भेटली तू पुन्हा !
भाग - नऊ
भाग - नऊ
मागील भागावरून
“मिस रणदिवे ओके सी यू ऑन मन्डे. बाय ” तिच्या उत्तराची वाट न पाहता तो कॅबिनमधून बाहेर पडला.
“ आत काय आहे यांचं मन्डेला.” ती विचार करू लागली.
“मॅम .. चलायचं.” भक्ती लागलेल्या तंद्रीतून बाहेर आली.
“रजत त्याला .” भक्ती
“ त्याला सर्व सांगितलं आहे .” लिलीने भक्तीला बोलू न देता तिच अर्ध वाक्य पूर्ण केलं.
“ त्याला सर्व सांगितलं आहे .” लिलीने भक्तीला बोलू न देता तिच अर्ध वाक्य पूर्ण केलं.
“स्मार्ट गर्ल..” भक्तीने तिचं कौतूक केलं. लिलीने आपल्या टॉपची नसलेली कॉरल सरळ केली.
“आय एम ऑल रेडी व्हेरी स्मार्ट. तेही आईच्या पोटातून ..”
“म्हणून बाहेर आल्या आल्याच लिलावतीच लिली केलसं.” भक्ती तिला चिडवू लागली.
“मॅम प्लिज हळू ना.. तुम्ही ना मला थोडाही भाव खाऊ देत नाही. लगेच हरभऱ्याच्या झाडावरून दणकन खाली आपटता.” ती गाल फुगवून म्हणाली.
“अगं भाव नको खाऊ, चल मी तुला तुझ्या आवडीच खाऊ घालते. ते खा पण भाव नको खाऊ..” भक्ती तिच्या गळ्यात हात टाकत हसत म्हणाली. दोघही शॉपिंगला गेले.. राघवने अर्धे काम करून आला .… राघव अन् लिली सोबत तिच्या आवडता नाश्ता खाऊन झाला. संध्याकाळी सहाच्या सुमारास तिघेही घरी परतले.
पुढे
संध्याकाळी सहाच्या सुमारास तिघेही घरी आले. राघव सामान ठेवून बाहेर निघून गेला.. पाणी प्यायले.
“झाली सर्व खरेदी?” बाबा सोफ्यावर बसत म्हणाले.
“ हो बाबा .. राज कुठंय?”
“तो बसलाय चित्र काढत.”
“ बरं.”
“ओके मॅम .. मी येऊ.”
“अगं आता जेवणच करून जा .” भक्ती लिलीला थांबवत होती.
“नको मॅम .. मगाशीच तर पोटभर खाल्लयं .. आता खरचं नको. पुन्हा कधीतरी येईन. येते मी.”
“ बरं जा .. उद्या लवकर येशील सोबत आईला घेऊन ये.”
“ हो..” लिली घरी निघून गेली.
“जा जाऊन फ्रेश हो ..” भक्ती तिच्या रूममध्ये फ्रेश व्हायला गेली. थंड पाण्याच्या शॉवरखाली उभी राहून फ्रेश होऊन ती राजच्या स्टडी रुममध्ये गेली.. तो त्याच चित्र काढण्यात मग्न होता.. भक्ती त्याच्या बाजूला येऊन बसली तरी त्याचं लक्ष नव्हतं.
“किती सुंदर काढलसं हे .” चित्र बघतिल्यावर ती त्याचं कौतुक करण्यापासून स्वतः ला रोखू शकली नाही.
“मम्मा खरचं तुला आवडलं?”
“हो खरचं खूप छान काढलं आहे.”
“पण या स्केच मध्ये.”
“This is the scene of my dream mommy and daddy.” ती एकटक त्याच्या चेहऱ्याकडे बघत राहिली.. त्याच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता.
“हा त्याच्या डॅडला मिस करतोय.’ ती विचार करत होती..
राज आवर आणि खाली ये ताट वाढायला घेतेय.” तिने सफाईने विषय टाळला होता..
“हो..” भक्ती खाली निघून गेली..
‘राज खरच त्याच्या डॅडला मिस करतोय.. करतोय म्हणूनच ते स्केच काढलयं .. स्वप्नात पाहिले त्याने..’ ती विचार करतच पायऱ्या उतरत होती.
“ताईसाहेब उद्या काय बनवायचं आहे.” रेखा काकू तिला आवाज देत म्हणाल्या..
“हो.. हो.. आले.” ती एकदम विचारातून भानावर येत म्हणाली.
“काय झालं ताईसाहेब हतक्या कसल्या विचारात आहेत?” रेखा काकू म्हणाल्या.
“काही नाही काकू असचं कामाचा विचार करत होते. ते जाऊ द्या आपण उद्याची तयारी करू.” किचनमध्ये जाऊन तिने आणि रेखाकाकू उद्याची तयारीला लागले..
“ मम्मा, भूक लागली.” राज किचनमध्ये येत म्हणाला.
