भाग - 44
विश्वराजला चॅलेंज देत भक्ती पाण्यात उतरली .
“आले मी. घाबरत नाही मी म्हणाले होते ..”
“ व्हेरी गुड माय ब्रेव्ह मम्मा.” आदिराज चिअरप करत होता.
“ मग पाण्याच्या खाली उतरून दाखवं …” तो तिला पाण्याच्या खाली येण्याच सांगत होता.
“ हे बघा पलटु मास्टर तुम्ही काय म्हणाला होतात की पाण्यात ये हे आले मी. पाण्याच्या खाली उतरून दाखवं असं कुठे म्हणाले होते..” एक हात कमरेवर डोळे बारीक करून ती फुरंगुटून म्हणाली..
“ अगं पाण्याला घाबरते माहिती आहे मला.. सांगायला संकोच वाटत असेल तुला आय नो सो रिलॅक्स .. मी काही म्हणणार नाही असते एखाद्याला पाण्याची, पाल, झुरळ यांची भिती असते. is not a big deal.”
‘खड्यात घाला तुमची डिल .. हे करतांना सर्व साहस गोळा करून आले मी इथे ‘ ती मनात बडबडत होती.
“ तुम्ही चेष्टा करताय का माझी? हे बघा ..” ती पटापट पुढे पाऊल टाकण्याच्या प्रयत्नात तिचा तोल गेला आणि पूर्ण पाण्यात जाण्याच्या आधीच ती त्याच्या मिठीत ओढली गेली. घाबरून त्याच्या मानेला गच्च पकडून तिने डोळे बंद केले. त्याने दोन्ही हात तिच्याभोवती वेढून तिला मिठित घेऊन तिच्या पाठीवर हात फिरवायला सुरवात केली.
“ रिलॅक्स भक्ती ..” विश्वराज हात फिरवत घाबरलेली तिला शांत करत होता.
“ मम्मा आर यू ओके. . “ आदिराजच्या आवाजाने ती भानावर येऊन विश्वराज पासून बाजुला झाली..
“हो.. आलेच मी .” ती रूममध्ये निघून गेली.
भक्ती रूममध्ये कपडे बदलायला निघून गेली.. त्यानंतर बराच वेळ राज आणि विश्वराज स्विमिंग पूल मध्ये सराव करत होते.. आबासाहेबांची तब्येतीत बरीच सुधारणा झाली होती..
रात्रीचे जेवण करून विश्वराज मेल चेक करत होता. त्याचा फोन वाजला. महत्त्वाचा असल्याने त्याने फोन उचलू गॅलरीत बोलण्यासाठी गेला. भक्ती राजला गोष्ट सांगून झोपवण्याचा प्रयत्न करीत होती.. गोष्ट संपेपर्यंत राज झोपला होता.. तिला विश्वराज रूममध्ये परतण्याची चाहूल लागताच तिने अंगावर ब्लॅकेट ओढून डोळे बंद करून झोपेच नाटक करायला लागली.
