Login

भेटली तू पुन्हा ! भाग - चौपन्न

भक्ती विश्वराज
भाग - 54


विश्वराज ने तिला घरी आणलं तेव्हा काळजीने अंजली तिच्या खोलीत आल्या.

“ सोन्या बरं वाटतयं का तुला ?” अंजलीने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. त्यांच्या डोळ्यांत अश्रू जमा झाले होते. तिने आईचा हात हातात घेतला.

“ हो मी ठिक आहे.”

“तुझ्या तब्येतीपेक्षा कार्यक्रम महत्त्वाचा होता का? खूप हट्टी आहेस तू.. मला कन्व्हिन्स करून गेलेली मी माझ्या तब्येतीची काळजी घेईल मग कशी तब्येत बिघडली ?”

“आई ठिक आहे मी मला काहीच झालेलं नाही.. सिस्टर ला इथं ठेवून हे जरा जास्तच झालयं. ती अंजलीला समजवण्याचा प्रयत्न करत होती.

“काही जास्त नाहीये हे .. बेडच्या खाली जरी उतरलीस तर फटके मारेल तुला.”

“ आई …” ती भोळा चेहरा करत म्हणाली..

“असा चेहरा करू नकोस. बिलकुल वितळणार नाहीये. चल हे पिऊन घे. आ कर” त्यांनी तिच्या समोर सुप चमचा पकडत विचारले. तिने चुपचाप तोंड उघडले आणि त्यांच्या हातून सूप पिऊ लागली.. विश्वराज चुपचाप त्या दोघांकडे बघत होता.


“ आई, मी भरवतो.” विश्वराजने तिच्या हातून सुपचा बाऊल घेतला.. त्याने चमचा घेत तिच्यासमोर पकडला.

“ मस्त माझ्या आईकडून सेवा करून घेते आहेस.”

“ गप्प रे .. मुलगी आहे ती माझी.” अंजलीने त्याला खांद्यावर फटका मारत म्हणाली..

“ आणि मी कोण आहे मग तुझा? मला नाही भरवलं कधी असं.” तो पटकन बोलून गेला.

“ आई, कुठून तरी जळण्याचा वास येतोय.” आई कडे बघत ती हसत म्हणाली . अंजली आणि काकू ही हसत होत्या.

“ मी अन् तुझ्यावर जळतोय. मला दूसरे काम नाही का?” तो भूवया उंचावत म्हणाला. खाऊन झाल्यानंतर सिस्टरने तिला गोळी दिल्या. .
अंजली तिच्या उशाशी बसून तिच्या डोक्यावर हात फिरवत होती. त्यातच तिला लगेच झोप लागली.

“ आई झोपलीय ती. तू आराम कर आता. मी आहे .” विश्वराज आईशी बोलत होता. आईला त्याने आराम करायला पाठवून दिलं.

दुसऱ्या दिवशी प्रियांशने कॉल करून तिची चौकशी केली. त्या मुलाच ऑपरेशन झालं सांगितलं. हे ऐकून ती भलतीच खुश झाली.


भक्ती ठणठणीत झाल्यामुळे ती बंटीला भेटायला हॉस्पिटलला गेली.

“हॅलो बंटी कसा आहेस बाळा?"

"मी छान आहे दिदी .. तू किती सुंदर आहेस एकदम सोनपरी .. माझी सोनपरी." बंटी तिच्या गालाला हात लावत म्हणाला.


"दिदी मला सर्व दिसतेय. मी आता शाळेत जाणार. खूप अभ्यास करणार" तो खूप एक्साईट झाला होता.

"हो .. माझा बंटी गुड बॉय आहे. शाळेत जाणार खूप अभ्यास करणार " भक्तीने त्याच्या गालावर ओठ टेकवले.

" हे बघ मी तुला खाऊ आणलाय आजीला त्रास नको देऊ मी येईल पुन्हा." ती म्हणाली आणि डॉक्टरांशी बोलून निघून गेली.

********"***


सत्यश विश्वा भक्ती आई काकू सर्व जेवायला बसले.
जेवणाला बसल्यावर आईने पुन्हा विषय काढला.

"विशू भक्ती आता तुम्ही दोघं फिरायला जावं अशी माझी इच्छा आहे." अंजली.

विश्वा नेहमी प्रमाणेच नाहीच म्हणाला. भक्तीनेही त्याच्याकडे पाहून नाक मुरडलं.

"आई, माझ्याजवळ यापेक्षा मस्त आयडिया आहे." भक्ती मध्येच म्हणाली.

"कोणती?" सत्यनने विचारले.

"आपण सर्वच काही दिवस फिरायला जाऊया,कशी वाटली आयडिया?" भक्ती एक्साईटेड होऊन म्हणाली.

"एकदम बेक्काऽऽर आहे." सत्यन म्हणला.

"सत्यन दादा." ती गाल फुगवून म्हणाली.

"अरे मग काय, दोघांना एकमेकांसाठी वेळ मिळावा म्हणून पाठवतोय न आम्ही मग मध्येच आम्हाला कशाला आणतेस?" सत्यन म्हणाला. विश्वाने एक भुवई उंचवून त्याच्याकडे पाहिलं.

" म्हणजे मावशीची इच्छा आहे नं ." सत्यन हळूच म्हणाला.

"हे बघा जायचं तर सर्वांनी, पटलं तर सांगा नाहीतर आम्हीही कुठे जाणार नाही." बोलून ती रुममध्ये जायला निघाली.

"भक्तीऽऽ."अंजलीने आवाज दिला.

"बाळ माझं ऐक ना?"

"आई प्लिज हो म्हण ना." भक्ती अंजलीच्या पायाजवळ बसून लाडीगोडी लावत म्हणाली.

