Login

भेटली तू पुन्हा ! भाग - सोळा

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !


भाग - 16

अनन्या भक्ती दोघे बोलत असतांना आदिराज बोलवण्यासाठी बाहेरून आत आला आणि दारातच थांबला.


“ मम्मा..” राजचा आवाज आला. तो समोर उभा राहून त्यांना बघत होता. .

भक्ती तिच्या चेहऱ्यावर हास्य ठेवून, “ राज काय झालं तू गेला नाहीस.”

“तुला घ्यायलाच आलो आणि तू इथेच बोलत बसलीस.. मला खूप भूक लागली आहे.”

“हो आले … अनन्या लिली चला मला ही भूक लागली..”
बाहेर लॉनमध्ये मोठ्या शाही टेबलवर नाश्ता लावलेला होता.. सगळी मंडळी त्या टेबलवर जमली होती.. वर वधुकडचे सर्वच एकत्र नाश्त्याला बसले होते ते सर्व अनन्या आणि तिची मैत्रिण यांची वाट पाहत होते.. टेबलजवळ आल्यावर अनन्याने होणाऱ्या नवऱ्याशी म्हणजे सुरजित सिंगची आणि भक्तीशी ओळख करून दिली.. खाऊन झालं तसं लिली भक्तीला बाजूला घेऊन गेली..

“मॅम, मी मार्केटला जाऊन येऊ का?”

“ कशाला?”

“ तिने तिचा फुटलेला मोबाइल दाखवला.”

“मी मागवला आहे येईल थोडयावेळात आणि रात्री जेवली का नाहीस?”

“तुम्ही कुठं जेवण केलं होतं. म्हणून मी प . .”

“ पुढच्या वेळी असं करायचं नाही आणि ते ही माझ्यासाठी मुळीच नाही.” भक्ती रागात पण आवाज कंट्रोल करत होती.

“ मग तुम्ही ही उपाशी राहू नका मी ही राहणार नाही.” लिली हळू आवाजात बोलत होती..

“लिली मार खाशील तू ..” भक्ती तिच्या समोर बोट नाचवत म्हणाली.

“मॅडम इथे सर्वासमोर नका हो मारू हवंतर रूममध्ये गेल्यावर मारा.” लिली निर्लज्जपणे म्हणाली. तिच्या बोलण्याने भक्तीचा रागाचा पारा वर चढत होता.

“ लिलावती मी ना तू … तुला जॉबवरून फायरच करते.”

“ ओके मॅम तुम्ही फायर करा पण तेवढं लिलावती म्हणू नका. आणि तुम्ही फायर करा की काहीही करा मी तर जाणार नाही.” ती वेगळ्याच ॲटिट्यूड मध्ये बोलत होती.

“निर्लज्ज कुठची.” भक्ती राग कंट्रोल करण्याचा प्रयत्न
करीत होती.

“निर्लज्जम् सदासुखी असं आहे ते.” लिली तिला करेक्ट करत म्हणाली.

“ तू … “ भक्ती राग गिळून पाय आपटत आत जायला वळली. लिलीने चांगलाच राग वाढवला होता..भक्ती तणतणतच तिच्या रूममध्ये गेली. आदिराज आणि ती खालीच गार्डनमध्ये खेळत होते. खेळून झाल्यावर आदिराज आणि लिली दोघेही रूममध्ये गेले.. समोरच गिफ्ट रॅप करून ठेवले होते..


भक्ती बाल्कनीत लॅपटॉप उघडून काम करत बसली होती.. जयपूर ला आल्यावर ही तिला ऑफिसचे काम पटापट करायचे होते.


“दिदी ते बघ गिफ्ट कोणासाठी आलयं.” तो गिफ्ट बॉक्स बघत म्हणाला. टेबलवर बॉक्स बघत त्यावर लिली नाव दिसलं तसं त्याने लिलीला सांगितल. लिली लगेच पुढे आली.

“दिदी तुझं आहे गिफ्ट बघ उघडून .” त्याने ते गिफ्ट तिच्या हातावर ठेवले.. गिफ्ट बघून दोघेही एक्साईटेड होते. लिलीने पटापट गिफ्ट उघडायला सुरवात केली. बॉक्स ओपन केला. त्यात नवीन मोबाइल होता..

