भेटली तू पुन्हा !
भाग - 39
विश्वराज लगेच त्यांच्या रूममध्ये गेला. कपाट उघडून समोरच एक लाकडी पेटी दिसली. त्याने घेतला आणि दार बंद करून तो आपल्या रूममध्ये आला. त्याने ती पेटी उघडली त्यात एक पेनड्राइव्ह होता.
‘पेन ड्राइव्ह ? यात काय आहे असं? बाबांनी आता बघायला सांगितलं म्हणजे काहीतरी असेल.’ विचार करत त्याने अमरला कॉल करून त्याचा लॅपटॉप घेऊन बोलवलं. अगदी पंधरा वीस मिनटात त्याचा लॅपटॉप त्याच्या हातात होता.अमर रूममध्ये आला..
“ अमर, मी काही दिवसांसाठी गावी जातोय. .”
“ ओके. नो प्रोब्लम सर .. मी इथे सर्व बघून घेईल..”
“ आय नो.”
“ गुड नाईट सर.
“ गुड नाईट.” अमर निघून गेला. त्याने पटकन पेनड्राइव्ह त्याच्या लॅपटॉपला कनेक्ट केला..
फाईल उघडल्या गेली.. त्यातून पहिलं फोल्डर उघडून त्यावर त्याने क्लिक केलं आणि समोर आला एक व्हिडिओ.. ते पाहून त्याचे डोळे मोठे झाले. हृदयाची धडधड वाढली आणि डोळ्यांतून अश्रू बाहेर आले.
त्या किल्पमध्ये बाळाची एक छोटी काळी आकृती दिसली आणि सोबतच बाळाची ठोक्यांची धडधड त्याच्या कानी आली आणि विश्वराजच्या हृदयाची धडधड वाढली. डोळ्यांतून अश्रू घरंगळत गालावर आला हे त्यालाही समजलं नाही. पुन्हा पुन्हा तो ती क्लिप बघत होता.. दुसऱ्या क्लिप वर क्लिक करत ओपन केली. ती भाजलेली माती तोडांत टाकून डोळे बंद करून आवाज करत बकाबक खात होती. त्या मातीचा आनंद घेत होती.. क्लिप बघून त्याचे किचिंत कपाळावर आठ्या पडल्या.
“ हे पण खायचं असतं का?” तो स्वतःशीच पुटपुटला.
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ती एक हिरवा कारलं हातात घेऊन एकसारखी न्याहळत होती.. त्या हिरव्या कारलेल्या बघून तिने कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि दुसऱ्याच क्षणाला ते कारलं तिने तोंडात टाकलं .. हे बघून आश्चर्याने विश्वराजचे डोळे बाहेर येण्याचे बाकी होते आणि तोंडाचा आ झालेला होता.. कारल्याचं नाव जरी काढल तरी उलटी करणारी भक्ती कच्चं कारलं खात होती..
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ती एक हिरवा कारलं हातात घेऊन एकसारखी न्याहळत होती.. त्या हिरव्या कारलेल्या बघून तिने कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली आणि दुसऱ्याच क्षणाला ते कारलं तिने तोंडात टाकलं .. हे बघून आश्चर्याने विश्वराजचे डोळे बाहेर येण्याचे बाकी होते आणि तोंडाचा आ झालेला होता.. कारल्याचं नाव जरी काढल तरी उलटी करणारी भक्ती कच्चं कारलं खात होती..
“ माझं बाळ माझ्यावरच गेलयं.” तो ओठांत हसला.. सगळे तिचे डोहाळे पुरवत होते.
आता तर तिचं पोटही दिसायला लागलं होतं. वजनही वाढून गाल फुलले होते.. आईपणाच तेज चेहऱ्यावर चमकत होतं. सगळे तिची खूप काळजी घेत होते.. आत्या ती म्हणेल ते खाऊ घालत होती. मध्येमध्ये एकाकी शांत व्हायची ती मग श्रीरंग तिचा मुड ठिक करत होता.
सोनाग्राफी क्लिप मध्ये त्याला त्याचं बाळ वाढतांना दिसत होतं. तिला सातवा महिना लागला होता. पोटाचा आकार वाढला होता.. पायांवर सूज आली होती.. तिला चालतांना त्रास होत होता. . आत्या तिच्या पायाला तेल लावून हलक्या हाताने मालिश करून देत होत्या. श्रीरंग बाजूला बसून तिचे व्हिडिओ काढून तिला चिडवत होता.. तिच्या पायांकडे कॅमरा दाखवत तिचे लाड पुरवत आहे हे श्रीरंग दाखवत होता.. सुजलेले पाय आणि पुढे आलेलं पोटं त्यामुळे चालणं फिरणं मंदावलं होत. तिचे सुजलेले पाय बघून विश्वराजला वाईट वाटले. तो स्क्रीनवरून हात फिरवत होता.. सकाळ उठल्यापासून तर झोपेपर्यंत वेळेनुसार योगा मेडिटेशन, अध्यात्म, वाचन, सकस आहार जेवणं, बाहेर फिरणं वेळेत व्हायला भर देत होते. भक्तीचे बरेचसे व्हिडिओ क्लिप्स होते. कधी हसण्या खेळण्याचे तर कधी त्याच्या विचारात रमण्याचे. अखेर तो दिवस आला ज्या दिवसाची सर्व आतुरतेने वाट बघत होते. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केले गेले. बाहेर रावसाहेब श्रीरंग आत्या थांबलेले होते. रावसाहेब जरा काळजीत दिसत होते. मनात देवाला विनवणी करत होते. प्रसवपीडातून लवकर भक्तीची सुटका होऊन दोघेही सुखरूप राहावे. बाळाचा आवाज कानावर पडताच डोळ्यांतून आनंदाश्रू आले.
“काँग्रॅच्युलेशन्स इट्स बेबी बॉय.”
“ हाऊ इज माय डॉटर .. रावसाहेबांनी त्या बाळला अलगद हातावर घेऊन त्याच्या कपाळावर ओठ ठेवले.
“शीट अब्सुलेटली फाईन.” रावसाहेब खूप भाऊक झाले होते.. त्यांची बाळ आज एका बाळाची आई झालेली होती. याक्षणी भारतीची आठवण येत होती. यावेळी एका मुलीला तिची आई हवी असते.
“ मी बघू शकतो तिला.” रावसाहेब.
“श्युअर .” रावसाहेब लगेचच रूममध्ये गेले. तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला. त्यांच्या स्पर्शानी तिने डोळे किलकिले करत उघडून ओठांवर स्मित आले..
“ बाळा, तुला काही त्रास तर होत नाहीये ना ?” रावसाहेबांनी तिच्या केसांवर ओठ टेकवले.
“ मी ठिक आहे.” तिने डोळ्यांनीच त्यांना आश्वस्त केलं. पाळण्यात लक्ष जाताच प्रश्नार्थक नजरेने रावसाहेबांकडे बघितलं.
“ मिठ्ठू वॅक्सिनसाठी नेलयं त्यांना.” रावसाहेब तिचा प्रश्न ओळखून म्हणाले.
तीन चार दिवसानंतर बाळाला आणि भक्तीला घरी आणण्यात आले. श्रीरंगने बाळाच्या स्वागतासाठी पूर्ण बंगला छान सजावला होता.. आत्याने दोघांच औक्षणं करून त्यांना आत घेतलं. भक्तीची रूम ही नवीन पाळणा खेळण्यांनी सजवली होती..
तीन चार दिवसानंतर बाळाला आणि भक्तीला घरी आणण्यात आले. श्रीरंगने बाळाच्या स्वागतासाठी पूर्ण बंगला छान सजावला होता.. आत्याने दोघांच औक्षणं करून त्यांना आत घेतलं. भक्तीची रूम ही नवीन पाळणा खेळण्यांनी सजवली होती..
आता प्रत्येक व्हिडिओमध्ये छोटा आदिराज दिसत होता. हसतांना, खेळतांना , त्याला मालिश करण्याचे , अंघोळ करण्याचे , पहिलांदा बोलण्याचे, दुडूदुडू चालण्याचे आणि पहिल्या वाढदिवसपासून तर आता मुंबई येईपर्यंत त्याची प्रत्येक हालचाल त्या व्हिडिओमध्ये सुंदर आठवण कैद करून घेतले होते.. या क्लिप बघूनच त्या आठवणी तो याक्षणी अनुभवत होता.. ताडकन उठून तो भक्तीच्या रूममध्ये गेला.. रूमचा दरवाजा उघडून तो आत आला. रूमचे लाईट ऑन होते. घड्याळ्यात रात्रीचे तीन वाजले होते पण भक्ती बेडवर नव्हती.. गॅलरीचा स्लाइडिंग डोअर खुले असल्याने तो आत आला.. तिथेच भक्ती खूर्चीवर झोपलेली दिसली. टेडी आणि राजच्या फोटोफ्रेमला छातीशी कवटाळून झोपली होती.. काम जरी करत असली तरी रात्री तिचं बाळ तिच्या कुशीत असायचं पण आज मात्र तिला झोप लागत नव्हती म्हणून बाहेर येऊन ती फोटोला न्याहळत त्याच्याच विचारात होती. ‘पहिल्यांदा गावी गेला आहे. तिथे रमला असेल का? इतक्या माणसांमध्ये? बाबा आहेत ना त्याच्याजवळ पण मी कुठे आहे? त्यात माझं राजसोबत बोलणं ही झालं नाही. उद्या लवकर जाऊन त्याल सरप्राईज देते.’ स्वतः शी बडबडत ती उशिरा झोपेच्या अधीन झाली. विश्वराज तिच्याजवळ जाऊन गुडघ्यावर बसून तिला एकटक बघत होता.. छोट्या बाकावर असलेल्या पायावर त्याची नजर गेली. त्यांच्या डोळ्यांसमोर तिचे टम्म फुगलेले पाय आले. मन अगदी भरून आलं.. हलकासा तिच्या पावलांवरून हात फिरवला. त्याचे ओठ त्या नाजुक पाऊलांना स्पर्शिले.
