. सरळ गाडी अभ्यंकरच्या न्यू बंगलो कडे निघाली.. गाडी बाहेर लावून ती आत जायला वळली.. झांडावर छोटी छोटी लाईटिंग लावलेली होती. स्विमिंग पूलजवळ लाईट झळकत होते.. सगळा परिसर लाईटच्या प्रकाशाने झगमगत होता.. ती पुढे गेली. बाहेरच मिस्टर शहा कोणाशी तरी बोलताना दिसले. गर्दी अशी नव्हतीच.. मोजकेच लोक होते.
“ हॅलो मिस्टर शहा .” ती प्रसन्न चेहऱ्याने म्हणाली..
“हॅलो मिस रणदिवे.” जतीने ही प्रतिसाद दिला.
“यू लूकिंग ब्युटिफूल.” जतीनने भक्तीला कॉम्प्लिमेंट दिली..
“थँक्यू मिस्टर शहा फॉर द कॉम्प्लिमेंट.” भक्तीने हसून त्याचे आभार मानले.
“व्हेअर इज मिस्टर अभ्यंकर.”
“ मिस्टर अभ्यंकर अर्जंट कॉल अटेंड करायला गेलेत. काही मिनिटांत येतील ते.” भक्तीने एन्ट्री केली तशीच त्याची हार्टबीट्स फास्ट झाली आणि फोनवर बोलत असलेल्या विश्वराजने मेनगेटकडे लक्ष वेधून घेतले.. तो अनामिष नजरेने तिलाच बघत तिच्यात हरवला होता. आजूबाजूचे त्याला काही भानच राहिले नव्हते. नजरेला फक्त ती दिसत होती.. मोबाइल मधील आवाज ना कानात शिरत होता ना मेंदूपर्यंत जात होता म्हणून त्याने मोबाइल कट केला आणि तो तिला पाहण्यात व्यस्त झाला.. ती एक एक पाऊल पुढे टाकत आत येत होती.. डिस्टर्ब करायला मोबाइल वाजू लागला लगेच त्याच्या चेहऱ्यावर नापंसतीच्या रेषा उमटल्या.. कॉल उचलून, ”कॉल यू लेटर .” तीन शब्द उच्चारून त्याने पुन्हा कॉल कट केला. भक्ती जतीन कडे जाऊन बोलू लागली. विश्वराज तिथूनच तिला बघत होता.. ती जेव्हा गोड हसली तेव्हा त्याच्या काळजात खळबळ माजली.
“ जीव घेऊनच टाकणार बहुतेक आज काही खरं दिसत नाहिये माझं.. आज जागरण पक्कं.” तो मनात विचार करत होता.. तो जरा सावरून तोंडावरून हात फिरवून लांब श्वास भरून सोडत असं करून नॉर्मल व्हायचा प्रयत्न करत होता. नॉर्मल होऊन तो त्यांच्याजवळ गेला..
“वेलकम होम मिस रणदिवे.” तो पुढे हात करत म्हणाला.
“काँग्रॅच्युलेशन मिस्टर अभ्यंकर.” तिने त्याच्या हातात बुके दिला.
“ थॅक यू मिस रणदिवे.”
“काँग्रॅच्युलेशन सर.” लिली हसून म्हणाली.
“ थॅक यू.”
“चला आत.” तो दोघींकडे बघून घराच्या दिशेने हात करत होता..
“ चला मॅम आपण आत जाऊन बघून घेऊ.” लिली मध्येच पचकली... मिस्टर शहा समोर असल्यामुळे तिला नकार द्यायला जमलाच नाही. नाईलाजस्तव तिला जावचं लागलं. मिस्टर शहा पुढे गेले. तसे तिने लिलीकडे राग भरलेल्या नजरेने पाहिलं.
“ थॅक यू मिस रणदिवे.”
“काँग्रॅच्युलेशन सर.” लिली हसून म्हणाली.
“ थॅक यू.”
“चला आत.” तो दोघींकडे बघून घराच्या दिशेने हात करत होता..
“ चला मॅम आपण आत जाऊन बघून घेऊ.” लिली मध्येच पचकली... मिस्टर शहा समोर असल्यामुळे तिला नकार द्यायला जमलाच नाही. नाईलाजस्तव तिला जावचं लागलं. मिस्टर शहा पुढे गेले. तसे तिने लिलीकडे राग भरलेल्या नजरेने पाहिलं.
“ शांत बसता येत नव्हतं का थोडावेळ.” ती चिडत म्हणाली.
“ मी तर शांत आहे मॅम.”
“ गरज होती मॅम आपण घर बघून येऊ म्हणायची. पाहिले नाहीत का तू?”
“ गरज होती मॅम आपण घर बघून येऊ म्हणायची. पाहिले नाहीत का तू?”
“मी उत्सुकतेपोटी म्हणाले.” ती चेहरा पाडून खाली बघून म्हणाली. जबरदस्तीने का होईना पण ती पुढे चालू लागली… ती पुढे गेली म्हणून लिलीने वाचले या अर्थाने सुटकेचा श्वास सोडला. ती दारवाजाच्या आत पाऊल टाकणार तितक्यात तिच्या कानावर आवाज आला..
“थांबा.” रामुकाका हातात ताट घेऊन आले.. “ काका तुम्ही .” त्यांना पाहून ती भावूक झाली.
