भेटली तू पुन्हा ! भाग -२

दुरावलेले एकत्र येतील का ?
भाग - दूसरा


‘वि… श्व… राज … नाही नाही ते नसणार दूसर कोणी असेल. .. हो.. हो .. ते कशाला येतील इथे .. त्यांना जर आदि बद्दल माहिती पडलं तर? ते दूर करतील … नाही नाही मी असं काहीही होऊ देणार नाही.… हे अभ्यंकर दूसराच व्यक्ती असणार ..हो हो .. जगात एकसारखे नेम सरनेम असणारे भरपूर लोक असतात.’ स्वतः प्रश्न निर्माण करून तिच त्या प्रश्नांची उत्तरे देत होती.नाव ऐकल्यापासून ती थोडी अस्वस्थ झाली होती. शहाच्या सेक्रटरीने सर्व आल्याचे सांगितले मग शहा आणि तिही मिटिंग हॉलकडे निघाले. सगळे गोलकार टेबलावर बसून हॉलच्या इंन्ट्रासकडे लक्ष ठेवून होते. कंपनीचे मालक अजून आलेले नव्हते. घड्याळाचा बाराचा ठोका पडला आणि आत अभ्यंकर बुटांचा टकटक आवाज करत आले. एक रुबाबदार व्यक्ती आत आले तसे ती एकक्षण श्वास घ्यायची विसरली. शहा यांनी त्याला वेलकम आणि फुलांचा बुके देऊन स्वागत केलं.

“सगळ्यांना माहित असेल तरीही मी यांची ओळख करून देतो. हे आहेत मिस्टर विश्वराज अभ्यंकर आपले नवीन ओनर” शहा यांनी ओळख करून दिली.

“हॅलो एवरी वन. जशी आजपर्यंत या कंपनीला साथ दिली तशीच यापुढेही द्याल.” तो गोड हासत म्हणाला.

शहा एकेक करून प्रत्येकांची ओळख करून देत होते. ती मूर्तीसारखी उभी होती. तो समोर उभा होता. तिचे डोळे पाण्याने भरून आले. महतप्रयासाने तिने त्यावर आवर घाताला. मागील चार वर्षाचा भूतकाळ तिच्या नजरेसमोर येत होता.

“या आहेत मिस रणदिवे ‘ए आर’ कंपनीचे मालक.” शहांनी तिची ओळख करून दिली. तसा त्याने तिच्यापुढे शेकहॅन्ड करीता हात पुढे केला. तिनेही चेहऱ्यावर वरवर हास्य ठेवून हात मिळवणी केली. त्याने तिचा हात जरा घट्टच दाबला. तो तिच्याकडे एकसारखा पाहत होता. चार वर्षांनंतर ती आज त्याच्यासमोर आली होती. पटकन तिला मिठीत घ्यावं असं त्याला मनोमन वाटत होतं. अजूनतरी त्याची इच्छा पूर्ण होणार नव्हती. कारण आता परिस्थिती बदलली होती. वेड्यासारखी प्रेम करणारी तिचा प्रेमावरचा विश्वास हरवला होता. तिच्या कपाळावर हलकाशी आठी पडली.


“प्लिज लीव माय हॅन्ड मिस्टर अभ्यंकर.” ती निर्विकार चेहऱ्याने म्हणाली तसा तो विचाराच्या गर्तेतून बाहेर बाहेर आला.

“ मी हा हात कधीच सोडणार नाहीये.” तिला पाहून तो मनात बोलत होता.

“या सॉरी.” तो म्हणाला.

“मिटिंगला सुरवात करूया.” ती मिस्टर शहांकडे बघून म्हणाली.

मिटिंगला लगेचच सुरवात झाली.

शहा यांनी बोलायला सुरवात केली. ते जसे बोलत होते तसे भक्तीच्या डोळ्यात राग उतरत होता. त्यांनी काही डॉक्यूमेंट ची कॉपी सगळ्यांसमोर ठेवण्यात आली. त्यात काही अटी ही ठेवण्यात आले होते.


“व्हॉट मिस्टर शहा .. हे काय नवीन आहे .. मी आधीच माझे डिझाइन तयार करून त्यानुसार काम ही करण्यात आले आहे आणि मध्येच मिस्टर अभ्यंकर यांना ते डिझाइनमध्ये बदल हवेत..”

