भेटली तू पुन्हा !
भाग - सहा
टेबलवरच काम आवरून ती थोडी रिलॅक्स झाली. एक कडक चहा पिऊन ती कामाला लागली.. कोणत्या ड्रेसला डिझायनिंग नूसार कपडा कसा पाहिजे? हेवी वेट, लाईट वेट त्याचे मटेरियल पाहत होती.. त्यानूसार ती आता कामात पूर्णपणे व्यस्त झाली. फोनकॉल करणे सुरू झाले. लिली तिच्या मदतीला होती.. काही फॅब्रिक्स तिला मागवायचे होते त्याची तिने नोंद करून घेतली.
“लिली आपल्या टेक्सटाईल माल सप्लायरांना फोन करून माल मागवून घे.”
“ओके मॅम.. मी आत्ताच कॉल करते.” लिली कॉल लावायला गेली आणि भक्तीने टेप घेऊन, मार्क करून ती फ्रॅबिक्स कट करू लागली. तिने एक एक कपडा डिझायनिंग नुसार कट करून बाजूला करत होती. टेबलवर कपड्यांचा ढिग जमू लागला.. डोळ्यांवर चष्मा, गळ्यात टेप, मेसी झालेले केसांच्या बटा चेहऱ्यावर आल्या होत्या. हातात पेन्सिल आणि जवळच कात्री.. काहीतरी विचार करत होती. ती इतकी कामात गढली होती की तिला आजूबाजूचे ही भान नव्हते. दुरून कोणीतरी तिला एकटक बघत होते.
भक्ती तिच्या कामात इतकी व्यस्त झाली होती की, तिला आजुबाजूचे कसलेच भान उरले नव्हते. व्हाईट शर्ट आणि फुल्ल स्कर्ट परिधान केलेल त्यात गळ्यात टेप अडकवलेला, कामात अडथळा नको व्हायला म्हणून केसांचा बन बांधून घेतला होता आणि त्यात दोन तीन कलर पेन्सिल खोचून घेतले होते. एक पेन्सिल हातात पकडून तर कधी ओठांच्या मध्ये घेत होती. डोळ्यांवर मोठ्या फ्रेमचे ग्लासेस काम करतांना आणि बुक रिडिंग करतांना ती लावत असे. ती कामात पूर्णपणे गुंतली असतांना विश्वराज तिथे येवून तिला एक टक न्याहळत उभा होता. कितीतरी वर्षानंतर तिला समोर पाहून समाधान पसरले होते त्याच्या चेहऱ्यावर..कपड्यांच्या गर्दीत बसून काम करती होती.
“लिली प्लिज एक कडक चहा सांग गं ?” बोलून ती तिच्या कामात लागली. काहीच वेळात चहाचा कप तिच्या जवळच्या टेबलवर ठेवण्यात आला..
“वाह ! खूप गरज होती याची.. थँक्स लिली ..” ती चहाचा सिप घेत म्हणाली. पण समोरून लिलीचा आवाज आलाच नाही.. भक्तीने वळून पाहिलं तर तो तिच्याकडेच बघत होता.
“तू ..तुम्ही.. इथे” ती त्याला पाहून गडबडली . तो असा समोर येईल याची अपेक्षा नव्हती..
“तू ..तुम्ही.. इथे” ती त्याला पाहून गडबडली . तो असा समोर येईल याची अपेक्षा नव्हती..
“आय मीन मिस्टर अभ्यंकर तुम्ही इथे ?” ती स्वतःला सावरत म्हणाली.
“ इकडे जवळ माझी मिटिंग होती. म्हटलं इकडे ही एक नजर बघून घेऊ.” तो तिच्या नजरेत बघून बोलत होता.
“ अं काय म्हणालात ?” ती गोंधळली.
“एक नजर ड्रेसेसचे काम बघून घेऊ..कुठपर्यंत आलयं .” तो त्याचं वाक्य करेक्ट करत म्हणाला.
