भेटली तू पुन्हा ! भाग - ३

भक्ती विश्वराज
भाग - ३


ती गाडीत बसून निघून गेली.. इतक्या वर्षातून त्याला समोर बघून हुंदका दाटून आला होता. डोळे वाहायला लागले होते. तिचं डोकं प्रचंड दुखायला लागले होते. तिने सीटवर डोके ठेवले आणि डोळे बंद केले. बंद डोळ्याआड ही विश्वराज उभा राहिला. बंद पापण्याआड ही अश्रूंनी त्यांची वाट मोकळी केली होती. 

“मॅमss प्लिज.”  लिलीने काळजीने तिच्या खांद्यावर हात ठेवले.

“हम्म ..”  राजला काही कळता कामा नये. तिने डोळे पुसले. 

“हो मॅम ..”

विचारांच्या गर्तेत तिचा डोळा लागला.

घर आलं तशी गाडी गेटच्या आत गेली.

“मॅमss” लिलीने हलवून तिला उठवले.

“पोहचलो आपण.”

“हो .”


“मम्मा किती उशीर केलास तू?” लिविंग रूममध्ये येताच राज गाल फुगवून म्हणाला.
“सॉरी बच्चा .. मिटिंग फारच वेळ चालली रे राजा म्हणून थोडासा उशीर झाला.” ती गुडघ्यावर बसून एक बोटाच्या आणि अंगठ्याने दाखवून त्याची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करत होती..

“थोडासा नो मम्मा चार तास उशिर केलास तू ..” त्याच्या छोट्या कपाळावर हलकशी आठी उमटली.

“सॉरीऽऽऽ” तिने पटकन त्याला जवळ घेतले.

भक्ती सोफ्यावर जाऊन बसली. राज पटकन आत जाऊन पाण्याचा ग्लास घेऊन आला.

“खूप थकलेली दिसतेय मॉम एव्हरीथिंग इज ओके आणि तुझे डोळे ही रेड झालेत?” तो एकदम पझेसिव मम्माज् बॉय होता. तिच निरक्षण करून विचारत होता.

“हो रे बाळा, सगळं ठीक आहे … येतांना डोळ्यांत कचरा गेला तेव्हापासूनच डोळे चूळचूळताय.. थोडी थकलीय बट इट्स ओके आणि आता तुला पाहिलं ना तर आता माझा थकवा असा दूर पळून गेला.” ती हात पसरवत म्हणाली.

“नॉट ओके मॉम . पहिलं आधी काहीतरी खाऊन घे मग रेस्ट कर.”

“नो राज आता नको. मी नंतर जेवते. आता मस्त आलं आणि इलायची घालून कडक चहा घेते.”

“मम्मा, आज किती चहा घेतलेस तू .” तो डोळे बारीक करून कमरे वर हात ठेवत म्हणाला.

“फक्त चार कप.” लिली मध्येच म्हणाली.

“चमची कुठची.” भक्ती पुटपुटली आणि तिने नाक मुरडलं.

“व्हॉट मम्माऽऽ .. किती डेंजरस आहे ते तुला माहित नाही का?” राज डोळे मोठे करून बोलत होता.

“हाय कोलॅस्ट्रोल, हायबीपी , शुगर, ॲसिडीटी, एनझायटी, झोप न येणे आणि तुला पित्त होतं मग तू वॅकऽऽ, वॅकऽऽ करत बसते.” तो पुढे बोलतच होता की भक्तीने त्याच्या समोर तिचे कान पकडून फक्त “सॉरी” म्हटले. राजमधला डॉक्टर उफाळून वर आला होता.


“यू शुड बी सॉरी मम्मा .. मला किती काळजी असते तुझी.. आता काही नाही उदयापासून तू माझ्या फ्रेंड ने दिलेला डायट फॉलो करणार आहेस.” भक्तीने छोटासा चेहरा केला.

‘त्या रंग्याला तर बघतेस चांगली. काय काय शिकवून ठेवलयं पोराला.’ भक्ती मनात विचार करत होती.

“असा चेहरा पाडल्याने मी तुझं काहीही ऐकणार नाहीये. दॅट्सऽऽ फायनल ओके.” तो निर्णय सुनावत म्हणाला.

“अरे मी तुझी मम्मा आहे की तू माझी हेच कळत नाही मला. बाबा तूम्ही हसू नका. अरे तुझं वयं काय आणि बोलतो काय?.. चार वर्षाचा पण झाला नाहीये तू .. तुझ्या वयाला साजेस बोल ना, असं मोठ्यासारखं काय बोलतोस? मम्मा ही गाडी, खेळणं,आईस्क्रीम पिझ्झा बर्गर हे असले कधीतरी हट्ट कर ना .. तुझं तर दूसरचं असतं. एकदम माझ्या आईच्या रोल मध्ये घूसतूस तू . . .. ” दोघांची तू तू मै मै मध्ये बाबा त्यांची गंमत पाहून हसत होते. तशी ती गाल फुगवून बोलत होती..

“फर्स्ट थिंक मम्मा काहीही लॉजिक लावत बसतेस तू .. लहान मुलांनी असं बोलू नये हे कुठं लिहलयं आणि हे सर्व माझ्या फ्रेंड कडून ऐकलंय मी.”

“मिठू, राज जे बोलतोय ते बरोबर आहे. तुझं चहाचं प्रमाण वाढलं आहे.”

“सॉरी दोघांना … कमी करण्याचा प्रयत्न करेल. आता तरी मिळेल का मला चहा प्लिज?” तिने भोळा चेहरा करून दोघांकडे पाहिले.

“ओह गॉड मम्मा ..” म्हणत राजने कपाळावर हात मारला.

“ नंतर मी म्हणेल ते खावं लागेल.”

“हो खाईल मी ..” ती शहाण्याबाळासारखी मान हलवत म्हणाली.

“ओके मी फ्रेश होऊन येते. माझी चुगली केली न तू … तू … तूझी अर्धी सॅलरी कट.” ती रूम मध्ये जातांना फक्त लिलीला ऐकू जाईल असे म्हणाली.

“मॅमss” लिलीने रडका चेहरा केला.

“ आणखी चमचेगिरी कर त्याची.” भक्ती लिलीला डोळे दाखवत म्हणाली.

“मॅम प्लिज मी त्यांची इन्स्ट्रक्शन फॉलो करत होते.”

“काय खूसूरफूसर चाललयं दोघांच?” राज हनुवटीवर बोटाने टॅप करून उजवी भुवई उंचवत म्हणाला.

“काही नाही आम्ही मिटिंगबद्दल बोलतोय.” भक्तीच्या आधीच लिली चेहऱ्यावर खोटं स्मित ठेवून बोलत होती. भक्ती वर निघून गेली आणि मग लिलीही सगळ्यांचा निरोप घेऊन घरी गेली.
फ्रेश होऊन ती राजजवळ बसली, त्याच्या आजच्या दिवसातील घडामोडी जाणून घेतल्या. त्याच्यासोबत गप्पा मारल्या खेळली ..थोड्यावेळाने तो त्याच्या खेळण्यात गुंतला. तिही विचारात हरवली. काही ठरवून ती बाबांच्या रूममध्ये गेली.

“बाबाऽऽ, एक बोलायचं होतं.”

“ बोलऽऽ” ते शांत स्वरात.

“बाबा आपल्याला इतक्यात इथून जाता येणार नाही. जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी.. आणि ..” ती मध्येच थांबली.

“आणि काय मिठू ..” बाबा पुन्हा तिला पुढे बोलवायला सांगत .”

“ बाबा .. विश्वराज त्या कंपनीचे मालक आहेत आणि ह्या डिलवर ही ते काम पाहणार आहेत.”

“मग काय ठरवलसं तू ऽऽ.”

“तो ब्रॅन्ड लॉच झाला की आपण इथून जाऊया.”

“ठीक आहे काही हरकत नाही. तू म्हणशील तेव्हा जाऊ मिठू..”

“पण बाबा मला त्यांना नाही भेटायचं.”

“ कोणाला ?” न कळून प्रश्न विचारत होते.

“ त्यांना .”

“ कोणाला मिठू .” समजून न समजल्यासारखे करत.

“ मिस्टर अभ्यंकरांना .”

“हम्म .. मग नको जावू ऑफिसला किंवा डील कॅन्सल् करं.”

“ नाही करू शकत बाबा. ऑलरेडी काम सुरू झालाय. हिज् चॅलेंजिंग मी आणि आता तर मला त्यांना माझं काम पूर्ण करून द्यायचं आहे.”


“त्यासाठी तूला ऑफिसला जावं लागेल.”

“नाही मी घरूनच काम करणार, इमर्जन्सी असेल तेव्हा जाईल.”

“तुला योग्य वाटेल ते कर मी तुझ्यासोबत आहे मिठू.” त्यांनी तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. तिने वळून मागे पाहिलं. दारात राज उभा होता.

“नानू, मम्मा चला काकूने सर्वांना बोलवलयं.”

“हो चल.. बाबा.”

“तुम्ही व्हा पुढे पी एक कॉल करून आलोच.”

“हो लवकर या.”

“हो. त्यांनी एक कॉल केला. बोलून ते थोड्यावेळात डायानिंग टेबलवर जेवायला बसले..”

जेवण करून राज आणि रावसाहेब बाहेर लॉनवर फिरायला गेले.
भक्ती स्टडीरूममध्ये जाऊन तिचं काम करत बसली होती. तितक्यात तिचा मोबाइल वाजू लागला. स्क्रीनवर मिस्टर शहा कॉलिंग झळकत होतं.

“हॅलो मिस्टर शहा .. यावेळी फोन केला.”

“सॉरी फॉर दी डिस्टरबिंग मिस रणदिवे ..”

“या या इट्स ओके. बोला काय झालयं ?”

“ ते अभ्यंकर सरांना प्रत्येक आऊटफिटच डिझाइन हवं होतं..”
ओके मग मी कंपनीच्या मेलवर सेंड करते.”

“नो .. ऍक्च्युली कंपनीच्या ईमेलवर ही डिझाईन चोरी जाऊ शकता. ..इट्स बेटर वे की तुम्ही सरांच्या पर्सनल ईमेलवर सेंड करा.”

“मग मी तुम्हाला पाठवते.”

“नो मिस रणदिवे. माझ्या पर्सनल इमेलचा जरा इश्यू झालाय सो त्यांनाच सेंड करा. आणि सर ही तुम्हाला कामाबद्दल कॉल करणार आहेत.” जतीन शहाने सुचेल ते कारण दिले.

“What पण का? त्यांना असं वाटतयं का की , मी हे पूर्ण करू शकणार नाही किंवा हे काम अर्ध्यावर सोडून जाईल.” भक्ती कपाळावर आठ्या आणून बोलत होती. ‘कॉलवर बोलायची काय गरज आहे?’ हे ती मनात विचार करत होती.

“नो मिस रणदिवे असे काहीही नाही.. मी ओळखतो तुम्हाला ..” शहा पटकन बोलला .

“मग हे तुम्ही त्या सरांना समजावा आणि एक माझ्या कामामध्ये जास्त लुडबूड केलीली मला चालणार नाही. तसं असेल तर मी आत्ताच डील कॅन्सल करते. तुमचा ऍडव्हान्स दिलेला चेक मी तुम्हाला परत देते. यासाठी माझं नुकसान झालं तरी चालेल.” ती थोडी कडक शब्दांत बोलत होती.

“नाही मिस रणदिवे तुम्ही मिस अंडरस्टँड करताय. सरांना किंवा कंपनीला तुमच्यावर विश्वास नाही अशातला भाग नाहीये आणि सर तुमच्या कामात इंटर फेयर ही करत नाहीये त्याचं असं म्हणणं आहे की सर्व एकदम बेस्ट आणि त्यांच्या देखरेखी खाली व्हावं. त्यांनी ही आता कंपनी घेतलीय आणि तिला वन पोझिशन वर आणायची बस्सं! इतकीच त्यांची इच्छा आहे. तरीही तुम्हाला त्रास झाला. मी तुमची माफी मागतो.. वन्स् अगेन सॉरी मिस रणदिवे ॲण्ड गुडनाईट.” गैरसमजामुळे ती कोणताही निर्णय घेण्यापूर्वी म्हणजे डिल कॅन्सल करण्याआधी मिस्टर जतीन शहा तिची माफी मागून समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.

“गुडनाईट मिस्ट शहा.” तिने कॉल कट केला. फोन ठेवताच त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास समोर आला. तो त्याने पटकन घेऊन घटाघटा कोरड्या घशाखाली उतरवला.
मित्राची वकिली करून घसा कोरडा पडला होता. सोबतच चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते.

“तुमच्या दोघांमध्ये माझा बॅन्ड नक्की वाजणार.” जतीन म्हणाला यावर विश्वराज हसत होता.

क्रमश ..

भेटूया पुढच्या

©® धनदिपा
१५/४/२०२४

🎭 Series Post

View all