भाग - 21
हीरिए सेहरा बाँध के मैं तो आया रे (हे या)
डोली बारात भी साथ में मैं तो लाया रे (हे या)
अब तो ना होता है
इक रोज़ इंतेज़ार सोह्णी
आज नहीं तो कल है
तुझको तो बस मेरी होणी रे
तैनू ले के मैं जावांगा
दिल दे के मैं जावांगा
तैनू ले के मैं जावांगा
दिल दे के मैं जावांगा
भक्ती डोळे करून त्याच्याकडे बघत होती. त्याच्या स्टेप्स त्याचे चेहऱ्यावरचे हावभाव बघून लाजेचे गुलाब गाली फुलेले होते.. त्याच्या डोळ्यांत आर्जव होता तिला मनवण्याचा .एक भूवई उंचावून तिने त्याला वाहवा दिली. त्यानेही डोळ्यानेच थॅक्स म्हटले. तिला सोबत करून तो स्टेप्स घेऊ लागला आणि ती त्या स्टेप्स मॅच करू पाहत होती. जणू विसर पडला होता तिला भुतकाळातील घटनांचा. त्याने तिला गोल फिरवून जवळ ओढलं तशी ती ही हसून त्याच्या जवळ आली. आजही जवळ आल्यामुळे तीच धडधड होत होती.नाचल्यामुळे दोघांचेही श्वास वाढले होते.. नजरा गुंतल्या होत्या. टाळ्यांच्या गजराने दोन्ही भानावर आले.. बावरतच ती बाजूला झाली. तितक्यात समरजित आणि अनन्या आले पुन्हा नाचायला लागले. त्यांच्यासोबत प्रिया राजश्री आणि बाकी मुल मुली ही आल्या.भक्तीला खाली जाण्यासाठी वेळ दिला नव्हता.. ग्रुप डान्स झाला तसे सर्व खाली आले. थोड्याच वेळात जिंकणाऱ्या टिमचे नाव जाहीर होणार होते लगेच होस्ट त्या टिमच नाव जाहीर केलं. वधू टिम जिंकली होती. सगळ्या स्टेजवर गेल्या पण भक्ती तिथे नव्हती.. अनन्याही तिला इकडे तिकडे बघतच होती. . ती सरळ स्टेजच्या मागे वळून तिथून ती तिच्या रूममध्ये गेली.. आता तिला त्याच्या समोर थाबांयच नव्हती. हृदयाची धडधड काही केल्या कमी होत नव्हती.. पुन्हा तेच क्षण डोळ्यांपुढे येऊन तिला हळवं व्हायला होत होतं म्हणून ती कोणालाही न सांगता रूममध्ये निघून आली.
भक्तीवर रूम मध्ये धावतच आली तसं तिने पटकन दरवाजा लावून घेतला आणि तशीच दरवाजाला पाठ टेकून मोठमोठे श्वास घेत होती.. अजूनही तिचं हृदय स्पीडने धडधडत होतं. त्याचा स्पर्श अजूनही तिला तिच्या रोमरोमात जाणवत होता..
थोडावेळ्या पूर्वी
भक्ती खाली आल्यावर लगेच मागच्या बाजूने तिथून सटकली.
अचानक भक्तीला गायब झालेली बघून विश्वराज अस्वस्थ झाला.
“आत्ता तर इथे होती कुठे गेली?” तो मनात विचार करत भरभर नजर फिरवत होता.. त्याने मोबाइल काढून तिला कॉल केला.. रिंग जात होती पण फोन उचलल्या गेला नाही. भक्ती फोन उचलत नव्हती आणि इकडे विश्वराजला काळजी वाटत होती.. त्याच्यासोबत डान्स करतांना तिही पूर्णपणे दोघांमधला वाद.. पण वाद होण्यासाठी आधी बोलावं तर लागतं तिने तर अबोला धरला होता हे ती पूर्णपणे विसरली होती. त्याला तिच्या डोळ्यांत तेच प्रेम दिसलं जे त्याला नेहमी त्याच्यासाठी दिसायचं. भक्तीला जवळ ओढल्यावर तिचे हात त्याच्या मानेभोवती गुंडाळले गेले. इतक्या वर्षाने तिच्या होणाऱ्या स्पर्शाने त्याचं रक्त तापत होत.. काही क्षणांनतर ती लगेच दूर ही झाली.. त्या राजस्थानी लूक नंतर सर्व मिळून नाचायला लागले. तेव्हा ती अंतर राखूनच नाचत होती. नंतर ती कोणाला न सांगता तिथून बाहेर पडली. विश्वराज तिला शोधायला गेला. भक्ती तिच्या रूमकडे जाणाण्यासाठी मागच्या बाजूने जात होती तितक्यात कुणीतरी तिचा हात पकडून खेचल्या गेली तशी ती त्याच्या अंगावर आली. हे इतक्या पटकन घडले की तिला लक्षातच आले नाही..
