भेटली तू पुन्हा ! भाग - अकरा

भक्तीराज
भेटली तू पुन्हा ! भाग - अकरा


सकाळची सूर्याची सोनेरी किरणं हळूहळू उगवत होती. सगळीकडे त्या तेजाची लालीमा पसरली होती. भक्तीला जाग आली. डोळे उघडल्यावर राजचा चेहरा नजरेस पडला आणि तिच्या ओठांवर गोड हास्य पसरले. त्याच्या कपाळावर ओठ ठेवून त्याच्या अंगावर ब्लॅकेट ओढून ती उठली.. फ्रेश होऊन आली आणि बाहेर बाल्कनीत मॅट टाकून योगा आणि प्राणायम करू लागली. योगासने आणि प्राणायम करून ती मांडी घालून डोळे मिटून लांब श्वास भरत ॐ चा उच्चार करत मेडिटेशनला बसली. पंधरा वीस मिनिटानंतर दोन्ही हातांच्या तळव्यांना एकमेकांवर घासून डोळ्यावर ठेवत चेहऱ्यावरून फिरवला. डोळे उघडून खाली अंथरलेला मॅट उचलून त्याची गोल घडी घालून त्याला त्याच्या जागेवर ठेवून दिला. बाल्कनीतल्या रेलिंगला पकडून  ती इकडे तिकडे बघत होती. इतक्यात तिचं लक्ष समोरील बंगल्याच्या रूममधल्या बाल्कनीत गेलं आणि तिचे डोळेच मोठे झाले.  हृदय धडधडायला लागलं.. तिने डोळे बंद केले.. जणू हा तिचा भास असावा पण भक्तीने एक डोळ्याची पापणी हळूहळू वर वर करत उघडला आणि तिला आता समजले की हा तिचा भास नाही तर तो खरचं इथे आलेला आहे.. हो तो दुसरा तिसरा कोणी नसून विश्वराज होता.. हो तोच तिथल्या चेअरवर बसून हातात कॉफी मग घेऊन तो तिच्याचकडे बघत गालात हसत होता. हळूहळू तिच्या कपाळावर आठ्या जमा झाल्या. त्याने हातातील कप उंचावत तिला दाखवला.

“हूँ s” नाक उडवत ती घरात निघून गेली. बाल्कनीतील दरवाजाची स्लाइड खाडकन बंद करून पडदेही ओढून घेतले. तो हसला. 

‘हे इथे खरचं. स्वप्न नाहीये ना माझ.’ अजूनही तिला विश्वास वाटत नव्हता. तिने जोरात आपल्या हाताला चिमटा घेतला.

‘आई गं..” तोंडातून त्रासिकआवाज आला आणि पटकन दुसऱ्या हातानी त्यावर चोळू लागली..

“ काय झालं मम्मा.” तिचा आवाज आणि चेहरा बघून राज उठून म्हणाला.

“ उठलास बच्चा.”

“ हो पण तू का ओरडलीस.”

“हं..  मुंगी चावली वाटत मला ..तू ते सोड. मी पटकन फ्रेश होऊन येते.” ती पटकन बाथरूममध्ये गेली. आवरून ती बाहेर आली पण राज रूममध्ये नव्हता..

“राज व्हेअर आर यू.” ती पायऱ्या उतरत राजला हाक मारत होती..

“ताईसाहेब, राज बाळ बागेत आहे.” 

“ बरं काकू मी बघते त्याला.” बोलून ती बाहेर बागेत आली. राज बाहेर झाडांना पाणी देत होता.

“ राज..”

“ रोज नानू आणि मी झाडांना पाणी देतो. ते नाही म्हणून आज मी देतो”

“हो … चल आवरून घे लवकर. . नाश्ता करायचा आहे.” तिने पाण्याचा पाईप बंद करून बाजूला ठेवला.  रूममध्ये जाऊन पटकन बाथरूममध्ये शिरला.. भक्तीने त्याची अंघोळ करून त्याला छान तयार करून त्याला खाली घेऊन आली.. टेबलवर नाश्ता लावून दोघंही गुपचूप नाश्ता करत होते.. भक्तीही काही बोलत नव्हती.. ती विचारांमध्ये हरवली होती.

“मम्मा, काय झालयं थोडी टेन्स् दिसतेस?” राज तिचा चेहरा बघत होता.

“काही नाही रे बच्चा … असचं ऑफिसच्या कामाचा विचार करतेय पण तुझं खूपच लक्ष असचं माझ्याकडे.” ती त्याचे केस विस्कटत हसून म्हणाली.

“द्यावं लागतं Because you are my responsibility.” राज शहाण्या माणसांसारखा बोलला. हे ऐकून भक्ती ही आश्चर्य चकीत होऊन स्तब्धच झाली. डोळ्यांची पापण्यांची काय ती जलद गतीने उघडझाप होत होती.. 