“wow दिदी किती छान .. न्यू मॉडेल कलर पण एकदम क्लासी आहे.” तो मोबाइल निरखत होता.. बाल्कनीतून त्यांची बडबड तिच्या कानी येत होती पण ती त्यांच्या कडे दुर्लक्ष करत काम करत होती. लिलीने तो मोबाइल राजकडे दिला आणि ती बाल्कनी मध्ये गेली.

“थँक्यू मॅम खूप सुंदर आहे पण तो आय फोन आहे. ” लिली.

“ मग आयफोन लोकं वापरत नाही का?” भक्ती लॅपटॉपमधून नजर न वळवता म्हणाली.

“वापरता म्हणजे इतका महाग मोबाइल मी कसा घेऊ?”

“ मी गिफ्ट दिल्यावर जसा घेता तसा घे. पसंत नसेल तर दुसरा बोलवं आणि नाहीच घ्यायचा असेल तर आण इकडे इथून खाली फेकून देते. मग प्रश्नच नाही.” भक्तीच्या आवजात अजूनही राग जाणवत होता..

“ मी कुठं म्हटलं की मला पसंत नाही मला खूप आवडलं आहे.. पण पण मला असे वाटते की मी तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेते.” ती मान खाली घालून म्हणाली.. तिचा खालचा स्वर भक्तीच्या लक्षात आला. तिने वळून पाहिलं. तिचा चेहरा पडला होता.. भक्तीने लॅपटॉप बाजूला करून तिच्या समोर उभी राहिली..

“बरं मला सांग तुझी ऑफिस अवर्स नंतर ही काम सांगितलं तर का करतेस? आदि आणि माझी काळजी का करते? माझ्याकडे एकदम बारीक लक्ष का असतं तुझं? माझं खाणं , पिणं, दुखणं खूपणं का बघतेस? मला त्रास झाल्यावर तुला का त्रास होतो? काल जेवली का नव्हतीस?” भक्ती तिच्याकडे बघत तिला एकावर एक प्रश्न विचारत होती..

“तुझं ऑफिस संपल की तुझं काम हीसंपलं…”

“नाही माझं काम नाही संपल .. कारण मी जोडली गेलेय तुमच्या सोबत .. रक्ताचं नातं नाही आपल्यात पण मनाशी मनाचं नातं आहे. विश्वासाचं नातं आहे.. प्रेमाचं नातं आहे.. बहिणचं नातं आहे. सखीच नातं आहे आपल्यात म्हणून त्रास होतो मला तुम्हाला त्रासात पाहून.. कालं तुम्ही खूप रडल्या त्रासात होता मग मी जेवण कशी करणार? माझ्या घशाखाली अन्नाचा घास तरी जाईल का? तुमच्यामुळे तर मी इथे आहे नाहीतर कुठे आणि ....” बोलतांनाही तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते.. भक्तीने तिचे डोळे पुसले.

“एवढे सगळ आहे ना मग कसा घेऊ का विचारतेस. गुपचूप घ्यायचं. जास्त विचार करू नकोस आणि यापुढे असा वेडेपणा करायचा नाही.” भक्ती तिच्या गालावर थोपटत होती.

“माझ्याकडून कधी काही चूक झाली तर मला क्षमा कराल कारण कधी काही करेल तर ते तुमच्या हिताचा विचार करून करणार.”


“ It depends on the situation lily.”

“ …..” लिलीने गाल फुगवले.

“लिली, जेव्हा आपला जवळचा व्यक्ती आपल्याला दुखावतो तेव्हा खूप त्रास होतो गं.. वेळ द्यावा लागतो समोरच्याला .. तुम्ही म्हटलं क्षमा करा तर लगेच क्षमा करून होत नाही. हृदयावर मिळालेला आघात सहजासहजी जात नाही. म्हणून म्हणते तेव्हाच्या परिस्थितीवर सर्व अवलंबून असेल. तोपर्यंत काळजी करू नकोस.. चल आत .” भक्ती बोलून आत निघून गेली.. लिली विचार करत अजूनही बाल्कनीत उभी होती.

“ हे भगवान कसं होणार माझं.” ती देवाला हात जोडून म्हणाली.
“दिदी.” राजची हाक कानावर आली तस ती आत निघून गेली..

“ मॅम ..” तिने खुणेने राजला विचारले.. त्याने ही खुण करून आत असल्याच सांगितलं. आदिराज ने हॅण्डसेटची संपूर्ण टेक्निकल माहिती दिली..