“ शू ss मी आहो.” घाबरून ती ओरडणार तर त्याने तिच्या तोंडावर हात ठेवला. . एक हातने कंबरेला पकडून घेतल तर दुसरा हात तिच्या तोंडावर होता.. भानावर येताच तिचे डोळेच विस्फारले गेले .. ती त्याच्या हातातून सुटण्याची धडपड करीत होती.. त्याने तिच्या तोंडावरचा हात काढला.
“ मिस्टर अभ्यंकर सोडा मला.” ती त्याचे कंबरेवरचे हात काढण्याचा निष्फळ प्रयत्न करत म्हणाली..
“ खूप पळलीस माझ्यापासून पण आता नाही.. यावेळी मी तुला कुठेही जाऊ देणार नाही...” तो तिच्याकडे बघत हसून म्हणाला. त्याने आणखीनच तिला जवळ ओढले आणि ती त्याच्या छातीवर दाबल्या गेली. सोबतच तिच्या अंगातून एक सळसळती वीज गेली.. तिने त्याच्या डोळ्यांत पाहिले आणि त्याची नजर प्रेमाने बघत तो त्याच्यांतील अंतर कमी करत होता. तिच्या छातीच स्पर्श होताच त्याचं तापलेलं रक्त उसळी मरायला लागलं. त्याचं इतक्या जवळ येण बघून ती मागे मागे चेहरा करत होती.
हे आऊट ऑफ कंट्रोल होताय भक्ती.. ती मनातच त्याच्या जवळ येण्याने असह्य होत होती. त्यात तिची धडधड ही वाढली होती. नजर त्याच्या नजरेत गुंतली. त्याचा हात कंबरेवरून हळुहळू वर हातावरून वर सरकत खांद्यापर्यंत आला. त्याच्या पुरुषी स्पर्शाने शहारून अंगावर काटाच आला. अंगावरची लव ताट झाली आणि तिचे श्वास वाढले. मानेवरून हात नेत त्याने दोन्ही हातांच्या ओंजळीत तिचे चेहरा पकडला. दोघांमधील अंतर तो कमी करू लागला. पापणी फडफडवत ती बघत होती. तो तिच्या चेहऱ्यावर झुकला . त्याचे उष्ण श्वास तिच्या चेहऱ्यावर जाणवले. तसं तिचे डोळे आपोआप बंद झाले आणि त्याने त्यावर ओठ ठेवले. याच्या ओठांचा ओला स्पर्श तिच्या कपाळावर झाला तसं तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू तरळले. ओठ टेकवून तो बाजुला होणार तर तिने ही तिचा चेहरा पुर्वरित केला.
“ भक्ती आय लव्ह यू .” तो तिच्या कानाच्या पाकळीवर ओठ टेकवत म्हणाला. त्याच्या आवाजात आणि स्पर्शात ओढ जाणवत होती.खाली सरकतच त्याने मानेवर ओठ ठेवणार तितक्यात त्याचा फोन वाजला. तिच्याकडे बघतच त्याने मोबाइल कानाला लावला. त्यातच त्याचे कंबरेवरची पकड सैल झाली आणि याचाच फायदा उठवत भक्ती तिथून पसार झाली..
“रॉंग टाईम अमर.” तो वैतागतच म्हणला.
“ सॉरी सर , तुम्हाला रिमाईंडर देण्यासाठी कॉल केला. .”
“ या … आलोच .”
भक्ती पळतच तिच्या रूम मध्ये गेली. दार लावून ती तिथेच पाठमोरी झाली . छातीवर हात ठेवत वाढलेल्या श्वासांना शांत करत होती. अजूनही त्याच्या चेहऱ्यावर रेंगाळलेल्या श्वासांनी मोहरत होती..
“ बरं झालं मोबाईल वाजला आणि मला येता आलं नाहीतर काही सांगताच येत नव्हतं. पण त्यांना राजबद्दल माहिती पडलं तर ? मी अजिबात दूर करणार नाहीये त्याला मिस्टर अभ्यंकर. आय नो तुम्हाला त्याच्या बद्दल माहिती असायला हवी होती.. मी ही एक प्रकारे अन्याय केलाय पण तेव्हा मला तेच योग्य वाटत होतं.. तेही तुमच्या आनंदासाठीच केले. विचार करतच ती अस्वस्थ झाली. बाथरूममध्ये जाऊन शॉवर खाली उभी राहिली. पाण्याच्या प्रवाहा सोबत विचारांना ही तिने सोडून दिले. नाईट सुट घालून ती राज जवळ येऊन त्याच्या डोक्यावर हात फिरवला.. कपाळावर ओठ टेकवून ती सोफ्यावर झोपलेल्या लिलीजवळ गेली..
“लिली, बेटू.” लिली तिच्या कपाळावर हात फिरवत म्हणाली.
“बेडवर जाऊन झोप .. इथे शरिराचं मटकुळ करून कशाला झोपलीस ? जा बेडवर जाऊन झोप तिथे.” भक्ती लिलीला उठवत म्हणाली..
“बेडवर जाऊन झोप .. इथे शरिराचं मटकुळ करून कशाला झोपलीस ? जा बेडवर जाऊन झोप तिथे.” भक्ती लिलीला उठवत म्हणाली..
“ नको, मी जाते माझ्या रूममध्ये. तुम्हीही झोपा … गुडनाईट .”
“ बरं …गुडनाईट.” .
“बाल्कनीत जाऊन जागत बसू नका..” भक्तीला बाल्कनीकडे जातांना बघून अंदाज लावतच म्हणाली..
“ थोडावेळ मोकळ्या हवेत फिरते.. मग झोपते.” भक्ती तिच्याकडे न बघता पुढे जात म्हणाली.
“ सकाळी लवकर उठायचं आहे. अनन्या मॅडमचं उद्या लग्नं आहे.”
“ हम्म . .” भक्ती बाल्कनीत गेली.. बाहेर रात्रीची शांतता पसरली होती. हवेत गारवा ही होता.. तिने डोळे बंद केले. डोळे बंद करताच तिच्या डोळ्यांपुढे मगासचा प्रसंग जसाच्या तसा आला.
मगाशी कानाशी ‘आय लव्ह यू’ म्हटलेलं कानात फिरत होतं. त्याच्या नरम ओल्या ओठांचा स्पर्श रोमांचित करायला पुरेसा होता.. थकून ही भक्तीला आज झोपत लागत नव्हती.. बाल्कनीत फिरल्यानंतर ती आत आली. राजच्या बाजूला आडवी झाली. राजला जवळ सरकवून त्याच्याकडे बघतच तिला झोप लागली..
भक्ती गेल्यानंतर ती गेल्या दिशेने बघत कुठे गेली शोधत होता..
‘ लवकरच तू परत येशील भक्ती .’ तो पुटपुटला आणि त्याच्या रूमच्या दिशेने गेला. रूममध्ये गेल्यानंतर त्याच्या ही भावनाना शांत होणं गरजेचं होतं . शॉवर खाली उभा राहून तो भक्तीच्या आठवणीत शांत झाला आणि आवरून बाहेर आला. . फॉरेनर गेस्ट सोबत मिटिंग अटेंड करायला लॅपटॉप ओपन केला. मिटिंग मध्ये बिझी झाला.. दिड दोन तासानंतर त्याने लॅपटॉप बंद केला. चेअर वर मागे टेकत डोळे बंद केले आणि भक्तीचा चेहरा त्याच्या नजरेसमोर आला. अंग मोडतच बेडवर पहुडला .तिच्या अदाने तो खरचं आज पुरता घायाळ झाला होता .. स्टेजवर जेव्हा ती घुंघट ओढून आली तेव्हा त्याच्या हृदयाने ती आल्याची ग्वाही दिली होती.. घुंघट वर करून तिने त्याच्याकडे बघितलं तेव्हा त्याला तिच्या नजरेतील तोच खोडकरपणा आणि तीच टशन दिसत होती.. तिच्या चेहऱ्यावर आलेलं हास्य बघून त्याचे ही ओठ आठवणीने याक्षणीही रुंदावले होते.. ‘कॉल नसता आला तर इतक्या लवकर जाऊ दिलं नसतं. उद्या बघून येईल. ‘ तिच्या विचारातच त्याचा डोळा लागला.
सकाळी अर्लामच्या आवाजाने भक्तीला जाग आली.. हात टेबलकडे चाचपडत तिने फोनवरचा अलार्म बंद केला.. राजकडे बघून त्याच्या कपाळावर ओठ ठेवून त्याच्या अंगावर पांघरून घातले आणि ती वॉशरूममध्ये फ्रेश होण्यासाठी गेली. फ्रेश होऊन ती बाहेर आली.. बाल्कनीत सकाळच्या प्रसन्न वातावरणात निवांत बसली.. तितक्यात तिचा मोबाइल वाजला तसं ती पटकन रूममध्ये गेली. राज झोपलेला असल्याने ती पटकन घेण्यासाठी गेली पण मोबाइल वाजून बंद झाला होता. पुन्हा मोबाइल वाजू लागला तस मोबाइल बाहेर घेऊन आली.. मोबाइल बंद व्हायच्या अगोदर तिने उचलून कानाला लावला.
इतक्या सकाळी कोणाचा फोन आला असेल भक्तीला? विश्वराजला माहिती पडेल का राजचं सत्य? सत्य समजल्यावर भक्तीला माफ करेल का ? जाणून घेण्यासाठी वाचत राहा भेटली तू पुन्हा !
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा