Login

भेटली तू पुन्हा ! भाग - एकोणपन्नास

भक्ती विश्वराज

भाग - 49 

“येऽऽ दिडशहाण्याऽऽ मलाही हे शक्य नाही काय? जगातील तू  एकमेव व्यक्ती नाहिये. तुझ्यासोबत सुरवात करायला. मला काही पागल कुत्र्याने चावलं नाहीये. समजलं?" ती त्याच्या चेहऱ्यासमोर एक बोट नाचवत त्याच्याकडे दोन पाऊल जवळ गेली, तसा तो दोन पाऊल मागे सरकला.


हो समजलं मला तुला पागल कुत्र्याने नाहीतर भांडखोर पागल   म्हैशी ने चावल असणार म्हणून तर मारकुटी म्हैस सारखी अंगावर धावूनच येतेस." तो थोडा हसत चिडवत म्हणाला. 

"मला म्हैस म्हणतो काय? यू ऽऽ. मी म्हैस तर रेडा "  तिने घट्ट दोन्ही हातांच्या मुळी आवळल्या. सत्यन मध्ये विश्वराजकडे तर भक्ती कडे आळीपाळीने बघत होता.. 

" अय हेंबाड्या जास्त आगावपणा करायचा नाही काय? सांगून ठेवतेय. माझं वरच टक्कूर सटकल ना, आपण कोणाच्या बापाला ऐकत नसतो." ती त्याच्यावर भयंकर चिडली होती. 

"मी माकडतोंड्या तर तू माकडतोंडी. ते तुझं टक्कूर अजून सटकायचं बाकी आहे का? पण तिथे आहे का टक्कूर की ऑलरेडी पहिला मजला सटकलेला आहे." तोही तिला तोंडात येईल ते बडबडत होता. सत्यन तर तोंडचा आ करून आणि डोळे वटारुन आळीपाळीने त्या दोघांकडे बघत होता.  त्याला फारच हसायला येत होते. पण आता हसले तर विश्वराजच्या रागाला आमंत्रण देण्यासासारखे होईल, म्हणून तो गप्प बसला. पण आतून तो दोघांचे भांडण खूप एन्जॉय करत होता.

"अरे दोघेही गप्प बसा." सत्यन त्यांच्यामध्ये जाऊन हात जोडून उभा राहिला. 

"अरे विषय काय?आणि भांडताय काय?" सत्यन त्या दोघांनाही म्हणाला.

"तुम्ही सांगून ठेवा तुमच्या खडूस मित्राला ."  भक्ती नाक फुगवून म्हणाली आणि मान फिरवून तिकडे बघायला लागली.

"हो. मी सांगतो त्यालाही पण तू थोडी शांत राहशील का प्लिज?" सत्यन म्हणाला तशी ती शांत बसली. विश्वा व भक्ती दोघेजण ही शांत बसले.


"तू काय विचार केलास?" सत्यनने विश्वराजला विचारले.

"आता आई म्हणतेय ते होऊन जाऊदे." विश्वराज विचार करत म्हणाला.

"ठीक आहे. तू तयार हो. बाकीच बघतो मी काय करायचं ते." सत्यनने पटापट फोन केले आणि दोन ते तीन तासात सगळी अरेंजमेंट केली. अंजलीने विश्वराज आणि भक्तीला रमाकाकू करवी बोलवून घेतले. मागच्या वीस एकवीस वर्षांपासून रमाकाकू त्यांच्यासोबत होत्या..

"रमाऽऽ" अंजलीने रमाला डोळ्यांनीच सांगितले. रमाने अंजलीच वार्डरोब उघडून त्यातील वस्तू बाहेर काढल्या. रमाने ते अंजली जवळ दिले. अंजलीने भक्तीला जवळ बोलवले.

"अंजली हे तुझे कपडे आणि हे दागिने आहेत."  अंजलीने तिच्या हातात दिले. तिला ते उघडायला सांगितले. त्यात एक रेड कलरचा शालू आणि दागिने होते.

"आवडले का तुला नाहीतर आपण दुसरे घेऊ?"