“अशी काय बघतेस तू.” तिच्या मोठमोठ्या झालेल्या डोळ्यांकडे पाहून राज बोलत होता.

“नानू घरी येत नाही तोपर्यंत तू माझीच जबाबदारी आहे.” राज तिचा चेहरा निरखून गंभीरपणे बोलत होता..

“कोण बोललं तुला?” तिने त्यालाच विचारले.

“ नानू म्हणालेत मला. तू ऑफिसला जात नाहीये का?” त्याने तिलाच उलट प्रश्न केला.
 
“नाही… बाबा जोपर्यंत घरी येणार नाही तोपर्यंत वर्क फ्रॉम होम करणार.. ऑफिसला गेल्यावर ही माझं मन लागणार नाही.” भक्ती शांतपणे बोलत होती.

“महत्त्वाचं असेल तर जाऊ शकतेस मम्मा. इथे काकीआजी आहेत.. don't worry about me  I will take care of everything”

“ हम्म मला समजलं ते तू जबाबदारीने माझी काळजी घेणारा मुलगा आहेस. तरीपण अर्जंट असेल तर जाणार मी.”

“ओके. तुझी इच्छा.” तो खांदे उडवून खेळायला गेला. कालची पूर्णतः सुट्टी असल्याने बरीचशी कामे बाकी होती तिच आता आवरत होती. रूममध्ये जाऊन लॅपटॉप समोर घेऊन बसली. मोबाइल ऑन केला तसे मॅसेज आणि मिस्ड कॉल्स् दिसत होते.. त्यात लिलीचे कॉल्स दिसत होते...
भक्तीने लगेच कॉल केला.

“ लिली व्हेअर आर यू.” 

“दहा मिनिटांमध्ये येते.” भक्तीने बोलून फोन कट केला.. ती आलेले इमेल बघत होती. पुन्हा भक्तीचा फोन रिंग झाला.. चेहऱ्यावर वैतागलेले भाव जमा झाले..

“ येस मिस्टर अभ्यंकर..” ती रागावर कंट्रोल ठेवून बोलत होती.


“मिस रणदिवे मी माझ्या नवीन बंगलोत शिफ्ट झालो असल्याने संध्याकाळी माझ्याकडे छोटिशी पार्टी आहे. प्लिज तुम्ही यावे अशी माझी विनंती आहे..” विश्वराज

“एक्स्ट्रीमली सॉरी मिस्टर मी पार्टीज अटेंड करत नाही.” ती नम्र स्वरात नकार देत बोलली.

“या पार्टीत आपल्याच कंपनीतील आहे मिस रणदिवे. जास्त नाही मोजकेच लोकांना निमंत्रण दिलं आहे. तुम्हाला माझा ॲड्रेस तर माहितीच आहे. तुमचा शेजारचा बंगलो. आम् वेटिंग ...”

“हॅलो..मिस्टर ..” भक्ती बोले पर्यंत त्याने बोलून कॉल कट केला.

“ सडलेलं कारलं.. लय उड्या मारून राहिला हा.. म्हणे माझा ॲड्रेस माहिती आहे की नाही.. शेजारीच तर आलाय मला त्रास द्यायला… वाट पाहत राहा नाही येणार माकडतोंड्या..” ती  वाकडतिकड चेहरा करून बडबडत होती..तिची प्रचंड चिडचिड होऊ लागली. राज आणि हे समोर आले तर? बाप्पा … मी काय करू?” ती विचार करतच अचानक तिच्या डोळ्यांत चमक आली.

“ हेच बेटर राहिलं.” भक्ती तिच्या पुढच्या कामाला लागली. डोअरबेल वाजली. रेखा काकूने दार उघडलं.

“या दिदी…ताईसाहेब त्यांच्या खोलीत आहे.” त्या चेहऱ्यावर स्मित ठेऊन बोलत होत्या..

“ओके काकू. मी रुममध्ये जाते.” ती वर रूममध्ये निघून गेली. दारावर नॉक करून ती आत आली..

“मॅम हे इन्वेटिशन कार्ड.” तिने भक्तीच्या पुढ्यात कार्ड धरले.

“कोणाच ?”

“मिस्टर अभ्यंकर यांच.” 
तुला दिलयं नं मग जा तू.”

“ मॅम मला कशाल देतील ते? तुमच्या नावे आहे ते.”

“ मिस्टर अभ्यंकरांचा कॉल येऊन गेला.  मला नाही जायचं आहे तूचं जाऊन ये.” भक्ती तोंड पाडून म्हणाली.

“मॅम आय थिंक तुम्ही जायला हवं..आता आपण त्यांच्यासोबत काम करतोय तसं बरं नाही दिसणार..” ती घाबरत बोलत होती.

“ हम्म ..” तिन हुंकार भरला.

“पण सोबत तू ही येतेय.” भक्तीने निर्णय सुनावला.

