भेटली तू पुन्हा !

ती आणि तो येतील का जवळ
तब्बल साडेचार वर्षानंतर ती मुंबईत पतरणार होती.विमानतळावर त्याचं विमान लॅंड झालं तसं ती टक टक तिच्या सॅण्डलचा आवाज करत बाहेरच्या दिशेने येत होती. तिने एप्रिकॉट ऑरेंज कलरचा ब्लेजर पॅन्ट घातलेली आणि डाव्या हातात पर्स आणि उजव्या हाताच बोट पकडून चार वर्षाचा   क्यूट लहानगा चालत होता.  तिच्यासोबत तिची सेक्रेटरी मिस लिली येत होती. सोबतच तिचे बाबा रावसाहेब ही होते. रावसाहेबांनी राजकारणातून निवृत्ती घेऊन त्यांची मुलगी आणि नातवा सोबत पुढचं आयुष्य आनंदात व्यतित करत होते. 

“लिलीऽऽ

“येस मॅमऽऽ

“मिटिंगच्या डिटेल्स् चेक करून घेऽऽ आणि त्यानुसार लवकर मिटिंग अरेंज करून प्रिप्रिएशन करं .. मला इथे जास्त वेळ राहायचं नाहीये. जेवढ्या लवकर मी इथून जाणार तेच माझ्या आणि राजसाठी चागलयं.”

“हो मॅम ..”

“जर मला आधीच माहिती असतं की मला मुंबईत यावं लागेल तर मी ती डिल केलीच नसती.” ती त्रासिक चेहरा करून बोलत होती.

“डोन्ट वरी मॅम, आपली मिटिंग झाली की आपण इथून लगेच निघू.”

“हम्मऽऽ”

“मिठू, किती अस्वस्थ होतेय बाळा.” रावसाहेब तिच्या हातावर थोपटत म्हणाले. ते गाडीत बसून निघाले. गाडीने घरच्या वळणाला लागली.

“मी ठिक आहे बाबा.” ती शांत होऊन म्हणाली. ती खिडकीतून बाहेर बघत होती. ती ठिक असल्याचं दाखवत जरी होती तरी  तिची अस्वस्थता बाबांना ही समजत होती. बाहेरून कठोरपणेचा आव जरी आणत असली तरी आतून खूप हळवी झाली होती. त्यांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला. तिने त्यांच्याकडे पाहिलं आणि डोळ्यांतील अश्रू गालावर ओघळलाच.. या शहरात खूप आठवणी आहेत. त्याच एक एक करून आठवत होत्या.

“नको ना मिठूऽ. तू म्हणत असशील तर आपण लगेच निघूया पण तू त्रास करून घेऊ नको.”

“मी आता कसलाच त्रास करून घेणार नाही बाबा . पण इथे आल्यावर .. म्हणूनच इतके वर्ष नाही आले मी.” ती अगतिक होऊन म्हणाली.

 तिने बाबांच्या खांद्यावर डोक ठेवले. रावसाहेबांनी हळूच तिच्या डोक्यावर थोपटले. मांडीवरच्या त्याने हलकिशी चुळबूळ केली. डोक्यावर थोपटत त्याला झोपवलं आणि तिही डोळे मिटून बसली. घरी पोहोचल्यावर गणू काकाने त्यांच्या सामानाच्या बॅग्स् घेऊन  आणि रेखा काकूने  त्यांना ओवाळून आत घेतले. (त्यांचा बंगला सांभाळणारे दाम्पत्य) 

वॉवऽऽ नानू किती सुंदर आणि किती मोठं घरं आहे.” तो आत आल्यावर सर्वत्र नजर फिरत म्हणाला आणि लगेच फिरायलाही निघाला. 

“मम्मा, बघ इथून सी व्ह्यू दिसतोय ..” समोर समुद्राकडे बघून तो आनंदाने उड्या मारायला लागला होता. “मला मज्जा येणार आता स्विम करायला. हो ना नानू..”

“हो ..”

“मम्मा, आपण इथेच राहूया.”

“ नाही राज .. आपण इथे नाही राहणार; माझं काम झालं की इथून लगेच निघूया.” ती पटकन म्हणाली.

“व्हाय मम्मा ..”

“ सद्धातरी तुझ्या प्रश्नांच उत्तर नाही देऊ शकत.”

“प्लिज गिव्ह मी अन्सर मम्मा.” तो हट्ट करत म्हणाला.

“नो मिन्स् नो राज..” तिचा आवाज थोडा वाढला.

