Login

भेटली तू पुन्हा ! भाग - पन्नास

भक्ती विश्वराज
भाग - 50

विश्वराज वैतागतच रूममध्ये कपडे बदलायला गेला.. वरती येऊन त्याने पटकन चेंज करून तो खाली निघून आला.. भटजीनी पुजा मांडली होती.. भक्ती रूममध्ये तयार होत होती.


"किती सुंदर दिसतेय माझी गोडुली." अंजली म्हणाली, तशी ती गोड अशी लाजली.

"बघ रमा, माझी गोडुली कशी लाजते?" अंजली हसत म्हणाली. तिने खालचा ओठ बाहेर काढून गालही फुगवले. भक्तीला तसे पाहून अंजलीला हसायला आले. त्यांनी तिचे एक हाताने गाल ओढले आणि दुसऱ्या हाताने नाक ओढले.

"आईऽऽ" भक्ती लटक्या रागाने म्हणाली.

“चल आता भटजी बुवा वाट पाहत आहे." अंजली म्हणाली. त्या तिघीही रुमच्या बाहेर आल्या. बाहेर हॉलमध्ये पुजेची सर्व तयारी झाली होती. पहिल्यांदा अंजली, रमा बाहेर आल्या त्यांच्या मागे भक्ती येत होती. त्या दोघींच्या मागे असल्याने विश्वाला ती दिसत नव्हती आणि तो तिला इकडून तिकडून पाहण्याचा प्रयत्न करत होता, पण त्याला भक्तीचा चेहरा अजूनही दिसत नव्हता. त्या दोघी बाजूला झाल्या आणि विश्वाला भक्तीचा चेहरा दिसला, पुन्हा एकदा तिला बघून त्याच्या हृदयाचा ठोकाच चुकला.

 हिरव्या रंगाची भरजरी सारी त्यावर पारंपारिक  शोभून दिसतील असे दागिने. नाजूक हातात हिरव्या बांगड्या आणि तोडे घातलेले. दागिन्यांनी तिच्या सौंदर्यात आणखीनच भर टाकली. नाकात महाराष्ट्रीयन नथ आणि त्याच लक्ष वेधून घेतले तिच्या कपाळावर असलेल्या चंद्रकोर आणि केसांवरच्या कुंकूने जे त्याने काल त्याच्याच हाताने तिच्या भांगेत भरले होते.. तिला बघून त्याचे हार्ट बीट स्कीप होत होते. 


"आऽई गंऽ!" त्याच्या तोंडून अस्पष्ट असे उद्गार निघाला. नकळत त्याचा हात त्याच्या हृदयावर गेला. आज वेगळच काहीतरी होतयं पण काय हे त्याला ही समजत नव्हतं .
 ‘हिला असं बघितल्यावर मला काय होतय? अचानक धडधड का वाढते ? हे फक्त एक वर्षापर्यंत आहे. नंतर ती तिच्या मार्गाने आणि मी माझ्या.. पण काहीही म्हणा दिसतेय सुंदर. नुसतं बघत राहावं असं वाटतयं.’ तो स्वतःच्या विचारांवर चमकला. झटक्यात त्याने मनातील विचार बाजुला सारले. अंजलीने दुरुनच तिच्या आल्याबाल्या घेतल्या.. दोघंही पाटावर बसले आणि पुजारीनी पुजा सुरू केली.. पुजारी जसे सांगत तसं दोघेही करत होते.. त्याच्या हाताला तिचा हलका स्पर्श झाला.  तसं त्याच्या अंगावर रोमांच उभे राहिले. क्षणभर तो स्तब्ध झाला.. पुजारी दोनदा सांगितल्यावर ही त्याच लक्ष नव्हत म्हणून तिने त्याला कोपराने धक्का देऊन पुजावर लक्ष द्यायला लावले. पुजा झाल्यावर प्रसाद देऊन पुजारीचा आशीर्वाद सोबत आई रमाकाकूचा ही आशीर्वाद  घेतला.. 