“आले राज .. नानू?”
“नानू टेबलवर बसलेत. तू वाढ पटकन.”
“हो चल .. ती टेबलवर जेवण लावत होती. दोघांनाही ताट वाढून दिलं तिने राजला भरवत ती ही जेवण करत होती..
“ मिठ्ठू, गुरुजी अकराचा वाजता येणार आहे.”
“ बाबा, सगळं तयार आहे. गुरुजी आले की पुजा होईल आणि बाकीचही.”
“हम्म..” जेवण होऊन टेबल आवरून ती डोळ्यांवर चष्मा चढवत लॅपटॉप घेऊन हॉलमध्येच सोफ्यावर बसली.. राज त्याच्या नानूसोबत बाहेर फिरत होता.
“Nanu my dad lives in this city right?” त्याने मध्येच प्रश्न विचारला.
“ तुला कोण बोललं?”
“मम्मा मुंबईला आलीय तेव्हापासून इथून जाण्याचं बोलतेय. तिला इथून लवकरात लवकर जायचं आहे.”
“आज मी स्केच काढले ते माझं ड्रिम आहे असं बोललो तर ती एकदम स्टॅच्यू झाली. जेवायला ये बोलून खाली गेली.”
त्याचं ऐकून तर रावसाहेब शांत झाले.
त्याचं ऐकून तर रावसाहेब शांत झाले.
‘लहान मुले किती निरक्षण करत असता बरं..
आई वडिलांचे,मोठ्यांचे त्यांच्या वागण्याबोलण्याचे.’ रावसाहेब विचार करत होते.
आई वडिलांचे,मोठ्यांचे त्यांच्या वागण्याबोलण्याचे.’ रावसाहेब विचार करत होते.
“नानू कसला विचार करताय ? तुम्ही माझ्या प्रश्नाच उत्तर दिलं नाही.”
“माझे डॅड याच सिटीत आहेत ?”
“ हो … ते याच शहरात आहेत.” ते निरागस मुलासोबत खोटं बोलू शकत नव्हते.
“पण यापुढे मला काहीच विचारू नको. काही गोष्टी सांगायला तू खूप लहान आहेस. योग्य वेळेची वाट पहा. तुझं स्वप्न नक्की पूर्ण होणार.” रावसाहेब त्याला समजवत म्हणाले. राज ने मान डोलावून नानूंच्या कुशीत शिरला.. दोघे आत आले तेव्हा ती लॅपटॉपवर बसून काम करत होती.
“ मिठ्ठू , काम झालचं नाही का? जा जाऊन झोप .”
“हो बाबा झालचं आहे.” तिने लॅपटॉप बंद केला.. राजला दुध आणून दिलं आणि प्यायला लावलं…
“ मम्मा, मी नानूसोबत झोपतो. मला स्टोरी ऐकायची आहे.” राजने दूध पिऊन ग्लास भक्तीजवळ दिला.
“ मग मी सांगते तुला … बाबांना कशाला त्रास …”
“नाही .. मला नानूकडून गोष्ट ऐकायची आहे..”
“ मिठ्ठू, झोपू दे त्याला माझ्याकडे. पण बाबा ..” रावसाहेबांनी हाताचा पंजा दाखवून भक्तीला पुढे बोलण्यापासून थांबवलं.
“ठीक आहे.” दोघही आत रूममध्ये गेले. भक्तीही रूममध्ये येऊन फ़्रेश झाली.. नाईट ड्रेस घालून ती बाल्कनीतल्या चेअर वर जाऊन बसली.. हातातल्या फोटोफ्रेम कडे बघत भुतकाळात हरवली होती. आठवणीने डोळे भरून आले. डोळे बंद करून फ्रेम छातीशी पकडून ती तिथेच झोपी गेली. सकाळी जेव्हा तिला जाग आली तर ती बेडवर होती. तिने बाजूला चाचपडू पाहिलं तर तिथे कोणीही नव्हतं .
“राजs. . तो कुठे गेला..” ती ताडकन उठली. मग तिच्या लक्षात आल्यावर ती शांत झाली..
‘ मी पण ना ..’ ती स्वतःशीच म्हटली.. रात्री मला चेअरवरच झोप लागली पण मी इथे कशी आले.’ ती विचार करू लागली.
‘झोपेत आली असणार बहुतेक ..’ बडबडून ती टॉवेल घेऊन फ्रेश व्हायाला बाथरूम मध्ये गेली.. पटकन तयार होऊन ती बाहेर आली. किचनमध्ये जाऊन ती नाश्ता बनवत होती. नाश्ता बनवून ती राज ला उठवायला बाबांच्या खोलीत आली तर राजही उठलेला होता.
“गुड मॉर्निंग मम्मा ..” भक्तीला समोर बघून राज गोड हसू होत.
“स्वीट मॉर्निग बच्चा .. झोप पूर्ण झाली.” त्याने मान डोलावली.
“ गुड मॉर्निंग बाबा”
“गुड मॉर्निंग मिठठू.”
“नानू, तुम्ही कधी उठलात ? तुमचं आवरूनही झालं?”
“मी केव्हाचाच उठलोय.. बाहेर फिरून आलो. मग पटकन तयार ही झालो.” रावसाहेब हसत म्हणत होते.
“चल आता तू पण आवरून घे पटकन .” भक्ती
“हो .. राज पटकन आवरून घे गुरुजी येतीलच.” रावसाहेब.
राज आज्ञाधारक मुलासारखा लगेच बाथरूममध्ये शिरला. तयार होऊन तो बाहेर आला. भक्तीने नाश्ता डायनिंग टेबलवर लावून बाबांना दिला आणि राजला भरवू लागली.
“ मम्मी तू पण खा.”
“नको मी नंतर खाणार आहे.” त्यांचं खाऊन झालं तसं तिने भरभर आवारायला सुरवात केली. सोबतीला राघव लिली रेखाकाकूही होतेच. गुरुजींचे त्यांच्या शिष्यासोबत आगमन झाले आणि त्यांनी बैठकरूमच्या मध्ये पूजा मांडली. रावसाहेब, भक्ती, आदिराज समोर बसला. गुरुजी त्याच्याकडून पूजा करवून घेत होते. समोरच अंजलीचा फोटो त्यावर पुष्पहार घातलेला होता. अंजलीला जाऊन आज पाच वर्ष झाली होती. सासू नव्हे तर ती भक्तीची आई झाली होती.. आई म्हणून नेहमी तिच्या पाठीशी उभ्या राहिल्या होत्या. दोघी फार कमी वेळ सोबत होत्या. भक्तीच्या निर्णयात त्यांची सहमती दर्शवली होती.. अंजलीच्या आठवणीने भक्तीचे डोळे झरझर वाहू लागले. शेवटच्या क्षणीही त्यांच्या ओठी भक्तीचे नाव होते पण तेव्हा इच्छा असूनही भक्तीला त्यांच्याजवळ जाता आले नव्हते.
“मम्मी, व्हाय आर यू क्राईंग?”
“माझ्या आईची आठवण आली म्हणून.”
“ तू खूप मिस करते त्यांना?”
“हो खूपच मिस करते.”
“God listens to little children so I pray to him send my mommy's mother back to my mommy..” भक्तीने त्याच्या डोक्यावरून हात फिरवून जवळ घेतला.. पूजा संपली .. गुरुजींना व त्यांच्या शिष्यांना भोजन दान, दक्षिणा देऊन ते गेले.. नंतर मंदिरात जाऊन बाहेरच बसणाऱ्या गोर गरीब उपाशी असलेल्यांना राज ने भोजन वाटप केले.. तिथून ते वृद्धाश्रमात गेले. संस्थेत भक्तीने संस्थेत एक चेक दिला आणि ती त्या थकलेल्या आधार नसलेल्या, वृद्धांना काही आवश्यक वस्तू दिल्या.. सर्वांचे मेडिकल चेकअप करण्यात आले.. त्यांच्या सोबत जेवण केलं. राज ही नवीन आजी आजोबांना भेटून आनंदून गेला.. राजमुळे त्यांच्या चेहऱ्यावर थोडावेळ का होईना आनंद पसरला. एक आजीच्या हातात तर अतिशय सुंदर कलाकुसर केलेल्या वस्तू होत्या. झबली, टोपी, स्वेटर विविध प्रकारचे कानटोपी, मोजे अशा वेगवेगळया हिझाईनने बनवल्या होत्या.. भक्तीला ते सर्व लोकरीपासून बनवलेले कपडे आवडले होते आणि ती त्या कपड्यांचा, बऱ्याच वस्तूंचा स्टॉल लावून योग्य त्या भावात विकून मदत करणार होती.. घरी परततांना त्यांना बराच उशीर झाला होता. आदिराज गाडीतच झोपी गेला होता.. त्याला कडेवर घेऊन ती त्याला आत घेऊन आली.. बेडवर त्याला ठेवून त्याचे अलगद कपडे काढून नाईट ड्रेस चढवून त्याच्या अंगावर ब्लॅकेंट ओढून घेतले. तीही टॉवेल घेऊन बाथरूममध्ये बाथ घ्यायला गेली.. गरम पाण्याच्या शॉवर खाली उभी राहून दिवसभरातील शीण दूर झाला. चेंज करून तीही बेडवर आली आणि राजला जवळ घेऊन तिने डोळे बंद केले. निद्रादेवी लगेच प्रसन्न झाली..

खूप दिवसांनी भाग आला आहे पण तब्येत बरी नसल्याने भाग लिहता आली नाही. डोक्यात असूनही मोबाइलमध्ये लिहता येत नव्हते. त्यासाठी मनापासून सॉरी. पुढिल भाग लवकर आणण्याचा प्रयत्न करते.