“मिठ्ठूऽऽ.” बाबांनी तिच्याकडे पाहिले.

“सॉरी बाबा .” म्हणत ती निघून गेली.

“ नानू, मम्मा का नाही म्हणतेय?”

“ बाळा, आईच ऐकायचं ..आई नाही म्हणतेय त्याला काही कारण असेल.

“ पण ती सांगत ही नाहीये.”

“ सांगेल ती पण, योग्य वेळ अजून आली नाही.”

“मग केव्हा येईल.” त्याचा पुढचा प्रश्न तयारच होता..

“ती वेळ लवकरच येईल आता पुरे तुझे प्रश्न … चल आपण थोडावेळ बाहेर फिरून येऊ.”


“हो .. पण त्या आधी मम्मला सॉरी बोलून येतो..” 

“शहाणं बाळं माझं.” त्यांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हटले.
 पळतच तो रूममध्ये गेला. 

ती फ्रेश होऊन आलेली आणि वोर्डरोब मध्ये कपडे लावत होती 
त्याने तिच्या गळ्यात हात टाकले तिच्या गालावर पप्पी देऊन तिला “सॉरी ममा” म्हणाला.

“आय अल्सो सॉरी बाळा, मी तुझ्यावर चिडायला नको होतं.

“हम्म ..  तेही अशा स्मार्ट ॲण्ड हॅण्डसम मुलावर चिडलीस तू.” त्याने त्याचे समोरचे केस उडवले.

“ म्हणूनच सॉरी बोलतेय ना पिल्लू..” तिने त्याचा गाल ओढून त्यावर ओठ ठेवले.

“जा फ्रेश हो .. तुला खायला तुझ्या आवडीचं काही बनवते . ती खाली किचनमध्ये निघून गेली.. रेखाकाकूने आधीच तयारी केली होती. राजने जेवण करून नानूसोबत बीच वर फिरायला गेला. खेळून आल्यामुळे फ्रेश होऊन दूध पिऊन लगेच तिच्या कुशीत शिरून झोपी गेला. 


“ मम्मा, मला भूक लागली.”  सकाळ झाली तशी त्याची भुक चाळवली.  तो त्याच्या मम्माला झोपतून उठवत म्हणाला. तसे तिने डोळे किलकिले करून उघडले. रात्री विचारांच्या तंद्रीत तिला पाचच्या सुमारास झोप लागली होती.

“हे हनी गुडमॉर्निग..“ त्याच्या कडे हसून गालावर ओठ ठेवून तिने त्याला कुशीत घेतले.

“मम्मा गेटअप मला भूक लागली.”

“हो का , चला मग आपण ब्रेकफास्ट करू.

ती त्याला घेऊन बाथरूम मध्ये गेली.तिने त्याच्या टूथब्रश वर पेस्ट लावून त्याचे दात स्वच्छ करू लागली तसे त्याने ब्रश त्‍याच्या हाती घेतला.

ओ मम्मा आय अँम ग्रोनप नाऊ … मी माझं करतो 

“पण  माझ्यासाठी तर तू छोटाच आहे. व्यवस्थित क्लीन कर.” ती पटकन फ्रेश होऊन नाश्ता बनवण्यासाठी निघून गेली.


किचनमध्ये गेल्यावर  नाश्ताची तयारी करायला सांगितली. 

ताईसाहेब तुम्ही बसा मी करून आणते. काय करायचं तेवढं सांगा.

“नाही काकू , नाश्ता मी बनवते. तुम्ही मदत करा आणि जेवण तुम्हीच करा आणि राज आणि बाबाला वेळेवर जेवण द्या. 

“बरं ताईसाहेब .. काय काय बनवायचं ?” रेखाकाकूने विचारले तसं ती सांगू लागली.

“होय ताईसाहेब.” रेखा काकू त्याप्रमाणे करत होती.

 “राजऽऽ चल बेकफ्रास्ट रेडी झालाय.” ब्रेकफ्रास्ट टेबलवर लावून तिने त्याला आवाज दिला.

“बाबा चला नाश्ता तयार आहे.” बाबांना ही ती स्टडीरूममध्ये बोलायला निघून गेली. 

 नाश्ता सर्व्ह करून ती राजला नाश्ता भरवत बसली. तो ही मधून छोट्या छोट्या हातानी तिला भरवत होता.


“नानू आपण आता गेम खेळूया.”

“हो .. खेळू .”

“येss“ तो आनंदाने ओरडत होता.

