भेटली तू पुन्हा! भाग - पंधरा

भक्ती विश्वराज
भाग - 15


“काय झालं मम्मा .. पुन्हा नानूंना मिस करतेय.” तिच्या पाणावलेल्या डोळ्यांना पाहून राज म्हणाला.
तिने मान खाली वर केली. त्याने पटकन तिला मिठीत घेऊन तिच्या पाठीवर हात फिरवत होता. तिनेही त्याची मिठी घट्ट करत आसवांना मोकळं करून दिलं. आसवांचा ओस पसरल्यावर मन हलकं वाटू लागलं तसं तिने राजला समोर करत त्याच्या कपाळावर गालाची पप्पी घेत प्रेम करू लागली.. 

“ बच्चा , मम्माला सोडून तर जाणार नाही ना?” या विचाराने पुन्हा तिला भरून आलं.

“No Never.” तो तिला बिलगत म्हणाला. 

“  मी कुठेच जाऊ देणार नाही तुला .. ती पुन्हा रडत म्हणाली.

“शू. . शांत हो मम्मा.  तुला सोडून मी कुठेही जाणार नाही .” तो त्याच्या परिने तिला शांत करण्याचा प्रयत्न करत होता.. त्याला समजवत नव्हतं की त्याची स्ट्रॉग मम्मा आज इतकी हळवी कशी झाली.. तो तिला हाताला पकडून बेडवर घेऊन गेला. तिला झोपायला लावत तो तिच्या उशाशी बसून तिच्या कपाळावर हात फिरवत होता.. त्याच्या कोमल स्पर्शाने हळूहळू तिचेही डोळे बंद होऊ लागले. लिलीला लाईट आणि दार बंद करण्याचं सांगून तिला रूममध्ये पाठवून दिलं.. मध्येच बंद डोळ्यांतूनही पापण्यावर पाणी दिसत होत. त्याच्या बोटांना ते जाणवत होतं. ते बोटांनी पुसून तो प्रेमाने तिच्या डोक्याची पप्पी घेतली. डोक्यावर थोपटत राहिला. त्याचे ही डोळे हळुहळू बंद होत झाकल्या गेले.. थोड्याच वेळात भक्तीला जाग आली तर राज तिच्या उशीशीच वाकडा तिकडा होत झोपलेला होता. त्याला उचलून सरळ झोपवून त्याच्या अंगावर पांघरून घातलं. झोपेतही तो थोपटत होता. भक्तीने त्याचा हात उचलून त्याच्या तळव्यावर ओठ टेकवले.. कपाळावर केसांवर ओठ टेकवत होती..   ‘वयापेक्षा ही खूप समजूतदार आहे माझं बाळं.. नको रे इतका मोठा होऊ. तुझ्याशिवाय माझ्या जीवानाला अर्थच नाही.’ डोळे भरून आले तसं ती बेडवरून उठून मोकळ्या हवेसाठी ती बाल्कनीत गेली. अमावस्या असल्याने बाहेर अगदी काळोख होता. विश्वराज दिसल्यानंतर ती आज बाल्कनीत आली होती.. ती तशीच बाहेर बघत उभी होती.. झोप न लागल्यामुळे आणि आज घडलेल्या घटनांच्या विचारात ती बाल्कनीत येरझरा मारत होती.. डोकं प्रचंड ठणकत होतं. डोक्यावर दाब देत ती इकडे तिकडे फिरत होती.. बाल्कनीचे स्लाईड उघडून राज बाहेर आला..

“ मम्मा तू झोपली नाहीस.” तो झोपाळलेल्या आवाजात. त्याने त्याचे दोन्ही हात पसरले. तिने त्याला उचलून घेतले. दोन्ही हात तिच्या गळ्यात  घालून मान तिच्या खांद्यावर टाकली. दोन्ही पाय तिच्या कमरेवर लटकवले.

“झोपली होते,मध्येच जाग आली. पण तू का उठलास?” ती त्याच्या पाठीवरून हात फिरवत म्हणाली. 

“ सुसू ला गेलो होतो तर तू दिसली नाही म्हणून इथे आलो. मला झोप येतेय..” तो आळसावलेल्या आवाजात म्हणाला. ती त्याला तशीच इकडे घेऊन आली. स्लाईड ओढली. पडदे लावले आणि त्याला बेडवर ठेवून तीही त्याच्या शेजारी झोपायला गेली. राज तिच्या कुशीत शिरला. त्याच्या केसांवर हात फिरवत डोळे मिटवत तीही झोपेच्या आधीन झाली..

