Login

भेटली तू पुन्हा! भाग - सतरा

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !

भाग - 17


आदिराज जाऊनही तो तिथेच उभा राहून त आदिराज गेलेल्या वाटेकडे बघत होता.. त्याचं मन ओढल्या जात होतं. त्याचा चेहरा अजूनही डोळ्यांसमोरून जात नव्हता.. आदिराजला जवळ घेतल्याने अशांत झालेलं मन काही वेळापुरता शांत झालं होतं.

“ सर मिस्टर सुरजित सिंग आपली वाट पाहत आहे. त्यांना थोड्यावेळात फंक्शनसाठी रेडी व्हायचं आहे.” त्याने डोळ्यांनी होकार कळवला आणि ते सुरजित सिंगला भेटायला गेले.

स्टेज वर जाताच सुरजिंग सिंग चेअर वरून उठून उभा राहिला. अनन्या ही त्याच्या शेजारी उभी राहिली..


“वेलकम वेलकम मिस्टर अभ्यंकर …व्हॉट अ प्लेझंट सप्राईज” विश्वराजच लग्नाला येणं हे त्याच्यासाठी अनपेक्षित होतं. सुरजित आनंदाने बोलत होता. अनन्याने ही त्याच्यासमोर हात जोडले.. अनन्याला अजूनही हे माहिती नव्हतं मिस्टर अभ्यंकर हाच भक्तीचा नवरा आहे.. कधी बघितलं नसल्याने ओळखण्याचा प्रश्नच नव्हता..

“काँग्रॅच्युलेशन बोथ ऑफ यु.” विश्वराने दोघांनाही ग्रिट केले.. सुरजितने अनन्याशी ओळख करून दिली. एका बिझनेस मिटिंगमध्ये ओळख होऊन त्यांनी सोबत दोन तीन प्रोजेक्ट वर एकत्रित काम केले होते. अनन्या ओठांवर सौम्य हसू ठेवून मोजकचं बोलत होती.

“ओके उद्या भेटूया. एयरपोर्टवरून सरळ इकडेच आलो. हॉटेलला जाऊन फ्रेश होतो..”

“आपलं पॅलेस असतांना तुम्ही दुसरीकडे कशाला जायचं. मी रूमवर लगेज पाठवायला सांगतो.” सुरजित म्हणाला.विश्वराजला ही हेच हव होत.

त्याने वेटर्सना इशारा करत जवळ बोलावून घेतले. त्याच्या कानात काही सांगून तो वेटर्स त्या दोघांच्या बॅग्स घ्यायला गाडीकडे गेला. त्याच्या सोबत अमर ही गेला. सुरजितने विश्वराजला संध्याकाळी संगीतसाठी येण्याचा आग्रह केला. त्यावर विश्वराजने होकार कळविला. विश्वराज खाली आला. सुरजित अनन्याला आवरायला सांगून तो ही रूममध्ये निघून गेला.. लिलीने अनन्याच्या कानात कुजबूज केली.


भक्ती रावसाहेबांशी बोलून झाल्यावर राजवर नजर टाकली तर तिथे तो नव्हता म्हणून ती इकडे त्याला शोधू लागली. काही वेळाने राज जवळ आला त्याला घेऊन ती ममता यांच्या जवळ जाऊन बसली. राजला खेळण्यासाठी त्याचे मित्र बोलवायला आले.

“मम्मा मी जाऊ?

“हो इथेच खेळा पण जरा जपून.” भक्तीने सर्वांना सांगितले.

“ हो ..” सर्वांनी एकत्र येऊन सूर लावला.. तिने स्मित दिलं.
लिली आणि अनन्या तिच्याकडे येतांना तिला दिसल्या. त्यांच्या हावभावमुळे भक्तीच्या सावधानतेची घंटा वाजली.. तिने क्षणभर विचार करत होती इतक्यात या दोघी पळायला लागल्या. त्यांना आपल्याकडे धावून येतांना बघून ही पटकन उठून पळयला लागली.

“नाही…” भक्ती पुढे आणि अनन्या लिली हळदीचे हात घेऊन तिच्या मागे धावत होत्या.

“ अनन्या लिली.”

“ काकू हिला काही सांगा हो ..” भक्ती ममता यांना धरून इकडून तिकडून वाचण्याचा प्रयत्न करीत होती. मध्येच त्यांना विनवत होती. ममता या तिघांकडे पाहून हसत होत्या..