“ आई पुजा झाली आता मला ऑफिसला जायचं आहे. अर्जंट मिटिंग आहे माझी.” विश्वराज आईला म्हणाला.

“ ठिक आहे जा पण लवकर ये .” अंजली म्हणाली.. क्षणाचाही विलंब न करता तो रूममध्ये कपडे चेंज करायला गेला. भक्ती सत्यन जवळ येऊन बोलू लागली.. विश्वराज खाली आला तेव्हा त्याला ते दोघं खुसर फुसर करतांना दिसले तशा त्याच्या कपाळावर हलकी आठी पडली.. विश्वराज अंजलीचा निरोप घेऊन निघाला..

“ विश्वा अरे माझी भक्ती आलीये .. निघतांना तिला ही सांगून जा...” अंजली त्याला भक्तीची आठवण करून देत म्हणाल्या. तो तिच्याशी न बोलताच निघाला होता..

“ येतो .” विश्वराज तिला म्हणाला त्यावर ती फक्त गालात स्मित करत होकार दिला. 

सत्यन आणि तो गाडीत बसून ऑफिसला जायला निघाले..

“ती काय बोलत होतीस?” विश्वराज.

“ ती कोण ?” सत्यनने विचारले.

“ आईची भक्ती .” विश्वराज उपहासात्मक पणे म्हणाला. .

“ आणि तुझी बायको.” 

“सत्या शट अप यार.. आमचं कॉन्ट्रॅक्ट मॅरेज आहे ती फक्त एक वर्ष इथे आहे  आणि ते ही आईसाठी बस्स! यापलीकडे काहीच नाही. तुला नाही सागायचं तर नको सांगू.” विश्वराज चिडत म्हणाला.

“ असं काही नाही रे … लग्न पुजा ॲन्ड ऑल दॅट हे जरा अतीच होतेय म्हणाली..” 

“ हो ना यार .. आई पण काहीही करायला लावते .” 

“ काहीही नाही रे … लग्न झाल्यावर हे तर पुजा रिसेप्शन हे तर आलचं .. त्यांना काय माहिती की तुम्ही कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केले आहे ते. प्रत्येक आईच्या आपल्या मुलाच्या लग्नाचे काही इच्छा असतात.  पण मावशी काही डिमांड न करता घरातच सर्व करायला तयार झाल्यात.. बरं त्यांनी रिसेप्शन करायच म्हटलं नाही. नाहीतर ते ही द्यावचं लागलं असतं.” 


“ येस .. बरं झाले त्या बाबतीत काही म्हणाली नाही.” विश्वराज ही सत्यनशी सहमत झाला. ऑफिसला येऊन दोघही कामात बिझी झाले.. 


    विश्वराज संध्याकाळी घरी आला.. फ्रेश होण्यासाठी त्याने रूममध्ये पाऊल ठेवले. रूमभर नजर जाताच त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या.. 

‘ यासाठी गेला होतास लवकर .. सोडणार नाही तुला .’त्याला शिव्या घालतच तो बाथरूममध्ये गेला.. सत्यनने रुम छान सजवली होती. बेडवरही फुलांचा गालिचा अंथरलेला होता. सर्व रुमभर फुलांचा सुवासिक गंध दरवळत होता. विश्वराज फ्रेश होऊन कपडे चेंज करून बाहेर आला. 
आईसोबत असणाऱ्या भक्तीला अंजलीने विश्वराज च्या रूममध्ये पाठवलं. ती रूममध्ये आली. सजावट पाहून ती आनंदित झाली. ती बेडवर बसली. .

“ वॉव कसली भारी सजवली रूम.”  ती चौफेर नजर फिरवत म्हणाली.. विश्वराज बाल्कनीत जाऊन बसला होता..