रात्रीच्या काळोखात तोही अंधाऱ्या बाल्कनीतल्या  सोफ्यावर बसलेला होता.. आज तिच्याप्रमाणे त्याला ही झोप येत नव्हती. तोही बैचेन होऊन दिवे मालवून बाल्कनीत बसला होता. तीही झोपली नसणार कदाचित थोड्या वेळासाठी ती बाहेर येईल यावर तो ठाम होता.. तिच्या बाल्कनतील दार उघडल्या गेलं. ती बाहेर येऊन अवस्थपणे येरझाऱ्या मारत होती.. डिमलाईट असल्याने तो तिला शांतपणे बघू शकत होता. पुन्हा एकदा स्लाईड उघडल्या गेली. त्याला उगीच धडधडायला झालं. आता कोण आलं? हिच्या रूमध्ये आणखी कोण असेल?  एक लहान मुलाची अस्पष्ट आकृती त्या डिमलाईट मध्ये  दिसली. हात झेपवत तो तिच्या कडेवर गेला. तिने मायाने त्याच्या डोक्यावरून पाठीवर हात फिरवत होती. तो बिलगून होता. थोड्याच वेळात ती त्याला आत घेऊन गेली.. स्लाईड बंद करून पडदे ओढले गेले.. विश्वराजने आपल्याला बघितलं असेल याचा जराही अंदाज तिला  नव्हता.. पण त्यांना बघून विश्वराज नाना प्रश्नांनी हैराण झाला होता.. त्यातच त्याचा डोळा कधी लागला ते त्याला समजलं नाही.
 


सकाळी सहाला त्याला जाग आली बाहेर गार वारा सुटला होता. बसल्याजागी झोपल्याने अंग अखडून गेलं होतं. उभ राहत त्याने हात पाय स्ट्रेच केले. समोर पहिलं तर पडदे लावलेलेच होते. तो आत बाथरूम मध्ये गेला.

जयपूर हॉटेल पॅलेस सकाळी सात वाजता भक्ती तिच्या रूमच्या बाल्कनीतल्या चेअर वरती बसून  होती.. सकाळी चारच्या फ्लाईटने ती जयपूरला आली होती.. आदिराज अजूनही अंथरुणात झोपून होता आणि भक्तीने त्याला उठवलं नव्हतं.. ती लवकर तयार झाली. तितक्यात दारावर टकटक झाली. तिने दार उघडलं. समोर अनन्या आणि तिचे आईवडिल उभे होते..

 “ अनन्या .. अरे मी तुझ्याचकडे येत होते..” अनन्याने भक्तीची गळाभेट घेतली..

“ काका काकू तुम्ही या ना आत..” ती लगेच दरवाजातून बाजूला झाली.. 

“कसे आहात काकू ?” 

“मी छानच गं तू कशी आहेस आणि इतक्या दिवसांत आमची आठवण आली नाही काय?”

“खूप आठवण आली तुमची राज मध्ये आणि बिझनेस मध्ये  इतकी बिझी झाले की आता ही बिझनेस साठीच इथे यावं लागलं. पण आता आलेय न त्याची कसर भरून काढू आणि आता काय करायचं ते मला सांगा. पटापट कामाला लागते..” ती हसत म्हणाली. 

“ काही काम करायचं नाहीस तू .. सर्व झालेल आहे.. सगळं छान enjoy कर.” काकू.

“एन्जॉय बिन्जॉय नंतर कर हा पहिलं माझं गिफ्ट दे..” अनन्या त्या दोघांना तोडत म्हणाली.

“बघा ही किती हावरट आहे आधीच गिफ्ट मागतेय.” भक्ती हसून म्हणाली.

“ते काही असो माझं वेडिंग गिफ्ट दे.”

“हो ग बाई आणलयं तुझं गिफ्ट.” म्हणत भक्ती आत गेली. आतून एक बॉक्स घेऊन आली तिच्या हातात टेकवला..

“ ओपन इट .” अनन्याने त्या बॉक्सवरच रॅपर काढत त्याला खोलत होती.. बॉक्स ओपन केल्यावर तिचे डोळे आनंदाने चमकले.

“wow, so elegant just looking like a wow” अनन्या तो डिझायन गाऊन बघून कौतुकाने बोलत होती..

“ थँक्स भक्ती.” अनन्याने भक्तीला मिठी मारली.

“यात तुझ्या अहोंसाठी आहे.”

“  त्याला तूच दे .” अनन्या.

“ बरं .”

““तुझा चॅम्प उठला नाही वाटत?” काका 

“नाही, इतक्यात उठेलच तो.”

