Login

भेटली तू पुन्हा ! भाग - एकेचाळीस

भक्ती विश्वराज
 भेटली तू पुन्हा ! भाग - 41



भक्ती आणि विश्वराज दोघेही श्रीरंगपुरला पोहचले.. गाडी आत शिरली तसे सत्तर वर्षाच्या आजीसाहेब त्या दोघांना ओवाळायला ताट घेऊन पुढे आल्या. त्या दोघांना ओवाळले त्या दोघांनी एकत्र आशीर्वादासाठी आजी साहेबांच्या पायांवर खाली वाकून त्यांचा आशीर्वाद घेतला... घरातील नोकरांनी गाडीतील सामान आत घेऊन गेले.. 

“कशा आहात आजीसाहेब? आबासाहेब कसे आहेत आणि काका काकू कुठे गेलेत?” भक्ती.
“ आत्ता आठवण आली का आमची? आम्ही अजिबात बोलणार नाही तुमच्यासोबत . जावाईराजे तुम्ही आत या .” आजी साहेबांनी भक्तीकडे दुर्लक्ष करून विश्वराजला आत घेतले.. 

“ आजीसाहेब .. चुकलं आमचं ” तिने चेहरा पाडला.. 

“ आमचे पणतू इकडे आले नसते तर तुम्ही आले असते? आम्ही कोण आहोत तुमच्या जे तुम्ही इकडे याल?” 

“ आजीसाहेब असं काय बोलताय .” ती आजीसाहेबांच्या पायाजवळ बसून भाऊक होऊन बोलत होती

 तितक्यात रावसाहेब ही बाहेरून आत आले.

“बाबा बघा ना आजीसाहेब कशा बोलताय माझ्यासोबत..” 

“मी यात पडणार नाही मिठ्ठू, तुमचं तुम्ही बघून घ्या..” ते आतच म्हणाले. विश्वराज उठून त्यांना नमस्कार केला… 

“ जावाईबापू कसे आहात ?” त्याने डोळ्यांनी सांगितले.

“ बाबा तुम्ही..” 

“ मी ही मजेतच म्हणावं लागेल जावाईबापू .. मुलीचा संसार  रुळावर आणण्याचा प्रयत्न करतोय.” त्यानेही मानेने होकार दर्शवला.

“ आबांची तब्येत बरी आहे का?” 

“ आता बरे आहेत .” ते दोघे आबांच्या तब्येती बद्दल होते..
 “ मी बघून येतो त्यांना … झोपलेले असणार .. तोपर्यंत तुम्ही फ्रेश व्हा!” 

“ नाही बाबा आधी आबांना भेटू.” इकडे भक्तीने ही आजी साहेबांशी लाडीगोडी लावत मन वळवलं होतं. तिचं राजबद्दल चौकशी करून झाली होती आणि तो यावेळेला आमराईत आंबा तोडायला गेला होता.. भक्तीला त्याला कधी बघते असं झालं होतं.

 “आजीसाहेब आबांना भेटायचं आहे ?” 

“रावसाहेब आत गेलेत जागे असले तर बोलवतील .” 

रावसाहेब आबासाहेबांच्या खोलीत गेले. 

“आबासाहेब मिठ्ठू आणि जावाईबापू आलेत.” 

“मिठ्ठू जावाईराजे आले. ... लगेच बोलवा त्यांना...” त्यांच्यात थोडा उत्साह संचारला. ते  बेडवर आधाराने  उठून बसले .भक्ती आणि विश्वराज आजीसाहेबासोबत आत आल्या .

“ आबासाहेब ..” 

“ मिठ्ठू ..” मिठू त्यांना बिलगली. विश्वराजने त्यांना वाकून नमस्कार केला.. 

“ आबा साहेब बरे आहात ना?” 

“ आता आमच्या सोबत मुंबईला येताय तुम्ही. पुढची ट्रिटमेंट आपली तिकडे होईल.” 

“ जावाईराजे नाही हो .. इथेच होऊद्या जे व्हायचं ते. .”

“ आबासाहेब असं काहीही बोलू नका.” भक्तीने त्यांना अडवलं.

“ आबासाहेब तुम्ही तुमच्या तब्बेतीची काळजी घेतली नाही म्हणून आजारी पडलात  .” 

“  वय झालेय आमचे..” 

“ एवढही वय झाले नाही .. अजूनही हॅण्डसम दिसतात.. तुम्ही लवकर बरे व्हा आबासाहेब  ” ती बिलगून म्हणाली. आबासाहेबांनी मान हलवली.. 

“ मिठ्ठू जावईराजेंना घेऊन रूममध्ये जाऊन आराम करा दमला असाल ..” दोघेही उठून त्यांच्या रूममध्ये जायला निघाले.

“ आजीसाहेब राज अजून आले नाहीत. मी घेऊन येते त्यांना.” 

“ मिठ्ठू .. येतील ते.. प्रभा त्यांच्या सोबतच आहेत.” 

“ आजीसाहेब बघून येऊ द्या ना मला.” 


“ मिठ्ठू प्रभा त्यांना घेऊन यायला निघाले आहेत. येतीलच थोडयावेळात .. त्यांना माहित नाहीये तुम्ही येणार आहात ते … तुम्हाला बघून सरप्राईज होतील.. माहीती आहे मला तुम्ही खूप अधीर झाल्यात त्यांना बघायला शेवटी आईच काळीज ते. ..   तोपर्यंत आवरून आराम करा मी वरतीच जेवण पाठवते..” 


“ आजीसाहेब आम्हाला काही नको.” ती वर रूमवर निघून गेली..

“ जावाईराजे सांभाळा त्यांना. ” विश्वराज ही तिच्या मागे गेला. रूममध्ये येऊन ती पटकन शॉवर घेण्यासाठी बाथरूम मध्ये शिरली .. विश्वराज आल्यावर त्याला कुठेच दिसली नाही.

बाथरूम मधून पाण्याचा आवाज आल्यावर त्याला समजले.
विश्वराज बाल्कनीत गेला. लगेचच नाष्टा घेऊन बाबू काका रूममध्ये आले. त्यांनी प्लेटमध्ये वाढायला घेतला तर विश्वराज नाही म्हणाला.  भक्ती फ्रेश होऊन बाहेर आली.. विश्वराजही फ्रेश होऊन तयार झाला.. तितक्यात दार उघडून राज आत आला समोर भक्तीला बघून थक्क झाला. आदिराज आला तसा वर रूममध्ये सरप्राईज म्हणत त्याला पाठवलं होत.

“ बच्चा” ती धावतच त्याच्या जवळ गेली आणि त्याला आपल्या कुशीत घेतले.. पटापट गालावर कपाळावर ओठ टेकवले. 

“पिल्ल्या कसा आहेस, खूप मिस केलं रे बच्चा ?” 

“मम्मा, तुझ्या डोळ्यात पाणी का आलं? मी तर  एकदम मस्त आहे हे बघ आणि मी आंबे तोडले…तुझ्यासाठी पण घेऊन आलो.” त्याला समोर बघूनच आनंदने डोळ्यांत पाणी आले.

“ अरे वा ! मस्त मी पण उद्या येईल..”  विश्वराज समोर त्यांच्याकडेच बघत होता.. राजचे लक्ष मागे उभ्या असलेल्या विश्वराज कडे गेले.. मनात भावनांची उलथापालथ होत होती. भक्ती सारखा बोलून रडून मोकळा होऊ शकत नव्हता.. महत्यप्रयासाने त्याने त्या भावना दाबून धरल्या..


“ राज हे तुझे डॅड आहेत.” भक्तीने त्याला एकदाच सांगून टाकले. त्याने दोघांकडे आळीपाळीने पाहिले मग तो विश्वराज जवळ आला.. राजने हाताने खाली वाकण्याची खूण केली. विश्वराज खाली वाकत गुडघ्यांवर बसला. 

“ तुम्ही मला आणि मम्माला मिस नाही केलं?” त्याने भाबडा प्रश्न  करत विचारले. त्याने एक नजर भक्तीवर टाकली.

“ खूप खूप मिस केलं दोघांना ..” त्याचा आवाज दाटून आला होता.

“मग आम्हाला सोडून कसे राहिलात इतके दिवस? मी आणि मम्माने खूप मिस केलं तुम्हाला. आता आपण सर्व सोबत राहू डॅड. मला दोघांसोबत राहायचं आहे.” तो रडत विश्वराजला बिलगला. विश्वराजच्या ही डोळ्यांतून पाणी आले.
“ आय मिस यू सो मच बच्चा.” म्हणत विश्वराजने त्याच्या गालावर कपाळावर ओठ ठेवून पप्पी घेतली. 


“ आय लव्ह यू डॅड ..” आदिराज
“लव्ह यू टू चॅम्प ..” पुन्हा विश्वराजने त्याला आपल्या छातीशी घट्ट कवटाळले.

 त्याची विनवणी ऐकून भक्तीच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागले.. आदिराज त्याच्या डॅडला खूप मिस करत होता हे तिला प्रकर्षाने जाणवले. 

“ मम्मा, डॅड आपल्या सोबत राहतील ना?” आदिराज मिठीतून बाजूला होऊन भक्तीकडे बघत म्हणाला.. ती राजजवळ गेली. त्याच्या गालावर हात फिरवून म्हणाली,

“हो बच्चा आपण आता एकत्र राहणार आहोत.” 
“ लव्ह यू मम्मा .” तो भक्तीच्या मिठीत शिरला आणि दूसरीकडून त्याने विश्वराजला जवळ बोलावून त्याच्या गळ्यात एक हात टाकला तर दूसरा हात भक्तीच्या गळ्यात होता.. एकाच वेळी तो दोघांच्या मिठीत होता. नकळत दोघे ही जवळ आले होते. दारावर टकटक झाली.

“ आम्ही यायचं का आत ?” रावसाहेब त्यांची परवानगी घेत म्हणाले.

“ बाबा विचारताय काय ?  या ना आत ..” विश्वराज 

“ म्हटले कौटुंबिक क्षणांमध्ये व्यत्यय तर नाही आणला ?” 

“ काही काय बोलताय बाबा.” भक्ती न पटून 

“ नानू मी आज खूप खुश आहे .. मला माझे डॅड भेटले आणि ते आता आपल्या सोबत राहणार आहेत.” तो उत्साहाने रावसाहेबांना सांगत होता. रावसाहेब ही आनंदाने त्याचे ऐकून घेत होते.. 


“ बाबा थॅक्य यू .” विश्वराज म्हणाला. .

“ डॅड चला माझ्यासोबत ‘तुम्हाला काही तरी दाखवायच आहे .” आदिराज विश्वराजला बाहेर घेऊन गेला.. 

“ मिठ्ठू  , बघितलं आज आदिराज किती खुश आहेत ते ?” 

“ हो बाबा .. मान्य करते त्या बाबतीत माझा निर्णय चुकला.” 

“ अजून सत्य तुझ्या समोर यायचं बाकी आहे.” रावसाहेब पुटपुटले.. 
 
“ बाबा काही म्हणालात .” भक्ती.

“ खाली जाऊया अजित प्रभा आले.” तिने मान हलवून होकार दिला आणि खाली गेले…  काका काकूंना भेटून भक्ती खूप खूश होती.. मुलगी आणि जावाईराजे आल्याने साग्रसंगीत जेवण तयार होते.. 

“ आजीसाहेब हे इतकं करण्याची खरच करण्याची आवश्यकता नव्हती.” 

“ आबासाहेब ठिक आहेत जावाई राजे. एकलुते एक जावाई आहात या घरचे .. या घरची रित आहे ती .  प्रभा त्यांच्या पानात बासुंदी वाढ.” त्याचा संकोच लक्षात घेता आजीसाहेब ओळखून म्हणाल्या. प्रभा जातीने लक्ष देत होती तर भक्ती राजला तिच्या हाताने भरवत होती.. राज त्याच्या डॅड जवळ बसलेला होता. सगळ्यांची जेवण झाली. आजीसाहेबां सोबत थोड्या फार गप्पा मारून भक्ती रूममध्ये गेली. रूममध्ये आल्यावर विश्वराज आणि आदिराज मस्ती करत होते..  विश्वराजन तिच्याकडे एक नजर बघितले. दोघांची  आर्म रेस्लिंग फाईट चालू होती आणि त्यात आदिराज जिंकलेला . आनंदाने उडया मारत नाचत होता.. 
भक्ती फ्रेश होऊन नाईट सुट घालून ती नाइट रुटिन करून बेडवर गेली.

“ पिल्या खूप वेळ झाला आता झोपूया.” तो बेडवर झोपायला गेला. विश्वराजला जवळ बोलावून शेजारी झोपायला लावले. दोघांच्या मध्ये आदिराज होता.. ती  त्याला थोपटतच तिने ही डोळे बंद करून घेतले. बंद पापण्याआड ही तिला विश्वराजची तिच्यावर फिरणारी नजर जाणवत होती.



क्रमश ..