“ओके. प्लिज हॅव अ सीट मिस्टर अभ्यंकर.” ती चेअर कडे हात केला. विश्वराज चेअरवर बसला. बसून ही तो तिच्याचकडे एक सारखा बघत होता. तिने बेल वाजवली आत ऑफिसबॉय आला. तिने त्याला ब्लॅक कॉफी त्यात नो शुगरची ऑर्डर दिली आणि विश्वराजचे डोळे आनंदाने चमकले. अजूनही त्याच्या आवडी निवडी तिच्या लक्षात होते.
“शीट हे काय केलं मी ..” तिने स्वतःची जीभ दाताखाली दाबली. कॉफीची ऑर्डर देऊन ती स्वतःला दोष देऊ लागली. काम करत असतांना तिला त्याची तिच्यावर स्थिरावलेली नजर जाणवत होती म्हणून ती अस्वस्थ होत होती.. त्या रूममध्ये या दोघांशिवाय तिथे कोणीही नव्हते.
“Mr Abhyankar please don't stare at me. I feel uncomfortable.” ती वैतागून म्हणाली.
“Why.” त्याने तिलाच प्रश्न विचारला. त्याच्या या प्रश्नावर तिने भुवया उंचावल्या. ती बोलायला तोड उघडणार तर ऑफिस बॉय कॉफी घेऊन आला. त्याने कॉफी विश्वराजसमोर पुढे केली.
“अनोळखी माणसाने स्टेअर केलेलं मला आवडत नाही.” ती त्याच्याकडे न बघता म्हणाली.
“कोण अनोळखी?” तो एक भुवई उंचावून.
“मी अनोळखी आहे.” तो एक एक पाऊल तिच्याकडे टाकून पुढे येत होता.
“मी अनोळखी म्हणूनच माझ्याकडे बघायचे टाळतेस की भिती वाटते माझ्या डोळ्यांत बघून स्वतः च्या भावनांवर नियंत्रण राहणार नाही आणि धावत येऊन माझ्या मिठीत येशील.” तो तिच्या नजरेला नजर देत म्हणाला.
“हे आता कधीच शक्य होणार मिस्टर अभ्यंकर.” ती कोरडेपणाने बोलत होती.
“ डोन्ट चॅलेंज मी..” त्याच्या डोळ्यांत एक निर्धार दिसत होता.
“हूँ .. ” तिने नाक फुगवून तिच्या केसांना झटका दिला. तो तिच्याकडे पाहतच राहिला.
“चोवीस तासाच्या आत तू स्वतः माझ्या मिठीत येशील.” तो निश्चयाने म्हणाला.
तिनेही डोळ्यांनीच त्याला डिवचले. त्याची कॉफीही संपली होती आणि लिलीला भक्तीला अपडेट द्यायच्या होत्या आणि एक महत्वाचा कॉल ही आला होता.
“मॅम.” ती काही बोलणार तर समोर विश्वराजला बघून ती गप्पच बसली.
“येस लिली ..”
“मॅम तुमचा फोन कुठेय?”
“अरे डेस्कवरच विसरले.”
“ओके. मी घेऊन येते.” लिली भक्तीचा मोबाइल आणण्यासाठी गेली.भक्तीच्या कॅबिनच्या आत ही रूम होती. तिथेच ती ड्रेस तयार करायला घेत होती. लिली फोन घेऊन तिच्यासमोर पुढे केला.
“मॅम, राजचे खूप मिसकॉल आहेत. मला ही कॉल केला होता.” ती हळूच भक्तीच्या कानात कुजबूजली.
“हम्म दे इकडे.” मोबाइल हातात घेतलाच की त्याची रिंग वाजू लागली.. तिने एकवेळ विश्वराजकडे बघितलं आणि “एस्क्युज मी.” ती सरळ तिच्या केबिनमध्ये गेली.
“ मम्मा तुला माझं सरप्राईज कसं वाटलं? यू लाइक इट.”
