भेटली तू पुन्हा ! भाग - 40
“ मॅम एक ईमरजन्सी आली. माझा एक मित्र आहे सिद्धार्थ त्याचा ॲक्सिडेंट झाला त्यालाच घेऊन हॉस्पिटलला आले.. तुम्ही व्हा पुढे मी हे सर्व आवरून नंतर येते.”
“ ओहह .. ठिक आहे ना तो.. बरं आरामात ये .. काही वाटलं तर मला फोन कर..”
“ हो मॅम करते. बाय .” लिली ने फोन कट केला.
“ ये मी तुझ्या समोर धडधाकड उभा असतांना सरळ खोटं बोलून मला ॲक्सिडेंट करून हॉस्पिटलमध्ये पाठवतेस.” सिद्धार्थ चहाचा कप खाली ठेवत म्हणाला.
“ सॉरी सिद्धू .. मला खोटं बोलावं लागलं .. आईच्या तब्येतीच कारण सांगितलं असतं तर मॅम आधी इथे बघायला आले असते.. आणि मला त्या दोघांमध्ये हड्डी बनायचं नव्हतं रे … आय होप हा प्रवास त्यांना आणखीन जवळ घेऊन येईल.
भक्ती आणि विश्वराज गाडीत बसून त्यांच्या प्रवासाला निघाले. सकाळची शुद्ध हवा असल्याने भक्तीने खिडकीची काच खाली केली आणि खिडकीकडे पाहत थंड हवा ती चेहऱ्यावर घेत होती.. विश्वराज गाडी चालवत अधून मधून तिच्याकडे बघत होता.. तयार होऊन आल्यावर त्याचे तर फ्युज उडाले होते.. भक्ती च्या बोलण्याकडे तर लक्ष नव्हते.. थोड्या मोठ्या आवाजात डोळे वटारून त्याला आवाज दिला. तेव्हा कुठे तरी आपण काही तरी माती खाल्ली हे त्याच्या लक्षात आले.. तो ब्लॅक कॉफी तर ती चहा घेऊन निघाले.. मध्येच रस्त्यात एका हॉटेलला थांबून नाश्ता करून ते पुढच्या प्रवासाला लागले.. गाडीत तशी शांतता होती. त्याने शांतता भंग करत बोलायला सुरवात केली..
“भक्तीऽऽ.” तिने त्याच्याकडे वळून पहिले.
“ थॅक्य यू व्हेरी मच इतकं गोड क्यूट गिफ्ट दिलं मला.. त्याला जन्म देण्याचा निर्णय घेतला. त्या वेळेस सिच्युएशन अशी होती की तू हे बाळं अऽ र्बोट केले असते तर हा. . ”
“विश्वराजऽऽ .. असं कसं बोलू शकता तुम्ही. मला असले घाणेरडे विचार सुद्धा कधी आले नव्हते.. प्रेम होत माझं मग मी त्या प्रेमाचा अंकुर कसा उपटून टाकणार होते. माझा जीव आहे तो. माझं जगण्याचं कारण आहे …” ती रडवेली होऊन पण रागाने म्हणाली.
“ सॉरी .. माझं म्हणणं होत की तू तेव्हा राग डोक्यात घालून काही केल नाही.. काही अघटित घडलं तर मी स्वतःच्या नजरेतून उतरलो असतो आणि या साठी मी मलाच कधीच माफ करू शकलो नसतो..”
“ जेव्हा पहिल्यांदा राज माझ्या कुशीत आला त्याला पाहिलं आणि मी सगळं विसरले.. तो एवढुसा जीव माझ्या कुशीत शांत निजला होता.. उठल्यावरही रडारड नाही.. एक वेळ त्याला माझा स्पर्श झाला की शांत व्हायचा अजिबात काही त्रास नाही.. त्याचं हसणं, खेळणं, चालणं, बोलणं हे बघता बघता माझा दिवस कुठे जात होता ते कळत नव्हतं.. आता तर पाच वर्षाचा होईल तो.” ती भरभरून राजबद्दल बोलत होती..
“कधी कधी तर आई आजी बाबा सगळ्यांचा रोल निभावत असतो.. मी त्याची मम्मा नाही तर तो माझी मम्मा बनतो.. मी त्याला म्हणते कधी तरी तुझ्या वयाच्या मुलांसारखा वाग ना .. त्यांच्यासारखे हट्ट कर ना ..” भक्ती आदिराजच्या आठवणीत हरवली होती. ओठांवर अलगद हास्य आलं होतं. विश्वराजच्या ही डोळ्यांपुढे पाहिलेले व्हिडिओ फिरत होते.
“भक्ती..”
“हूंऽऽऽ” विश्वराज पुढे बोलणार तर त्याचा फोन वाजू लागला.
“ अमर व्हॉट हॅपन्ड् .”
“सर, मिस्टर एलिसला तुमच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्स करून बोलायचे होते..”
“ नाऊ ?” त्याने अंगठा कपाळावर फिरवला.
“ येस सर .”
“ ओके देन फाइव्ह मिनिटस्.”
“ शुअर सर .” व्हिडिओ कॉन्फरन्स मीट आवश्यक असल्याने त्याचे भक्तीसोबत बोलायचे थांबवले आणि त्याने गाडी एका बाजूला करत थांबवली.
“ भक्ती ड्रायव्हरला बोलवलं आहे . तो ड्राइव्ह करेल.”
“ नको मी ड्राइव्ह करते..”
“ शुअर ..
“ एबसोल्युटली शुअर”
“ देन ओके.” तो ड्रायव्हिंग सीट वरचा उठून बाजूच्या सीटवर लॅपटॉप उघडून बसला.. भक्ती ही ड्रायव्हिंग सीटवर बसली. त्यांचे मागे थोडी दूर अंतर राखून सिक्यूरिटीची गाडी होती.. तिने गाडीचा ताबा घेतला आणि चालवायला सुरवात केली. विश्वराज मीटिंग मध्ये गुंतला आणि ड्राइव्हींग मध्ये पण अध्येमध्ये तिही चोर नजरेने त्याच्याकडे बघत होती. मध्येच तिची चोरी पकडल्या जात होती.. विश्वराज गालात हसून त्याच्या कॉन्फरन्स मध्ये लक्ष देत होता. तास दिडतास त्याची कॉन्फरन्स संपली. त्याने डोळे चोळले.
“युवर बॉडी नीडस् रेस्ट नाऊ”
“ यु शुड टेक सम रेस्ट.”
“नाही मी नाही आराम करू शकत. मला आधी माझ्या चॅम्पला घट्ट मिठीत घ्यायचं आहे.. माय सन.” विश्वराजचा चेहरा आनंदाने भारलेला दिसत होता... एका बापाला त्याच्या मुलाला भेटण्याची अधीरता ओढ स्पष्ट दिसून येत होती.
“ हो मुलाची आणि त्याच्या डॅडची भेट व्हायला डॅड पण फ्रेश दिसायला हवे . थकवा चेहऱ्यावर दिसणार असेल तर कसा वाटणार ? त्या करिता तर थोडा आराम केलाच पाहिजे.” ‘ती समोर बघत म्हणाली.
“ ओके. दहा मिनिट रेस्ट करतो.” सीटवर डोके मागे टेकवून तो थोडावेळासाठी डोळे मिटून बसला. दहा मिनटांचे एक तास होऊन गेला आणि ते आता टॅफ्रिकमध्ये अडकलेले होते.. रस्त्याच्या कडेला एक मुलगी तिच्या लहान भावासोबत फुलं विकायला बसली होती.. येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना ती फुलं घ्यायला आवाज देत होती.. भक्ती गाडी एका बाजूला लावून ती त्या मुलीजवळ गेली..
“ आवं ताई एक गुलाब तरी घ्या हो .”
“खूपच सुंदर आहेत ही गुलाबाची फुलं .. कितीला दिलीत ?”
“ पंधराला एक ..”
“ मला ही सर्व गुलाबाची फुलं दे.”
“सर्व घेताय .” तिचे डोळे आनंदाने चमकले.
“हो .. मला सांग तू शाळेत जात नाही का ग ?”
“जाते की .. आज नाय गेली.. माझ्या आयला बर नाय ना मग मी आज फुलं विकाया आली..”
“मग तुझे बाबा कुठे आहेत ?
“बाबा नाहीत .”
“ हे देवा.”
“आणि या छोटूला पण घेऊन आलीस.”
“हाच मागं मागं आला माझ्या .”
“काही खाल्लसं का ?”
“सकाळी खाऊन आलतो.”
“हे घे तुझ्या फुलांचे पैसे .. सांभाळून ठेव. “ भक्तीने दोन हजार रुपये दिले.
“इतके पैसे नाय झाले . चारशे पन्नास रुपये बस.”
“ अरे वा तुला तर हिशोब करता येतो छानच. असु दे तुझ्या आईला औषध पाणी होईल.”
“मग मी शाळेत जाते .”
“ हो ग बाई.” भक्तीला तिचे खुप कौतुक वाटत होते. .
“हे बघ मी आले असते तुझ्यासोबत पण मला पुढे जायचं आहे.. मी एक काम करते.” म्हणत तिने कॉल करून कमलेश दादाला (सिक्युरिटी हेड ) यांना बोलवून घेतलं. कमलेश दादला सांगतिले.
“ ताईसाहेब मी पवनला पाठवतो यांच्या सोबत.”
“ नाही दादा तुम्ही जा, आणि यांना हवी ती मदत करा आणि यांच्या रोजगारचही बघा यांच्या आईला विचारून आपल्या गावाकडे जायची तयारी असेल तर तसे करा. .”
“ नाही दादा तुम्ही जा, आणि यांना हवी ती मदत करा आणि यांच्या रोजगारचही बघा यांच्या आईला विचारून आपल्या गावाकडे जायची तयारी असेल तर तसे करा. .”
“ पण ताईसाहेब रावसाहेब ?”
“ मी सांगेल बाबांना .. आमची काळजी करू नका ?”
“तुझ्या घरी या काकांना घेऊन जा. रोज शाळेत जायचं आणि याला पण घेऊन जायचं.” तिने मान हलवून होकार दिला.
इकडे विश्वराजला जाग आली तशी त्याला गाडी थांबलेली दिसली. त्याने खिडकीतून समोर बघितले तर त्याला भक्ती त्या लहान मुलांसोबत दिसली. बाहेर येऊन तो त्यांच्याकडे गेला. तिच्या पाठी उभा राहिला.
“ताई हा माणूस तुझा नवरा आहे ?”
“ कोण माणूस ?” तिने मागे वळली..
“ हो .. मी तुझ्या ताईचा नवरा आहे.” विश्वराजच आधी म्हणाला.
“ पण तुला कसं कळलं गं?” भक्ती कुतूहलाने विचारले.
“ हिरोइन सारखी दिसते मग तुझा नवरा हिरोच दिसतो.. कोणत्यातरी पिक्चरमधी पहिल्यासारख वाटतो. तुम्ही दोघही टिव्ही मधले हिरो हिरोईनच दिसता..” तिच्या बोलण्यावर तिघही हसू लागले..
“ हे पण बघतेस का तू ?” भक्ती हसून म्हणाली.
“ हो कधीमधी.”
“ बरं आता मी निघते मला वेळ होतोय.. घरी गेल्यावर आईशी माझं बोलणं करवून दे.”
“ हो .” त्या चिमुकल्यांचा निरोप घेऊन विश्वराज आणि गाडीत बसले… दहा किलोमीटरच्या अंतराने भक्ती विश्वराजची गाडी श्रीरंगपुरला पोहचली.
क्रमश..