"ठीक आहे आपण जाऊया मग तर खुश." अंजली तिच्या गालावर हात फिरवत म्हणाली.

"हो खूप म्हणजे खूप खूप खुश. चला आपण तयारी करुया." विश्वराज भुवया उंचावून त्या दोघींकडे पाहत होता.

"सत्या,हे काय आहे रे मी कितीवेळचा सांगतोय तर ऐकत नव्हती आणि आता या मांजरीच कसं ऐकलं? असं वाटत की ती माझी आई नाही हिचीच आहे." विश्वराज सत्यनला म्हणाला.

"तू जळतोय का तिच्यावर?" सत्यन हसून विश्वाला म्हणाला.

"चक्ऽऽ मी नाही जळत त्या चिपकलीवर, कशी आईला जाऊन चिपकलीय." सत्यनला विश्वराज बोलण्यावर हसूच आले.

"हसतोय काय? जाम वैताग आणलाय या मुलीने?" विश्वराज सत्यनला हसताना पाहून म्हणाला.

"मला ना यांच्याकडे पाहून डाऊट येतो, इतक्या कमी दिवसांमध्ये ह्या इतक्या जवळ कश्या आल्यात?" विश्वराज अंजली,भक्तीकडे बारीक नजरेने पाहत म्हणाला.


"चला तयारी लागा." सत्यन विषय बदलवत विश्वराजला म्हणाला.

"आधी त्या चिपकलीला विचार कुठे जायचं आहे? तशी तिकिटे काढावी लागतील." विश्वराज भक्तीकडे पाहत म्हणाला.

"तिने जर ऐकलं ना की तू तिला चिपकली आणि मांजर म्हणालाय तर तुझं काही खरं नाही." सत्यन.

"तू घाबरवतोय का मला?" विश्वराज.

"मी फक्त सांगतोय तुला, तिने ऐकलं असेल तर महागात पडेल तुला." सत्यन.

"कुठे जातोय आपण?" सत्यनने हसत भक्तीला विचारले.


" आपल्या फार्महाऊसवर." भक्ती म्हणाली.


अंजलीकडून तिने फार्महाऊसबद्दल ऐकलं होतं. तिला तिथे जायची इच्छा झाली. अंजली तिच्याकडे कौतुकाने पाहत होती.कोणते कपडे घ्यायचे इथपासून तर यायच्या वेळेपर्यंत, हे करु आणि ते करु असं तिचे प्लॅनिंग चालू होते.

"आई शॉपिंग राहिली ना आपली?" भक्ती अंजलीला म्हणाली.

"जा तू करुन येऽ, विशू भक्तीला घेऊन जा शॉपिंगला तिला काय घ्यायचं ते घेऊन ये." अंजली विश्वराजला म्हणाली.

"चलऽऽ." नाईलाजाने तो 'हो' म्हणाला. ती लगेच त्याच्यासोबत निघाली. दोघे एका मॉलला आले. तिथून ती कपड्यांच्या सेक्शन मध्ये गेली आणि तिला हवे तसे कपडे घेऊन लगेचच परत आली.

"झालीही शॉपिंग ." विश्वा आर्श्चय कारक होऊन पाहत होता.

"हो ." भक्ती.

त्याचा त्यांच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. त्याने अस ऐकलं होत की मुलींच शॉपिंग संपतच नाही पण भक्तीला मोजून अर्धा तास लागला होता. ती बॅग्स घेऊन बाहेर आली होती. त्याने खांदे उडवले आणि तिच्या हातातील बॅग्स घेऊन गाडीत बसला.


घरी आल्यावर आईच्या रुममध्ये गेली तर आई आराम करत होती म्हणून आवाज न करता ती तिच्या बेडरुममध्ये आराम करायला गेली. विश्वा तिला सोडून ऑफिसला निघून गेला. अंजली उठल्यावर भक्तीने तिला काय काय शॉपिंग केली. ते सर्व अंजलीपुढे ठेवले.

"भक्ती काय हे तू सर्व आमच्यासाठीच आणले, तुझ्यासाठी काहीच नाही?" अंजली आणलेल्या कपड्याकडे पाहत म्हणाली.

"आई, माझ्याकडे भरपूर ड्रेस आहेत. हे तुझ्यासाठी, रमाकाकू साठी आणलेत. आपण तिकडे गेल्यावर हे घालायचे आहेत." भक्तीने हा निर्णय सांगूनच टाकला आणि उद्याच्या तयारीला लागली. सर्वात आधी आईच्या बॅगमध्ये औषधे भरली. आईला लागणाऱ्या वस्तू काळजीपूर्वक भरल्या, नवीन ड्रेस बॅगेत पॅक केले. रात्रीचे जेवण झाले तसे अंजलीने तिला जबरदस्ती तिच्या बेडरुममध्ये पाठवले. ती पाय आपटतच त्यांच्या रुममध्ये आली, तेव्हा विश्वराज बेडवर आडवा तिडवा झोपलेला होता.(मुद्दामहून तिला त्रास देण्यासाठी त्याची नाटकं दुसर काय?) त्याचं जोराजोरात घोरणे चालू होतं.

"ये उठंऽऽ उठंऽऽ, मला झोपायच इथे? इतका मोठा बेड आहे तरीही कसा पसरलाय अजगरासारखा." भक्ती वैतागत म्हणाली.
इतके दिवस दोघेही शांत होते. त्याला अस झोपलेलं पाहून तिला राग आला.

"काय कटकट लावाली आहे गं तू, रात्रीच्या वेळीस लोक झोपतात आणि तू काय बडबड करतेय झोपू दे मला." विश्वराज बोलून पुन्हा झोपत म्हणाला.


क्रमश ..