“ तुमचं तुम्ही बघून घ्या. मला यात ओढू नका.”


“शांत बसा ना … काय लहान मुलांसारखी पळापळी लावली यार तुम्ही…” ती पळत त्यांच्या तावडीत न येण्याच्या प्रयत्न करत बोलत होती..

“ मग शांतपणे पुढे ये आणि लावू दे आम्हांला हळद.” अनन्या पुढे हळदीचे हात दाखवत होती.

“ मला नाही आवडत प्लिज यार .” भक्तीचा नकार कायम होता..

“ मॅम आम्ही सोडत नसतो तुम्हाला काय अनन्या मॅडम .” लिलीने अनन्याकडे बघून म्हणाली..

“कोई शक !” अनन्या दादाच्या स्टाईलने बोलली.

“ आज ना छोडूंगी तुझे डम डमा डम.” मध्ये अमीर ही आला.

“ अगं तुझ्या नवऱ्याला पीड ना .. मला काय पिडते.” भक्ती तिला सुनावत बोलली.

“ त्याला तर जन्मभर पिडणारच आहे पण त्या आधी तुझा नंबर आहे.” अनन्या हसत प्रत्युत्तर देत होती..

“अगं नवरी आहेस तू , तयार व्हायला वेळ लागेल. कार्यक्रम सुरू होऊन जाईल इथे काय हळद हळद खेळत बसलीस. कसं दिसेल ते काय म्हणतील लोक.” भक्ती अनन्याला समजवण्याचा आणखी एक प्रयत्न करत होती.

“कुछ तो लोंग कहेंगे लोगो का काम है कहना ।” भक्तीचा निष्फळ प्रयत्न अनन्याच्या सुर लावल्याने फेटाळून लावला.

“ छोडो बेकार की बातो में कही बित ना जाए रैना |” लिलीने ही अनन्याच्या सुरात सुर लावून पुढे कंटिन्यू करू लागली.

“ मुर्ख मुली तिचं लग्न आहे आणि काय तू तिच्या वेड्यापणात सामील झाली.” भक्ती लिलाला राग दाखवत होती.

“तुम्ही ही सामील व्हा की मग.” लिली हसून

“ लिली पकड हिला सोडू नकोस.” अनन्या लिलीला म्हणाली. अनन्याला हेवी कपड्यात पळायला जमत नव्हतं.

“आता तर पकडून दाखवच मला.” नाही म्हणून ते ऐकत नव्हते मग तिनेही त्या दोघांना चॅलेंज दिला.

तशी लिली भक्तीला पकडायाला तिच्या मागे धावली.. भक्ती सावध असल्यामुळे तिच्या हाताला लागली नाही तशीच पुढे पळाली आणि पळता पळता पुढच्या व्यक्तीला जोरात जाऊन धडकली.. धडक इतकी जोरात होती की ती व्यक्ती खाली आणि भक्ती त्याच्या अंगावर पडली. हातात त्याचा शर्ट आला होता आणि घाबरून डोळे बंद केले होते.. जरा वेळाने तिला आपण एका व्यक्तीच्या अंगावर पडल्याचे भान आले. त्याच्या मानेजवळ चेहरा असल्याने त्याचा मादक गंध तिच्या नकात शिरला त्या वासाने शहारली ती. स्पर्श ही अनोखळी नव्हता. आता तिला डोळे बंद असूनही माहिती पडलं होतं की तो व्यक्ती कोण आहे. ( बरोबर ओळखल तुम्ही तो विश्वराज आहे.)

स्टेजवरून खाली उतरून तो तिथेच काहीवेळ घुटमळत होता. त्या मुलाला आणि भक्तीला बघत तो इकडे तिकडे शोधत उभा होता. मागे वळून पाहिलं आणि धाडकन त्या मुलीसोबत खाली पडला.. त्याने ही ओळखलं होते. त्याचे दोन्ही हात तिच्या कंबरेवर होते पण तिचे हात मात्र सैल झाले. चेहरा वर करत तिने त्याच्या नजरेला नजर लावता उठण्याचा प्रयत्न करू लागली. तिच्या कमरेवर त्याच्या हाताची पकड घट्ट झाली आणि ती त्या मजबूत मिठीत कैद झाली. तिचा उठण्याचा प्रयत्न व त्याची घट्ट पकड बघून तिने वैतागलेल्या नजरेने त्याच्या नजरेत बघत होती..