“येस अफफोर्स सगळी हेल्दी फूड होत आय लाईक व्हेरी मच..” त्याचा उत्साही आवाज आला त्याचा आवाज ऐकून भक्तीचे ओठांवर हसू आले.
“हो खूपच आवडले मला.”ती हसून बोलत होती.
“मी नानूसोबत बाहेर चाललोय.” राज .
“ओके. टेक केअर. बाय उऽऽऽऽम्मा.” भक्तीने फोनवरच आवाज करत पप्पी दिली. समोरून राजने ही पप्पी दिली. भक्तीने फोन कट केला आणि मागे वळली आणि त्याच्या छातीवर जाऊन आदळली भानावर येत घाई करत तिने पाऊल मागे टाकला. गडबडल्यामुळे तिचा तोल गेला आता खाली पडणार म्हणून तिने डोळे गच्च मिटून घेतले पण ती खाली आपटलीच गेली नाही. तिने हलकेच डोळे उघडून बघितले तर विश्वराजने तिचा एक हात त्याच्या हातात घट्ट पकडला होता. त्याने तिच्या हाताला धरून त्याच्याकडे ओढले भक्ती त्याच्या खूप जवळ आली होती. त्याचा एक हात तिच्या पाठीवर तर एक हात तिच्या खांद्यावर ठेवला होता. दोघांची हृदयाची धडधड वाढली होती.. तिचा मंद मंद सुंगध तो श्वासात भरून घेत होता आणि ती तर तो असा जवळ आल्यावर तिला काही सुचत नव्हते.तिचं इतक्या जवळ येणं तिचा प्रेझेन्स त्याला अनुभवायचा होता. ती इतक्या जवळ आली होती की त्याच्या चेतना जागत होत्या,त्याला कसेतरी स्वतः वर संयम ठेवणं कठीण जात होते. हे क्षण ही तो मनाच्या एका कप्यात सजवून ठेवणार होता त्याच्यासाठी होते. तात्पुरता या आवठणीवर त्याला काही दिवस काढायचे होते. तो एकटक तिच्याकडे बघत होता तर तीही त्याच्या नजरेत गुंतली होती. त्याच्या उबदार स्पर्शाने ती शहारत होती. दोघेही एकमेकांच्या नजरेत आरपार गुंतले असतांना लिली आत आली. दोघेही भानावर येऊन वेगळे झाले.
“सॉरीऽ मॅमऽऽ.” ती मान खाली घालून म्हणाली. विश्वराज उगाचच इकडे तिकडे बघत होता. त्याचा फोन वाजला आणि तो बोलण्यात व्यस्त झाला. भक्ती लिलीच्या जवळ येऊन बोलती झाली.
“आम्ही काय इकडे रोमान्स करत होतो.. खाली पडता पडता त्यांनी सावरलं अचानक ओढल्यामुळे ..”
“पण मी कुठे काय विचारतेय?” लिली गालात हसत होती.
“तुझा गैरसमज होऊ नये म्हणून ” भक्ती न राहवून म्हणाली.
“पण मॅम पाहणाऱ्याला तुम्ही रोमांस करताय असेच वाटेल. ऑऽऽऽ.. क्यूट ना किती प्रेमाने बघत होतात एकमेकांकडे.” लिली हसून हळू आवाजात बोलत होती.
“थोबाड बंद कर तुझं. मी इथ त्यांच्याशी गुलगुल करायला अन् बोलायला नाही आले.” भक्तीने लिलीवर रागचा कटाक्ष टाकला.
“ते फक्त माझ्यासाठी ह्या डिलपुरतेच महत्त्वाचे आहे. ऑर्डर संपली की त्यांचा रस्ता वेगळा आणि माझा वेगळा.. सो लवकरात लवकर ऑर्डर संपवण्याच्या मागे लागं.. इट्स दॅट क्लिअर.” भक्तीचा पारा चढत होता.
“येस मॅम..” लिली बारीक चेहरा करून म्हणाली.
“मी आत जातेय प्लिज मला डिस्टर्ब करू नको.” थोडं मोठ्यानेच बोलली आणि पटकन तिच्या कपड्यांच्या रूममध्ये जाऊन आतून दार लॉक करून टाकले. विश्वराजचा फोन संपला आणि तो मागे वळला त्याला भक्ती कुठेच दिसली नाही पण लिलीचा चेहरा लटकलेला दिसला.
“व्हेअर इज शी.”
“ते आत त्याचं काम करताय…” तो दरवाजा उघडायला गेला तर लिली लगेच म्हणाली, ”सर , मॅमनी डिस्टर्ब करायला नाही सांगितलंय.”
“ओके .Miss Lily take care of her.” विश्वराज बोलून निघून गेला. भक्तीने दरवाजाला टेकून ती खाली बसली.
“विश्वराज का जवळ येण्याचा प्रयत्न करायताय? जवळ घेऊन पुन्हा दूर ढकलायाचं .. हे आता सहन होणार नाही विश्वराज .. राजमुळे सावरली पण आता नाही सहन होणार..” भक्ती रडत बडबडत होती.
‘मला माझं काम लवकर पूर्ण करून निघून जायचं तेही कायमचं.’ ती मनातच निर्धार केला. डोळे कोरडे करून ती तिच्या कामाला लागली. वॉशरूममध्ये जाऊन पाण्याचे हबके चेहऱ्यावर मारले. फ्रेश होऊन बाहेर आली आणि तिच्या कामाला लागली. कटिंग केलेले कापड तिने शिवायला घेतले तेच पूर्ण झाल्याशिवाय ती हातातून सोडणार नव्हती. ड्रेस तयार झाला तेव्हा तिने मेनीक्वीन्स वर घातला सर्व आवरून ती पर्स घेऊन ती बाहेर आली. केबिनमध्येच लिली तिची वाट पाहत बसली होती.
“मॅम आर यू ओके.” ती काळजीने म्हणाली.
“हो मला काय झालं?” ती शांतपणे म्हणाली.
“मॅम तुम्ही तेव्हा गेलात ते आता डोअर ओपन केलयं. किती उशीर झाला आणि राज आणि काकांचे किती फोन आलेत.”
“काय सांगतेस .. माझं वेळेकडे लक्षच नाही राहिलं गं . कसही करून मला आज हाती घेतलेलं काम पूर्ण करायचं होतं आणि मी ते केलं.. हे देवा.. माझा राज, बाबा काळजी करत असतील.” ती घड्याळ कडे बघत लिलीसोबत बोलत होती. घड्याळात रात्रीचे अकरा वाजले होते. सोबत बाबांना फोन लावत होती.
फोन रिंग होताच पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला गेला.
फोन रिंग होताच पहिल्याच रिंगमध्ये फोन उचलला गेला.
“मिठ्ठू, अकरा वाजलेत घरी केव्हा येणार आहेस . मुलगा आणि म्हातारा बाप काळजी करत असतील याचं भान राहिलं नाही का तुला.. मुलगा समजूतदार आहे तक्रार करत नाही म्हणून इतकंही गृहीत धरून त्याला दूर ठेवू नकोस. या वयात लहान मुलांना आईवडिलांचा सहवास पाहिजे असतो. बाप जवळ नाही पण त्याच्या आईने तरी त्याला वेळ देणं गरजेचं आहे. फार कोमजून गेलयं माझं बाळं. कामाच्या वाप्यात एक आई आहे विसरू नकोस मिठ्ठू.” रावसाहेब बापाच्या काळजीने भक्तीची कानउघडणी करत होते. जाणीव करून देत होते. राजला आईवडिलांची गरज आहे. हे बोलण्यातून समजावत होते.
क्रमश ..
तुम्ही काही बोलत नाही म्हणून मी पण आज बोलणार नाही.
©® धनदिपा
७/५/२०२४
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा