भाग - 51
भक्ती फ्रेश व्हायला बाथरूममध्ये गेली आणि रूममध्ये विश्वराज
फ्रेश होऊनच रूममध्ये आला. विश्वराज तिथे असल्याची कल्पना नसल्याने ती ब्लाऊज आणि परकर वर बाहेर आली.. जसं तिने समोर त्याला पाहिले तस ती किंचाळली.
फ्रेश होऊनच रूममध्ये आला. विश्वराज तिथे असल्याची कल्पना नसल्याने ती ब्लाऊज आणि परकर वर बाहेर आली.. जसं तिने समोर त्याला पाहिले तस ती किंचाळली.
“ आऽऽऽ.” अनपेक्षितपणे त्याला समोर बघून घाबरून तिने मोठ्याने ओरडली.. त्याने पटकन तिच्याजवळ जाऊन तिच्या तोंडावर हात ठेवला.
“ अंग ये केवढ्या मोठ्याने किंचाळतेस.. मी आहे.” त्याने पटकन जाऊन तिच्या तोंडावर हात ठेवून रागातच म्हणाला.. पण तिच्या जवळ जाताच तो तिच्या चेहऱ्याकडे एक टक बघत हरवला. पाण्याचे काही थेंब तिच्या चेहऱ्यावर तर गळ्यावर एखाद्या मोत्याप्रमाणे चमकत होते.. त्याचं एकटक बघण तिला अस्वस्थ करत होतं तर तो तिला निरखत या आधी कुठे पाहिलं याचा विचार करत होता.
“ मी तर रूम लॉक केली होती मग तू तुम्ही आत कसे आलात?
तुला काय लाज लज्जा शरम आहे की नाही. मुलींच्या रुममध्ये असं आत येऊ नये. इतकेही मॅनर्स नाहीत." ती चिडून म्हणाली तेव्हा तो भानावर आला. तो बारीक नजर करून तिच्याकडे रोखून बघत होता.
तुला काय लाज लज्जा शरम आहे की नाही. मुलींच्या रुममध्ये असं आत येऊ नये. इतकेही मॅनर्स नाहीत." ती चिडून म्हणाली तेव्हा तो भानावर आला. तो बारीक नजर करून तिच्याकडे रोखून बघत होता.
“मैं लुट गई बरबाद हो गई इस अखडूकुमारने मुझे कही का नही छोडा भगवान मै क्या करू?" ती वरती छताकडे पाहत ड्रामा करत म्हणाली.
"इतक्या मोठ्याने कशाला गळा काढतेस गं? मी काय केलं तुला .. जसं मी काय जबरदस्ती केली असं बोलते आणि माझे वर मॅनर्स काढते? तुला एवढेच वाटते तर तू पूर्ण कपडे घालून यायला पाहिजे होतं, यात माझी काय चूक?" तो तिच्याजवळ येत चिडत म्हणाला.
“आत मध्ये साडी कशी नेसू मूर्ख माणूस , म्हणून बाहेर आले. बाहेर आल्यावर रमाकाकूला आवाज देऊन त्यांच्याकडून साडी नेसून घेत होते त्याअगोदरच तू आत आला. तू मला अशा अवतारात पाहिलं नं .. माझ्या परवानगी शिवाय असं मला कोणीही पाहू शकत नाही तू ही नाही ." ती त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली.
"आणि जर जबरदस्ती करायचा प्रयत्न केलास ना तर दात तोडून हातात देईल. आत येण्याआधी नॉक तरी करत जा, ही रुम माझीही आहे." भक्ती ठसक्यात म्हणाली.
" म्हणजे माझ्याच रुममध्ये यायला मी तुला विचारावं. तुझ्यावर जबरदस्ती करायची नाही मला तर जवळ यायची इच्छा नाही. बिकॉज आय हेट यू ." तो एक पाऊल पुढे टाकत तिच्या जवळ येत होता.
तशी ती मागे सरकली.
तो पुढे आल्याने तिला काय बोलावे हे सुचत नव्हते. थोडं थांबून तिने बोलायला सुरवात केली.
“मी… . मी .. ही काही प्रेमात पडली नाहिये तुझ्या .. असा अखडू खडूस वयाने मोठ्या असणाऱ्या कडू कारल्यांच्या … शी …सेम टू यू .. तू तशीही जबरदस्तीही करू शकत नाही.”