"खूपच सुंदर आहे, मला आवडले, मी हिच साडी नेसणार आणि दागिने घालणार पण मला साडी नेसता येत नाही. शालू बघून ती खूप खुश झाली पण तिला नेसता येणार नाही म्हणून नाराज झाली.

"ब्युटिशियन आले आहेत ना मग कशाला काळजी करते."

"आई, आजचा विषय नाही. मी रोज कशी घालणार नं?" तिच्या चेहऱ्यावर टेंशन दिसत होते.

"मग नको नेसू, मी तुला रोज रोज साडी नेसायला नाही सांगणार, जशी आज तू जिन्स टॉप घातलयं तसचं तू रोज असेच कपडे घाल. जशी तू आता राहतेस तसंच लग्नानंतरही राहा." 

"पण आई तुम्हाला कुणी काही म्हटलं तर? आधीच मी अनाथ आहे आणि तुम्हाला कोणी काही बोललेल मला नाही आवडणार." तिने चेहरा पाडत मनात आलेला प्रश्न विचारला.

"कुणी कितीही बोलू दे. संस्कार, स्वभाव हा वागण्यातून दिसून येतो,कपड्यावरुन नाही." अंजली हसत म्हणाली. भक्तीनेही स्मित केले.

"तुला नक्की आवडलं न हे." अंजलीने त्या वस्तूवर नजर फिरवत म्हणाली.

"जा तयार हो, रमाऽऽ." त्यांनी रमाला आवाज देऊन तिला घेऊन जाण्यास सांगितले.

"जी ताईसाहेब." रमा म्हणाली आणि भक्तीला एका रुममध्ये घेऊन गेली . ती फ्रेश व्हायला सांगून बाहेर आली, तितक्यात दोन ब्युटिशियन तिला तयार करायला रुममध्ये आल्या. ती तयार होत होती. भक्ती रुममध्ये रेडी होत होती तर अंजलीने विश्वासाठी एक इंडो वेस्टर्न शेरवानी आधीच आणली होती. अंजीलीने त्याची आवड लक्षात घेऊन तयार करून घेतली होती. त्याला ही रेडी व्हायला पाठवले. दोघेही तयार होऊन बाहेर आले. छुमछुम पैंजणाचा आवाज करीत ती बाहेर आली आणि तिला पाहताच विश्वाची विकेटच पडली. हृदय जोरजोत धडधडू लागलं. त्या नववधूच्या शालूत ती अतिशय सुंदर दिसत होती. तो एकसारखा तिच्याकडे पाहतच राहिला, त्यालाही त्याचं भान राहिलं नव्हते. सत्यनने त्याच्याजवळ येऊन त्याला हलवून भानावर आणले.

"आता तिलाच बघायचं आहे तुला." सत्यन मस्करीच्या सुरात म्हणाला.
विश्वराजने एक रागीट कटाक्ष सत्यन वर टाकला तसा सत्यन शांत बसला.आणि थोड्याच वेळात लग्नाच्या विधीला सुरवात झाली. भटजीबुवांनी अंतरपाट धरला आणि मंत्र म्हटले. एक एक मंत्र तिच्या कानावर पडत होते, तशी तिच्या डोळ्यांत अश्रू येत होते. अंतरपाट दूर झाला आणि दोघांनी एकमेकांना वरमाला घातली. नंतर भटजींनी सांगितल्याप्रमाणे पुढचे विधी होत होते. भटजींनी कन्यादानाला आईवडिलांना समोर या म्हणून बोलवले. हे ऐकून तिच्या डोळ्यांतील अश्रू गालांवर आले. अशा पद्धतीने ती लग्न करणार याचा विचार तिने कधीच केला नव्हता. सत्यनने पुढे होऊन तिचे कन्यादान केले. तिच्या चेहऱ्यावर हलके स्मित पसरले. डोळ्यांनीच त्याला थॅक्यू म्हणाली. त्यानेही प्रतिउत्तर म्हणून डोळे मिचकवून गोड हसला. लग्न झाले तसे ते अंजलीपुढे आशीर्वाद घेण्यासाठी ते खाली वाकले. खाली वाकून त्या दोघांनी आशीर्वाद घेतला. नंतर ती सत्यन जवळ आली आणि ती त्यांच्या पाया पडली. त्याने तिच्या खांद्याला पकडून उठवले आणि ती त्याच्या मिठीत शिरुन रडू लागली. त्याने तिला हलकेच थोपाटले. कपाळावर हलकेच ओठ ठेवले. सत्यनने आज तिचे कन्यादान करुन मोठ्या भावाचे काम केले होते. भक्तीला नवरा, आई, भाऊ असे नाते मिळाले होते, ती खूप खुश होती.

