भेटली तू पुन्हा ! भाग - चार

दुरावलेले दोघे एकत्र येतील का?

भाग - चार

“नाही मिस रणदिवे तुम्ही मिस अंडरस्टँड करताय. सरांना किंवा कंपनीला तुमच्यावर विश्वास नाही अशातला भाग नाहीये आणि सर तुमच्या कामात इंटर फेयर ही करत नाहीये त्याचं असं म्हणणं आहे की सर्व एकदम बेस्ट आणि त्यांच्या देखरेखी खाली व्हावं. त्यांनी ही आता कंपनी घेतलीय आणि तिला वन पोझिशन वर आणायची बस्सं! इतकीच त्यांची इच्छा आहे. तरीही तुम्हाला त्रास झाला. आय अपोलोजाईज फॉर ऑल दिस. वन्स् अगेन सॉरी मिस रणदिवे ॲण्ड गुडनाईट.” गैरसमजामुळे ती कोणताही निर्णय घेण्यापूर्वी म्हणजे डिल कॅन्सल करण्याआधी मिस्टर जतीन शहा तिची माफी मागून समजूत काढण्याचा प्रयत्न करत होते.

“गुडनाईट मिस्ट शहा.” तिने कॉल कट केला. फोन ठेवताच त्याच्यासमोर पाण्याचा ग्लास समोर आला. तो त्याने पटकन घेऊन घटाघट कोरड्या घशाखाली उतरवला.
मित्राची वकिली करून घसा कोरडा पडला होता. सोबतच चेहऱ्यावर घामाचे थेंब जमा झाले होते.

“तुमच्या दोघांमध्ये माझा बॅन्ड नक्की वाजणार.” जतीन म्हणाला यावर विश्वराज हसत होता.


भक्तीने कॉल कट केल्यानंतर इकडे जतीनने ग्लास मधील पाणी घटाघटा संपवलं.. विश्वराज त्याची गंम्मत बघून हसत होता.

“अरे तुमच्या दोघांमध्ये माझाच बॅडऽऽ नक्की वाजेल अस दिसतयं. तोफ आहेत नुसत्या तोफऽऽ.. धडधड फायरिंग सुरू केली त्यांनी माझ्यावर जरा सुद्धा त्यांना कळलं की डिल फक्त निमित्त मात्र होतं त्यांना इथपर्यंत आणण्यासाठी तर पहिला बळी माझा जाईल.”

“असं काहीही होणार नाहीये. डोन्ट वरी.” विश्वराज त्याला आश्वस्थ करत होता. 

“सद्ध्या त्या तापलेल्या आहेत.” मोबाइल हातात घेऊन फोन लावायचा विचार करतोय की काय हे बघून जतीन म्हणाला. 

“याऽऽ… आय क्नो, मी मेलची वाट पाहतोय बघ आलाच!.” तितक्यात मोबाइल ब्लिंक झालेला तो दाखवत होता. ए आर कंपनीकडून त्याला मेल दिसत होता.  पण तो मेल तिने न पाठवता लिलीने पाठवला होता. भक्तीने लिलीला कॉल करून सर्व सांगून दिले होते. 

“हुशार आहेत मॅडम.” तो गालात हसत ओठांत बडबडला.”

“ चल मी निघतो बायऽऽ.” जतीन चेअरवरून उठत म्हणाला. 

“ओके मी ही निघतोच बाय ॲन्ड गुडनाईट.” जतीन ऑफिस मधून निघाला तरीही विश्वराज अजूनही तिथेच होता. शेवटी त्याचा खासमखास असा नेहमी सोबत असणारा कम पर्सनल असिस्टंट कम बॉडीगार्ड अमर त्याच्या केबिनच्या बाहेर दारावर नॉक करत आला.

“ येस, कमिंग ..” अमर आत आला.
 Sir, eleven o'clock is getting late.” 
विश्वराज अंगावर कोट चढवत बाहेर आला.

“सरऽऽ ऑर्डर देऊ का? ” अमर गाडी चालवत म्हणला.

“नको अमर खूप लेट जेवण झालयं.” विश्वराज टॅबमध्ये काहीतरी काम करत बोलत होता. 

“ओके सर ..” त्यांच्या गाडी बंगल्याजवळ आल्यावर सिक्युरटी गार्डने गेट उघडले. गाडी बंगल्यात आली. 

“ गुड नाईट सर.”

“ गुडनाईट.” अमर निघून गेला. आतून दरवाजा उघडला गेला. विश्वराज आत आला.

“रामुकाका तुम्ही अजून जागे का आहात? स्टाफने उघडला असता.”

“तुम्ही येत नाही तोपर्यंत मन नाही लागत साहेब.”

“किती वेळा सांगितले काका की मला साहेब नका बोलत जाऊ.”

“सवय पडली आहे साहेब ती काय सुटायची नाही. मेल्यानंतरच सुटणार ..”

“ रामुकाकू ..” विश्वास त्यांच्यावर ओरडला. आपल्या माणसांचा दूरावा सहन होत नव्हता. भावूक झाला होता तो कसेबसे त्याने भावनांवर आवर घातला.

“ पुन्हांदा नाही बोलणार.”

“भक्ती निघून गेल्यावर आई ही काही दिवसात मला कायमची सोडून गेली. रमाकाकूही कायमच्या निघून गेल्या आणि तुम्हीही असे बोलताय.” तो मोठा सुस्कारा टाकत वरती पायऱ्या चढून वर गेला. एकटा पडला होता तो.. आई जाणार हे तर त्याला माहिती होतं तरीही तिचं जाणं त्याच्यासाठी एक धक्का होता. रात्री झोपलेली आई सकाळी उठलीच नव्हती.. कोलमडून गेला होता तो तेव्हा त्याला गरज होती तिची पण ती त्यावेळेस त्याच्याजवळ नव्हती.  तेव्हा याचं लोकांनी आणि त्याच्या जीवलग मित्राने सत्यनने त्याला यातून सावरलं होतं. म्हणूनच आता रामुकाकाच्या शब्दांनी दुखावला गेला होता.


“साहेब..” रामू काकाची हाक ऐकायला पण तो थांबला नाही.

“रागवलेत साहेब.” दुखावलेला तो झपाझप पावले टाकत आत आला. हातातील बॅग बेडघर फेकली. फ्रेश व्हायला बाथरूम मध्ये गेला. शॉवर घेऊन तो टॉवेल गुंडाळून चेजिंग रूममध्ये जाऊन नाईट पॅन्ट घालून तो सरळ बाहेर बाल्कनीत गेला. 

“सर्व मला सोडून गेलेत. एकटा पडलोय ग आई मी.” तो वर आकाशाकडे बघून बोलत होता. 

“भक्ती साडेचार वर्षापासून हे घर सुनं झालं गं. कधी येशील परतून.”

“लवकरच येतील ताईसाहेब. होईल सर्व व्यवस्थित. काळजी करू नका. हे घ्या दूध प्या.” रामुकाका दूध घेऊन त्याच्यासमोर उभे होते.

“ काका, नकोय मला.”

“घ्या साहेब…ताईसाहेब आल्यावर मला ओरडतील रामू काका तुम्ही यांची काळजी घेतली नाही. त्या आले की मी गडावर जाऊन माथा टेकवीन.” रामू काका हात जोडत प्रार्थना करत होते.

“भक्ती इतक्या सहजासहजी तयार नाही होणार काका. मनाचे घाव भरायला वेळ लागतो.”

“भरपूर वर्ष झालीत साहेब. ताईसाहेब ही तिकडे तुमच्या आठवणीत झुरत असतील.”

“खूप त्रास दिलाय काका मी तिला म्हणून तर काहीही न बोलता निघून गेली. आताही तिच्या डोळ्यांत मला वेदना दिसते .. माझ्याबद्दल अविश्वास दिसतो. परत येईल का ती माझ्याकडे?” विश्वराज हताश होऊन जड आवाजात बोलत होता.

“ एक संधी तर तुम्हाला मिळायलाच पाहिजे. मी बोलू का ताईसाहेबांसोबत.”

“नाही काका.. आता काही बोललेलं ती समजून घेण्याचा प्रयत्न करणार नाही .. सद्ध्यातरी भरपूर रागवलेली आहे. योग्य वेळ आल्यावर मी बोलेल. उद्या कॉल करून बघतो तुमच्या ताईसाहेब काय म्हणताय ते..”

“बरं, आता शांत झोपा .” रामूकाका बेडरूमचे दार बंद करत म्हणाले..

“देशील न एक चान्स भक्ती?” तो भक्तीच्या फोटोफ्रेमशी अगतिक होऊन बोलत होता. काहीवेळाने तो झोपी गेला.

********************************************************


“काहीही करून पुन्हा गुंतायच नाहीये. मला लवकरात लवकर परत जायच. इकडे आलेच आहे तर ऑफिसमध्ये जाऊन बघून येते नाहीतर लिली तर नेहमीच असते.” 

भक्ती विचारात गुंतली असताना राज जांभई देत आत आला.

“ मम्मा मला झोप आलीय.” तो आळसावलेला आवाजात म्हणाला.
“हो चल रे पिल्लू .” तिने सगळे विचार बाजूला ठेवून राजला कडेवर घेतले. त्याने त्याचे दोन्ही हात तिच्या गळ्याशी लावून खांद्यावर मान ठेवली आणि लगेच झोपून ही गेला. त्याला व्यवस्थित बेड वर ठेवून त्याच्या अंगावर पांघरून घालून तिही त्याच्या शेजारी आडवी झाली. एका हाताने त्याला थोपटत उद्याचा  विचार करत होती. आजच्या दिवशी जरा जास्तच हेक्टिक झाली असनूही निद्रादेवी प्रसन्न होत नव्हती.. वारंवार आज पाहिलेली त्याची प्रतिमा डोळ्यांसमोर येत होती. मनाच्या एका कोपऱ्यात अजूनही तो तसाच होता ‘फक्त तिचा’.
 “नाही तो .. माझा नाहीये.” एक चुकार थेंब तिच्या डोळ्यांतून घरंगळला.

“माझा फक्त आदी आहे.” “You have hurt me so much Vishwaraj.” तिने डोळे कोरडे केले आणि राज कडे बघतच ती हळुहळू तिचे डोळे मिटले गेले. 

सकाळी लवकर उठून तिने आवरले .. पटापट राजचं आवरून त्याचा नाश्ता भरवत होती.

“बाबाऽऽ मी आपल्या ऑफिसला चालले.”

“अरे वा ! योग्य निर्णय घेतलास, इतक्या मेहनीतीने ऑफिस काढलयं.. प्रामाणिक स्टाफ आहे म्हणून काळजी नाही . तू जातेय ते उत्तमच आहे...”

“हम्म म्हणून म्हटलं इथे आहे तोपर्यंत ऑफिसला जाते.” तिचं ऐकून बाबांनी मनातच कपाळावर हात मारून घेतला.

“देवाऽऽ पांडुरंगाऽऽ या पोरीने एकच पालपूद लावलायं इथून जायचं, इथून जायचं. इथून जाण्यासाठी तिला इथे आणलंय का?” बाबा नाश्ता करतच मनात विचार करत होते.

 नाश्ता आवरून ती एकीकडे राजला इन्स्ट्रक्शन देणं चालू होतं तर दूसरीकडे ती लॅपटॉपमध्ये महत्वाची कामे करत होती.

“मम्माऽऽ तू नको काळजी करू. मी करतो सर्व आणि नानूला वेळवर मेडिसीन देईल.” त्याच्या बोलण्यावर तिने त्याच्याकडे पाहिलं. खूप क्यूट दिसत होता.

“ऑऽऽ माझं बाळ मोठं होतयं.” ती त्याचा लाड करत म्हणाली. तिने त्याला कुशीत घेतले.

“मम्मा मी मोठाच आहो .. तूच मला छोटा समजते.” तो 
गाल फुगवून म्हणाला. तिने त्याचा गाल ओढला.

“हे बघ लहान मुलांचे गाल ओढता तसेच करत असते माझे पण.” तिला तर खूप हसायलाच येत होतं.

“मी माझी आणि नानूची काळजी घेईल तू तुझी घे.. चहा कॉफी जास्त घेऊ नकोस.. लंच वेळवर कर..” राज छोट्याभक्तीला सुचना देत होता.

“ हो रे बाबा..” भक्ती हसून म्हणाली त्याच्या गालावर ओठ टेकवून ती त्यांचा निरोप घेऊन ऑफिसला निघाली. ऑफिसला पोहचताच तिच्या स्टाफने ऑफिसला छान सजवून, गुलाब देऊन, टाळ्या वाजवून तिचं स्वागत केले..


“वेलकम बॅक मॅम ..”

“थॅक्यू ऑल ऑफ यू गाईज … हे करायचं काहीही आवश्यकता नाही. मीही तुमच्यातील एक आहे. आता सर्वांसाठी टाळ्या झाल्याच पाहिजे.” ती उत्साही आवाजात म्हणाली. तिच्या येण्याने सर्व वातवरण उत्साहीत झाले होते.

मग तिनेही त्यांना ट्रिट छोटीशी पार्टी द्यायचं कबूल केलं.  पूर्ण स्टाफ खूपच खूश झाले.

“चला आता नव्या जोमाने उत्साहाने कामाला लागूया .. नवीन कॉन्ट्रॅक्ट नुसार आपल्याला वेळेत ड्रेसेस हजर करायचे आहे..  डू फास्ट ..” तिने सर्वांकडे बघून म्हटले .

“येस  .. सर्व एकाचवेळी उत्साहित होऊन म्हणाले. ती तिच्या  कॅबिनमध्ये गेली. केबिन जशीच्या तशीच होती. लिलीच्या देखरेखी खाली ती केबिन रोज स्वच्छ होत होती. भक्ती आणि लिली शिवाय कोणीही त्या केबिनमध्ये जात नव्हते. पाय बरा झाल्यानंतर विश्वराजने त्याच्या पद्धतीने हे केबिन बनवून घेतली होती.. आत प्रवेश करताच तो ही इथे असल्याचा भास झाला आणि नकळत डोळे ओलावले. 

“ लिलीऽऽ..”

“येस मॅमऽऽ ..” म्हणत तिने आता पर्यंतचा सर्व आढावा भक्तीच्या समोर ठेवला. ती एक एक करून फाइल वरून नजर फिरवत होती. कामात व्यस्त असतांना तिचा मोबाइल वाजला.

क्रमश ..

कोणाचा फोन असेल? आजचा भाग कसा वाटला तर तेही कमेंट मध्ये जरूर लिहा.