‘ सॉरी भक्ती , किती आणि काय काय सहन केलसं .. आई होणं सोपे नाही, ते ही एकटीने जिथे माझी सर्वात जास्त गरज होती. पण यापुढे तुझ्यासोबत मी कायम असेन आय प्रॉमिस यू.’ तिला निरखत त्याचं अंतर्मनाशी बोलत होता. एक हात तिच्या मानेखाली तर कंबरेच्या खाली नेत तिला दोन्ही हातांवर लहान मुलांसारखा उचलून बेडरूम मध्ये घेऊन आला.. गाढ झोपेच्या अधीन झालेली ती बिनधास्त त्याच्या हातावर निरागस बाळासारखी पहुडली होती.
‘ भक्ती तुला असेच मिठीत घेऊन तुझ्यावर प्रेमाचा वर्षाव करावा असं वाटत असून ही मी हे आता करू शकत नाही. पण तो ही दिवस लवकरच येईल.’ भक्तीला बेडवर ठेवत त्याने आल्हाददायक मिठीत घेऊन तिच्या कपाळावर ओठ ठेवले. तिच्या हातांतून फोटो फ्रेम काढून घेतली. राजचा फोटो बघून त्याच्या चेहऱ्यावर हास्य आलं. त्या फोटोफ्रेम वर ओठ टेकवून त्याने तो फोटो बेडसाईड टेबलवर ठेवला. तिच्या अंगावर पांघरूण घालून तिच्या केसांवर हात फिरवून लाईट बंद करून दार ओढून तो त्याच्या रूममध्ये आला. आज भरपूर धावपळ करूनही तो ताजेतवाना दिसत होता.. डोळ्यांवर झोपेचा अंमल अजिबात दिसत नव्हता.. राजच कपाट उघडून त्याने त्याच्या वस्तू बघायला सुरवात केली सोबतच त्याने काढलेले सुंदर स्केच बघितले. पहाटे निघायच असल्याने तो आता बेडवर आला. डोळे बंद करून मुलाच्या भेटीचे स्वप्न बघत तो झोपी गेला..
सहाच्या ठोक्याला दोन्हीही आपआपल्या रूममधून बाहेर पडले. काही तासांच्या आरामात ही दोघं टवटवीत वाटत होते. भक्ती पांढऱ्या शुभ्र रंगाच्या सुट मध्ये फुलासारखी टवटवीत दिसत होती. काही क्षण तिच्याकडे बघण्यात हरवला. त्याची एक टक नजर लावून आपल्याकडे बघणं तिची धडधड वाढवून गेली.
“ गुड मॉर्निंग मिस्टर अभ्यंकर .” भक्ती नजर दूसरीकडे वळवून शुभेच्छा देत म्हणाली.. तरीही त्याचा काहीच रिस्पॉन्स न आल्यामुळे तिने त्याच्याकडे रोखून बघितले. आधीच त्याची नजर तिला अस्वस्थ करत होती..
“ मिस्टर अभ्यंकर . .” ती थोड मोठ्यानेच म्हणाली. .
“ हं ..” अजूनही त्याची नजर तिच्यावरच रोवलेली होती..
“ निघूया .” ती डोळे मोठे करून म्हणाली.
“ हो जस्ट वेट माझी बॅग आणायची आहे.”
“ लिली .” भक्तीने लीला हाक दिली.
“ ताईसाहेब लिली ताई घरी गेल्यात.” रेखाकाकू बाहेर ट्रेमध्ये चहा घेऊन आल्या.
“ मला न सांगताच गेली .” म्हणत भक्तीने लिलीला फोन लावला.
“ हॅलो लिली कुठे आहेस गं ? आपल्याला निघायचं आहे लक्षात नाही का तुझ्या ?”
क्रमश ..
नमस्कार , खरं तर मी दोन महिन्यानंतर आज आले. आधी माझी परिक्षा असल्याने आणि नंतर तब्येत बरी नसल्याने मी लिहू शकले नाही.. काही ना काही चालूच आहे. मागील दोन महिन्यात मनावर खूप ताण आला. सद्ध्या ट्रिटमेंट चालू आहे. आता ठिक आहे. आपूलकीने तब्येतीची चौकशीचे मॅसेज करणाऱ्या माझ्या वाचक मैत्रिणींना खूप खूप प्रेम .. त्यातून त्यांची काळजी आणि प्रेम दिसून आले. आता वळते माझ्या कथेकडे नियमित पणे भाग येत नाही. हे ही तितकचं खरं आहे. पण कधी कधी माझा ही खरचं नाईलाज होता.. कारण ही सांगू शकत नाही. जे नियमित वाचतात त्यांची खूप गैर सोय होतेय त्यासाठी त्यांची मी मनापासून माफी मागते.. आतापर्यंत समजून घेतलंच आहे यापुढेही घ्याल अशी आशा आहे . तुम्ही माफ ही केलं असेल असं मी धरून चालते.. पुढेही अशीच साथ आणि प्रेम राहू देत.
तुम्हा सर्वांना 79 व्या स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा
Happy Independence day
धन्यवाद .
©® धनदिपा सम्राट
©® धनदिपा सम्राट
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा