Login

भेटली तू पुन्हा ! भाग - त्रेचाळीस

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !
भाग - 43




आदिराजने विश्वराजला स्विमिंग करण्याचे विचारले असता विश्वराजही लगेच हो म्हणत तयार झाला होता.... घरी आल्यावर प्रभा काकूने आणि आजी साहेबांनी तिच्या कपाळावर कुंकू बघून विचारले तर भक्ती बोलायच्या आधीच आदिराज सांगून मोकळा झाला… भक्ती रूममध्ये आल्यावर सर्वात आधी आरशासमोर उभी राहून लाल झालेलं कपाळ स्वच्छ करत होती आणि पाठीमागून आरश्यात असलेल्या तिच्या रूपाकडे विश्वराज बघत होता.. कहर म्हणजे साडी नेसल्याने तिच्या नाजुक कमरेच्या वळणदार घाटावर आपसुकच त्याची नजर जात होती..  ती तिच्या कामात इतकी मग्न होती की तिला हे माहितचं नव्हतं..  भांगेतील कुंकू ठेवून तिने सर्व पुसून टाकले.. अचानक आपल्याकडे बघणाऱ्या विश्वराजकडे तिचे लक्ष गेले. मागे वळून त्यांची नजरा नजर झाली. काही क्षण त्याच्या नजरेत तिची नजर गुंतली.  भानावर येताच तिने नजर फिरवून ती बाथरूम मध्ये जाण्यासाठी वळली. 

“ भक्ती ss..” त्याने तिचा हात पकडला. 

“ भक्ती मला बोलायचं आहे तुझ्याशी. प्लिज माझं एकदा ऐकून घे.. फक्त एकदाच ऐकून घे.” 

“काय ऐकून घेऊन मी विश्वराज  .. समोर मला जे दिसलं ते स्पष्ट होत मग आता त्यात काय ऐकून घेऊ.” 

“पण नजरेला दिसलेलं तेच सत्य असेल हे कशावरून? ते एकदा पडताळून घेऊन मगच त्यावर विश्वास ठेवावा. इतकाच विश्वास ठेवला माझ्यावर .. फक्त एकदा मला भेटून माझ्याशी बोलली असती.. पण नाही समोर जे दिसलं त्यावर विश्वास ठेऊन  न भेटता एक चिठ्ठी लिहून सोडून गेली. माझं प्रेम होत म्हणे तुमच्यावर.. प्रेम माय फूट ..” शेवटचे वाक्य तो तिरसटपणे म्हणाला पण हे ऐकून तिचे डोळे मात्र पाण्याने भरले.. ते बघून तो बोलायचा थांबला .

“ विश्वराज…  तुम्ही असं बोलून माझ्या प्रेमावर प्रश्न निर्माण केलेत.” डोळ्यांतील अश्रू तिच्या गालावर पडला. तिला जवळ ओढून विश्वराजने गालवरचा अश्रू पुसले..

“भक्ती .. मला तेच म्हणायचं आहे की तू त्याच प्रेमावर विश्वास का नाही दाखवलास..  बनवलेल्या प्लॅन मध्ये सहज अडकली गेली.. दोन्ही हातांच्या ओंजळीत तिचा चेहरा पकडत म्हणाला.

“म्हणजे ?”

“म्हणजे हेच की .. 


“ मम्मा डॅड ..” राज आत आला तसा भक्तीने तिचा हात सोडवून घेतला आणि डोळे कोरडे करून ती राजकडे गेली.. राज आल्याने त्याच बोलणं अर्धवट राहिल. 

“ डॅड आपण स्विमिंगला कधी जायचं?” 


“ संध्याकाळी कर रे बच्चा. जेवण व्हायचं , मी आलेच फ्रेश होऊन मग खाली सर्व सोबतच जाऊया.” त्यांच्याकडे एक नजर बघून ती बाथरूम मध्ये गेली. 

“  तुझी मम्मा बरोबर बोलतेय , चॅम्प इविनिंगला करूया ओके.” 

“ हो चालेल.” दोघांनी एकमेकांच्या हातावर हात देऊन टाळी मारत हाय फाय केला. 


फ्रेश होऊन कपडे बदलवून भक्ती बाहेर आली. विश्वराजने आदिराजला फ्रेश करून दिले आणि तो फ्रेश व्हायला गेला. तिघेही आवरून खाली आले. यांचीच वाट बघत डायनिंग टेबलवर बसून होते. जेवणं होऊन जो तो आपल्या रूममध्ये आराम करायला गेला.. विश्वराज ही त्याचा लॅपटॉप घेऊन काम करत बसला होता.. रावसाहेब त्यांच्या रूमममध्ये त्यांची कामे करत होते. मध्येच त्यांना जाधव (सेक्रटरी ) यांच्याशी फोनवर बोलत होते.. 

    विश्वराज रूममध्येच काम करत होता तर राज एक पेंटिंग करण्यात व्यस्त होता..  मोबाइल घेऊन बाहेर बाल्कनीतल्या झोपाळ्या बसून तिने कॉल लावला..


“ हॅलो मॅम.. कसे आहात ?” 

“ ये काय गं तुला फोन करायला वेळ मिळालाच नाही का? बराय तुझा मित्र .”

“ कोण मित्र?” लिली न समजून

“ अग त्याचा ॲक्सिडेंट झाला होता तो मित्र.” 

“ अं .. हो हो बराय तो…  सॉरी मॅम पण काय आहे ना रोज हॉस्पिटलला जाण्याची धावपळ होतेय ना त्यामुळे लक्षातच आले नाही..” लिली भोळा चेहरा करून साफ खोटं बोलत होती.

“ it's ok .. ” 

“ कधी येणार आहेस ?” 

“उदया येते . आज संध्याकाळपर्यंत याला डिस्चार्च मिळेल. मग उद्या निघते.” 

 “ आरामात ये ओके बाय .” 
“ बाय.” 

फोन ठेवून ती तिथेच बुक शेल्फ मध्ये असणारे हाताला येईल असे एक पुस्तक हातात घेतले.  पुस्तक हातात असून सुद्धा डोक्यात विश्वराजचं बोलणं फिरत होते.. तिचे लक्ष हातातल्या पुस्तकाकडे गेले..  अतिशय सुंदर अस पुस्तकाचं मुखपृष्ठ होतं. एकाच चेहऱ्यामध्ये शिवशक्ती तर एक मुलगी आणि त्यापाठी असलेली शक्ती काहीचं गुढ पण दैवी शक्तीवर आधारित असलेलं  लेखिका सारिका कंदलगावकर यांची देवी रक्षती रक्षितः पुस्तक तिला आकर्षित करून गेलं. आधीच गुढ रहस्य पौराणिक कथा वाचायची आवड होतीच. तिने पुस्तक वाचायला घेतले ते पूर्ण झाल्याशिवाय हातातून सोडले नाही.. 

‘ शांभवीचा रहस्याने भरलेल प्रवासासोबत शक्ती पिठांच दर्शन घडवून आणले लेखिकेने. प्रत्येक ठिकाणी एक कोड आणि त्याचे उत्तर कसे शोधतात छान वर्णिले.’ ती डोळे मिटून स्वतःशी विचार करत होती.


 राजचे पेंटिंग होऊन तो विश्वराजला दाखवले. विश्वराजने त्याचे मनापासून कौतुक केले.. त्याची स्तुती करत त्याच्या गालावर कपाळावर ओठ ठेवले.. भक्तीला दाखवायला म्हणून तो बाल्कनीत गेला आणि आल्या पावली परत आला. 

“व्हाट हॅपेन्ड चॅम्प?” तो लवकर परतल्याचे बघून विश्वराजने त्याला विचारले.

“ मम्मा तर झोपाळ्यावर झोपली. .” राज ने सांगितल्यामुळे विश्वराज ही उठून बाहेर बाल्कनीत आला. ती झोपाळ्यावर बसल्या ठिकाणी झोपली होती.. 