“थँक्यू यू काका.”  तिला घ्यायला काका सकाळी विमानतळावर आले होते. हॉटेलची प्रशस्त दोन बेडरूम असलेली खोली देण्यात आली होती. भक्ती आणि अनन्या या दोन्ही स्कूल फ्रेंड होत्या.. परिवार ही ओळखीचा असल्याने एकमेकांकडे येणं जाणं होतं होत.. 

“ थॅक्यू काय म्हणतेस बेटा. तू लग्नाली आलीस हेच खूप झालं. किती वर्षानंतर आलीस… रावसाहेबांशी बोलणं झालय माझं..”

 “ गुड मॉर्निंग एव्हरीवन.” लिली ओठांवर हलकसं हास्य ठेवून तिच्या रूम मधून बाहेर आली.

“गुड मॉर्निंग लिली.” अनन्याने हसून प्रतिसाद दिला.. लिलीला ही सर्व ओळखत होती..

“ काय मग लिली कसं वाटतयं जयपूर?”
“ तस तर छानच वाटत आहे. पूर्ण जयपूर बघितल्यावर सांगेल.”

“तुला जेव्हा फिरायला जायचं आहे तेव्हा जाऊ शकते.” 

“आता मला खूप भूक लागली आहे..” ती केविलवाणा चेहरा करून म्हणाली..

“लॉन वर सर्व रेडी करून ठेवलं आहे.” काकू लिलीला म्हणाल्या..

“अनन्या तू एकदा ड्रेस ट्राय करून बघ.”

“ मॅम ते नंतर करूया ना, आधी पेट पूजा काम दूजा .” लिली त्या दोघांना मध्ये अडवत म्हणाली.

“ओके. तू जा खाली, मी राजला रेडी करून घेऊन येते..”

“ मम्मा, आय ॲम रेडी.” बेडरूममधून तयार होऊन आदिराज बाहेर हॉलमध्ये आला.

“तू रेडी झालास.” भक्तीने त्याला जवळ घेऊन त्याच्या कपाळावर ओठ ठेवले.

“गुडमॉर्निंग एव्हरीवन..”

“ गुडमॉर्निंग आदि.” 

“गुडमॉर्निंग हॅण्डसम.” अनन्याच्या हॅण्डसम म्हटल्याने तो चक्क लाजला.

“कसला भारी लाजतोय.” अनन्या त्याच्याकडे बघत म्हणाली..

“ थॅक्यू फॉर द कॉम्प्लिमेंट .. यु अल्सो ब्युटीफूल.” राज तिचं कौतुक करत होता.

“ राज चल आपण खाली जाऊया.” केदार नाथ त्याच्यापुढे हात करत म्हणाले.

“ हो आजोबा एक मिनिट .”
 एक नजर भक्तीला बघून त्याने परमिशन घेतली आणि त्यांच्या हातात हात देऊन तो त्यांच्यासोबत पुढे गेला..


“किती गोड आहे ग हा.” अनन्या तिच्या बाबांसोबत जाणाऱ्या आदिराज कडे बघत म्हणाली..

“अगदी खरं बोलल्या अनन्या मॅम, आदिराज खूप शांत समजूतदार मुलगा आहे.” लिली ने ही अनन्याला सहमती दर्शविली.

 
“भक्ती पुन्हा एकदा विचार कर ना राजसाठी. एक चान्स तर देऊ शकते तू. ” अनन्या तिचा हातात घेऊन समाजावण्याचा प्रयत्न करीत होती..

“बाप असतांना त्याला बापाचं प्रेम मिळायलं नको का? ज्यावर त्याचा अधिकार आहे.” अनन्याने तिच्यासमोर प्रश्न निर्माण केला.

“अनन्या प्लिज !” भक्ती 

“ काय झालं होतं ते तू बोलतही नाही.. कसं सोडवणार हा प्रश्न .. सांग ना काय झालं होतं? का वेगळे झालेत तुम्ही?” अनन्याच्या प्रश्न तिला त्या घटनेमध्ये घेऊन गेल्या आणि आपसूकच डोळ्यातील पाणी गालावर आले..

“ भक्ती ..” अनन्याने तिला साद घातली. भक्ती त्या घटनेत हरवून गेली होती.

“अनन्या .. मला खूप त्रास होतो गं .. मला नाही आवडत ग हे . असं राहणं आणि त्याच्यासोबत कठोरपणे वागणं. माझा नाईलाज आहे…इतकं असून सुद्धा मी त्यांना एक क्षणासाठीही त्यांना विसरले नाही.”


“कदाचित मीच कमी पडले गं. म्हणून मी...त्यांना.” 

“ मम्मा..” राजचा आवाज आला. तो समोर उभा होता.

क्रमश ..

©® धनदिपा सम्राट


🎭 Series Post

View all