Login

भेटली तू पुन्हा ! भाग - अडतीस

भक्ती विश्वराज
भेटली तू पुन्हा !

भाग - 38


भक्तीने रावसाहेबांना फोन लावला..

“बाबा आबांची तब्येत कशी आहे?”

“… .”


“ बाबा..”


“ बरं बोलते मी ..”

“ राज.. पण त्याला काय बोलू बाबा ?”

“ आता झोपले ते .. बोलावं तर लागेलच मिठ्ठू.”

“ उद्या सकाळी निघते.”

“ काळजी घ्या मिठ्ठू… हवंतर त्यांना बोलून घ्या .. एकट्या असल्यावर घाबरतात तुम्ही.”

“ बाबा .. मी काय लहान आहे का? बाहेर सिक्युरीटी आणि गार्ड पण आहेच ना … जाऊ द्या ठेवते फोन .” तिने लगेच एक नंबर फिरवला.

“ मला भेटायचं आहे तेही आत्ताच्या आत्ता.” एवढं बोलून तिने फोन कट केला. घरी येऊन ती तिच्या रूममध्ये गेली. राजचा फोटो हातात घेतला.


“ घरी आल्याबरोबर तू डोळ्यांसमोर असतोस पिल्ल्या. खूप आठवण येतेय रे .. पहिल्यांदाच गेला ना मला सोडून.” ती फोटोकडे बघून बोलत होती.. राजच्या फोटोवर ओठ ठेवून तिने ती फोटोफ्रेम टेबलवर ठेवली आणि ती कपडे घेऊन ती बाथरूममध्ये गेली. शॉवर घेऊन नाईट ड्रेस अंगावर चढवून ती खाली आली तर विश्वराज आत येतांना दिसला..

“ काकू ..” रेखा काकूंनी विश्वराजला पाणी दिलं.

“ काकू खूप भूक लागली आहे वाढायला घ्या ना.”

“ हो ताईसाहेब तुम्ही टेबलवर बसा..”

लिली ही फ्रेश होऊन बाहेर आली होती..

“गुड इवनिंग सर तुम्ही ही जेवणाला बसा.”

“ नाही मी माझ्या घरी जाऊन जेवेल आता महत्वाचं बोलयचं होतं म्हणून इकडच आलो.” तो भक्तीकडे एक नजर टाकत म्हणाला.

“ हे ही तुमचंच घर आहे सर .. प्लिज बसा .”

“ मिस्टर अभ्यंकर आधी जेवण करून घेऊ मग बोलूया प्लिज बसा.” ती त्याच्याकडे बघत म्हणाली.

“ मला फ्रेश व्हायचं आहे. तिथून जसाच्या तसा इथच आलो.” विश्वराज तिच्याकडे बघत म्हणाला .


“ वरती उजवीकडची दूसरी रूम तिथे जा.” लिली पटकन बोलून गेली. भक्ती मोठे डोळे करू तिच्याकडे बघत होती.. लिलीने भक्तीकडे दुर्लक्ष करत होती. विश्वराज पटपट पायऱ्या चढत वरती गेला.. भक्तीच्या फोनवर लवकर बोलण्याने बाकीच अमरला सोपवून तो गाडीत बसून इथे आला होता.

“ काय झालं मॅम .. असं काय बघताय माझ्याकडे?”

“ तुला दुसरी कोणतीच रूम दिसली नाही का?” भक्ती तिच्या डोक्यात टपली मारत म्हणाली.


“ ते काय गेस्ट आहेत का गेस्ट रूममध्ये राहायला.. या घरचे जावाईबापू आहेत जा वा ई बा पू.” ती एक एक शब्दावर जोर देत म्हणाली.

“ बस झाली नाटक .. ये बस ..”
“ त्यांना येऊ द्या ना आधी. आपण बसले तर कसं दिसणार ते.” दोघही त्याची वाट पाहत तिथेच बसल्या होत्या.. शेजारच्या बंगल्यातून विश्वराजचा एक नोकर माणूस एक बॅग घेऊन आला.

“ हे सरांनी मागवलं.” भक्ती ने हातात घेतलं आणि ती द्यायला ती वरती तिच्यारूम मध्ये आली.

“ मिस्टर अभ्यंकर ..” तिने बाथरूमच्या दारावर टकटक केली.

“टॉवेल प्लीज.” आतून त्याने आवाज दिला.. मोठा श्वास घेऊन तिने कपाटातून टॉवेल काढून दारावर टकटक केली. हलकसा दार उघडून त्याने हात बाहेर काढला. तिने पटकन त्याच्या हातात टॉवेल देऊन ती बाहेर आली. तयार होऊन तो खाली निघून आला. दोघही त्याची डायनिंग टेबलवर बसून वाट बघत होते.. भक्तीने तिघांना ताट वाढले.


जेवण झाल्यानंतर भक्तीने बोलायला सुरवात केली..

“आबांची तब्येत बरी नाहीये. आपल्याला सोबत गावाला जायचं आहे.”

“ हम्म …सकाळी रेडी रहा लवकर निघू.” तो उठून बाहेर जायला सोफ्यावर उठला.


“ सर आता कुठे निघालात? इथेच थांबा… हो की नाही हो मॅम.” लिली भोळा चेहरा करून भक्तीकडे बघत होती. भक्तीचा होकार गृहित धरून लिली विश्वराजला म्हणाली होती. आता तर भक्ती काही बोलू शकत नव्हती..

“ हो.. राजची रूम आहे. ” तिला तर होकार द्यावाच लागला होता पण आता लिली विश्वराजला एकाच रूम मध्ये राहण्याचा आग्रह करण्याच्या आधीच भक्ती बोलून गेली होती..


“ मला झोप येत आहे गुड नाईट मॅम .” लिली मुद्दाम मोठी जांभाई देत म्हणाली..


“ गुड नाईट.” दोघं ही एकत्र म्हणाले. लिलीने दोघांकडे पाहिले पण ते एकमेकांकडे बघत सुद्धा नव्हते.. तीही गुडनाईट म्हणाली आणि वर आली.. राजच्या रूममध्ये जाऊन बेडवर वरचा टेडी तिने टेबलवर ठेवला.. बेडशीट अंथरूण ब्लॅकेट काढून बेडवर ठेवून ती बाहेर पडली.. विश्वराज बाहेरच उभा होता. विश्वराज तिच्याकडेच बघत होता.. ती त्याच्या समोर उभी राहिली.

“ गुड नाईट मिस्टर अभ्यंकर .” तिने औपचारिकता दाखवली..

“ भक्ती ..” त्याने तिला हाक मारली. ती थांबली

“ आज तुम्ही ही खूप थकलेले आहात आणि मी ही उद्या बोलूया.” ती मागे न वळता म्हणाली.

“ ओके.. गुडनाईट .” तो ही बोलून लगेच रूममध्ये निघून गेला.

भक्ती तिच्या रूममध्ये आली. आज दिवसभराची धावपळ सुरू होती तरीही तिच्या डोळ्यांवर झोपेचा अंमल दिसत नव्हता..

अचानक आबांची म्हणजेच रावसाहेबांच्या काकांची तब्येत बिघडली असल्याने त्यांनी तिला तिच्या नवऱ्याला सोबत बोलवलं होतं .. मोठा प्रश्न राजचा होता.. कसं सांगणार आहे त्याला, हा प्रश्न सतत तिला भेडसावत होता.. अस्वस्थ होऊन ती रूममध्ये येरझऱ्या मारत होती. मध्येच बाल्कनीत जात होती.. गावाकडच्या मंडळींना तर त्याचं वेगळ होण्याच माहित नव्हतं. रावसाहेबांनी ही विशेष त्यांना कळू दिलं नव्हतं.. आज आणि उद्या ते तिला इथे आणणार होतेच.. तिच्याही न कळत तिच्यासाठी बरच काही केल होतं त्यांनी..