“मिस्टर अभ्यंकर सोडा मला.”

“मिस रणदिवे तुम्ही स्वतः येऊन मला धडक देऊन पाडले. पाडले तर पाडले पण मिठी मारली. वरून माझा शर्ट पकडून मला मांजरी सारखे नखं मारलेत आणि म्हणताय सोडा मला. मी तर तुम्ही पडायला नको म्हणून आधार देतोय तर मलाच उलट बोलत आहात.” तो तिला सुनावत होता.

“ मी नखं कुठे मारली ?” ती मोठे डोळे करून त्याच्याकडे बघत होती..

“दाखवू काय?” त्याने लगेच कॉलर बाजूला केली आणि तिथे नखांचे ओरखडे लाल झालेले तिला दिसले..

“सॉरी.. दोन म्हशी मागे लागल्या होत्या. त्यांच्यापासून वाचण्याकरता धावत सुटले आणि समोर तुम्हाला येऊन धडकले. शर्ट पकडतांना मानेवर माझं नखं लागलं. खरच सॉरी.” ती त्याच्या डोळ्यांत बघत त्याची मनापासून माफी मागितली.

“ म्हशी … ते ही इथे ?” त्याच्या डोळ्यांत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

“ हो .. दोन पायांच्या पिवळ्या झालेल्या म्हशी.”

“ पण आज तर सगळेच पिवळे दिसताय.”

“ यातल्याच त्या .. चांगलं बघतेच त्यांच्याकडे.” इतकं होऊनही ती त्याच्या अंगावर पडूनच बोलत होती..

यांना लपून पाहणारी लिली हसत होती..

“येसऽऽऽ .. ढॅडणऽऽ .. ढॅडणऽऽ .. ” सुर लावून नाचायाला लागली.. तिला असं वेड्यासारखं नाचतांना बघून एक राजस्थानी पेहराव परिधान केलेली आजी तिच्या जवळ येऊन बोलली,

“ बेटा थोडी देर में संगीत शुरू होने वाला है। तब नाच लेना अब अकेलेही नाच रही हो।”

“दादीजी , तब में नाचूंगी ही, लेकीन अब खुशी ऐसी हुई है ना की पुछो ही मत.” तिने त्या आजीला आनंदाने मिठी मारली. त्या आजीनेही तिच्या पाठीवर हात फिरवला..

“ सदा हमेशा खुश रहो बेटा.” ती हसून बोलली.

“थॅक्यू दादीजी.” लिलीने तिच्या पायांना हात लावला.

विश्वराज इकडेतिकडे शोधत होता तेव्हाच लिलीने त्याला पाहिले होते मग तिने अनन्याला घेऊन मागे लागून पळण्याचा प्लॅन करत जोरात धडक घडवून आणली होती.. ती विश्वराजच्या अंगावर पडली म्हणून अनन्याने लिली कडे पाहिलं. ती पुढे जाऊन भक्तीला सावरायला जाणार तर लिलीने तिच्या हाताला पकडून बाजूला आणले..

“अग ती खाली पडली आणि तू मला बाजुला काय आणतेस. लागलं असेल तिला .. मला काही म्हणाली तर मी तुझाच प्लॅन होता हे सांगेल.”

“मॅडम थोडा वेळ असेच थांबू द्या हो त्यांना .”

“ पण का थांबू द्यायचं भक्तीला खाली पडण्यापासून वाचवलं थॅक्स टू बट आता आपण तिथे जाऊया.”

“ या नवरा बायको साठी खास जुगाड केलाय मी.” भक्ती हसून म्हणाली..

“नवरा बायको ..” हे ऐकून अनन्याला आश्चर्यचा धक्काच बसला.

क्रमश..

वाट बघत होतात ना जेव्हा विश्वराजला कळेल की मिठीत आलेला आदिराज हा त्याचाच मुलगा आहे. तेव्हा काय होईल?कशी असेल त्या रिॲक्शन? यासाठी भक्तीला माफ करेल का? आणि आदिराज समजेल त्याचे वडिल कोण आहेत? उत्सुक आहात मग भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत छान छान कमेंट करून प्रतिसाद द्या.