Login

भेटली तू पुन्हा ! भाग - पंचेचाळीस

भक्ती विश्वराज

भाग 45


अंजलीच्या आठवणीने तिचा कंठ दाटून आला तशी
ती रूममध्ये जाऊन दार बंद करून ती गुडघ्यात तोंड खुपसून हमसून रडू लागली. दार उघडून तो आत आला तिच्याजवळ जात त्याने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्याच्या स्पर्शाने तिने तोंड वर करून त्याच्याकडे पाहिले आणि ती पटकन त्याच्याकडे झेपावली. त्याने ही तिच्या भोवताली हातांचा वेढा घालून तिला मिठीत घेतले.

“विश्वराज.. मी .. मी शेवटच्या क्षणी त्यांच्या जवळ नव्हते याची खंत आज ही होते. मला आई माफ करतील का?”

“भक्ती माफ करण्याचा प्रश्नच कुठे येतोय.. तिचा माझ्यापेक्षा तुझ्यावर जीव होता. सतत म्हणायची मला .. तिला त्रास दिलास तर घरातून हाकलून लावेल. जसं काय मी तिच्या मुलीला मारतोय. पण तिला काय माहित तिची मुलगीच मला मारायची.” विश्वराज तिचे डोळे पुसत विषय फिरवला..

“ ते तर चुकून मारलं होतं मी तुम्हाला … ते ही झोपेत.”

“ चुकून झोपेत असं मारते आणि आज काय केलसं ? आज तर जाणून ओठ चावला. सुज पण आली त्यावर .”

“ फेविकॉल सारखे चिपकले होते मग काय करणार..”

“ मग हे असं बघ जरा काय सांगणार मी सगळ्यांना रात्री मांजरीने चावलं म्हणून .” तो तिच्या पुढ्यात जाऊन त्याचे ओठ दाखवत होता..

“ खूप लागलयं का ? सॉरी .” ती जवळ येऊन ओठांवर फुंकर मारत होती आणि तो तिच्या चेहऱ्याचं निरिक्षण करत होता.. रडून लाल झालेलें डोळे, मोकळे झालेले केस जे मध्ये मध्ये चेहऱ्यावर येत होते..

“बस्स! ठीक आहे मी .” पुन्हा तेच घडू नये म्हणून कसाबसा स्वतःवर कंट्रोल करत मागे झाला..

“भक्ती आजही मला तुझी पहिली भेट आठवते..” तो जुन्या आठवणांना उजाळा देत म्हणाला. .

“किती भांडली होतीस माझ्याशी . माझं प्रेम मिळवण्यासाठी इतके प्रयत्न केले आणि क्षणाचाही विचार न करता सोडून गेली.”

“प्रेम केले हो म्हणून तर सोडून गेली.. तुम्ही आनंदी सुखी राहवं म्हणून.”

“तुला सोडून मी कसा सुखी राहणार होतो. तू नसल्यावर मी कसा आनंदी राहणार होतो.. माझ्या आयुष्यात प्रेम आणणारी तू, तुझ्याशिवाय माझं जीवन अपूर्ण होतं आणि आहे.”

“काय भांडत होतीस तू माझ्याशी आणि का काय बोललीस आठवते तुला.” तो आठवत होता.

“हो मला सर्व आठवतेय पण सुरवात तर तुम्ही केली होती मी नाही.”

“ स्वतः मला धडक देऊन मलाच सुनावत होते..” ती तोंड वाकड करत म्हणाली.

“आणि तू ऐकून घेत होतीस का? मला तर मारायला अंगावर येत होती.” तसं तिला तेव्हाचे क्षण आठवून हसुच आले. ते क्षण आठवून तो ही हसायला लागला.

“ माकड , मांजर, गोरिला , म्हैस रेडा, प्राणी संग्रहालायातील आणि बरेच काही नावे ठेवून झाली होती एकमेकांना .” भक्ती हसून म्हणाली .


“अगदी खरयं. भांडणापासून सुरवात होऊन कधी तुझ्या प्रेमात पडलो कळलचं नाही..” तो तिचा हात हातात घेऊन तिच्या नजरेत बघत म्हणाला. पुन्हा नजर एकमेकांत गुंतली. तो प्रेमाने बघत होता तिने मान खाली करत नजर झुकवली.. त्याने बोटाने हनुवटी वर करत तिचा चेहरा वर केला…

“विश्व ss विश्वराज असे असे नका बघू माझ्याकडे.”

“बघू दे भक्ती किती वर्षानंतर आज असा जवळून बघतोय प्लिज मला माझे मन भरेपर्यंत बघू दे.. तो उत्कटतेने तिच्याकडे बघत होता.
त्याची ती नजर तिला त्याच्या मिठीत जाण्यास भाग पाडत होती.
तुम्ही असे बघत राहाल माझ्याकडे तर …”
“ तर … ?” त्याची नजर प्रश्नार्थक झाली.
“तर मी…. मी तुमच्या मिठीत सामावून जाईल..”

“वेटिंग धिस मुव्हमेंट .” तिच्या गालांवर अंगठा रब करत तिच्या जवळ येत म्हणाला. . तो जवळ आल्याने तिचा उर वर खाली होत होता. भक्तीने डोळे मिटून घेतले. तो आणखीन जवळ आला आणि त्याने तिच्या कपाळावर ओठ ठेवले.. त्याच्या ओठांचा स्पर्श कपाळावर होताच तिचे ओठ हलकेच रुंदावले. तो स्पर्श ती अनुभवत होती. डोळे उघडून तिने समोर पाहिले कपाळावर किस करून विश्वराज लगेच बाल्कनीत निघून गेलेला होता..


“ॲम रियली सॉरी विश्वराज …” ती पाठीमागून त्याला व्याकूळ होऊन बिलगली. .. भक्तीने त्याच्या पाठीवर चेहरा घुसळला. त्याचवेळी त्याने डोळे बंद करून घेतले. अखेर त्याला तेच हवं होत. ती त्याच्याजवळ कायमसाठी आली. त्याने तिच्या हातावर हात ठेवला. हात पकडतच पाठीमागून तिला समोर उभं करून तिला लगेच त्याच्या मिठीत आवळून घेतले.. तिनेही त्याच्या भोवतालची मिठी अजुनच घट्ट केली. भक्तीच्या डोळ्यांतून अश्रू बाहेर पडत होते.. त्याच्या जीवनातून सुंदर असा काळ तिने हिरावून घेतला होता..


“ विश्वराज .. मला माफ करा … मी त्या दिवशी तुम्हाला तिच्या सोबत आणि तुमचं बोलणं ऐकून खरंतरं मला धक्का बसला होता.. मी ज्याच्यावर प्रेम करते तो तर माझ्यासोबत खुश नाहिये. त्याला हे नातं नकोय.. आईसाठी नातं निभावण्याचा प्रयत्न करतोय. हे मी नाही सहन करू शकले विश्वराज . तेव्हा कळून चुकलं की माझं प्रेम हे एकतर्फी होतं आणि म्हणूनच मी चिठ्ठी लिहून न भेटताच निघून गेले.. आईना सांगायचा प्रश्न नव्हता.. कारण मी आईना खर सांगू शकत नव्हते. ज्या नात्यात प्रेम नाही विश्वास नाही. बळजबरी निभावणं होतं म्हणूनच मी न सांगता निघून गेले होते.. त्या खोट्या प्रेमाच्या नात्यातून तुम्हाला कायमचे मुक्त करून गेले . .. ”



“पण आईने ओळखलं होतं आपल्यात काहीतरी बिनसलं आहे ते. नंतर तिने माझ्याकडून जाणून घेतले होते. मी तुझा विश्वासघात केल्याने आपण वेगळे झालो म्हणून माझ्याशी बोलणं सोडलं . तब्येतीकडे दुर्लक्ष करून खाणं ही सोडलं. माझं ऐकायला तयार नव्हती. तेवढच नाही तर चेहरा ही बघत नव्हती.. एकाच घरात मी परका झालो होतो. तिच्या तब्येतीकडे बघून तिला अखेर इंत्यभूत सत्य काय ते समजावून सांगितले. सर्व ऐकून म्हणाली याची कल्पना तुला आधीच द्यायला हवी होती . म्हटलं चुकलचं माझं ते..”


“ पण तुम्ही मला का बोलवून घेतलं विश्वराज.. मी माझ्या
राजसोबत खूप खुश होते. मला मि. शहाच्या मार्फत अट घालून बोलवून घेणं हे कळलयं मला. पुन्हा नाही सहन करू शकणार मी माझा विश्वासघात केलेला..”

“लिसन भक्ती..” त्याने तिचा चेहरा दोन्ही हातांच्या ओंजळीत पकडला.

“ माझं प्रेम कधीच खोटं नव्हते यापुढेही नसणार . जर माझं प्रेम खोट असतं तर आत्ता मी तुझ्या समोर काय करतोय?” त्याने उलट प्रश्न केला.


“ मला नाही माहिती.” तिने तोंड वेंगाडले. ते पाहून त्याला हसूच आले..


“ भक्ती तुझ्यावर प्रेम करत होतो म्हणूनच …”

“म्हणूनच माझा विश्वासघात केलास ?” त्याला न बोलू देता तिचं पुढे बोलू लागली .

“ जेव्हा मला सर्वांत जास्त तुम्ही माझ्या जवळ हवे होतात तेव्हा नव्हते. प्रेग्नंट असल्याची पहिली न्युज तुम्हाला सांगू शकले नाही आणि का सांगु ? जर तुम्ही पुढे मुव्ह ऑन होताय आणि बाळाची न्युज ऐकून तुम्ही त्याला ही माझ्यापासून वेगळं करण्याचा प्रयत्न किंवा बाळासाठी एकत्र येण्याच प्रयत्न केला असता.
बाळच माझ्या जीवनाचा आधार होता म्हणून बाबांनाही सांगू दिले नाही.. आत्ताही तुम्ही राजसाठीच आले आहात.” तिने मान फिरवून घेतली.बोलतांनाही तिच्या डोळ्यांतून अविरत अश्रू वाहत होते..


“ भक्ती .. शांत हो आधी…” त्याने तिचे डोळे पुसले. .

“ मी माझ्या दोन्ही बाळांसाठी आलो.” त्याने तिच्या कपाळावर ओठ टेकवले.

“मी तेव्हा जे काही केलं ते तुझ्यासाठीच केलं पण ; करण्याआधी तुला या सर्वांची कल्पना द्यायला हवी होतीस हे माझी मोठी चुक ठरली. आठवतं तुला तू एका मोठ्या अपघातातून वाचली होतीस ते आणि त्याजागी सत्यन अपघातात गेला.

“हो पण त्याचा इथे काय संबंध .. ?”


“तो अपघात घडवून आणला होता तुझ्यासाठी.”

“ हो तुझ्यासाठी .” तो पुन्हा म्हणाला..

“म्हणजे मी त्या गाडीत असते तर आज दादू जिवंत असता. म्हणजे माझ्यामुळे दादू ..” पुढे तिच्या कडून बोलल्या गेलेच नाही आणि सत्यन गेल्याच्या अपराधी भावनेने तिला रडू कोसळले.


क्रमश ..

©® धनदिपा सम्राट