" मला करायचीही नाहिये." तो ही प्रतिउत्तर देत
" तू करूही शकत नाही .आय हेट यू टू मोअर अँण्ड मोअर ."
आता त्याला तिची मस्ती करायची लहर आली.
"तू काय मला चावी फिरवतेय का? ये मी काही म्हातारा नाही आहो. मी प्रूव्ह करु शकतो.. अशी ही तू या अवतारात हॉट दिसतेय. " तो मिश्किलपणे म्हणाला.
तो पुढे जाऊन तिच्या कमरेत हात घालून तिला जवळ ओढले. त्याच्या अचानक ओढल्याने ती त्याच्या खूप जवळ आली. त्याच्या थंडगार स्पर्शाने तिच्या अंगावर काटा आला, शरीरावरचे लव ताट झाले, तिचे हार्टबिट्स वाढले, श्वास फुलले होते. तिच्या पोटात काहीतरी ढवळाढवळ होत होती पण काय तिला समजत नव्हते. त्याच्या अशा कृतीने ती पूर्ण गोंधळली होती. तिने खाली नजर झुकवली. त्यालाही तिचं गोंधळणं आणि तिची वाढलेली धडधड ऐकू येत होती. त्याने तिच्या चेहर्यावर फुंकर मारली आणि ती त्याच्याकडे पाहायला लागली तसा तोही तिच्या चॉकलेटी ब्राऊन डोळ्यांत पुरता हरवला होता. चष्म्याच्या आड लपलेले तिचे सुंदर मृगनयनी डोळे तो आता कुठे लक्ष गेले होते त्याचे. तिच्या डोळ्यांवर असलेल्या दाटसर पापण्यांच्या उघडझापने त्याचे हदय बंद पडते की काय असे त्याला वाटत होते.
दारावरच्या टकटकने दोघेही भानावर आले. रमाकाकूने बाहेरुन आवाज दिला. तिने त्याला जोर लावून ढकलले. तो बाजूला झाला आणि बाहेर निघून गेला. भक्ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. 'काय होत हे?' ती विचार करत होती. रमा काकू आत आल्या. भक्तीने कांकूकडून साडी कशी नेसायची याची शिकवण घेतली. भक्ती छान पिंक कलरची प्लेन शिफॉन साडी नेसली.. रमा काकू निघून गेल्या. मग ती बाकीची तिची तयारी करू लागली. तयारी झाली तशी ती खाली निघून आली..
सत्यन ही आला होता. विश्वराज आणि तो एका मिटिंगसाठी सोबतच जाणार होते.
दारावरच्या टकटकने दोघेही भानावर आले. रमाकाकूने बाहेरुन आवाज दिला. तिने त्याला जोर लावून ढकलले. तो बाजूला झाला आणि बाहेर निघून गेला. भक्ती त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत होती. 'काय होत हे?' ती विचार करत होती. रमा काकू आत आल्या. भक्तीने कांकूकडून साडी कशी नेसायची याची शिकवण घेतली. भक्ती छान पिंक कलरची प्लेन शिफॉन साडी नेसली.. रमा काकू निघून गेल्या. मग ती बाकीची तिची तयारी करू लागली. तयारी झाली तशी ती खाली निघून आली..
सत्यन ही आला होता. विश्वराज आणि तो एका मिटिंगसाठी सोबतच जाणार होते.
डायनिंग टेबलवर सर्व नाश्ताला बसले होते. अंजलीने एक एनव्हलप विश्वावा समोर ठेवले.
"काय आहे यात?" तो गोंधळून म्हणाला.
"ओपन करू पहा." अंजली म्हणाली आणि त्याने उघडून पाहिले.
"मी अजिबात जाणार नाही. "तो इनव्हलप पाहून अंजलीला म्हणाला.
"अरे जाऊन या तुम्ही." अंजली म्हणाली.
"जाऊन ये की तू?" भक्ती न कळून म्हणाली.
"एकटा जाऊन काय करणार आहे तो." अंजली म्हणाली.
"मग सत्यन दादालाही घेऊन जा सोबतऽऽ." भक्ती पुन्हा नकळत म्हणाली. हे ऐकून सत्यन आणि विश्वा दोघांनाही ठसका लागला. भक्तीने दोघांनाही पाणी दिले. त्यांना बरं वाटायला लागले.