विश्वराज रूममध्ये आल्यावर सर्वांत आधी त्याचं लक्ष वेधून घेतलं ते आदिराजच्या भितांवर लावलेल्या फोटोने. ज्यात भक्तीने त्याला जवळ घेतले होते आणि आदिराजने तिच्या गालावर ओठ ठेवले होते. आदिराज त्या रूममध्ये कधी झोपायला जात नव्हता त्याच्या आईजवळ नाहीतर त्याचे नानू पण भक्तीने त्याच्या खेळणं इतर ऍक्टिव्हिटी साठी रूम तयार केली होती.. बेड जवळच्या टेबलवर आदिराजची एक फोटोफ्रेम दिसली. त्याने उचलून त्या फोटोवर अलगद प्रेमाने हात फिरवला..

“आय मिस यु चॅम्प.” डोळ्यांच्या कडा पाणावल्या. एक बाप असूनही त्याला त्याच्या मुलापासून दूर राहत होता.. एक बाप म्हणून तो अजूनही भक्तीला माफ करायला तयार होत नव्हतं. पुन्हा इथे आल्यावर त्याचा राग उफाळून वर येत होता. हाताच्या मुठी आवळल्या जात होत्या. तितक्यात त्याचा मोबाइल वाजला..

‘बाबांचा फोन आत्ता… आबांना काही..’ त्याच्या मनात शंका निर्माण झाली. काळजीने त्याने पटकन कॉल उचलला.

“ बाबा .. सगळं ठीक आहे ना तिकडे.”

“ हो इथे सर्व ठीक आहे..” रावसाहेब शांत स्वरात म्हणाले. “आम्हाला तुम्हाला काहीतरी द्यायचं होतं पण तुम्ही तेव्हा नवीन प्रोजेक्ट मध्ये बिझी होतात मग तुमच्या सोबत भेट ही झाली नाही. आमच्या रूममध्ये कपाटात असलेल्या ड्रॉवरमध्ये एक लाकडी पेटी आहे. ती पेटी तुमच्यासाठीच आहे. तुम्ही घेऊन या.”


“ पण बाबा आत्ता यावेळी .”

“ हो .. असे ही आज तुम्हाला झोप येत नसलेच त्यापेक्षा तुम्ही ते घेऊन त्यात जे आहे ते एकदा बघा . ”

रावसाहेबांनी फोन ठेवून दिला.. विश्वराज लगेच त्यांच्या रूममध्ये गेला. कपाट उघडून समोरच एक लाकडी पेटी दिसली. त्याने घेतला आणि दार बंद करून तो आपल्या रूममध्ये आला. त्याने ती पेटी उघडली त्यात एक पेनड्राइव्ह होता.

‘पेन ड्राइव्ह ? यात काय आहे असं? बाबांनी आता बघायला सांगितलं म्हणजे काहीतरी असेल.’ विचार करत त्याने अमरला कॉल करून त्याचा लॅपटॉप घेऊन बोलवलं. अगदी पंधरा वीस मिनटात त्याचा लॅपटॉप त्याच्या हातात होता.अमर रूममध्ये आला..

“ अमर, मी काही दिवसांसाठी गावी जातोय. .”

“ ओके. नो प्रोब्लम सर .. मी इथे सर्व बघून घेईल..”

“ आय नो.”

“ गुड नाईट सर.

“ गुड नाईट.” अमर निघून गेला. त्याने पटकन पेनड्राइव्ह त्याच्या लॅपटॉपला कनेक्ट केला..


फाईल उघडल्या गेली.. त्यातून पहिलं फोल्डर उघडून त्यावर त्याने क्लिक केलं आणि समोर आला एक व्हिडिओ.. ते पाहून त्याचे डोळे मोठे झाले. हृदयाची धडधड वाढली आणि डोळ्यांतून अश्रू बाहेर आले.