“ओके देन मी इथेच थांबते. तुम्ही दूसरी डिझायनर घेऊ शकता.”

“भक्ती ... विश्वराज .

“मिस. रणदिवे. “ ती नावात करेक्शन करत मिस रणदिवे यावर जोर देत म्हणाली.. त्याने एक उसासा सोडला.

“मिस रणदिवे .. हाती घेतलेलं काम असं कसं अर्धवट सोडू शकता? हेच जमते का तुम्हाला?” तो त्याच्या आवाजात करारीपणा आणत उपहासाने म्हणाला.

’जशी मला अर्ध्यावर साथ सोडून गेली.’ हे तिला ऐकू जाईल असं हळूच म्हणाला. तो एक प्रकारे डिवचत होता.

“मला ते डिझाइन आवडले नाही असं नाहिये. आपण शोमध्ये ते डिझायनर कपडे लॉन्च करणार आहोत. तो एक ब्रॅन्ड आहे. त्यानुसारच आपल्याला करावं लागणार आहे.”


“इफ यू डोन्ट् माईंड मला त्या डिझाईन मध्ये थोडे चेंजेस करायचे आहेत.”

ती शांत बसली.

“ओके .. मी तयार आहे आणि मिस्टर अभ्यंकर एकवेळ हाथी घेतलेलं काम मी कधीच सोडत नाही पण काही गोष्टी सोडून दिलेलं योग्य असतं. तुम्ही तुमच्या रिक्वायरमेंट सांगा. मी लगेच कामाला लागते.” तिने लांब श्वास भरून सोडला..

“हे काम मलाच लवकरात लवकर पूर्ण करून इथून जायचे आहे.” ती ओठांत पुटपुटली.

“ काही म्हणालात का मिस रणदिवे ?”

“नाही मिस्टर अभ्यंकर.” ती चेहऱ्यावर जबरदस्तीची स्माईल आणत होती.

“लिली ऽऽ ... तिला काय सांगायचं समजून लिली लगेच समोर बसून लॅपटॉप मध्ये नोंदवू लागली.. त्याने ही त्याच्या पीए ला डिटेल्स दिले. तोही बाकींच्यामध्ये बोलण्यात व्यस्त झाला. भक्ती मधूनच त्याला एकटक न्याहळत होती. किती वर्षानंतर ती त्याला बघत होती. तोच चार्म अजूनही तसाच चेहऱ्यावर झळकत होता. तो फॅशन इंडस्ट्रीमध्ये येईल हा विचार तर तिने कधीच केला नव्हता. त्याची बोलण्याची लकब, चालण्याची स्टाईल, विचार करतांना पायावर पाय ठेवण्याची स्टाईल अगदी ‘तशीच जशी चार वर्षा आधी होती .... पर्सनॅलिटी तर त्याची आधीपासूनच भारदस्त होती. पण आता तर अधिकच उठून दिसत होता. आधी दाढी ठेवणारा आता क्लीन शेव करून होता. त्यातही जास्तच डॅण्डसम दिसत होता. त्या लूकमध्येही तो कातील दिसत होता. त्याला बघण्यात हलकेच तिचेही ओठही रुंदावले.दुसऱ्या क्षणी त्या वाईट आठवणीने शिरकाव केला आणि डोळे भरून आले.. अचानक त्यानेही तिच्याकडे नजर वळवली. दोघांची नजरानजर झाली. तिने लगेच डोळे बंद करून त्या अश्रूंना डोळ्यांतच थांबवले तरीही त्याच्या नजरेत तिचे पाण्याने भरलेले डोळे हेरले होते. ती काय विचार करत असेल हे त्याला जाणवले. तिचा चेहरा बघून त्यालाही गलबलून आले. उठून तिला सरळ मिठीत घ्यावं आणि एकदा मला बोलयची संधी दे .. मी सर्व ठिक करेल. आय प्रॉमिस प्लिज फक्त एकदा! त्याचे मन आतून आक्रोश करत होते. विश्वराजने पाण्याचा ग्लास तिच्यापुढे सरकवला.. तिने त्याच्याकडे साफ दुर्लक्ष केले. आता तिच्या डोळ्यांत त्याला त्याच्याबद्दल राग दिसत होता. मिंटिगला बऱ्याच वेळ झाला होता. आतातर लंचचा वेळ ही निघून गेला होता.

‘राज जेवला असेल का? मी भरवल्याशिवाय राज जेवत नाही.’ विचार करतच बाबांना मॅसेज करायला तिने पर्समधून मोबाइल बाहेर काढला. त्यावर आधीच मिसकॉल दिसत होते.


“नक्की राजनेच केला असणार “.. तिने स्मित केले आणि मॅसेज टाइप करायला सुरवात केली.

“बाबा, राज जेवला का? .. मी मिटिंगमध्येच आहे .. मला यायला वेळ लागेल. तुम्ही दोघं जेवून घ्या.” मोबाइल ठेवून ती पुन्हा मिटिंगमध्ये लक्ष देत होती. पण तिच्या ओठांवर आलेलं स्मित त्याच्या नजरेतून सुटले नव्हते.

‘ कोणाला हसून मॅसेज करतेय ही ? कोणासोबत बोलत असणार ही? हिच्या ओठांवर लगेच स्माईल आली.’ विश्वराजच्या मनात बोलत होता.

मिटिंग संपली आणि मिस्टर शहांनी सर्वांना जेवणासाठी आमंत्रित केले. शहा यांनी सगळ्यांना हॉटेलचा ॲड्रेस सेंड केला. भक्तीचा मोबाइल व्हायब्रेंट झाला.

“सॉरी मिस्टर शहा. मी नाही येऊ शकत. मला अर्जंटली घरी निघावं लागेल. वन्स अगेन सॉरी. एन्जॉय युवर लंच.” ती अदबीने म्हणाली. तिला घरी जाण्याची ओढच लागली होती.

“आय अम् कमिंग .. फोनवर बोलत निघून गेली. तिच्यामागे लिली सर्व डॉक्युमेट घेऊन निघाली.


“सॉरीऽऽ विश्वराज ती नाही म्हणाली.”

“हेऽऽऽ जतीन तू प्रयत्न केलास” .. मला ही खूप पापड लाटावे लागणार आहे.” असं म्हणत ते हॉटेलच्या दिशेने निघाले. मिस्टर शहा हे विश्वराजचा कॉलेजफ्रेंड होता.
हो जेवणाची आयडिया ही विश्वराजचीच होती. पण त्या आयडियावर भक्तीने पाणी फिरवलं होतं. जेवणाची अरेंजमेंट तर त्यानेच तर केली होती. त्यानिमित्ताने तरी तो तिला जवळून बघू शकत होता.

ती गाडीत बसून निघाली.. इतक्या वर्षातून त्याला समोर बघून हुंदका दाटून आला होता. डोळे वाहायला लागले होते. तिचं डोकं प्रचंड दुखायला लागले होते. तिने सीटवर डोके ठेवले आणि डोळे बंद केले. बंद डोळ्याआड ही विश्वराज उभा राहिला. बंद पापण्याआड ही अश्रूंनी त्यांची वाट मोकळी केली होती.

“मॅमss प्लिज.” लिलीने काळजीने तिच्या खांद्यावर हात ठेवले.

“हम्म ..” राजला काही कळता कामा नये. तिने डोळे पुसले.

“हो मॅम ..”

विचारांच्या गर्तेत तिचा डोळा लागला.

घर आलं तशी गाडी गेटच्या आत गेली.

“मॅमss” लिलीने हलवून तिला उठवले.

“पोहचलो आपण.”

“हो .”


“मम्मा किती उशीर केलास तू?” लिविंग रूममध्ये येताच राज गाल फुगवून म्हणाला.

छोट्या राजची नाराजी कशी दूर करेल भक्ती? विश्वराजला तर खूप सारे पापड लाटावे लागणार आहेत. लाट बाबा तू .. मी काय म्हणते, उन्हाळ्याचे दिवस तर आहेत मग बिबळ्या, कुरडई हे पण करूनच टाक तेवढाच तुझा बिझनेस वाढेल. बरोबर ना मंडळी ! पण पापड लाटणं ही साधी सोपी गोष्ट नाहीये. किती मेहनत असते बायकांची हे त्यांनाच माहिती आहे. विश्वराजला काय कळणार . बघूया हा कसा पापड लाटतो. आजचा भाग कसा वाटला. कमेंट करून नक्की कळवा. फॉलो केलं नसेल तर फॉलोही करा. भेटूया पुढच्या भागात.

©® धनदिपा
१२/४/२०२४

🎭 Series Post

View all