मग ती फ्रेश होऊन कपडे चेंज करण्याकरिता तिने कपाट उघडले तर तिथे डिझायनर साड्या, ड्रेस, जिन्स, टॉप, नाईट ड्रेस, गाऊन होते आणि तिच्याजवळील कपडेही त्यात ठेवले गेले होते.  तिने त्यातील एक नाईट ड्रेस काढला. फ्रेश व्हायला बाथरुममध्ये गेली. फ्रेश होऊन ती बाहेर आली तेव्हा विश्वराज झोपून गेलेला होता. मग ती आईच्या रुममध्ये गेली.

“आईऽ झोपली नाहीस." भक्ती आईजवळ बसत म्हणाली.

"भक्ती बाळा सारखं झोपून झोपूनही कंटाळा आलाय गं. झोप नव्हती लागतं, पण तू अजून का जागी आहेस?" आईने तिला आता जागी असलेलं बघून विचारले.

"मला पण झोप नव्हती येत. मी इथेच झोपू तुझ्याजवळ?" भक्ती अंजलीला हट्ट करत म्हणाली.

"अगं विशू तुझी वाट पाहत असेल." अंजली म्हणाली.

"कसलं काय? झोपलाय कुंभकर्ण ..डोंबल वाट पाहणार माझी." ती हळूच पुटपुटली.
 
"काय म्हणालीस?" अंजलीने विचारले. 

 "तो आरामात झोपलायऽ, बरं आईऽ, मी तुझ्या पायाला तेल लावून चेपून देते." भक्ती.

"नको गं तू आराम कर, सकाळपासून तुझीही धावपळ होतेय. थकली असणार नं ?"

“तुझी भक्ती काम करतांना काही थकत नसते आई." बोलता बोलता तिने वाटीत तेल घेऊन अंजलीच्या पायाला तेल लावून चोळू लागली. हलकी मालिश करत होती. भक्ती खूप गप्पा मारत होती. तिचे कॉलेजचे किस्से रंगवून सांगून अंजलीला हसवत होती. रमाकाकूही त्यांच्यासोबत हसत होत्या. तिच्या गोष्टी ऐकून अंजलीचा डोळा लागला अन् ती गाढ झोपली. मग भक्तीही तिच्या शेजारी झोपून गेली.

विश्वराज सकाळी त्याच्या वेळेवर उठला तर त्याला भक्ती कुठेच दिसली नाही, कुठे गेली? म्हणून त्याने बाथरुम, किचन, गेस्टरुम पाहिली पण ती तिथे ही नव्हती. तो आईच्या रुममध्ये गेला तर ती आईच्या जवळ झोपलेली होती. 

"नक्कीच ही जादूगरनी आहे." तो मनात म्हणाला. त्याने दरवाजा ओढून त्याच्या बेडरुमच्या आत जिमसाठी रुम काढली होती. तिथेच जिमचे साहित्य आणि बाथरुमही होते. तो तिथेच त्याचे रुटीन वर्कआऊट करत होता. भक्ती उठली आणि एक क्षण वाटलं आपण कुठे आहोत? पण समोर आईचा प्रसन्न चेहरा पाहून तिच्या लक्षात आले की, कालच तिचं लग्न झाले आणि ती या घरात आली.

"गुडमॉर्निंग भक्तीऽऽ" अंजलीने भक्तीच्या कपाळावर किस केले.

"गुडमॉर्निंग आई." ती आईला मिठी मारत म्हणाली.

"आई, मी आवरुन लगेच येते." म्हणत ती तिच्या रुममध्ये गेली.

" कुठे गेला खडूसकुमारऽऽ?" ती रुमभर नजर फिरवत म्हणाली.

“जाऊ दे मला काय.” म्हणत  रूम आतून लॉक केली आणि ती कपडे घेऊन बाथरूममध्ये गेली.. विश्वा फ्रेश होऊनच रूममध्ये आला.



क्रमश ..