"सुखी राहा,नेहमी खुश राहा." असा भरभरुन आशिर्वाद दिला.

"काँग्रॅट्स विश्वा." त्याला शुभेच्छा देत सत्यनने मिठी मारली. 

"गप रे ! तुला माहिती आहे न आमच्यातील बाँड, हे नातं फक्त एक वर्षांपुरतंच आहे." विश्वा त्याच्या मिठीत असतांना त्याच्या कानात म्हणाला.

"विशू, हे नात वर्षभराचं नाही, तर जन्मोजन्माचं जोडले गेले आहे. लवकरच तुझा यावर विश्वास बसेल, याची मला खात्री आहे आणि तो दिवस लवकरच येईल." सत्यन मनातच म्हणाला आणि बाकीच्या तयारींना लागला.

अंजली यांनी रमाकाकूला सांगून गृहप्रवेशाची तयारी करायला सांगितली. रमाकाकूने सांगितल्या प्रमाणे सर्व गृहप्रवेशाची तयारी 
केली.भक्तीला विश्वराजला ओवळण्यासाठी अंजली दाराजवळ उभी राहिली.. रमाने त्यांच्या हातात ओवाळणीच ताट दिलं. त्यांना ओवाळून भक्तीला माप ओलांडायला लावले. तिने माप ओलांडून गृहप्रवेश केला. रमा काकूने पुढची तयारी केली. एका परातीत लाल कुंकवाचे पाणी करून घेतले होते आणि त्याच समोर एक पांढरा शुभ्र कपडा अंथरलेला होता. त्यांनी तिला परातीत पाय ठेवायला सांगितले. अंजली सांगत होती तस ती करत होती. तिच्या पावलांचे ठसे त्या शुभ्र कापडावर उमटले होते. गृहप्रवेश झाल्यावर त्यांना देव्हाऱ्यातील देवासमोर जाऊन नतमस्तक झाले. त्यानंतर त्यांना भक्तीला दुसऱ्या रूममध्ये आराम करायला पाठवले. सत्यन ही विश्वराजशी बोलून अंजलीचा निरोप घेऊन निघून गेला. विश्वराज रूममध्ये जाऊन आधी कपडे चेंज केले.. फ्रेश होऊन तो त्याच्या लॅपटॉप घेऊन कामाला बसला.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून विश्वराज खाली आला तर त्याला पुजेची तयारी झालेली दिसली.. सत्यन ही आलेला दिसला.

“तू कधी आलास ?” विश्वराज ने सत्यनला विचारले.

“ आत्ताच आलो.” त्यावर सत्यनने उत्तर दिले.

“ आई आता हे काय नवीन?” विश्वराजने पुजाची तयारी बद्दल विचारले.

“ लग्नानंतर दोघमिळून पुजा करतात.” 

“ मी ऑफिसला चाललोय.” विश्वराज

“ तूझ्याच लग्नाची पुजा आहे . तू आज ऑफिसला नाही जायचे.” 

“ पण आई ..” तो आईला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत होता. आईने हातानेच पंजा दाखवून त्याला बंद केले..

“ जाऊन चेंज करून ये.” 

“ आता या कपड्यांना काय झालं ?” तो अंगात घातलेल्या कपड्यांवर नजर टाकून वैतागून बोलत होता . नको त्या गोष्टी त्याला त्याच्या आईसाठी नको त्या व्यक्तीबरोबर कराव्या लागत होत्या.. वैतागतच तो वर जाऊन कपडे चेंज करून आला.


क्रमश ..