“ आय नो की तू झोपली नाहीस तर ते झोपण्याच नाटक बंद कर मला तुझ्याशी महत्वाचं बोलयचं आहे. .” एकदम तिच्या जवळून आवाज आला तशी दचकून ती वळली आणि पाठी असलेल्या विश्वराज तोल जाऊन तिच्या अंगावर कोसळला. दोघांसाठी ही हे अगदी अनपेक्षित होतं. दोघही एकमेकांजवळ आले होते.. विश्वराजची नजर तिच्या चेहऱ्यावरून तिच्या डोळ्यांकडे गेली. ते डोळे एक सारखे त्याच्या डोळ्यांकडे बघत होते.. त्याच डोळ्यांत हरवून तो त्या दोघांमधलं अंतर हळुहळू कमी करत होता.. त्याच्या चेहरा अगदीच तिच्या चेहऱ्याजवळ आला. गालावर आलेले काही केसांच्या बटा त्याने एक हलकी फुंकर घालून बाजूला केले. तसे तिचे डोळे मिटल्या गेले आणि ओठ थरथरले. थरथरत्या ओठांवर त्याची नजर खिळली आणि हळुहळू तो तिच्या ओठांकडे वळला क्षणाचा ही विलंब न करता ओठांवर ओठ टेकवत विलग झालेल ओठ अखेर ओठांत घेतले. तसे भक्तीचे बंद असलेले डोळे उघडून मोठे झाले.. ओठांच्या त्या कोमल पाकळ्यांना कुरवाळत होता.. काय नव्हतं त्या किस मध्ये प्रेम ओढ कित्येक दिवसांचा विरह आज तो किस करत खूप दिवसांची तहान भागवत होता. खूप तरसला होता या क्षणांसाठी हळुहळू असणारा किस आता डिप होत गेला . भावना अनावर होत त्या क्षणात हरवत त्याने त्याचा संपूर्ण भार तिच्यावर टाकला. छातीला होणाऱ्या तिच्या स्पर्शाने तो उत्तेजित झाला आणि आणखीच किस डिप होत गेला. त्याच्या बदलेल्या भावना तिच्या लक्षात आल्याने व श्वास कमी पडत असल्याने ती त्याला स्वतःपासून दूर करू बघत होती पण तो जरासुद्धा हलत नव्हता. तिचा जोर कमी पडत होता आणि विश्वराज सोडायचा नाव घेत नव्हता.. रागावून ती दूर ढकल्याच्या प्रयत्नांत त्यांच्या पाठीवर खांद्यावर हाताने बुक्के मारत होती.. तरी त्याच्यावर काहीच फरक पडत नव्हता.. शेवटी तिने तिच्या दातांचा वापर करत त्यांच्या ओठांचा चावा घेतला. चुंबकासारखा चिकटलेला तो बाजुला होऊन पटकन उभा राहिला. पाठोपाठ तीही त्याच्यासमोर उभी राहिली.. त्याच्या छातीवर दोनचार बुक्के देऊन ती बाहेर जाण्यासाठी वळली. हात पकडत तिला जवळ खेचले. तिच्या डोळ्यांत त्याला पाणी दिसलं “सॉरी” म्हणत तो बोलायच्या आधीच ती रूमबाहेर पडली. मनातच त्याने डोकं आपटून घेतलं.
“जास्त घाई केली मी पण एवढ्या दिवसांनंतर किस करायला मिळाला. नाही राहिलो कंट्रोल मध्ये. म्हणूनच तर त चिडून निघून गेली. काय गरज होती अशी अधाशासारख करण्याची.. किती दिवसानंतर आली ती तुझ्याजवळ हळुहळू पुढे जायचं होत ना पण तुला सबुरी नाही.. पाच वर्ष कमी नाहीयेत विरहाचे घेतला किस त्यात नाही रहू शकलो कंट्रोलमध्ये. माणूस आहे यार मशीन नाही भावना नियंत्रित करण्याची. अजून तरी दुधाची तहान ताकावरच आहे.. अजून ताकच प्यायच नसेल तर पटकन तिच्या मागे जा आणि मनव तिला, दूर कर तिचा राग व गैरसमज आता तुला बोलण्यात कुणीही व्यत्यय आणणार नाही.” स्वतः शी बडबडत मनाची समजूत घालून तोही तिच्या मागे गेला.
गाडीची चावी घेऊन ती काही अंतरावर असणाऱ्या फॉर्म हाऊसवर गेली.
गाडीची चावी घेऊन ती काही अंतरावर असणाऱ्या फॉर्म हाऊसवर गेली.
“ ताईसाहेब इथे.” तिथले काम बघणारे काका धावत बाहेर आले. गेट उघडलं गेलं गाडी आत आली..
“ ताईसाहेब तुम्ही यावेळेला .”
“ हो काका सहजच बघायला आले. काका एक कडक चहा होऊन जाऊ द्या.” ती त्या काकांना म्हणाली.
“ लगेच आणतो ताईसाहेब .” ते काका आत धावत गेले. रात्रीच्या गारव्यात ती बाहेर अंगणातल्या झोपळ्यावर बसून झोके घेत जे झालं त्याचा विचार करत होती.. घरातून निघतांना असलेल्या नाईट ड्रेसवर ती आली होती. इथे मात्र थंडी जाणवत होती.. थंडीमुळे तिने हातावर हात घासले.. तेवढ्यात तिच्या अंगावर गरम शाल पांघरली गेली.. तिला स्पर्शावरून कळलं कोण आहे . एक वेळ अंगावर पांघरलेल्या शाल कडे बघून तिने व्यवस्थित करून घेतली..
“ ताईसाहेब चहा घ्या. पाव्हणं तुम्ही ही घ्या.”
“ खूप खरचं गरज होती काका थॅक्य यु.”
“थॅक्य यू काका .” विश्वराज काकांना म्हणाला.
“ताईसाहेब पाव्हणं जास्त वेळ थांबू नका बाहेर गारवा आहे.थंडी लागेल..” तिने मान डोलावून होकार दिला. विश्वराज ही तिच्या जवळ जाऊन बसला..
“सॉरी. विश्वराज म्हणाला तरीही तिचा काहीही प्रतिक्रिया नाही.. ती गप्प पणे गरम चहाचे घोट रिचवत होती.
“भक्ती माहिती मला तू माझ्यावर रागावली आहे पण हे सिच्युएशन अशी होती आणि त्यात तू सकाळी साडी नेसून अतिशय सुंदर दिसत होती . तुझ्या भाषेत सांगायचं झालं तर एक नंबर दिसत होती आणि त्यात अशी इतक्या जवळ होतीस इतका मोठ्ठा चान्स मला सोडायचा नव्हता .” तो प्रामाणिक पणे म्हणाला. पण त्याचं एक्सप्लेनेशन ऐकून किंचित डोळे बारिक करून त्याच्याकडे मारक्या म्हशीसारखी बघत होती.
“विश्वराज तुम्ही ना एक नंबरचे संधीसाधू माणूस आहात.”
“आहेच मी पण याविषयाचा मला अजिबात अंहकार नाहीये.” तिने नाक मुरडले.
“अरे खरचं तू बाईट केलं म्हणून नाहितर माझं काही खरं नव्हतं. मी ..”
“ अजिबात लाज वाटत नाही ना तुम्हाला असं बोलायला..” त्याला बोलायच्या आधी तीच म्हणाली.
“ नाही.” तो मिश्किलपणे म्हणाला.
“ रूममध्ये आदिराज आहे याच तरी भान असायला पाहिजे .”
“ तो नसता रूममध्ये तर पुढे बरचं काही..”
“ शू sss काहीही बोलू नका. निर्लज्ज” तिने त्यांच्या बोलणाऱ्या ओठांवर वर हात ठेवला. पुन्हा दोघे काही सेंकदासाठी एकमेकांच्या नजरेत हरवले. काही क्षणानंतर भानावर येताच तिने त्याच्या ओठांवरचा हात काढून ती समोर बघू लागली.
“भक्ती .. तू गेल्यानंतर आई पण मला सोडून गेली. खूप एकटा पडला होतो मी.. खाली घर खायला उठत होतं. मग मी ऑफिस मध्येच राहयला लागलो पण रामुकाका फोन करून बोलवून घेत. खूप मिस केलं तुला मी..” थोडयावेळाने विश्वराजने बोलायला सुरवात केली. .
“ डॉक्टरांनी प्रवास करायला नाही म्हटले होते म्हणून आईचे माहिती पडल्यावर नाही येऊ शकले मी.” ती म्हणाली आणि उठून आत गेली.. अंजलीच्या आठवणीने तिचा कंठ दाटून आला होता.. सासू नव्हती ती तर तिची आई झाली होती.. दोघांनाही एकमेकांशिवाय अजिबात करमत नव्हतं. सासू सुन कमी पण मायलेकीच दिसत होत्या. जेव्हा तिने जाण्याचा निर्णय सांगितला तेव्हा ही तिला सपोर्ट करत तिच्या बाजुने राहिल्या होत्या. या आईचे प्रेम ही फार काळ तिला आयुष्यात लाभले नव्हते.
मकरसंक्रातीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा
क्रमश ..
©® धनदिपा सम्राट