‘डॅड, मॉमला आत घ्या.”  

‘ तिची झोपमोड होईल ?” 

“ तिला माझ्यासारखं उचलून घ्या म्हणजे मम्माची झोप डिस्टर्ब होणार नाही.” तो विश्वराजला हळू आवजात म्हणाला. त्याने हळूच तिला मानेखाली हात घातला आणि एका हाताने कमेरच्या खाली हात नेऊन हळूच उचलून तिला अलगद बेडवर ठेवले. अंगावर रजई ओढले. राजने तिच्या कपाळवर किस केले आणि त्याच्या डॅडला ही त्याच्या मम्माच्या कपाळावर ओठ टेकवायला म्हटले.  विश्वराजला तर आयती संधीच मिळाली. भक्तीच्या चेहऱ्यावर झुकत त्याने तिच्या कपाळावर त्याचे ओठ स्थिरावले. तिच्या कपाळावर ओठ ठेवून दोघेही रूमच्या बाहेर निघून गेले. जसे ते दोघ बाहेर गेले आत झोपलेल्या भक्तीने डोळे उघडले. विश्वराजने ओठ ठेकलेल्या ठिकाणी तिने हात फिरवला. त्याच्या झालेल्या स्पर्शांनी शहारली ती.. पुस्तक वाचत असतांना तिला झोप लागली. विश्वराजने तिला उचलून घेतले तेव्हा तिला जाग आली होती . त्याचा स्पर्श समजतात डोळे बंद करून त्याच स्थितीत राहिली होती.. 

संध्याकाळी मागच्या साइडला राज आणि विश्वराज स्विमिंग करायला पूल मध्ये आले.. विश्वराज त्याला शिकवत होता.. पण त्याला आधीच स्विमिंग करता येत होते.

“ चॅम्प तू तर चांगला स्विमर आहेस.दॅट्स गुड माय बॉय” विश्वराज प्रभावित होऊन म्हणाला.

“हो ..”


“बरं मला सांग तुझी मम्मा अजूनही घाबरते स्विमिंग करायला?” 

“हो थोडी थोडी .” राज तोंडावर हात ठेवून हसू दाबत म्हणाला.

“ पालीला ही अशीच घाबरते.. दूर जरी असली तरी उड्या मारणार .” विश्वराज हसत आदिराजला सांगत होता.. 

“ काहीही सांगू नका त्याला ..” भक्ती स्विमिंग पुलाजवळ येऊन तिथल्या चेअरवर बसत म्हणाली..

“ काहीही नाही खरं तेच सांगतोय..

भिंतीवर पाल दिसली की एकतर मला गच्च मिठी मारते नाहितर बेडवर लहान मुलांसारखे उड्या मारतेस . चॅम्प तरी पाल हिच्या पासून दोन हात लांब असते तरीही तुझ्या मम्माला दिसले की .. ” 

“ नाही हा पिल्लू हे साफ खोटं आहे. तुझी मम्मा कशालाच घाबरत नाही..”  भक्ती आदिराजला पटवून देण्याचा प्रयत्न करीत होती.. 

“ खोटं आहे हे ..” विश्वरात मुद्दाम भक्तीला डिवचत होता. 

“ हो ..” हाताची घडी घालून मोठ्या तोऱ्यात बोलत होती..

“ बरं मग ये पाण्यात .” 

“ येते. मी काय घाबरते होय.” भक्तीने नाक उडवलं आणि स्विमिंग पूलाजवळ आली. पाणी बघून तिने आवंढा गिळला. डोळे बंद करून तिने श्वास आत भरून घेतला .
बाप्पाच नाव घेत ती हळुहळू पायऱ्यांनी त्या पुलमध्ये उतरू लागली. आतून थोडी घाबरलेली पण भिती चेहऱ्यावर न दिसू देता ती पुढे चालत होती. पाण्यात उतरून ती कशीबशी स्थिर राहत उभी राहिली..


क्रमश ..

©® धनदिपा सम्राट