"तुमच्या हनिमूनमध्ये मी काय करणार आहे?" सत्यन गालात हसत म्हणाला.
"क्कायऽऽ हनिमूनऽऽ" आता भक्तीला जोरात ठसका लागला. अंजलीने भक्तीला पाणी दिले.
'ह्या डुक्करसोबतऽऽ हनिमूनला जाण्यासाठी मला कायऽ वेड लागलयं का? अजिबात नाही आणि तिथं जाऊन काय करणार भांडण्याचे नवीन प्रकार शोधणार ?.' ती पाणी पिता पिता विचार करत होती.
"हो बाळा तुम्हाला आठ दिवसानंतर पॅरिसला जायचं आहे." अंजली म्हणाली.
"आई कसं शक्य आहे हे? मी तुला एकटीला सोडून कुठेही जाणार नाही." भक्ती.
"आम्ही कुठेच जात नाहीये." विश्वराज.
"विशूऽऽ" आईने त्याला हाक मारली.
"नाही आई आता काहीच नाही, सर्व तुझ्या म्हणण्यानुसार केले आहे. यात तुझी खूप दगदग झाली आहे. आता काहीच नको. आम्ही तुला सोडून कुठेही जाणार नाही." तो ठामपणे म्हणाला.
"विश्वा, आत्ताच तर तुमचं लग्न झालयं हेच दिवस असतात रे सोबत फिरण्याचे, एकमेकांना ओळखण्याचे,समजण्याचे." अंजली त्याला समजावत म्हणाली.
"आई, तुझं म्हणणे बरोबर आहे, पण मला असं अचानक इतक्या दिवसांसाठी सर्व सोडून जाता येणार नाही. माझी मिटिंग आहे. ती मी कॅन्सल करु शकत नाही." विश्वराज अंजलीला म्हणाला.
"ती मिटिंग सत्यन अटेंड करेल." अंजली.
"मला थांबावच लागेल." विश्वराज.
"बरं मग असं कर तुम्ही दोन दिवस तरी जवळपास फिरुन या." अंजली म्हणाली.
“बघ मी जाण्याचा विचार करेन पण, आता नाही.” उठून तो रूममध्ये आवरायला गेला.
"भक्ती बाळा तो नाही म्हणतोय."
" आई जाऊ दे ना ." आईला रुममध्ये सोडून ती तिच्या रुममध्ये आली..
" असही या गाढवा सोबत मी तर जाणार नाही. प्रेमानं बोलणं तर नाहीच नाही पण फॅमिली ट्रिप तर नक्कीच होऊ शकते ना... नेहमी तिरसटासारखा बोलत असतो खडूस कुमार." ती ओठांत पुटपुटत होती.
"अरेऽऽ काय काम काम लावलाय रे… लवकर बुढ्ढा होशील जरा गर्लफ्रेंडला बाहेर फिरायला ने शॉपिंग कर .. आईला ने … फॅमिलीसाठी कमवतो न त्याच फॅमिलीला वेळ देता येत नाही का तुला ..तर नाही तू तर भरी जवानीत बुढ्ढा झालास रे चक्ऽऽऽ चक्ऽऽऽ.. सदा न कदा मशीनीला जुंपलेला रोबोट झालास तू .. जगणं विसरलास रे .. चल जास्त भाव खाऊ नको आणि खाल्ला तर मी सोडत नसते. माइंडेड." भक्ती फोनवर धमकी देत म्हणाली.
"सोनाने तक्रार केली तर बुकलून काढील तुला .. चल ठेव फोन आणि विचार कर माझ्या बोलण्याचा." ती मोबाइल कानाला लावून बोलत होती आणि विश्वा आरश्याजवळ उभा राहून तयार होत होता. त्याने तिचे संपूर्ण बोलणं ऐकले होते.
तो तिच्याशी न बोलता तरातरा निघून गेला. तिने त्याच्याकडे नाक ओठ पुढे घेऊन दोन्ही बाजूने फिरून घेतले.
"अग गं काय हे? कोण सोना आहे ही माझी गर्लफ्रेंड अन् मलाच माहिती नाही.." पलीकडून परेश तिच्या बोलण्याने गोंधळला होता. बिचारा केव्हापासून ऐकतोय जे त्याच्या डोक्यावरून गेलं होत.
क्रमश ..