“घराची लक्ष्मी आत येतेयं तिचं औक्षण तरी होऊ देत?” रामुकाकांच्या ओठांवर हलकेसे हास्य होते.
“ नाही काका मी आता या घरची कोणीही नाहीये.”तिच्या आवाजात कोरडेपणा जाणवत होता..
“जी या घरची खरी लक्ष्मी आहे तिचं औक्षण करा.”
“ त्याचचं करायचं ताईसाहेब आणि त्या तुम्ही आहेत. एक बाईसाहेब त्यानंतर तुम्ही या घरच्या लक्ष्मी होते आहे आणि राहणार.” रामुकाका ठाम स्वरात .
“काका.” ती अविश्वसाने काकाकडे बघत होती.
“ बाई माणूस कोणी नाही या घरात मॅडमताई आमच्या वतीने यां दोघांच औक्षण करा.” रामुकाका लिली जवळ ताट पुढ्यात घेऊन तिला विनंती करत होते.. लिलीने लगेच हतात ताट घेतले..
“साहेब तुम्ही ही या.” रामुकाका विश्वराजला बघून म्हणाले..
“ नको काका.” तो नकार देत.
“या पटकन.” त्यांनी हाताला पकडून विश्वराजला समोर उभं केलं. भक्ती पुढे काही बोलूच शकली नाही.. लिलीने दोघांच औक्षण केलं. तिचं नव्या नवरीप्रमाणे स्वागत केलं.. काकांनी समोर कुंकवाच पाणी करून ठेवलं होतं.. काकांनी तिला आग्रह करत तिने त्या परतील दोन्ही पाय बुडवत घरात पाय ठेवलं.
“ काका पूजा ?”
हे इथे .” तिच्या डोळ्यातील प्रश्न वाचून. तिकडे गुरुजी पुजा मांडली तिथे जांभई देत होते.. या दोघांना बघून त्यांनी पटापट भक्ती आणि विश्वराजला तिकडे पाटावर बसण्यास विनंती केली. ती अचंबित चेहऱ्याने सर्व पाहत राहिली..
ताईसाहेब बसा या पाटावर ..”
“ पण हे काय ?”
“बसा हो लवकर त्या गुरूजींना घरी जायचं आहे. जोपर्यंत तुम्ही बसणार ते घरी जाऊ शकणार नाहीत.” लिली तिचा प्रश्न ऐकून सवयीप्रमाणे बोललीच
“ मी कुठे नाही म्हटलं त्यांना?” तिच्या चेहऱ्यावर आठ्या जमा झाल्या
“ अहो त्यांना आज हि पुजा करून सौभ्यागवतीच्या हातून प्रसाद दान दक्षिणा घेऊनच ते त्यांचा व्रत संपन्न होते..”
“ काय बरळतेस .. असं कुठलही व्रत मी अजून तरी ऐकलेल नाही आणि आहे तर तुला कसं कळलं?
“ मी..मी हे ताट ठेवायला आले तेव्हा त्यांनी सांगितलं मला म्हणून…” लिली आवाजात विश्वास दाखवत म्हणाली. पण तिच्या प्रश्नाने भक्तीचे समाधान झाले नाही. ती एक भूवई उंचावत लिलीकडे बघत होती..
“ यजमान तुमच्या धर्मपत्नीला घेऊन लवकर पाटावर बसावे.. पूजा आरंभ करत आहोत.” गुरुजी त्या दोघांना विनंती करत होते..
“बसा मॅडम आपण या विष्यावर नंतर बोलू.” लिली तिचा हात पकडून पाटावर घेऊन गेली. ती वैतागत ती लिलीकडे बघत होती. विश्वराज काही बोलूच शकला नाही. त्याआधीच लिलीने त्याचे काम केले होते. गुरुजींनी पुजा सुरू केली. तिला त्याच्या हाताला स्पर्श करावयास सांगितला तसं ती विचार करत होती..
“ हात लावा लवकर ..” गुरुजी मंत्र म्हणत तिला विचारात हरवलेलं बघून बोलले. तिने थरथरत हात त्याच्या हाताला स्पर्श केला.. त्याला तिच्या हाताची थरथर जाणवत होती.. तो ही यासाठी तयार नव्हताच. रामुकाकाने शपथेत अडकवल्याने तो बोलू शकत नव्हता.. गुरुजीचे बोलणारे पवित्र मंत्र उच्चार तिला असह्य होतं होते.. वारंवार भुतकाळ आठवत होता. डोळ्यात झरझर पाणी येत होते.. ना पूजातून मध्येच उठून बाहेर पडता येत होतंं. महत्स प्रयासाने ती डोळ्यांतून अश्रू बाहेर पडू देत नव्हती. पूजा संपन्न झाली.. तिने गुरुजींना नमस्कार केला.. ”सौभाग्यवती भव !” त्यांनी तिला आशीर्वाद दिला. मग विश्वराज ही पाया पडण्यासाठी खाली झुकला. गुरुजींचा तोंडून शब्द बाहेर पडले.“ विजयी भव!” आशीर्वाद मिळून त्याला त्याच्या कार्याबद्दल आपण योग्य करत असल्याचा विश्वास वाटत होता.
क्रमश ..
©® धनदिपा सम्राट
२८/८/०२४
©® धनदिपा सम्राट
२८/८/०२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा