Login

भेटली तू पुन्हा ! भाग - बेचाळीस

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !
भाग - 42



भक्तीला सकाळी जाग आली तिला तिच्या अंगावर भार असल्याने डोळे उघडून पाहिले तर विश्वराजचा हात तिच्या अंगावर होता. त्यांच्या मध्ये झोपलेला आदिराज सकाळी उठून खाली निघून गेला होता. त्यामुळे झोपेत विश्वराज भक्तीला राज समजून तिला जवळ ओढून तिच्या अंगावर हात ठेवला होता.. अंगावर भार जाणवल्याने तिने डोळे उघडून पहिले तर विश्वराज खूपच जवळ आणि त्याचा एक हात तिच्या पोटावर ठेवलेला दिसला.. त्याचा हात पोटावरून काढून खाली ठेवला. राज बेडवर नव्हता तो खाली गेल्याच समजल्यावर ती ही लगेच उठून बाथरुममध्ये फ्रेश व्हायला गेली.. फ्रेश होऊन ती बाहेर आली.. ड्रेसिंग टेबल वर बसत तिने छान आवरून घेतलं.. विश्वराज अजूनही झोपलेला होता.. राज आणि रावसाहेब बाहेर गार्डनमध्ये बसून फुलांना खत घालत होते.. ते करत असतांना राजला पण माहिती देत होते..

“ राज ..”

“ गुडमॉर्निंग मम्मा..”

“ गुडमॉर्निंग बच्चा. गुड मॉर्निंग बाबा .. बच्चा तू उठला तेव्हा मला उठावायचं होतं ना… ”

“ गुड मॉर्निंग मिठ्ठू.”

“ मम्मा तू झोपली होतीस मग मी उठून नानू कडे आलो ..”

“ बरं मी तुला दूध घेऊन येते आणि बाबांचा चहा.” बोलून ती आत किचनमध्ये गेली.

“ताई साहेब काय हवंय तुम्हाला ?”

“मी बनवते काका .” भक्तीने सर्वांसाठी चहा नाश्ता बनवायला घेतला. एकीकडे नाश्ताची तयारी केली. आबांसाहेबांसाठी डाएट फुड बनवलं आणि ती घेऊन आबासाहेबाच्या रूममध्ये गेली. आबासाहेब फ्रेश झालेले होते..

“ आबा साहेब हे बघा मी नाश्ता घेऊन आले.”

“ तू कशाला करतेस बाबू आहे ?”

“आजीसाहेब हे सर्व करायला आवडतं आम्हाला. चला बसा बरं .. तिने टेबलवर नाश्ता ठेवला. ”


“ आवडलं आबासाहेब ?” तिने एक घास भरवत आबांना प्रश्न केला. .

“ हो ..”

“ मी बाहेर सगळ्यांना नाश्ता देऊन येते.” भक्ती जायला वळली.

“ मिठ्ठू बेटा देवीच्या मंदिरात जाऊन देवीची ओटी भरून या..”
“हो आजीसाहेब.” तिने मान डोलवली.. बाहेर सर्व डायनिंग टेबलवर बसलेले होते.

“मिठ्ठू जावाईबापूंना बोलवून आणा.” तिने राजला दूध आणि नाश्ता वाढला.. ती वर रूममध्ये गेली.. विश्वराज बाथरूम मध्ये गेलेला होता.. त्याच वेळी विश्वराज कमरेला टॉवेल गुंडाळून एका टॉवेलने केस पुसत बाहेर आला.. समोरच ती डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत होती. दोघांची नजरानजर झाली आणि ती मागे त्याच्याकडे पाठ करत वळली.

“ ते ते मी मला .. बाबांनी. सॉरी ” ती खाली मान घालून बोलण्याचा प्रयत्न होती. इतक्या वर्षानंतर त्याला शर्टलेस बघून तिची कमालीची धडधड वाढली होती.. ते पिळदार शरीर आणि त्यावर असलेले पाण्याचे थेंब गॅलरीतून येणारी सूर्याकिरणांनी चमकत होते..

“काय झालं ?” समोरून आवाज आला तशी तिने दचकून समोर पाहिलं तरं तो अजूनही शर्टलेस होता..

“ आऽऽ आ ऽ आधी तुम्ही शर्ट घाला..” भक्ती मागे वळून चेहरा फिरवला ..

“ का?”

“ का म्हणजे ?” तो पुन्हा तसाच तिच्यासमोर आला होता. .

“ राज रूममध्ये आला तर ?”

“He'll be so impressed by me seeing him like this.” हिल बी सो इम्प्रेस्ड बाय मी सीइंग हिम लाईक धिस .

“पण तू माझ्याकडे बघून का बोलत नाहीयेस. मी असा आहे म्हणून तुला काहीतरी होतयं का? की तूला हि मस्क्युलर बॉडी बघून …” तो तिच्या नजरेला नजर देत एक एक पाऊल टाकत तिच्याकडेच येत होता आणि ती मागे जात होती.

“ हे बघा ..” तिने त्याच्याकडे बघत आवंढा गिळला..

“ मी तेच करतोय .” ती त्याच्या डोळ्यांकडे बघण्याचं टाळत होती.


“ मला असं काहीच होत नाहीये. खाली डायनिंग टेबलवर सर्व तुमची वाट बघत आहे हे सांगायला आले होते.” तिच्या पाठीला भिंतीचा स्पर्श झाला आणि तिथेच ती स्तब्ध झाली.. विश्वराज ही तिच्याजवळ आला. त्याने त्याचे दोन्ही हात भिंतीवर टेकवले.. दोघांमध्ये अंतर कमी होत होते.. तो तिच्या डोळ्यांकडे मध्येच ओठांकडे बघत जवळ येत होता.. त्याचे गरम श्वास तिला चेहऱ्यावर जाणवत होते. आधीच त्याच्या शरीराच्या सुंगधाने रोम रोम शहारात होती.. काही सुचत नव्हते. विश्वराजने भिंतीला दोन्ही हात लावून तिला कव्हर केले होते. तिथून हलण्याचीही जागा नव्हती. तो तिच्या ओठांवर ओठ टेकवणार इतक्यात “राज आलास तू .” भक्ती पटकन सुचेल ते दाराकडे बघत म्हणाली. आणि विश्वराज पटकन बाजूल झाला. तो मागे वळून बघण्याआधी भक्ती तिथून बाहेर पडली. त्याला राज तर दिसला नाही पण भक्ती ही तिथे नव्हती..

“ आज ही तशीच आहे. मी जवळ आल्यावर बावरून जाणारी. आज बहाणा करून निघून गेलीस पण एक दिवस तू स्वतः होऊन माझ्या मिठीत येशील .” स्वतःशी म्हणत पटकन आवरून तो बाहेर गेला.. विश्वराज बाहेर आल्यावर सर्व नाश्ता करायला बसले. आजीसाहेबांनी देवीची ओटी भरायला सांगितले असल्याने भक्ती रूममध्ये तयार व्हायला आली.. कपाटातून एक साडी काढली..

साडी नेसून चेहऱ्यावर थोडा मेकअप केला. आणि तयार होऊन ती खाली आली.. डायनिंग टेबलवर बसलेल्या विश्वराजचे लक्ष पायऱ्यावरून येणाऱ्या भक्तीकडे गेले. एका हातावर पदर घेऊन ती हळूहळू पायऱ्या उतरत होती.. सुरेख सजली होती.

“ मिठ्ठू सुरेख दिसताय हो.” प्रभा काकूने डोळ्यांतलं काजळ टिपत तिच्या कानामागे दिट लावली. तर आजी साहेबांनी तिच्या डोक्यावरून बोट फिरवून त्यांच्या कानांच्या वरती नेत दुमोडली. तिच्या गालांवर ओठ ठेवले.

“ मम्मा वॉव लुकिंग गॉर्जस .” राज तिच्या बिलगत म्हणला.

“थँक्यू बच्चा .” तिने स्मीत केले.

“ आम्ही मंदिरात जाऊन येतो..” भक्तीने सर्वांकडे बघून म्हणाली. विश्वराज आदिराज पुढे गेले.. भक्ती ही त्यांच्या पाठोपाठ निघाली.. ड्रायव्हर कडून चावी घेत विश्वराज ड्रायव्हिंग सीटवर बसला. भक्ती त्याच्या बाजूच्या सीटवर बसली.. राज तिच्या मांडीवर बसला.. मागे सिक्युरीटीची गाडी होती..


मंदिराजवळ येताच गाडी खाली पार्क केली. तिथून देवीची ओटी आणि पुजेचं साहित्य घेऊन ते मंदिरात गेले. बऱ्यापैकी मंदिरात गर्दी होती. पुजारांनी ओटी भरून देवीची पुजा केली.. तिघांनी मिळून देवीची आरती केली.. भक्ती खाली गुडघ्यांवर बसून कपाळ जमिनीला स्पर्श करून नमस्कार केला. आणि तेव्हाच आरती घेणाऱ्या विश्वराजचा धक्का लागून कुंकूंची डबी तिच्या डोक्यावर पडल्यामुळे तिच्या भांगेत कुकं भरले गेले..

“ सॉरी भक्ती लागलं काय तुला ?” तो खाली वाकत तिच्या समोर आला.. केसांमध्ये कपाळावर आणि चेहऱ्यावर कुंकू पडून लाल झाले होते.
“ हा तर शुभ संकेत आहे. देवी आईने आशीर्वाद दिला.” पुजारी काका हसून म्हणाले. पुजारीना नमस्कार करून तिघेही घरी जाण्यासाठी बाहेर पडले.. कुंकू डोक्यावर पडल्याने एका हातात ताट तर दुसऱ्या हाताने ती पुसू लागली.

“ मी करून देतो.” विश्वराज तिची धडपड बघून म्हणाला. रुमाल घेऊन अतिरिक्त असलेलं कुंकू रुमालाने पुसत होता आणि ती एकटक त्याच्या कडे बघत होती..

“ माझ्याकडे नंतर बघ आधी डोळे बंद कर नाहितर डोळ्यात जाईल.” तो स्मित करून म्हणाला. आपली चोरी पकडली म्हणून भक्तीने पटकन डोळे बंद केले. तिने डोळे बंद केले म्हणून विश्वराज तिला बिनधास्त बघत होता.


“ डॅड झाले ?” राजच्या आवाजाने विश्वराज भानावर आला. राज तिथे असल्याचे विश्वराजच्या लक्षात आले नव्हते. विश्वराज लगेच भानावर आला आणि भक्तीनेही डोळे उघडले. पहिल्यांदा मम्मा डॅड सोबत बाहेर आलेल्या राजला छान वाटत होते. दोघांसोबत एन्जॉय करत होता..

“डॅड आपण स्विमिंग कधी पासून करायचं?” गाडी चालवणाऱ्या विश्वराजला आदिराजने उत्साही होऊन विचारले.

“ तू बोल केव्हापासून सुरू करायचं ?”

“ आज..”

“Ok तू म्हणशील ते.” विश्वराज हसत म्हणाला.. आदिराज ने लगेच त्याच्या गालावर ओठ ठेवले.


क्रमश ..