“आधी खाऊन घे.”

“ओके मम्मा. “

“गुड .” तिने त्याच्या कपाळावर ओठ ठेवले.


बाबा मी थोड्यावेळात मिटिंगसाठी निघतेय.हवं तर तुम्ही राजला बाहेर घेऊन जा. जेवणेच्या वेळेपर्यंत येण्याचा प्रयत्न करेल.


“मम्मा लवकर ये तू बाहेर गेल्यावर खूप मिस करतो तुला.


“ओह्ह! मी पण खूप मिस करते माझ्या पिल्लूला.” तिने त्याला हदयाशी कवटाळले.

“नानू सोबत फिरायला जा तोपर्यंत मी येते. ओके. नाऊ स्माइल प्लिज. ती तयार होऊन त्याच्या गालावर ओठ ठेवले.. त्यानेही तिच्या गालावर पप्पी दिली मग ती घराबाहेर पडली.
गाडीत बसून ती तिच्या सेक्रेटरी म्हणजे लिली सोबत आजच्या मिटिंग विषयी चर्चा करत होती. थोड्याचवेळत त्यांची कार एका भल्यामोठ्या इमारतीजवळ आली. खाली उतरून ती त्या बिल्डिंगकडे एक नजर टाकली. एक हलका उसासा सोडला आणि ती आत शिरली. लिलीने आधीच रिसेप्शनिस्ट कडे तिचे कार्ड दाखवून दिले होते त्यामुळे त्यांना केबिनमध्येच पाठवलं. मिस्टर शहा त्यांची वाटच पाहत होते. त्यांनी तिचं ग्रीट करून वेलकम केले.


“मिस्टर शहा मला मध्येच बोलवणं का पाठवलं? माझं काम तुम्हाला वेळवर तुमचे डिझाइनर ड्रेस देणं मग तुम्ही मला का बोलवून घेतलं आणि येणचं भाग होतं तर लिली आली असती मग मलाच का?” तिने मनात असलेला प्रश्न विचारला. शहा यांच्या कॉल वरून अर्जंट बोलवण्याने ती मुंबईत आली होती. 

“मिस रणदिवे अॅम सॉरी दॅट पण ही मिटिंग महत्त्वाची आहे. शर्मा यांनी ही कंपनी ‘मिस्टर अभ्यंकरला’ हॅन्ड ओव्हर केली आहे.

“काय ..” नाव ऐकून तर तिचे डोळे एकदम मोठे झाले. 
तरीही इथे माझं काय काम होतं. मालक कोणी का असेना याच्याशी माझं काही देणघेणं नाही मिस्टर शहा.”

“मिस रणदिवे .. ट्राय टू अंडरस्टँड..”  या बोर्डमिटिंगला सर्व हजर राहणार गरजेचं होतं. मिस्टर अभ्यंकर या कंपनीचे नवीन ओनर आहेत आणि तशीच ऑर्डर होती. सो …” तो विनवत होता

“ येस मिस्टर शहा ..” ती विचारात गुंतली.


‘वि… श्व… राज …  नाही नाही ते नसणार दूसर कोणी असेल. .. हो.. हो .. ते कशाला येतील  इथे .. त्यांना जर आदि बद्दल माहिती पडलं तर? ते दूर करतील … नाही नाही मी असं काहीही होऊ देणार नाही.… हे अभ्यंकर दूसराच व्यक्ती असणार ..हो हो .. जगात एकसारखे नेम सरनेम असणारे भरपूर लोक असतात.’ स्वतः प्रश्न निर्माण करून तिच त्या प्रश्नांची उत्तरे देत होती.

क्रमश ..

कोण आहे विश्वराज आणि ती काय लपवतेय ? आजचा भाग वाचून काही तर्क लागला का? कदाचित लागेलही आणि नाही ही कारण खूप महिना नंतर आज लिहण्याचा ॥श्री गणेशा॥ करत आहे. त्याकरीता तुमची साथ मोलाची आहे. आशा आहे तुम्ही द्याल. आजचा भाग कसा वाटला ते नक्की कळवा. कमेंट करा म्हणजे मी पुढचा भाग लवकर घेऊन येते. आज आहे ईराचा पाचवा वर्धापनदिन. तुम्हा सर्वांना आणि माझ्या ईराला खूप खूप शुभेच्छा .. ईरावरील नवनवीन कथांचा आनंद घ्या. भेटूया पुढच्या भागात. 

©® धनदिपा
११/४/ २०२४

🎭 Series Post

View all