“ मी  मी  का?” 

“ तूच जायला सांगत आहे ना म्हणून आता तू ही चल .. मला जाम बोर वाटते पार्टीत.”

“ पण मॅडम संध्याकाळी मला लवकरी घरी जायचे होते ?”

“ का? आई बरी आहे ना?” भक्तीचा पुढचा प्रश्न. सोबत तिने पटापट मोबाइल लावून कॉल केला. रिंग जात होती.. पली कडून फोन उचलला गेला.

“मावशी कशी आहेस?” 

“मी अगदी ठणठणीत आहे. तू कशी आहेस बाळा?” 

“ मी छान आहे ग मावशी .. बरं ऐक ना चार पाच दिवसांसाठी 
आम्ही राजस्थानला चाललोय. ड्रायव्हर काकांना मी पाठवते तू तिची बॅग त्यांच्याकडे दे..”

“ बरं भरून ठेवते पण काय गं तू कधी येत नाही या मावशीकडे?”

“मावशी तुला माहिती आहे ना कामं किती वाढलेत माझे त्यात बाबा पण घरी नाहीयेत. येईल तुझ्या हातचे उकडीचे मोदक खायला..”

“ नक्की ये मग … पिल्लू कुठयं गं?”

“ तो खेळतोय. काळजी घे .. काही वाटलं तर मला कॉल कर ..चल ठेवते मी.” भक्तीने बोलून फोन कट केला.. भक्ती तिच्या माणसांची काळजी घेत होती मग ती कंपनीतील एम्पॉली असो वा घरातील काम करणारी गडी माणसं ..

“मॅम हे राजस्थानच कधी ठरलं? पण मी तिथे येऊन काय करू त्या तुमच्या फ्रेंड आहेत.”

“आत्ता थोड्यावेळापूर्वी ठरलं. तिने पूर्ण परिवाराला बोलवलयं सो तूही माझ्या परिवारातील सदस्य व पर्सनल सेक्रेटरी आहेस  मग तू नको का?” भक्तीच वाक्य लिलीच्या मनाला स्पर्शून गेलं. ती एकसारखी पाहतच राहिली.

“अशी बघत बसू नकोस. जा पटकन तयारी लाग आणि गिफ्ट अरेंज करं?”

“ओके मॅम पण काय घेऊ?” लिलीला प्रश्न पडला

“तुला आवडेल ते घे.”  भक्ती बोलून ती तिच्या कामाला लागली.. तरीही लिलाचा मोठा प्रश्न तसाच कायम होता. ती विचारात पडली. तिच्या चेहऱ्यावर गोंधळलेले भाव बघून ती काय विचार करते हे भक्तीला समजले.  

“बाप्पाची मूर्ती घेऊन ये आणि ऐक आपल्या न्यू वेडिंग कलेक्शन मधला डिझायनर रॉयल ब्लू गाऊन आणि त्यासोबतच सूट तोही पॅक करून घे अनन्या आणि तिच्या मिस्टरांसाठी..” भक्ती लॅपटॉपवर लक्ष ठेवून बोट चालवत काम करत लिलीसोबत बोलत होती. भक्तीच्या ऑर्डर फॉलो करून लिली तिच्या कामाला निघून गेली. 


संध्याकाळी सहाच्या सुमारास ती तयार व्हायला लागली. तिने एक फॉर्मल ड्रेस बाहेर काढला…

“मॅम हे काय करताय ?” लिली मोठ्याने ओरडली.

“ लिली. ..  किती घाबरले मी, एवढ्या मोठाने ओरडायला काय झालं तुला?”

“हा ड्रेस पार्टीसाठी वेअर करणार ..” भक्तीच्या हातून लिली ने ड्रेस ओढून घेतला आणि त्याला जिथे होता तिथेच लटकवला..


“ मग काय ह्या ड्रेसवर येऊ?” भक्तीने स्वतःच्या  कपड्यांकडे हात दाखवत..

“ मी काढून ठेवते तोपर्यंत तुम्ही फ्रेश होऊन या.” लिलीने तिला बाथरूम मध्ये पिटाळले. भक्ती फ्रेश होऊन बाहेर आली.. 

“हि साडी कशाला काढलीस तू?” ती चिडून म्हणाली..

“मम्मा किती सुंदर साडी आहे. तू वेअर करणार? मला बघायचं यात तुला..” साडी न्याहळत राज तिला गळ घालत होता.

“पण पिल्लू ..” 

“मम्मा प्लिज ..” त्याने क्यूट चेहरा केला. ती लगेच पाघळली. त्याला नाराज करणं तिला जमत नव्हतं..त्याच्या केसातून हात फिरवून ती चेजिंग रूममध्ये गेली..

क्रमश ..
भेटूया पार्टीत

©® धनदिपा ..
११/८/०२४


🎭 Series Post

View all