“स्मार्ट बॉय … तुला सर्वच कसं माहिती आहे? ” लिली आश्चर्याने त्याच्याकडे बघत होती.. त्याने त्याच्याजवळील टॅब दाखवून डोळे मिचकवले. लिलीने त्याचे केस विस्कटले...

संध्याकाळी हळद होती. भक्ती राज आणि लिली तयार होऊन खाली आल्या. हॉटेलच्या प्राव्हेट एरियात सर्व कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. छान सजवून डेकोरेट केलेले होते..

“सगळे यलो यलो दिसताय मम्मा..” आदिराज सगळ्यांकडे बघत म्हणाला..

“ हो ..”

“छान दिसतेस अनन्या .” भक्ती

वधू वरांना हळद लावली गेली. फोटो काढण्यात आले..

भक्ती आणि आदिराज यांनीही दोघाांना हळद लावली. बाकीचे ही एक जण येऊन हळद लावत होता. नातेवाईक एकमेकांना हळद लावून मज्जा मस्ती करत होते. भक्ती बाजूला उभी राहून त्यांची मस्ती बघत होती.. आदिराज ही त्या लहान मुलांसोबत खेळायला गेला.. ती त्याच्याकडे लक्ष ठेवून होती. रावसाहेबांचा फोन आल्यामुळे ती जरा बाजुला होऊन फोनवर बोलत होती. मुलांची पकडापकडी खेळ चालू झालेला. इकडून तिकडे पळत होते.. धावत असतांनाच अचानक त्याचा पाय खाली अंथरलेल्या कार्पेट मध्ये अटकला. त्याच्या मागे धावणारे मित्र ही घाबरून जागीच थांबले. आपण आता खाली पडणार म्हणून त्याने डोळे बंद केले पण तो खाली न पडता मजुबत हातामध्ये आला. हळूच एका डोळ्याची पाकळी उघडून त्याने समोर पाहिलं. समोर अनोळखी चेहरा दिसला.. आदिराज पुढे धावत असतांना वळून मागे पाहत होता आणि कार्पेट मध्ये पाय अडकल्याने तो तोंडावर आपटणार तर समोरून येणाऱ्या त्याच पडणाऱ्या आदिराजकडे लक्ष गेलं आणि त्याने पटकन त्याला दोन्ही हांतावर उचलून घेतले.

“चॅम्प तू ठीक आहेस? कुठं लागले का?” समोरून काळजीचा आवाज आला. राजच्या ओठांवर हसू तरळलं.

“येस .. यु सेव्हड् मी.. थँक्य यू अंकल.” राज सरळ उभा राहून धन्यवाद देत म्हणाला... त्याचे मित्र ही त्याच्याकडे लगेच आले.

“ तू ठीक आहेस. थॅक्य यू अंकल तुम्ही वाचवलत याला.” आदिराजचा मित्र म्हणाला. तो सगळ्याकडे बघत मंद हसला. पण तो एकसारखा आदिराजकडे बघत होता.. समोर जणू त्याची छोटी प्रतिकृती झळकत होती. त्याने त्यांच्या डोक्यावरून हात फिरवला…

“ जपून खेळा.” सर्वांकडे नजर टाकत म्हणाला..

“ टेक केअर चॅम्प .” दोन बोट त्याच्या गालावरून फिरवले. हृदयात काहीतरी जाणवत होतं.. पण काय ते समजत नव्हतं.

“आय ॲम आदिराज .” आदिराजने जेंटलमेन प्रमाणे त्याने हात पुढे केला. त्याने त्याच्या हाताकडे बघून ओठ रुंदावले. त्याने ही त्याचा हात पुढे करत त्याच्या हातात हात मिळवला..

“ नाईस नेम.” तो

“ नाईस टू मीट यू आदिराज. ”

“ मी टू ” आदिराज हसून म्हणाला आणि तो एकटक बघतच राहिला ..


“ आदिराज तुझी मम्मा बोलवतेय.” एक त्यांच्याच वयाचा मुलगा त्याला सांगायला आला..

“ओके अंकल माझी मम्मा बोलवतेय … . जावं लागेल. बाय .” आदिराज म्हणाला.

“टेक केअर आदिराज.” त्याने आदिराजच्या केसांवरून हात फिरवला. आदिराज जाण्यासाठी मागे वळला. आदिराज जाईपर्यंत तो त्याच्याकडेच बघत होता. मन अजूनही आदिराजकडे ओढ घेत होत..

क्रमश..

ओळखलं असेलच तुम्ही कोण आहे तो? लवकरच भेटूया पुढच्या भागात.